"ओढ" म्हणजे काय ते
जोर लावल्याशिवाय समजत नाही.
"विरह" म्हणजे काय ते
माहेरी गेल्याशिवाय समजत नाही.
"गेम" म्हणजे काय ते
स्वत: केल्याशिवाय समजत नाही
"पराजय" म्हणजे काय ते
सासरी आल्याशिवाय समजत नाही
"दु:ख" म्हणजे काय ते
दिवटी झाल्याशिवाय समजत नाही.
“सुख" म्हणजे काय ते
विडंबन केल्याशिवाय समजत नाही.
आधारीतः म्हणजे
प्रतिक्रिया
3 Feb 2009 - 1:26 am | पिवळा डांबिस
सुख" म्हणजे काय ते
विडंबन केल्याशिवाय समजत नाही.
व्वा!!! भले शाब्बास!!!!
:)
(सदासुखी) डांबिस
3 Feb 2009 - 1:31 am | चतुरंग
सतत सुखी रहाण्याचा आणि मिपाकरांना सुखात ठेवण्याचा प्रयत्न करतो! ;)
(खुद के साथ बातां : चल रंगा, नवीन कच्चा माल शोधूयात! B) )
चतुरंग
3 Feb 2009 - 1:59 am | शितल
सुखी मिपाकर. :)
3 Feb 2009 - 7:09 am | सहज
“सुख" म्हणजे काय ते
विडंबन केल्याशिवाय समजत नाही.
अगदी अगदी. :-)
3 Feb 2009 - 9:18 am | बाकरवडी
सुख म्हण्जे नक्की काय असतं,
विडंबन केल्याशिवाय समजत नसतं !!
3 Feb 2009 - 9:24 am | संदीप चित्रे
>> "पराजय" म्हणजे काय ते
सासरी आल्याशिवाय समजत नाही
क्या बात है !! :)
3 Feb 2009 - 2:45 pm | केशवसुमार
बेसनशेठ,
अगदी अमच्या मनातलं बोल्लात..
“सुख" म्हणजे काय ते
विडंबन केल्याशिवाय समजत नाही.
क्या बात है
(सुखी)केशवसुमार