"ओढ" म्हणजे काय ते
१ आयडी उडवल्यावर लगेच दुसरा काढल्याशिवाय समजत नाही.
"विरह" म्हणजे काय ते
आपला आयपी ब्लॉक केला गेल्याशिवाय समजत नाही.
"गेम" म्हणजे काय ते
हिट्स वाढवुन सर्व्हरवर ताण आणल्याशिवाय समजत नाही
"पराजय" म्हणजे काय ते
तरीसुद्धा संकेतस्थळ चालु असल्याचे पाहिल्याशिवाय समजत नाही
"दु:ख" म्हणजे काय ते
आपला पानभर प्रतिसाद क्षणात उडवल्या गेल्याशिवाय समजत नाही.
“सुख" म्हणजे काय ते
दिवसातुन एकदातरी आंतरजालावर गजाल्या केल्याशिवाय समजत नाही.
आधारीत : - म्हणजे आणि (म्हणजे)
वास्तविक पाहता काव्य आणि विडंबन हा आमचा प्रांत न्हवे, पण आज कंट्रोल सुटला.
हे आमचे विडंबनाचे पहिले नवजात अपत्य आमचे मानस गुरु "केशवसुमार शेठ" व आमचे परममित्र "केशवयात्री" यांना विभागुन अर्पण ..!
आता यापुढे ह्याचा सांभाळ त्यांनीच करावा ..! ;)
प्रतिक्रिया
3 Feb 2009 - 7:31 am | सहज
झकास डॉन्या!
"प्रतिसाद" म्हणजे काय ते
पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरी नेल्याशिवाय समजत नाही.
3 Feb 2009 - 7:33 am | घाटावरचे भट
वाहवा!!!
3 Feb 2009 - 8:28 am | सुचेल तसं
लै भारी!!!
Life is what happens to you while you are busy making other plans.
-- John Lennon
3 Feb 2009 - 10:02 am | अवलिया
मस्त
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
3 Feb 2009 - 8:03 am | चतुरंग
खल्लास विडंबन!!!
(शितल तुझी कविता इतली भारी आहे की एकामागे एक तीन विडंबनं आली एकाच दिवसात! :))
चतुरंग
3 Feb 2009 - 8:03 am | टारझन
=)) बेष्ट रे डॉणूरंगा ..
- टारझ'न'
'ण' बद्दल प्राजु ची माफी , ऍज सेड येल्लो णॉटी, माय हाड ऑफ विंडेक्स बोट, इज ग्रोन यक्स्ट्रा.
3 Feb 2009 - 8:51 am | विनायक प्रभू
फूल टू रे डॉण्या.
3 Feb 2009 - 9:02 am | शितल
बहरलाय..
डॉन्या आणी विडंबन :O
=))
मला काय बुध्दी झाली "म्हणजे... " काय ते मिपाकरांना सांगितले देव (मिपावरील नव्हे ;) )जाणे
12 Feb 2009 - 5:22 pm | विवेक
मस्त वा
काय मन्ग
3 Feb 2009 - 9:07 am | llपुण्याचे पेशवेll
येक लंबर इडंबन आहे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
3 Feb 2009 - 10:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
एक लंबर हो डानराव पाटील. आज तुमच्याशी राजकीय युती केल्याचा फार्फार आनंद होत आहे.
अवांतरः केशवयात्री का केशवटुकार (पक्षी: आनंदयात्री)?
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
3 Feb 2009 - 10:29 am | बेसनलाडू
(आंतरजालीय)बेसनलाडू
3 Feb 2009 - 10:48 am | परिकथेतील राजकुमार
मस्त रे डॉणभौ !
खल्लासच इडंबन!
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
3 Feb 2009 - 10:49 am | पिवळा डांबिस
अगदी भारी!
"दु:ख" म्हणजे काय ते
पानभर प्रतिसाद क्षणात उडवल्या गेल्याशिवाय समजत नाही.
कवीन अगदी आपलां हृदय उघडां केला दिसतां!!!!!
:)
3 Feb 2009 - 11:16 am | झेल्या
विडंबनातही 'डॉन'....
क्या बात है..!
