केदारनाथ भटाचार्य..
हा कलकत्त्यात वाढलेला आणि नंतर मुंबईत स्थायिक उत्तम गायक....
९० च्या दशकातली त्याची कित्येक गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत....
पाच वेळा फिल्म्फेअर पुरस्कार मिळवून आता इतरांना पुरस्कार देण्यासाठी मला स्पर्धेत धरू नका , असे जाहीर केले.
एका दिवशी २८ गाण्यांचे रेकॉर्डिंग करून गिनेज बुकात नाव नोंदवले.
आतापर्यंत वेगवेगळ्या भाषांमध्ये सुमारे आठ हजार गाणी गायली.
..... त्याच्या सर्वच गाण्यांवर मन डोलते..थुईथुई नाचते. आशिकी, साजन, दीवाना,बाझीगर, १९४२- अ लव्ह स्टोरी ...काय ती नितांतसुंदर हृदयाला घरं पाडणारी गाणी...पुन्हा तरूण झाल्यासारखं वाटलं...
एकदा त्याचा कार्यक्रम ऐकायला मी महाविद्यालयात असताना २० किलोमीटर सायकल चालवत गेलो होतो त्याचे स्मरण झाले यानिमित्ताने.....
.... एक तेव्हाचा मित्र भेटला परत तेव्हा त्याने माझ्या आय्पॉडवर फक्त केदारनाथाची गाणी पाहून टच्कन पाणी काढले डोळ्यातून...
आज त्याच मित्राला फोन करून केदारला पद्मश्री मिळाली असे कळवले... पुन्हा टच्कन पाणी आले की नाही ते फोनवर कळाले नाही..." फक्त किती उशीरा मिळाली रे पद्मश्री... आणि या पुरस्काराने पद्मश्रीचाच सन्मान झाला आहे आणि अमुक अमुकपेक्षा केदार किती महान होता आहे आणि राहील.."यावरही आम्ही पुष्कळ बोललो...
इतक्या गुणवत्तेचा गौरव आज सरकारने केला आहे त्याबद्दल केदारनाथाचे आणि सरकारचे दोघांचे अभिनंदन...
आणि भविष्यात अनेक उत्तमोत्तम गाणी आम्हाला ऐकायला मिळोत अशी त्या प्रभूचरणी प्रार्थना....
प्रतिक्रिया
26 Jan 2009 - 5:16 pm | विसोबा खेचर
इतक्या गुणवत्तेचा गौरव आज सरकारने केला आहे त्याबद्दल केदारनाथाचे आणि सरकारचे दोघांचे अभिनंदन...
हा हा हा! सही जोडे! :)
आपला,
तात्या शानू.
अवांतर - बाकी त्याची काही काही गाणी आम्हाला आवडतात.
26 Jan 2009 - 8:56 pm | हेरंब
तात्या,
अवांतर - बाकी त्याची काही काही गाणी आम्हाला आवडतात.
हे वाक्य बहुधा तुम्ही चाली या अर्थाने म्हटले असावे. नाहीतर प्रत्येक गाणे नाकाने पाडणारा कुणाला आवडू शकतो यावर विश्वास बसत नाहीए.
(कानांना अत्याचारांपासून जपणारा)
हेरंब
26 Jan 2009 - 10:27 pm | नितिन थत्ते
नाकाने गाणारा हिमेश केवढा हिट झालाय पाहताय ना?
खराटा
(येथे उत्तम काथ्या कुटून मिळेल)
11 Feb 2009 - 8:42 am | शिप्रा
>>प्रत्येक गाणे नाकाने पाडणारा कुणाला आवडू शकतो यावर विश्वास बसत नाहीए.
त्याचा आवाज, त्यातील लवचिकता, संगीतातील समज, स्वरफेक, स्वराला घट्ट पकडून ठेवण्याची हातोटी, याचा तुम्ही विचार केलेला दिसत नाही. ;)
26 Jan 2009 - 6:55 pm | सुचेल तसं
कुमार सानूनी एक काळ खूप गाजवला होता. ९० चं दशक निर्विवादपणे त्याचच होतं (उदित नारायण येऊस्तोवर). आशिकी, साजन, सडक, फिर तेरी कहानी याद आयी, दिवाना, इत्यादि.
कुमार सानूंचं पद्मश्री मिळाल्याबद्दल अभिनंदन!!!
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
26 Jan 2009 - 9:06 pm | ब्रिटिश टिंग्या
याचा अर्थ २०२५ साली हिमेश रेशमियादेखील पद्मश्री पुरस्कार मिळु शकतो :)
- टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
27 Jan 2009 - 12:01 pm | ढ
असं अभद्र बोलू नका कृपया!!!
अगदी गंमतीनं सुद्धा.
नियती तथास्तु तथास्तु म्हणत असते म्हणे !!!!
26 Jan 2009 - 9:34 pm | धनंजय
विडंबन झकास झाले आहे.
26 Jan 2009 - 9:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
एकदा कधीतरी यांच्या तोंडून किशोर कुमाराचं एक गाणं ऐकलं होतं (कुठलं ते आठवत नाही), त्यादिवसापासून याचा आवाज तर सोडा नावही ऐकलं तरीही कानात बोटं घालते.
