१२ डिसेंबरला घरी जाणार जाणार म्हणून तयारी करत करत मी २२ला जाण्यासाठी मोकळा झालो, पण अचानक टिकीटे तथा काहीच बाकीचे प्लान तयार नव्हते तरी म्हणालो निघायचं आहे तर निघू .. बघू काय होईल ते ! मित्राबरोबर सरळ न्यु दिल्ली रेल्वेस्टेशनला पोहचलो व टिकीटासाठी दोन तास अटापिटा करुन शेवटी मुंबई राजधानीचे टिकीट घेतले व सरळ ४.१५ च्या गाडी बसलो. योग्य वेळ योग्य काम करणे हा माझा धर्मच नाही त्यामूळे गाडीत बसल्यावर विसरलेल्या गोष्टि आठवू लागल्या.. चार्जर घेऊन आला नाहीस.. पैसे सुट्टेच खिश्यात आहेत... नशीब एटीम तथा क्रिडीट कार्ड घेऊन आला आहेस नाही तर मुंबई मध्ये बस भीक मागत.. मावस बहीणीचा पत्ता घेतला नाही आहेस.. तीचा फोन नंबर पण मेल मध्ये... धन्य आहेस... आता मुंबैला रात्र हॉटेल मध्येच काढ.. अशी अनेक मुक्ताफळे स्वतःवर उधळून झाल्यावर मी जरा स्थीर स्थावर होऊन इकडे तिकडे पाहीले तर समोरच्याच बर्थ वर एक २५-३० वर्षाची आंन्टी बसलेली दिसली.. मी एक स्माईल दिल्यावर ती नाक मुरडुन आपले डोके पुस्तकात घालून बसली ती बसलीच ! च्यामायला म्हणालो हे झेंगाट चांगले आहे .... टीपी होईल असा विचार केला तर ही बया... नाक मुरडत आहे... आता उद्या सकाळ पर्यंत काय करायचं हा डोक्याला शॉट.. ट्रेन मध्ये झोपणे हा आमचा स्वभावच नाही त्यामुळे गडबड होते ... तास भर मोबाईलचा जिव खल्ला व मेलो मेलो म्हणत जेव्हा तो स्वतःच बंद झाला तेव्हा विचार करु लागलो की आता काय करावे ? आपली बर्थ सोडून सरळ आजू बाजूच्या डब्ब्यामध्ये काय काय चालू आहे... कोण कोण महारथी बसले आहेत पहावे म्हणून पायात चपला अडकवुन निघालो, दोन तीन बर्थ सोडल्यावर एका आजी बरोबर दोन चिमुकली पोरं बसलेली दिसली... त्यांना हाय केलं व सरळ तेथे बसलो ! थोडा टिपी केला तोच टिकीट चेकर आला टिकीटे दाखवली व त्याच्या बरोबरच फिरत फिरत सेकंड क्लास मधुन थर्ड क्लास मध्ये पोहचलो... अर्धा एक तासाने तो पण मोकळा व मी पण... मी हाय हल्लॉ केलं व थोडा टिपी त्याच्याशी केला जेवणाची वेळ झाली होती... जेवण केले व परत आपल्या बर्थ वर येऊन आडवा झालो, तो पर्यंत ती आंन्टी पुस्तकातून बाजूला झालीच होती... मी तीला पुन्हा स्माईल देऊन विचारलं " मुंबई ? " ती ने त्रासीक मुद्रेतून नुस्तेच मान डोलाऊन उत्तर दिले व गप्प बसली.. मी म्हणालो.. च्यामायला दोन शब्द तोंडातून बाहेर काढायला हा कसला चेंगुस पणा... छे !
हा प्रवास असाच निरस पणे पार पडला व मी धड्पणे दादर ला पोहचलो ! एका नेट वर जाऊन... मेल मधुन मावस बहीणीचा पत्ता शोधला व त्यांना आधी फोन केला तेव्हा कळाले ते पण सुट्टी साठी घरी गेले ( बेळगावला) मी म्हणालो झालं सुट्ट्लो !
