अगदी स्पष्ट आठवते.
टेकडीचा रस्ता. उतरलेली उन्हे.
तुझा हात, विस्कटलेले केस
ओलेते डोळे अणि तापलेले श्वास.
काही क्षणांचा प्रवास.
दरम्यानचे वाढलेले अंतर
मनाच्या इच्छा, मिठीच्या अपेक्षा.
पण आपण ठरलो नदीचे दोन किनारे.
आज इतक्या दिवसानंतर डोळे न्याहाळाताहेत
खिडकीच्या झरोक्यातून आत येऊ पहाणार्या
आंब्याच्या डहाळीला.
हि फांदी मी कितीतरी वेळा तोडली असेल.
पण काहि दिवसांनतर ती पुन्हा हिरवी होते.
परत एकदा घरात डोकावन्याकरीता आतुर.
मग विशाद वाटतो.
किती निरंतरता आहे तिच्या प्रयासात
आणि किती निर्बलता होति माझ्या प्रयासात.
प्रतिक्रिया
27 Feb 2009 - 6:12 pm | लिखाळ
मस्त !.. आवडले !
-- लिखाळ.
27 Feb 2009 - 8:48 pm | प्राजु
किती निरंतरता आहे तिच्या प्रयासात
आणि किती निर्बलता होति माझ्या प्रयासात.
क्लास!!!!!
विचार करण्यासारखंच आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/