आणि आठवून आठवून, जुनं उगाळून उगाळून तात्यांचा पुन्हा एक निषेध. अलिकडेच एक दिवस मिपाच्या मुख्य पानावर या भट्टाचार्यसाहेबांनी गायलेल्या गाण्याची लिंक ठेवली होती. (गाणं छानच आहे पण ...)
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
26 Jan 2009 - 11:02 pm | प्राजु
उदा.
कुछ ना कहो- १९४२ अ लव्ह स्टोरी
सोचेंगे तुम्हे प्यार - दिवाना
दिल है के मानता नही - दिल है के मानता नही
घुंघट की आड से - हम है राही प्यार के
दिल मेरे तू दिवाना है - सूर्यवंशम
दो दिल मिल रहे है आणि मेरी मेहबूबा - परदेस
सध्या इतकीच आठवली. ही गाणी खरंच चांगली आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Jan 2009 - 11:06 pm | llपुण्याचे पेशवेll
दो दिल मिल रहे है गाणे माझ्या मते अभिजितने गायले आहे.
पुण्याचे पेशवे
Since 1984
26 Jan 2009 - 11:34 pm | प्राजु
ते गाणे कुमार सानूचेच आहे १००%. इथे पहा
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Jan 2009 - 11:42 pm | सर्किट (not verified)
परंतु, दोन हृदये भेटत असताना, मगरीचे हळूच येण्याचे काम काय, हे मला कधीच कळले नाही.
-- (उपद्व्यापी) सर्किट
26 Jan 2009 - 11:46 pm | प्राजु
काय सांगावे आता?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Jan 2009 - 11:27 am | एक
आपल्याला जे वाटेल तेच मगरीला पण नाही का वाटणार?
(..वर उल्लेख केलेल्या प्लेटला पुण्यात मिळणार्या प्लेट चा संदर्भ आहे..:)
26 Jan 2009 - 11:52 pm | रेवती
आधी मला खरच वाटलं की भडकमकर मास्तरांना ह्या बुवाचा आवाज आवडतो.
कु.सा.ची आणि हिमेसभाईची तुलना नाकामुळे व्हावी यातच मजा आहे.
रेवती
27 Jan 2009 - 11:36 am | कवटी
इतक्या गुणवत्तेचा गौरव आज सरकारने केला आहे त्याबद्दल केदारनाथाचे आणि सरकारचे दोघांचे अभिनंदन...
त्याची गौरवगाथा इथे मांडल्याबद्दल मास्तर तुमचे ही अभिनंदन आणि तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेछा!
आणि भविष्यात अनेक उत्तमोत्तम गाणी आम्हाला ऐकायला मिळोत अशी त्या प्रभूचरणी प्रार्थना....
+१
सहमत
केदारनाथा (का)च्या प्रतिभे समोर नतमस्तक
("इक लडकी को देखा तो ऐसा लगा" ऐकले की अजुनही गुलाबी आठवणी चाळवणारा)
कवटी
http://www.misalpav.com/user/765
28 Jan 2009 - 8:45 am | हेरंब
जेंव्हा सूर्यास्ताची वेळ येते तेंव्हा खुजा व्यक्तिंच्या ही सावल्या मोठ्या वाटू लागतात.
(लताप्रेमी) हेरंब
28 Jan 2009 - 9:04 am | मराठी_माणूस
अत्यंत कमी शब्दात योग्य मुल्यांकन
11 Feb 2009 - 1:18 am | भडकमकर मास्तर
जेव्हा खुज्या व्यक्तींच्या सावल्या मोठ्या वाटू लागतात, तेव्हा सूर्योदय झाला आहे असे समजावे...
.....
तैत्तिरीय उपनिषद
(अक्षय,ऐश्वर्या,उदित्,सानू,बाळासाहेब, हेलनप्रेमी) भडकमकर मास्तर
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
11 Feb 2009 - 1:21 am | अघळ पघळ
सुर्योदय झाला आहे? की सूर्यास्त??
12 Feb 2009 - 4:35 am | केशवराव
हेरंबा , लय भारी !
[ लता प्रेमी . . . केशवराव.]
11 Feb 2009 - 1:37 am | बेसनलाडू
(निषेधकर्ता)बेसनलाडू
12 Feb 2009 - 2:21 pm | महेंद्र
जेव्हा खुज्या व्यक्तींच्या सावल्या मोठ्या वाटू लागतात, तेव्हा सूर्योदय झाला आहे असे समजावे...
कस्ली कमांड आहे तुम्हा लोकांची मराठी वर ..मस्त ...:)
ह्याच माणसाने आपली एक बायको असतांना दुसरे लग्न केले होते ना डीवोर्स न घेतां?? की तो दुसरा कोणी होता?
12 Feb 2009 - 9:09 pm | टिउ
उदित नारायण होता बहुदा...
बाकी अक्षय कुमारला पद्मश्री मिळु शकतं तर कुमार शानुला का नाही?