निता मध्ये जाऊन एक कोल्हापुर आधी बुक केलं ! त्याच्या कडे सामानची बॅक भिरकावली व म्हणालो आलोच मुंबई दर्शन करुन येतो ८ला संध्याकाळी तो पर्यंत बँग संभाळा. तो हो म्हणायची देखील वाट पाहीली नाही सरळ कॅब केली व सिध्दी विनायकला गेलो दर्शन घेऊन समुद्र किनारा पाहत... हिरवळीचा थोडा अस्वाद घेत मज्जा करु म्हणून चोपाटीवर गेलो तर छे.. कोणीच नव्हते.. दोनचार म्हातारी कोतारी सोडली तर... म्हणून... सरळ परत गेट वे ऑफ ईडिया जवळ आलो व तेथे २६/११ च्या काही खुणा दिसतात ते का पाहीले पण ताज ची रंगरंगोटी करुन पुर्ण चकाचक केले होते ते पाहून समाधान वाटले व तास एक भर समुद्र, बोटी व पाखरे पाहत घालवले... काही पाखरांना चारा देण्याचा प्रयत्न केला पण ती पाखरं आपले आपले झेंगाट बरोबर घेऊनच आले होते त्यामुळे जरा निराशा पदरी (खिश्यात) पडली.
पाचच्या आसपास दहिसरला पोहचलो व एकाला म्हणालो भाइ इकड टाइमपास काठी काय आहे का ? .. तो मला म्हणाला.. क्या साब, यही सामने तो है... असे म्हणून "स्वागत" बार कडे बोट दाखवले जे समोरच होते.... ! मी अरे वा खुशी खुशी मध्ये हसत म्हणालो.. क्या बात है... मुल्ला आखं बंद करे तो भी मसजीद के सामनेच"
पण च्या आयला संध्या काळी पाचच्या आसपास बार बंद होता... मी त्या गेट किपर जवळ गेलो व त्याला काही अडजेस्टमेंट विचारली तो माझ्या थोबाडाकडे बघत आत गेला व दोन मिनिटाने आला व म्हणाला "अंदर जाओ" मी लगेच आत पोहचलो तर आतील दृष्य पाहून दचकलोच... मुंबई मध्ये बार मध्ये मी अनेकदा गेलो होतो पण दहिसर बाजूला कधीच नाही व एकटाच तर जिवनामध्ये कधीच नाही पण हा स्वागत बार एकदम अजबच वाटला मला !
५०० स्केअर फुटामध्ये बार.. टेबल्स व खुर्च्या... व १० बाय १० च्या जागेत एक स्टेज.. स्टेजला लागुनच बेजों चे साहित्य... बाजुला तीन चार खुर्च्या ओळीने.. त्या च्या डाव्याबाजुला कॅश देवाण्-घेवाण टेबल... व त्याच्या परत डाव्या बाजुला... छोटासा बोळ..वजा रुम व आत स्टोर रुम ! इनमीन १० टेबलं व प्रत्येक टेबलासाठी चार खुर्च्या... ! पण साफ सफाई चांगली दिसत होती.. ! आत गेल्या गेल्या उजव्या बाजुला एका कोप-यात एक ५० च्या आसपासचा मानव बसला होता.. समोर एक ग्लास... व चकणा... ! मी मनातून जरा समाधान व्यक्त केले की चला एकटाच नाही आहे... ! एक अंधारातील टेबल बघून ते काबीज केले व ऑर्डर घेण्यासाठी कोणी येईल का हे पाहू लागलो तोच... एक २७-२८ च्या आसपासची तरुण मुलगी.. पांढ-या रंगाची साडी, पांढरी टिकली... पांढ-या बांगड्या..... " बाइ बाई माझा आज रंग पांढरा.." असे काही गुणगुणते की काय असे मनाला वाटुन गेलं पण नाही ती सरळ माझ्या टेबल जवळ आली व म्हणाली "क्या आज बहोत जल्ल्दी ? " मी जरा दचकलोच मी कधी येथे रोज येतो यार.. मी तिला म्हणालो " नाही हो बाई, मी आज पहील्यांदा आलो आहे येथे..." तीने माझ्या कडे वरुन खाली पर्यंत व्यवस्थीत पाहीले व टिशर्ट - जिन्सची पॅन्ट व स्पोर्टशुज बघुन तिला मी एखादा कॉलेज कुमार वाटलो असावा म्हणून तीने अंदाजपंच्चे