((प्रवाह..आणि उत्तर))

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
4 Feb 2009 - 11:10 pm

प्राजूची "प्रवाह..आणि उत्तर" वाचली आणि लगोलग विडंबनाचे प्रवाही उत्तर स्फुरले ते असे..

काव्य अनावृत्त
मात्रा आणि वृत्त
शिष्य हा प्रवृत्त
झाला पहा

कविबुद्धी नाठी
हाणावीच काठी
विडंबना साठी
लगोलग

'धुकट सकाळ'
फुकता 'फुकट'
'चिकट' बिकट'
होत जाई

तोतयांचे बंड
विचारती गुंड
'चतुरंग' पुंड
गेला कोठे?

कविता 'म्हणजे'
वाघाचे हो पंजे
कशाला पाहिजे
वृत्त छंद

विसरा 'खोबार'
'शाळा' झाली फार
प्यावा थंडगार
सोमरस

काव्य 'हलकट'
करी खटपट
नाना पाठोपाठ
अवलिया

आवडती नार
आहे 'बुधवार'
टाकावी चिक्कार
सायंकाळी

कवी किती जण?
कवितांचे तण
उपटण्या मन
आतुरले

'केसूपंथी' खाज
विडंबन साज
मिपावर गाज
होत राही..

'रंगा'च सत्त्वर
देतो हे उत्तर
लोंबले लक्तर
विडंबनी..

चतुरंग

कविताविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

4 Feb 2009 - 11:29 pm | अवलिया

मस्त :)

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

पिवळा डांबिस's picture

5 Feb 2009 - 12:45 am | पिवळा डांबिस

क्या बात है चतुरंगा!!!
धन्य झालो!!!

मैदान मारोनी
घरी येता पुंड
उभा राहे गुंड
स्वागतासी...
=D>
=D>
=D>

घाटावरचे भट's picture

5 Feb 2009 - 5:21 am | घाटावरचे भट

=)) मस्तच...

शितल's picture

4 Feb 2009 - 11:31 pm | शितल

विडंबनाची त्सुनामी आली आहे वाटते मिपावर.. ;)
चतुरंगजी विडंबन एकदम भारी. :)

प्राजु's picture

4 Feb 2009 - 11:31 pm | प्राजु

प्रवाही उत्तर
देता कवितेला
मधुचा का प्याला
रिता झाला?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

4 Feb 2009 - 11:34 pm | चतुरंग

मधुचा हा प्याला
नाही रिता झाला
जरा वेळ गेला
सबूर हो!

चतुरंग

मीनल's picture

4 Feb 2009 - 11:38 pm | मीनल

ये क्या हो रहा है?
:?
मीनल.

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Feb 2009 - 11:46 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रणाम गुरुजी

=)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

4 Feb 2009 - 11:55 pm | अवलिया

नुसते गुरुजी गुरुजी करु नका...
तुमचे पण नाव घेतले होते बैंनी.... चिकट हात होते म्हणुन...
द्या उत्तर...

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Feb 2009 - 12:00 am | बिपिन कार्यकर्ते

आम्ही ताईंच्या आज्ञेबाहेर नाही हो... __||__

बिपिन कार्यकर्ते

लिखाळ's picture

5 Feb 2009 - 12:40 am | लिखाळ

चिकट ते हात
असती म्हणून
ठेवले अजून
समांतर.

__/\__ चतुरंगांना प्रणाम...
-- लिखाळ.

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Feb 2009 - 12:43 am | बिपिन कार्यकर्ते

अरे बाबा, ती कोपर्‍यापासून नमस्काराची स्मायली आहे. हात चिकट नाहीत. नीट साबणाने धुतो.

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

5 Feb 2009 - 12:05 am | विसोबा खेचर

आवडती नार
आहे 'बुधवार'
टाकावी चिक्कार
सायंकाळी

रंगा! अगदी मनातलं लिहिलंस बघ! आज कधी नव्हे ते आमचं भग्य उजळलं आणि बांद्र्याच्या 'मोनालिसा इन' हाटेलात दोन घटका टिस्का चोपरासोबत व्हॅट ६९ पिण्याचा योग आला. सुरवातीला तिचा कुणी एक फ्रेंड आणि त्याची सखी आमच्यासोबत होते पण नंतरचा तास-दीड तास फक्त अम्ही दोघंच! तिच्या पुढील काही गुंतवणूक प्रोजेक्ट्स संबंधी बोलत होतो! (धंद्याविषयीचे डिटेल्स ती माझी शेअरबाजारतली अशील असल्यामुळे इथे देऊ शकत नाही!)

असो, पण खूप छान बाई आहे रे! अगदी कुणीही मोहात पडावं अशी. आत्ता पार्टी आटपूनच घरी येतो आहे तो तुझी कविता वाचनात आली !

आत्तापर्यंत बॉलीवुडमध्ये बीग्रेड चित्रपटातच काही कामचलाऊ नायिका कराव्या लागल्या ज्याची कुणीही दखल घेतली नाही. केवळ आमिरखानच्या तारे जमी पर मुळे खूप दखल घेतली गेली असं ती मला सांगत होती.

असो..

आपला,
(टिस्काचा मित्र) तात्या.

बेसनलाडू's picture

5 Feb 2009 - 12:27 am | बेसनलाडू

रंगाशेठ, झकास उत्तर ;) १०/१०
(मास्तर)बेसनलाडू

चतुरंग's picture

5 Feb 2009 - 12:34 am | चतुरंग

गुणप्रदानाचे काम आपल्याकडे दिले की काय?
पैकीच्या पैकी दिल्याबद्दल धन्यवाद मास्तर!

(खुद के साथ बातां : रंगा आता विडंबनात पोस्ट ग्रॅज्यूएट करायला हरकत नाही! ;) )

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Feb 2009 - 12:37 am | बिपिन कार्यकर्ते

!!!

मी डॉ. रंगा म्हणणार होतो. ;)

बिपिन कार्यकर्ते

आम्ही अजून विद्यार्थीच आहोत!

चतुरंग

शाल्मली's picture

5 Feb 2009 - 1:46 am | शाल्मली

झकास विडंबन !!
मजा आली. :)
--शाल्मली.