सतराव्या शतकात होऊन गेलेल्या अमृतराय नावाच्या पंतकवीसंबंधी एक चर्चा उपक्रमावर वाचनात आली.
'कटाव' ह्या काव्य प्रकाराबद्दल ते प्रसिद्ध होते असे मला त्यातून समजले.
ते असो. सांगायचा मुद्दा हा की तिथला त्यांचा कटाव वाचून त्यांची बायकोबद्दलची तक्रार समजली की सतत बडबडणारी, खाणारी आणि वेगवेगळ्या वस्तू मागत रहाणार्या कजाग पत्नीला वैतागून अमृतराय झोपडीत रहायला गेले.
ते कारण काय असेल ते असो पण त्याच्या बायडीची काय तक्रार असू शकेल हे आम्ही जाणतो! त्यातूनच त्यांच्या त्या कटावाला त्यांच्या बायडीने उत्तर दिले असते तर ते असे ;)
माझा हा घरगडी धुवे न लुगडी आठी असे वाकडी
फुंके ना शेगडी सदाच मुरडी, चर्या पहा बोकडी !!
होता दोन घडी कशी कडमडे तोंडात ह्याच्या बिडी
बाजूच्या गधडीस देखुनि रमे ऐसाच चालू गडी !!
दारु घेत सडी, सदा बडबडी लोळे पहा वरकडी
कामे टाळुन दे पडी न कळता लावून दारी कडी !!
खातो हा जसा माकडी वसवशी उलटी असे खोपडी
यालागी हकलून आज दिधले 'रंग्यास' त्या झोपडी!!
चतुरंग
प्रतिक्रिया
8 Feb 2009 - 9:00 pm | अवलिया
मस्त हो रंगाशेठ.... :)
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
8 Feb 2009 - 9:06 pm | लिखाळ
मस्त :)
-- लिखाळ.
8 Feb 2009 - 9:18 pm | शितल
चतुरंगजी,
उत्तर वाचुन मज्जा आली.. :)
8 Feb 2009 - 10:14 pm | केशवसुमार
रंगाशेठ,
एकदम धमाल उत्तर..
(घरगडी)केशवसुमार
8 Feb 2009 - 10:28 pm | llपुण्याचे पेशवेll
एक नंबर लिहीले आहे रंगाराय. :)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
8 Feb 2009 - 11:52 pm | पिवळा डांबिस
होता दोन घडी कशी कडमडे तोंडात ह्याच्या बिडी
बाजूच्या गधडीस देखुनि रमे ऐसाच चालू गडी !! =))
क्या बात है!!
जियो!!!
9 Feb 2009 - 12:28 am | संदीप चित्रे
>> दारु घेत सडी, सदा बडबडी लोळे पहा वरकडी
कामे टाळुन दे पडी न कळता लावून दारी कडी !!
आवडले....
श्री. चारूदत्त आफळे यांच्या 'कीर्तन रंग' ह्या सीडीमधे जेवणावळीचा सुंदर कटाव ऐकलेला आठवतोय; मिळाला तर पोस्टतो इथे.
9 Feb 2009 - 12:47 am | प्राजु
जबरदस्त उत्तर..
खातो हा जसा माकडी वसवशी उलटी असे खोपडी
यालागी हकलून आज दिधले 'रंग्यास' त्या झोपडी!!
लय भारी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Feb 2009 - 12:54 am | मुक्तसुनीत
रंगरावाना दाद उक्रवरही दिली होतीच. मजा आली !
9 Feb 2009 - 1:27 am | शाल्मली
मस्त! झकास!
जोरदार उत्तर!
--शाल्मली.
9 Feb 2009 - 2:19 am | धनंजय
चांगली जिरवली अमृतरायाची...
9 Feb 2009 - 4:17 pm | विसोबा खेचर
रंगाशेठ, चालू द्यात! तुम्ही सध्या एकदम फार्मात आहात बॉ! :)
तात्या.
9 Feb 2009 - 5:06 pm | चतुरंग
(झोपडीनिवासी) चतुरंग
9 Feb 2009 - 5:10 pm | आनंदयात्री
यकच नंबर मालक !!
मला आधी वाटले चतुरंग वालावलकरांना भेटुन आले की काय ?
9 Feb 2009 - 6:48 pm | चतुरंग
भेटायची गरजच नाही, 'तिथे' नुसतं एकदा जाऊन आलं तरी माणूस हाय होतो!! ;)
चतुरंग
10 Feb 2009 - 8:02 am | आनंदयात्री
>>भेटायची गरजच नाही, 'तिथे' नुसतं एकदा जाऊन आलं तरी माणूस हाय होतो!!
खरयं बॉ !! आत्ताच तिथे एक चर्चा वाचली .. अम्म वाचली म्हटल्यापेक्षा स्क्रोल केली :D (काही इकडच्या लोकांना पण हात धुवुन घेतांना पाहिले तिकडे .. पण ते असो )
काय हो साला किस पाडतात. सर्किटरावांनी ४ ओळी खरडल्या तर लोकांनी साला मागच्या महिन्याभरात तिकडे जेवढे कलेक्टिव्हली टंकले नसेल तेवढे टंकुन घेतले.
आता हा तो त्या विषयाचा स्फोटकपणा म्हणावा की सर्किटरावांचा लोकसंग्रह (??) हा ज्याच्या त्याचाआ प्रश्न !!
:)
असो, सर्व मराठी संकेतस्थळांना मनापासुन शुभेच्छा.
10 Feb 2009 - 8:05 am | अनिल हटेला
=))
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
11 Feb 2009 - 11:00 pm | जयवी
जबरी उत्तर :)
11 Feb 2009 - 11:14 pm | भडकमकर मास्तर
मूळ कटाव भारी...
विडंबन अजून भारी...
रंगराव... मजा आणलीत... :)
_____________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/