गोळी झाडली होती की इकडे कुठे म्हनून.. ;) तीने ऑर्डर घेतली आपली नेहमीचीच फॉस्टर पण मुंबैला आल्यावर ब्रन्ड चेंज रॉयल चेंलेंज ! ती एक बाटली आणली व केला ग्लासामध्ये ती भरुन झाल्या हाती देऊन तीथेच उभी राहीली, आता ही का उभी ... म्हनून मी तीला प्रश्नार्थक नजरेने विचारण्याचा केवलवाणा प्रयत्न केला पण ही डिम्म... ! शेवटी मीच तिला हातानेच बाजूच्या खुर्चीवर तर बस म्हणालो .. तर म्हणते कशी " नही नही, यही मेरी डुटी है " च्यामायला म्हणजे बीयर संपे पर्यंत ही बया डोक्यावरच उभी राहणार तर... ! लवकरात लवकर बीयर संपवावी व येथून पळावे हा विचार डोक्यात उडु लागला तोच दरवाजा उघडला व एका मागोमाग एक अशा सात -आठ जणी आत आल्या व त्यातील चार्-पाच माझ्या टेबलाकडे आल्या... मी धास्तावून... हातातला ग्लास रिचवला तोच त्या आलेल्या जणीं माझ्या बाजुला जी उभी होती तिला बाजुला घेऊन गेल्या व कुजबुजु लागल्या.. मी हुश्य केलं व निवांत पै़की आपली बियर ग्लास मध्ये ओतली... !
थोड्यावेळातच मला लक्ष्यात आलं होतं की आपण चुकुन लेडीज बार मध्ये आलो आहोत... व येथे लेडीज वेटर सिस्टम आहे... व तो स्टेज व बेंजो का आहे तेथे ह्याची ही कल्पना आलीच. थोड्या वेळाने अजुन चार बाया आल्या वर स्टेजवर ठेवलेल्या खुर्ची वर जाऊन बसल्या... त्यांच्या मागोमाग.. बंजोवादक व २५-३० वर्षाची दोन तरुण मुलं पण आली.. ! थोडा वेळ त्यांनी बंजो बरोबर काही चाळे केले व बेंजो वादकांच्या बॉस ने ओके म्हणून हात वर केला त्याच बरोबर... सगळ्याजणी आपापल्या चपला काढून... दोन्ही कर जोडून उभ्या राहील्या व एक मुलगा हातामध्ये आरती घेऊन स्टेजच्या समोर असलेला पडदा दुर सारत उभा राहीला.. पडद्या मागे साईबांबाची एक चांगलीच मोठी मुर्ती व बाजुला गणपती बप्पा बसलेले ! च्यामायला हे काय नवीन लचांड हा... डोक्यात विचार सुरु होऊ पर्यंत गजाननाची आरती चालू झाली... छे च्यामायला हातात ग्लास .. पोटात बियर व समोर गजाननाची आरती..ची सुरवात... झटपट ग्लास खाली ठेवला... समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास रिचवला व शुज काढुन उभा राहीलो... ! सुखकर्ता दुखःहर्ता.. किती तरी गोड आवाजामध्ये तो युवक आरती म्हणत होता... व बाकीचे फक्त सपोर्टसाठी टाळ्या वाजवत होते... व ठेका धरत होते... काही क्षणातच माझे ही हात ठेका धरु लागले व सुख कर्ता संपल्या संपल्या काही क्षणामध्येच ... शिरडी वाले साई बाबा.. आया है ते रे.. दर पे.... हे सह वाद्य - व सह गायनात चालू झाले... वाह क्या... बात थी... कोणी काही ही म्हणो पण एका मंदिरापेक्षा जास्त सुंदर पध्दतीने ते गाणे मी एकले व त्याच रंगात रंगुन गेलो..! प्रार्थाना संपली तरी ही मी काही क्षण बेसावध अवस्थेतच होतो.... तो तरुण मुलगा माझ्या समोर कधी... पुजेची थाळी घेऊन आला कळालेच नाही.. मी दिपावरुन हात फिरवत.. डोक्याला लावला व खाली खुर्चीवर बसलो... व ती माझी वेटर पुन्हा माझ्या जवळच्या जागी येऊन उभी राहीली व माझा ग्लास भरुन दिला....
