मिपाकरांना व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा देणारी प्राजूची 'कधी येशील कोंदणी??...' ही कविता वाचल्यावर आमच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले नसते तरच नवल.
कशी येशील कोंदणी??...
तुझा चालणारा ढीग, जणू काजळाचा मेघ
मुळी सोसावेना वेग, पडे जमिनीला भेग
धनुष्य का भिवईचे, कोरूनसे काढलेले
डोळे तांबारले कसे, म्हशीसम रोखलेले
रंग त्यांचा भला बुरा, तिरळा का असे जरा?
पापण्यांचा गं पिसारा, रंगवुनी मस्कारा
कुंतल ते चार काळे, का सोडशी मोकळे?
लाव मेंदी ग तू खुळे, आरशाशी घुटमळे
मोठी तुझी गं जिवणी, नको रंगवूस राणी
बोलतेस जीवघेणी, भीतीने मी पाणी पाणी
तुझे हासणे ते 'मंद', वाटे व्हावे मद्यधुंद
दिसे ओठातून कुंद, पिवळ्याशा फळ्या बंद
जरी तुला मी टाळतो, का स्वप्नांत पाहतो?
तुझ्या भीतीने उठतो, घाम पुसत राहतो
श्वासाश्वासात गं राणी, चोंदल्या त्या आठवणी
जशी धान्याची तू गोणी, कशी येशील कोंदणी?
चतुरंग
प्रतिक्रिया
11 Feb 2009 - 9:19 pm | धनंजय
"मेघ" (काजळाचा मेघ!) उपमा मूळ कवितेपक्षा सरस वापरली आहे ;-)
11 Feb 2009 - 11:29 pm | संदीप चित्रे
पहिल्या दोन ओळींतच फुटलो ना रंग्या :)
>> श्वासाश्वासात गं राणी, चोंदल्या त्या आठवणी
जशी धान्याची तू गोणी, कशी येशील कोंदणी?
या ओळी तर खासच आहेत :)
11 Feb 2009 - 9:21 pm | लिखाळ
वाहवा ! फारच जोरदार.
काजळाचा मेघ, पिवळी फळी, चोंदलेल्या आठवणी..मस्तंच :)
-- लिखाळ.
11 Feb 2009 - 9:22 pm | प्राजु
वाटच पहात होते मी....
मस्त मस्त.
धनंजय यांच्याशी सहमत आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Feb 2009 - 9:42 pm | शितल
चतुरंगजी,
=))
11 Feb 2009 - 10:06 pm | त्रास
+११११११
ग्रेट
11 Feb 2009 - 11:16 pm | llपुण्याचे पेशवेll
+१
ग्रेट.
असेच म्हणतो
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
11 Feb 2009 - 11:54 pm | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =))
रंगासेठ, सलाम यार तुला.
बिपिन कार्यकर्ते
12 Feb 2009 - 12:14 am | घाटावरचे भट
रंगाशेठना सलाम.
12 Feb 2009 - 8:33 am | वल्लरी
असेच म्हणते.. :)
---वल्लरी
12 Feb 2009 - 5:35 pm | दशानन
हेच म्हणतो
11 Feb 2009 - 10:07 pm | अवलिया
मस्त !
--अवलिया
11 Feb 2009 - 10:49 pm | मीनल
ती हिरकणी कुठे आणि ही कुठे?
आपली कुठली आहे ते ज्याच त्यान ठरवाव. :))
आपली अशी असेल तर तशी असावी हे स्वप्न पहाव.
मीनल.
11 Feb 2009 - 10:56 pm | बेसनलाडू
झकास रंगाशेठ!
(हसरा)बेसनलाडू
12 Feb 2009 - 12:27 am | भडकमकर मास्तर
चालणारा ढीग,पिवळ्याशा फळ्या,, चोंदल्या आठवणी... :)
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
12 Feb 2009 - 8:14 am | अनिरुद्धशेटे
>श्वासाश्वासात गं राणी, चोंदल्या त्या आठवणी
जशी धान्याची तू गोणी, कशी येशील कोंदणी?
एक्दम सही विडंबन
12 Feb 2009 - 8:20 am | आनंदयात्री
एक नंबर विडंबन.
12 Feb 2009 - 8:20 am | मदनबाण
मोठी तुझी गं जिवणी, नको रंगवूस राणी
बोलतेस जीवघेणी, भीतीने मी पाणी पाणी
हाहाहा...सॉलिट्ट्ट...
मदनबाण.....
देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.
12 Feb 2009 - 8:30 am | राघव
तुम्ही भारी आहात..
खूप वेळ हसत होतो :)
मस्त विडंबन.
मुमुक्षु
12 Feb 2009 - 2:01 pm | दत्ता काळे
तुझे हासणे ते 'मंद', वाटे व्हावे मद्यधुंद
दिसे ओठातून कुंद, पिवळ्याशा फळ्या बंद
हा . . हा . . मस्तंच.
12 Feb 2009 - 3:22 pm | श्रावण मोडक
भारीच.
12 Feb 2009 - 5:33 pm | अनिल हटेला
तुझा चालणारा ढीग, जणू काजळाचा मेघ
मुळी सोसावेना वेग, पडे जमिनीला भेग
पहील्या कडव्यातच फुटलो !!!!! =)) =))
रंगाशेठ ,हॅपी वॅलेंटाईन बरं!! ;-) :D
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
12 Feb 2009 - 9:41 pm | चतुरंग
आणि प्रतिक्रिया देणार्या सर्वांचे आभार!!
(सराफ) चतुरंग
13 Feb 2009 - 2:14 am | विसोबा खेचर
श्वासाश्वासात गं राणी, चोंदल्या त्या आठवणी
जशी धान्याची तू गोणी, कशी येशील कोंदणी?
सह्ही रे रंगा! :)
तात्या.