माझा मनाच्या कुपितले या सदरातला हा तिसरा लेख
'' तुकयाची आवली एक अनोखी जीवनयात्रा''
'' तुकयाची आवली'' ही सौ. मंजुश्री गोखले यांची कांदबरी. तुकारामांची दुसरी पत्नी आवली हीच भावविश्व सांगणारी एका वाक्यात सांगायचे तर ''कल्पनेतला चंद्र हातात घरण्याची मनिषा बाळगून तो चंद्र प्रत्यक्षात प्राप्त करणं'' असंच या कादंबरी बाबतीत म्हणावं लागेल. एका स्त्रीनं दुसर्या स्त्रीची उलघडलेली जीवनगाथा अशा स्वरूपाची ही कादंबरी लेखिकेचा यशस्वी प्रयत्न आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही.
माझ्यामते एखाद्या कांदबरीबाबत विचार करताना, तिच्या यशापयशाचा लेखाजोखा मांडताना एक महत्वाचा निकष म्हणजे ती वाचकाच्या मनाला भावते का कारण लेखकाने आपली प्रतिमा, आपले विचार लेखणीत उतरवलेले असतात. ते वाचकांच्या मनात पेरण्यासाठी आणि जेव्हा लेखिकेच्या ह्दयातील स्पंदने वाचकाच्या ह्दयापर्यत पोहोचतात तेव्हा ती कांदबरी वाचकाच्या, वाचनाच्या अंगाने सर्वोत्कृष्ट असते.आणि ही आवली वाचकाला भिडते. संवेदनांची तार छेडते आणि, म्हणूनच तो एक यशस्वी लेखनप्रयास ठरतो.
खरंतर ''आवली'' सारखा किचकट आणि अप्रचलित विषय निवडल्याबद्दल प्रथम लेखिकेचे अभिनंदन कारावयास हवे. कारण, या कांदबरीची इमारत बांधणे फार अवघड होते.ना याचा पाया माहित होता, ना त्यांची उंची हातात होते ते मधले दोन-चार दगड आणि या दगडांना सामावून घेऊन इमारत बांधण्याचे शिवधनुष्य त्यांनी उत्तमपणे पेलले आहे.
'' तुक्याची आवली'' ही वास्तव कादंबरी नाही, पुर्ण काल्पनिक कांदबरीदेखील नाही येथे वास्तव, आणि कल्पना यांचा समन्वय साधला आहे. इतिहासात फक्त मुंगीएवढया उल्लेख असलेल्या तुकारामाच्या दुसर्या पत्नीच्या, जी तुकारांमाबरोबर सावली प्रमाणे होती त्या सावलीरूप आवलीचा हा जीवन प्रवास आहे जगावेगळा नवरा जगावेगळया परिस्थितीत या महिलेने स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे जीवन कसे चालवले याचा हा लेखाजोखा आहे. त्याला, स्त्रीसुलभतेची जोड आपसुकच मिळाली आहे.
या कांदबरीत अनेक पात्रे आहेत. त्या प्रत्येकाच्या अस्तित्वामुळे ही कांदबरीत पुढे जात राहते. षा कादंबरीत लेखिकेने सर्व पात्रांना योग्य जागा व योग्य माप दिले आहे. त्यामुळे, कुठेही पात्रे कादंबरीशी अलिप्त न वाटता त्याला पुरकच राहतात.येथे लेखिकेने इतिहास व कल्पना यामध्ये सरमिसळ होणार नाही यांची काळजी घेतलेली दिसते. कथानकात प्रसंगानुरूप अनेक पात्रे आलेली आहेत. त्या प्रत्येकाची स्वभाववैशिष्टये, वय, जाणीवेची पातळी वेगळी आहे मात्र, त्या सर्व पातळया, दिसणारा फरक लेखिकेने आपल्या ओघवत्या शैलीत योग्यपणाने मांडलेला आहे्र यामुळे, कथा कोठेही भरकटत जात नाही वा तो एकजिनसीपणा कुठे तुटत नाही.