मरकेगाव, तालुका धानोरा. नक्षलवाद्यांनी पंधरा पोलिसांना हाल हाल करून मारलं. कुणाच्या डोळ्यात पहार खुपसली,
कुणाचे हात पाय तोडले,तर कुणाच्या डोक्यात दगड घालून मेंदू बाहेर काढलेला...
कुणाही जखमीला गोळी घालू नका! त्यांना दगडाने सळईने चेचून मारा असं त्या नक्षलवाद्यांचा प्रमुख ओरडून सांगत होता.
लोकसत्तात आलेली ही बातमी.
आज भारताला नक्की धोका कुणापासून आहे? बाहेरील देशातून आलेल्या दहशतवाद्यांकडून का स्वातंत्र्य मिळून साठ
वर्षे झाल्यानंतर सुद्धा नायनाट न करता आलेल्या अंतर्गत अतिरेक्यांकडून? हा नक्षलवाद गेली अनेक वर्षे पोसला जातोय.
महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि तामीळनाडू यांच्या एकत्रित प्रयत्नांनी सुद्धा काहीही साध्य होत नाहीए. आपण आपल्या देशांतर्गत
अतिरेक्यांना थांबवू / थोपवू शकत नाही तर बाहेरच्यांचा काय मुकाबला करणार?
मुंबईत दहशतवादी कसे घुसले? सरकार काही करणार आहे का? आम्ही कर भरणे बंद करू. अशा प्रकारच्या घोषणा
करत ताज समोर मेणबत्त्या पेटवणारे आता काय करणारेत?
कुणी तरी या शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहील?
प्रतिक्रिया
13 Feb 2011 - 9:41 am | गांधीवादी
पुढे काय ?
ते काम फुकटात होते. त्याला काही मेहनत करावी लागत नाही.
अवांतर : भविष्य काळात आपोआप श्रद्धांजलीच्या प्रतिक्रिया पडतील असे एक अद्ययावत संगणक तंत्रज्ञान विकसित करायचा प्रयत्न आहे.
सारखे उठून काय ते श्रद्धांजली व्हायची हो ?