म्यां नवल पाहिले---पुलाउ ओरांग उतान

वैशाली हसमनीस's picture
वैशाली हसमनीस in जनातलं, मनातलं
19 Feb 2009 - 7:54 pm

मलेशियादेशावर निसर्गाचा वरदहस्त असल्यामुळे निसर्गातील अनेक चमत्कार येथे बघायला मिळतात परंतु मानव आणि वन्यजीव यांची सांगड घालणारे एक नवलही मला येथे ''पुलाउ ओरांग उतान'' येथे पहायला मिळले.

पुलाउ म्हणजे बेट या बेटावर ओरांग उतान ह्या मानवसदृश वानरांचे संवर्धन , पुनर्वसन, संशोधन , निगराणी इ. कार्य केले जाते. सिंगापूर ते थायलंड ह्या महामार्गावर कोलालंपूरपासून साधारण २ ते २.३० तासांवर 'बुकिट मेराह' नावाचे प्रेक्षणीय स्थळ आहे. तिथून 'मरिना'या गावापासून जेटीने बेटावर पोहोचता येते. सुमारे ५ एकर जमिनीवर हे केंद्र उभारले आहे. सन १९९९मध्ये तीन ओरांग उतान येथे आणले गेले, आज त्यांची संख्या २३ आहे. अशाप्रकारचे हे जगातील पहिले केंद्र आहे.

आम्ही बेटावर पाउल ठेवताक्षणीच एका स्मितवदनेने आमचे स्वागत करून काही सूचना दिल्या. कोणत्याही प्रकारचा आवाज न करणे कारण ओरांग उतान हा अतिशांतताप्रिय प्राणी आहे, तसेच काहीही खाऊ व पिऊ नये. आमच्यापुढे पर्यायच नव्हता. मान हलवून आम्ही एका बोगदावजा पिंजऱ्यात पाय टाकला. बाहेर खुले जंगल आणि आम्ही मात्र पिंजऱ्यात ! एक महाकाय , प्रचंड नरवानर दिसला̱. गाइडने ओळख करून दिली, 'हा माइक'माइकचा भयंकर आकार बघून थोडी भीतीच वाटली. सत्तावीस वर्षे वयाच्या माइकला चार बायका होत्या.गरीब बिचार्या त्याच्या पुढे पुढे करीत होत्या . तो मात्र त्यांच्याकडे लक्षही देत नव्हता. बीजे नावाच्या अन्य वानराशी मारामारी करून त्याचा पाडाव करून तो कळपप्रमुख बनला होता. बीजे निराशावस्थेत गेला होता. माइकचे वजन २२० किलो.

माणूस आणि ओरांग उतान ह्या दोहोत ९८% साम्य, त्यामुळे पहिली ३ वर्षे त्याची वाढ आपल्या मुलांसारखीच होते अशी गाइडची माहीती.

त्यानंतर आमचा मोर्चा गाइडने हॉस्पिटलकडे वळविला. तिथले एक योग्यवेळेपूर्वी जन्मलेले बेबी ओरांग उतान होते. इनक्यूबेटरमधून तिने ते काढून दाखविले. महाशयानी एकवार आमच्याकडे उपकारार्थ नजर टाकली आणि मान फिरविली. त्यापुढे ३ बेबी कॉटस होत्या.

ते त्यांचे के. जी. स्कूल. तिथे 'एप्रिल'नामक एक ७ महिन्यांचे पिलू पाहिले.

स्वारी प्रथम आमच्याकडे बघायला तयार नव्हती , मग मात्र लाजून वगैरे दाखविले. तिचे डोळे फारच सुंदर होते. 'एप्रिल इज अ ब्युटिफूल गर्ल' गाइडचा सही रिमार्क ! एप्रिलमध्ये जन्मली म्हणून नाव एप्रिल. पुढे त्यांची प्राथमिक शाळा. तिथे दीपावलीत जन्मलेली 'दीपा' ती पोत्यांच्या झोपाळ्यावर झुलत होती.
ती इतकी धीट होती की विचारूच नका.
त्यानंतर त्यांची माध्यमिक शाळा पाहिली आणि वर्गात शिक्षक नसताना ७वी८वीतील मस्ती करणारी मुले आठवलीं.
broken image

नुसता धुडगूस, मारामारी इ. ओरांग उतानची घरटी पाहिली.