स्त्रीसुलभतेमुळे असेल कदाचित पण स्त्रीपात्रे अधिकच खुलली आहेत त्याच्यातील भावनिक आंदोलने अधिक स्पष्ट, भावस्पर्शी आहेत. आवलीच्या पर्यायाने तुकारामाचा जीवन प्रवासात सामजिक परिस्थीतीने मोठी भूमिका बजावली. तो काळ रंगवण्यात लेखिकेला बरेच यश आले आहे. ते लेखन परिस्थिती डोळयासमोर उभी राहण्यास मदत करते ज्यायोगी तो जीवनपट सहजतेने उलघडत जातो. आवलीबाबत म्हणाल तर उत्तम या एकच शब्दाने आवलीसंबधीत लेखनावर प्रतिक्रिया देता येईल ''आवली'' हे आपल्या कथानकाचे मुख्यपात्र आहे. याची जाणीव ठेवून लेखिकेने ते मस्त खुलवले आहेत. इतिहासाचे जास्त ओझे नसल्याने तीला या पात्रात विविध रंग भरण्यास पुर्ण वाव होता. झ्याचा पुरेपुर वापर लेखिकेने केलेला आहे. आपल्याला काय सांगायचे आहे ते लेखिकेला पुर्ण ज्ञात आहे. हे प्रत्येक वाक्यातून जाणवते तीचे बालपण, सासर, माहेर, आंनदी वातावरण असे काही रंगविले आहे की ते एका विशिष्ट उंचीवर जाऊन पोहोचते आणि अचानक युटर्न घेते त्यामुळे तीची मानसिक स्थिती, तिच्या मनातील कल्लोळ, हळूहळू तिचे विचार पटूदेखील लागतात. सपुर्ण कादंबरीत लेखिकेने तिचे व तुकारामांचे तिचे व पांडूरगाचे आणि तिचे तिच्या मुलांशी असणारे नाते संवादातून सुयोग्यरित्या मांडलेले आहे. त्यामुळे तेथे कोठेही अवास्तवता जाणवत नाही याशिवाय लेखिकेने एक महत्वाची गोष्ट केली आहे. तीने इतिहास कोठेही टाळलेला नाही. आवलीची एक अष्टपैलू स्त्री म्हणून ओळख निर्माण करताना तीने भांडणे केली हे कोठेही टाळले नाही पण, त्या भांडणाचे लिखाण अशाप्रकारे झाले आहे की ती भांडणे होण्यास आवली नाहीतर परिस्थिती कारणीभूत होती हे दाखवून देण्यास लेखिका तसुभरही कमी पडलेला नाही म्हणूनच शेवटी एक नवी आवली उभी करण्यास लेखिका यशस्वी होते आणि इथेच तिचा खरा विजय आहे.
तुकारामांबाबत बोलायचे, तर ते त्यांचे चरित्र सर्वज्ञात आहे. त्यास धक्का लावण्याचे कोणतेही धाडस लेखिकेने केलेले नाही हे आवलीचे जीवनवर्णन असल्याने साहजिकच तुकारामांना दुय्यम स्थान आहे पण दुसर्या अंगाने त्यांचेही चरित्र फुलत जाते. येथे लेखिकेने तुकारामांचा दुष्टीकोन, आवलीचा दुष्टीकोन त्यातील बदल समाजावर व समाजाचा होणार परिणाम यातील द्वंद्व योग्य तीव्रतेने प्रगट होते मात्र लेखिकेचा एक विचार वाखणण्याजोगा आहे गेल्या 3-400 वर्षात तुकारामांबद्दल अनेक अंध्रक्षध्दा निर्माण झाल्या पण त्याचा वापर कादंबरीत कोठेच नाही उलट त्याला व्यवहारिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला आहे सदेह वैकुंठगमन स्वप्नात दाखवणे हे तर फारच छान म्हणावे लागेल. महत्वाचे म्हणजे आवलील मोठे करताना तुकारामांच्या प्रतिमेला त्यांच्या जेष्ठत्वाला कणभरही धक्का लावलेला नाही. त्यामुळे कोणताही विद्रोह न होता आवली आपल्या मनात घर करते हे महत्वाचे.
लेखिकेने आपल्या कादंबरीत एक वेगळा प्रयोग केला आहे. तुकाराम आवली या दोन पात्रासोबतच तीने विठ्ठल रखुमाईला देखील सजीव केले आहे व प्रत्येक भागानंतर एक प्रेक्षक म्हणून विठ्ठल- रखुमाईची त्या प्रसंगावरील प्रतिक्रिया घेतली आहे. यामुळे साक्षात देव-भक्त, त्यांची पत्नी यांच्यातील नाते सबंध छानपणे मांडता आलेले आहेतच पण त्यामुळे कादंबरीला एक विशिष्ट वजन प्राप्त झालेले आहे.तुकारामाच्या वैवाहिक जीवनात संकटे देवाने म्हणजे पांडूरंगानेच आणली मग त्यामागच्या त्यांच्या भावना काय होत्या हे जाणून होण्यास ते पॅराग्राफ फार महत्वाचे ठरतात आवलीचे मोठेपण दाखवण्यासाठी लेखिकेने याचा वापर खुबीने करून घेतला आहे म्हणूच कादंबरीचा तो उच्चांक ठरतो.
