(सजा)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
23 Jan 2009 - 8:10 pm

मिलिंद फणसे यांची 'सजा' वाचून आम्हाला आमच्या सजा आठवल्या! ;)

कोरड्या नरड्यास ह्या 'द्राक्षासवाचा' शाप दे
टाकतो 'नवटाक' वा 'मोसंबिचा' उ:शाप दे!

जी कुणी दिसते मला, बघतो तशी त्या त्या क्षणी,
गात्र मी स्पर्शीत नाही, फक्त थोडे 'माप' दे!

तामसी आयुष्य भोगी, शेवटी ही 'आव' का?
तोड त्या नाडीस, पोटा सोडुनी अडमाप दे!

दे सजा, बसता कुठे टोचेल का मज तो 'मणी'?
मात्र माझ्या 'वेदनेला' मलम हा उ:शाप दे!

कोरडा उपचार असतो 'पानपुसण्याचा' इथे
पूस 'रंग्या' अन् खुशालीची जगाला थाप दे...!

चतुरंग

कवितागझलविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

सर्वसाक्षी's picture

23 Jan 2009 - 10:40 pm | सर्वसाक्षी

चतुरंगजी,

आपल्याला 'ओलाव्या'ची नितांत गरज आहे! एकुण शनिवार रात्र सा(र्थ)की लागावी ही शुभेच्छा! सजा भोगुन झाली, आता 'मजा' करा.

श्रावण मोडक's picture

23 Jan 2009 - 11:05 pm | श्रावण मोडक

खरंच गरज होती का? मला तरी वाटत नाही. चांगले विडंबन आहे हे, सरळ वाचता येतेच. रंग्या या शब्दाचे अवतरण हा अपवाद. त्यावरील केवळ मणी आणि वेदनेला यातील अवतरणे गरजेची.

सर्किट's picture

23 Jan 2009 - 11:09 pm | सर्किट (not verified)

मोडकांशी सहमत आहे. अवतरणांमुळे रसभंग होतो, असे मलाही वाटते.

-- सर्किट

चतुरंग's picture

24 Jan 2009 - 12:09 am | चतुरंग

रंग्या, मणी आणि वेदना सोडून सर्व अवतरणे गाळता आली असती.
पुढील विडंबनात काळजी घेतली जाईल.

चतुरंग

बेसनलाडू's picture

23 Jan 2009 - 11:15 pm | बेसनलाडू

'माप' झकास ;)
बाकी आपणही हल्ली वरचेवर द्राक्षासवाकडे वळू लागला आहात,असे जाणवू लागले आहे. गुरुभक्ती अगदीच उचंबळून आलेली दिसते.
(हसरा)बेसनलाडू

प्राजु's picture

23 Jan 2009 - 11:55 pm | प्राजु

माप अगदी मोजून मापून आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

24 Jan 2009 - 1:43 am | संदीप चित्रे

रंग्याशेठ....
'माप' तर एकदमच बाप :)

केशवसुमार's picture

24 Jan 2009 - 3:01 am | केशवसुमार

रंगाशेठ,
सगळ मोजून मापून चालू आहे.. चालू दे..
(अडमाप) केशवसुमार

एकलव्य's picture

24 Jan 2009 - 9:07 am | एकलव्य

डिसक्लेमर - सहसा आम्ही इकडे फिरकत नाही... पण वा वा वा! काव्य आवडले...

अन् खुशालीची जगाला थाप दे...! :)