क्रमशः
प्रतिक्रिया
21 Jan 2009 - 5:56 pm | अवलिया
च्यायला... क्रमशः
तुला काय रोग आहे का रे ? एका दणक्यात नाही लिहिता येत का?
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
21 Jan 2009 - 8:03 pm | अवलिया
मगाशी पटकन प्रतिक्रिया दिली... आताशी वाचले बघ नीट.
छान लिहिले आहेस... पुढचे पटकन टाक.
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
21 Jan 2009 - 6:03 pm | विनायक प्रभू
नको तिकडे टेकान घेवा ची सिरियल आहे की काय?
21 Jan 2009 - 6:05 pm | अवलिया
तो राज आहे... चार पाच भाग लिहील अन पळुन जाईल...
मागचे सोडुन नवीन सिरीयल चालु करेल...
हल्लकटटटऽऽऽ............. पैचान कौन
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
21 Jan 2009 - 6:07 pm | दशानन
सगळे भाग (राहीलेले) ह्या आठवड्यात नाही लिहले तर माझं नाव मी जैंनाच कार्ट बदलुन ठेवीन... >:)
21 Jan 2009 - 6:08 pm | सहज
आता मग सगळे भाग वाचुन झाल्यावरच प्रतिसाद देउ. लवकर लिही.
21 Jan 2009 - 6:09 pm | अवलिया
इफ यु वांन्ट टु किल...किल. डोन्ट टॉक.
- एक म्हण
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
21 Jan 2009 - 8:24 pm | घाटावरचे भट
असेच काहीसे....
'व्हेन यू हॅव टू शूट, शूट...डोंट टॉक'
-इति 'टुको' (द गुड, द बॅड अँड द अगली)
22 Jan 2009 - 10:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
एऽऽऽऽऽ ब्लॉंडी, डोंट जस्ट टॉक अबाऊट इट!
राजे पटापट लिवा आता.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
22 Jan 2009 - 1:12 am | शितल
>>>तो राज आहे... चार पाच भाग लिहील अन पळुन जाईल...
>>मागचे सोडुन नवीन सिरीयल चालु करेल...
=))
बाकी सुरूवात चांगली झाली आहे.
लवकर लिहा.
21 Jan 2009 - 6:08 pm | ज्ञ
तुला काय रोग आहे का रे ? एका दणक्यात नाही लिहिता येत का?>>>
नाना, हे जैनाचं कार्टं बहुतेक केकता कपूरकडे लेख म्हणून कामाला असणार.
एकदम टायमावर पुढच्या भागाची पाटी लावतो नेहमीच.. :)
21 Jan 2009 - 6:11 pm | अवलिया
जावु द्या हो.. आपला माणुस आहे.
बरा आहे झोडायला.... :)
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
22 Jan 2009 - 1:00 am | पक्या
छान लिहिलं आहे.
22 Jan 2009 - 1:08 am | प्राजु
आत हे दिल्ली ते दिल्ली तुमच्या माझी सफर चे रेकोर्ड ब्रेक करणार की काय??
असो.. लवकर लिहा पुढचा भाग.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Jan 2009 - 8:20 am | विसोबा खेचर
जैनराव,
येऊ द्या अजूनही!
तात्या.
22 Jan 2009 - 8:30 am | अनिल हटेला
हे जैनाचं कार्टं बहुतेक केकता कपूरकडे लेख म्हणून कामाला असणार.
मला पण असेच वाटतये ....
असो...
राजे,
जरा लवकर लिहीते व्हा...नायतर नवीण नाव काय घ्यायचे ते ठरवा..
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
22 Jan 2009 - 12:30 pm | सुनील
कार्ट्या, मस्त लिहिलय पण जरा जास्त मोठे भाग लिही की!
(आगाऊ सल्ला - "अनोळखी" ठिकाणी जाण्यापूर्वी जुन्या-जाणत्यांचा सल्ला घ्यायला विसरू नये!)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
22 Jan 2009 - 1:26 pm | दशानन
धन्यवाद, मोठचं लिहतो आहे.. त्यामुळे जरा वेळ लागत आहे !