अशी ही ''तुकयाची आवली'' मात्र या आवलीची गाथा सांगताना कळत - नकळत काही त्रुटी राहून गेलेल्या आहेत का कोणास ठाऊक पण आवली पहिल्या पानापासून पकड घेत नाही आपणाला तिच्याशी समरास व्हायला थोडवेळ जावा लागतो याशिवाय आवलीच्या पुर्वर्धात काही प्रंसग उदाः मुलगीचा हात मागणे इतक्या सहजतेने घेतले गेले आहेत की ते खरेच इतक्या सहजतेने आयुष्यात घडतात का असा प्रश्न पडतो एक दोन ठिकाणी लेखणी थोडी वाहावत गेली आहे पण तेवढया पुरतीच! याऊलट शिवाजी महाराजांच्या भेटीच्या प्रसंगाला अतिशय कमी महत्व दिलेले आहे जे सारखे मनाला खटकते याशिवाय, आवली उलघडताना त्यांनी काही नात्यांची वीणा उलघडलेलीच नाही.तुकारामांची पहिली पत्नी जीवंत होती. कल्पनाविश्व वापरायचे होते तर यांच्यातील संवाद खुलवून आवलीला अधिक योग्य घडवता आले असते याशिवाय तुकाराम आवली यांच्या वैवाहिक जीवनाचा उल्लेख जवळजवळ नाहीच जे असणे अत्यंत गरजेचे होते काही दगड सोडल्यास हा संपूर्ण कल्पनाविष्कार आहे या अविष्काराचे ध्येय साहजिक आवलीला एक चांगली निदान कजाग नसणारी स्त्री म्हणून उभी करणे हाच आहे पण काही ठिकाणी लेखिका तटस्थता व आपलेपणा या गोधळात पडलेली दिसते. त्यामुळे आवलीची भांडणे तुकारामांवर काय परिणाम करीत यांच्या उल्लेख जास्त नाही त्यामूळे तीची दुसरी बाजू जवळजवळ झाकोकली जाते जे व्यक्तिवित्रणाचा मरक आहे स्त्रीचा विचार केला असल्याने सहानभूतीची भावना ठिकठिकाणी उमटते.ज्याची आवश्यकता नाही.
या सर्व त्रुटींसह आवली चांगली आहे. उपमांचा योग्य वापर ओघवती भाषा योग्य भावना दर्शन यामुळे साहित्यिकदृष्टया आवली उत्कृष्टच आहे. मेहता पब्लिशिंगचे पुस्तक असल्याने मुखपृष्ट व मांडणी अत्युत्तम ! या सर्वामुळे पुस्तक हातात घेतल्यावर खरचं झपाटायला होते. ते सोडवत नाही पण या सर्वाहून महत्वाचे की लेखिकेने इतिहास व कल्पनेच्या मेळातून समजाला एका समजुतीतुन बाहेर काढायचा प्रयत्न केलाय.ज्याप्रमाणे तीने पुस्तक नव%यासाठी मरणा%या हिरकणींना अर्पण केले आहे.त्याचप्रमाणे एका हिरकणीला मनाच्या वनवासातून दूर करायचा प्रयत्न केला आहे. शेवटी असं म्हटलय की ''शेवटी का होईना त्या विठूरायानं मान्य केलं होत की तुकाराम फक्त आवलीचे होते आणि आवली तुकारामांची. ती होती फक्त तुक्याची आवली'' पण या आवलीला 400 वर्षानं वा होईना समाजाचं बनवलयं या कादंबरीनं आता ती झाली आहे. ''समाजाची आवली''
कायमची
विनायक वा. पाचलग
11 वी विज्ञान शाखा
विवेकांनद कॉलेज कोल्हापूर
vinayakpachalag@gmail.com
www.marathilegends.tk
अवांतर- २ दीवसापुर्वी विवेकानंद जयंती साजरी झाली त्यानिमित्याने माझ्याकडुन या महापुरशाला विनम्र अभिवादन
कोणाकडे त्यांचे काही लिखाण उपलब्ध असल्यास ते जरुर मला पाठवावे वाचायला आवडेल.