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
3 Feb 2009 - 11:33 am | ढ
डानराव,
मस्त, छान, सुरेख...
कवितेतलं ओ का ठो कळत नसल्यानं जे न देखे रवि हा विभाग कधीच उघडला नाही.
तुमचं नाव वाचून धाग्यावर टिचकी दिली. तुम्ही छान लिहिता हे माहिती होतं पण
आता या प्रांतात सुद्धा मस्त भाईगिरी केलीय तुम्ही.
3 Feb 2009 - 11:46 am | इनोबा म्हणे
रे डान्या!
चला आता त्या केशवटूकारांना रिटायर करुन हिमालयात पाठवा तपश्चर्येला! ;)
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
3 Feb 2009 - 1:53 pm | मनस्वी
के व ळ अ प्र ति म विडंबन रे डान्या!
महोदय, तुम्ही एक उत्तम विडंबक आहात हे मान्य करायला हवे.
3 Feb 2009 - 2:33 pm | केशवसुमार
डॉन्राव,
एकदम धडाके बाज विडंबन.. अभिनंदन..
चांगले चालू आहे..चालू दे..
(सुखी)केशवसुमार..
3 Feb 2009 - 3:11 pm | नंदन
भारी लिहिलंय डॉनभाऊ, विडंबन आवडलं!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
3 Feb 2009 - 3:22 pm | झेल्या
विडंबन म्हणजे काय ते
ओरिजिनल वाचल्याशिवाय समजत नाही :)
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
3 Feb 2009 - 3:24 pm | ब्रिटिश टिंग्या
आवड्या आवड्या! :)
3 Feb 2009 - 3:41 pm | लिखाळ
मस्त.. मजेदार.. विडंबन आवडले :)
-- लिखाळ.
3 Feb 2009 - 5:17 pm | शंकरराव
विडंबण आवडले :-)
शंकरराव
3 Feb 2009 - 5:20 pm | कवटी
मस्त रे डॉन्या....
आयला तु बी इडंबन करायला लागला?...
कवटी
http://www.misalpav.com/user/765
3 Feb 2009 - 6:49 pm | मुक्तसुनीत
पोरांनो ,
काय श्वास घ्यायला फुरसद द्याल का नाही आज ! =))
3 Feb 2009 - 10:10 pm | बिपिन कार्यकर्ते
बरं झालं मी नव्हतो ऑनलाइन आज दिवसभर. ऑफिसातून पळच काढावा लागला असता. =))
बिपिन कार्यकर्ते
3 Feb 2009 - 10:31 pm | खरा डॉन
हा हा हा मस्त रे डॉन भाय!
माझा पण प्रयत्ण!
बाझवला तिच्याआयला म्हणजे काय ते
मिसळ पावची तर्री ओरपल्या शिवाय कळत नाही.
4 Feb 2009 - 11:34 am | छोटा डॉन
हा आमच्या काव्यप्रांतातला पहिलाच प्रयोग असुनसुद्धा कौतुक करण्यासाठी प्रतिसाद देणार्या व न प्रतिसाद देता कौतुक करणार्या व कौतुक न करणार्यांचेही आभार ..!
धन्यवाद. :)
------
( ह्या बाबतीतही "केसुं"चा शिष्य ) छोटा डॉन
4 Feb 2009 - 11:39 am | साती
मस्त विडंबन
साती
12 Feb 2009 - 5:47 pm | सूहास (not verified)
सुहास..
मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
27 Feb 2009 - 4:23 pm | अनामिका
डॉनराव!
मस्तच झक्कास्स्स!
"अनामिका"
27 Feb 2009 - 10:19 pm | चकली
मस्त आहे!
चकली
http://chakali.blogspot.com
21 Apr 2009 - 4:45 pm | पाषाणभेद
अर्पणपत्रिका पण छान जमलीय.
आपल्या अपत्याचे दोन दोन पालक असतांना त्याचे चांगलेच पालनपोषण होईल.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
21 Apr 2009 - 5:05 pm | स्वाती दिनेश
लय भारी रे डॉन्या, आत्ताच वाचलं तुझं 'म्हणजे'..:)
स्वाती