त्यानंतर १५ मिनिटांचा स्लाइड शो. संपूर्ण वेळ १.३० तास. पण ह्या एवढ्याश्या वेळात आलेला अनुभव इतका चांगला वाटला की तो आपणा सर्वाना सांगावासा वाटला म्हणून हा लेखनप्रपंच ! भारतातून निघणाऱ्या कोणत्याही सहली मलेशियातील हे आपल्या पूर्वजांचे आदिमानवाचे नयनरम्य, लहानथोर सर्वांनाच भावणारे , प्रेक्षणीय स्थळ दाखवित नाहीत ही खेदाची बाब. ह्या केंद्राची महत्त्वाची गोष्ट ही कि येथील ओरांग उतानना जन्मल्यापासून सर्व प्रकारचे शिक्षण देउन नंतर साबा सरावाच्या जंगलात सोडून दिले जाते. त्यांच्या योग्य वाढीसाठी वातावरण निर्माण केले जाते. आपल्या ह्या पूर्वजाची काळजी आपणच घ्यायला नको कां?

प्रवासअनुभवआस्वाद

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2009 - 7:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण लेखन आवडले !

अवलिया's picture

19 Feb 2009 - 7:58 pm | अवलिया

छान

फोटो मोठे करा ना! एक चित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे असते असे म्हणतात.

--अवलिया

प्राजु's picture

19 Feb 2009 - 8:08 pm | प्राजु

महिती सुरेख आहे. फोटो तेव्हढे मोठे करा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शाल्मली's picture

19 Feb 2009 - 8:45 pm | शाल्मली

महिती सुरेख आहे. फोटो तेव्हढे मोठे करा.

असंच म्हणते.

--शाल्मली.

अनामिक's picture

19 Feb 2009 - 9:32 pm | अनामिक

हेच म्हणतो.
फोटो मोठे असते तर अजून मजा आली असती.

अनामिक.

समिधा's picture

19 Feb 2009 - 9:56 pm | समिधा

महिती सुरेख आहे. फोटो तेव्हढे मोठे करा.

समिधा's picture

19 Feb 2009 - 9:56 pm | समिधा

महिती सुरेख आहे. फोटो तेव्हढे मोठे करा.

वैशाली हसमनीस's picture

20 Feb 2009 - 4:03 am | वैशाली हसमनीस

खूप प्रयत्न करूनही फ्लिकरवर फोटो अपलोड न झाल्यामुळे पिकासावर फोटो अपलोड करावे लागले.पिकासाचा साइज तेवढाच आहे त्यामुळे क्षमस्व.

ढ's picture

20 Feb 2009 - 11:31 am |

वैशाली ताई,

विसुनानांनी इथे सांगितले आहे तसे करा.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

20 Feb 2009 - 1:20 pm | घाशीराम कोतवाल १.२

असेच म्हनतो
तुम्ही अगदी फुकटात सहल घडवलीत हो
मस्त आहे तुमचा लेख

**************************************************************
शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप||
शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||

विसोबा खेचर's picture

20 Feb 2009 - 6:43 am | विसोबा खेचर

सुरेख लेख..

काय हो वैशालीतै, पत्ता काय तुमचा? बर्‍याच दिवसांनी मिपावर दिसत आहात. रागावला होतात की काय मिपावर? :)

तात्या.

वैशाली हसमनीस's picture

20 Feb 2009 - 11:19 am | वैशाली हसमनीस

तात्या,मिपावर राग वगैरे नाही.दोन महिने डोंबिवलीत होते त्यानंतर इकडे येताना भारतीय पाहुण्यांना घेऊन आले.त्यामुळे मिपावर यायला वेळ मिळाला नाही. आता २-३ लेख टाकायचा विचार आहे.

सहज's picture

20 Feb 2009 - 6:56 am | सहज

ऍनीमल प्लॅनेट / डिस्कव्हरीवर पाहीले होते. तुम्ही जाउन आलात वा वा.

पिल्लु ओरांग उटानला हात लावू देतात का?

माहीतीपूर्ण अवांतर - "ओरांग उटान" हा शब्द मलय भाषेतील ओरांन [लोक] व उटान [का हूटान म्हणजे जंगल] या शब्दापासुन आला आहे. थोडक्यात "बनमानूश". जंगलात रहाणार्‍या आदिवासींना "ओरांग असली" [आदी/मूळ रहीवासी]

वैशाली हसमनीस's picture

20 Feb 2009 - 11:26 am | वैशाली हसमनीस

आपली माहिती बरोबर आहे.ओरांग उतान म्हणजे जंगली मानव म्हणजेच आदिमानव. ह्याला इतर वानरांप्रमाणे शेपटी नसते.

सुनील's picture

20 Feb 2009 - 2:14 pm | सुनील

छान माहिती.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दशानन's picture

20 Feb 2009 - 2:19 pm | दशानन

मस्त फोटो व सुंदर माहीती... आवडली !

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D