तू घरात नसताना आज जरा थंडी वाजली
मायेची माणसं गेली की उब पण रहात नाही
जरा रेंगाळतच पडलो होतो बिछान्यावर
बरेच लोळून झाले पण झोप काही आली नाही
आख्खी चादर लपेटून घेतली अंगाला
पण तुझ्या मिठीची सर काही आली नाही
तूझी आठवण मोजता मोजता पहाटच झाली
पण आठवणींचे गणित काही सुटले नाही
तू घरात नसताना आज जरा थंडी वाजली
मायेची माणसं गेली की उब पण रहात नाही
- अडाणि.
प्रतिक्रिया
7 Mar 2009 - 1:55 pm | परिकथेतील राजकुमार
वा सुंदर कविता :)
ह्या कवितेमुळे संदिपची 'नसतेस घरी तु जेंव्हा' आठवुन गेली !
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य
7 Mar 2009 - 2:24 pm | अमोल केळकर
असेच म्हणतो
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
7 Mar 2009 - 8:24 pm | प्राजु
नसतेस घरी...ची आठवण झाली.
नभ फाटून वी़ पडावी, कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते अन चंद्र पोरका होतो....
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
7 Mar 2009 - 2:41 pm | जागु
अडाणी कुठे गेलेय तुमची ती ? माहेरी का ?
कविता छान आहे.
7 Mar 2009 - 8:11 pm | क्रान्ति
तुझी आठवण मोजता मोजता पहाटच झाली
पण आठवणींचे गणित काही सुटले नाही!
खूप छान कल्पना!
क्रान्ति
8 Mar 2009 - 12:01 am | अडाणि
परदेशी गेलीय... ओफीसच्या कामासाठी...
प्रतिक्रीयेबद्दल सर्वांचे आभार.
अफाट जगातील एक अडाणि.
8 Mar 2009 - 12:11 am | लवंगी
तुमच्या तीला नक्की वाचुन दाखवा..