अतिअवांतर्-परवा सा रे ग म प पाहिले त्याचा निकाल तुम्हाला माहित असेलच या निकालासाठी सर्व संगीतप्रेमींचे अभिनंदन
आणि हो या निकालासाठी सगळी मराठी जनता एकवटली होती त्याचे प्रत्यंतर महाजालावर देखील येत होते
ही एकजुट अशीच कायम राहो हीच सदीच्छा कारण हीच गोष्ट दहशतवादावर लागु पडेल
डीस्क्लेमर्-हा लेख नोवेंबर मध्ये लिहिला आहे मात्र एका स्पर्धेला तो पाठवला असल्याने येथे दीला नव्हता आज देत आहे .आणि हो मला ग्रंथ परिक्षण कसे लिहायचे याचा फॉरमॅट माहित नाही तेव्हा लिहिलेले गोड मानुन घ्यावे आणि प्राजु यानी याच विषयावर लिहिलेल्या लेखाची याच्याशी तुलना करु नये
सर्वाना सक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा
आता एक आनंदाची गोष्ट-
या लेखाला महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या ग्रंथपरिक्ष्ण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला होता
तर कालच जाहिर झालेल्या निकलानुसार इचलकरंजीत झालेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत संपुर्ण कोल्हापुर व सांगलीतुन द्वीतीय क्रमांक मिळाला ते सुद्धा सर्वात लहान लेखक असताना
असो
काल आम्ही एका ठिकाणी खुप दंगा घातला तो येथे पहा
प्रतिक्रिया
15 Jan 2009 - 8:47 am | मीनल
विनायक ,
सर्वात प्रथम म्हणजे तुझ कौतुक.
इतक्या लहान वयात तू इतक लिहितो आहेस. विचार पूर्वक लिहितो आहेस.
वयाने बराच लहान आहेस. विज्ञान शाखेबरोबरच इतरही वाचन करतो आहेस आणि ते अभ्यास म्हणून नाही हे ही लक्षात येते आहे.
तूला खूप सदिच्छा.
`तुकयाची आवली `चे तू केलेले वाचन, त्यावरचा तूझा विचार आणि त्यावर लिहिलेला हा लेख सर्वच कौतुकास्पद आहे.
अभिनंदन.
15 Jan 2009 - 1:22 pm | विसोबा खेचर
`तुकयाची आवली `चे तू केलेले वाचन, त्यावरचा तूझा विचार आणि त्यावर लिहिलेला हा लेख सर्वच कौतुकास्पद आहे.
अभिनंदन.
हेच म्हणतो..!
बाय द वे, तुक्याची आवली ह्या पुस्तकाच्या लेखिका सौ गोखले या आपल्या मिपाच्या प्राजूच्या मातोश्री होत!
असो,
तात्या.
15 Jan 2009 - 6:21 pm | विनायक पाचलग
चायला आम्ही गंडलोच की
आमची या विषयावर चर्चा झाली होती त्याच्याशी (प्राजु) पण शेवटपर्यंट त्यानी सांगीतले नाही असो
आता बघु लेख लोकाना आवडला तर पाठवीन त्याना
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
15 Jan 2009 - 8:42 pm | प्राजु
बाय द वे, तुक्याची आवली ह्या पुस्तकाच्या लेखिका सौ गोखले या आपल्या मिपाच्या प्राजूच्या मातोश्री होत!
नको तिथं बोलायची सवय काही जात नाही तुमची.. ;) ह. घ्यालच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Jan 2009 - 6:53 pm | संदीप चित्रे
विनायक...
सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन इतक्या लहान वयात चांगलं वाचायची सवय लावून घेतल्याबद्दल आणि त्याहून महत्वाचं म्हणजे जे वाचलं ते सारांशाने व्यवस्थित लिहिण्यावद्दल.
तुम्ही ह्यापुढेही खूप वाचते आणि लिहिते रहावे ह्या शुभेच्छा !
प्राजुला हा लेख नक्की आवडेल असं वाटतंय...
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
15 Jan 2009 - 8:40 pm | प्राजु
प्राजुला हा लेख नक्की आवडेल असं वाटतंय...
खरंच आवडला. त्याने मला व्य. नि. मधून पाठवला होता.. तेव्हाही त्याला हे मी बोलले होते.
चायला आम्ही गंडलोच की..
असं म्हणू शकतोस. मी तुकयाची आवलीचे कथारूपी वाचनही केले होते इप्रसारण वर.
आमची या विषयावर चर्चा झाली होती त्याच्याशी (प्राजु) पण शेवटपर्यंट त्यानी सांगीतले नाही असो
मी जर आधी बोलले असते तुला तर कदाचित, मंजुश्री गोखल्यांची मुलगी या दृष्टीने तू माझ्याशी या लेखाबद्दल चर्चा केली असतीस .. कदाचित ती इतकी प्रामाणिकपणे केली नसतीस... आणि तेच मला नको होतं.
आता बघु लेख लोकाना आवडला तर पाठवीन त्याना
.. लेख तुझा चांगलाच आहे. यात प्रश्नच नाही. नक्की पाठव लेखिकेला.. मी ही त्याबद्दल बोलले आहे तिला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Jan 2009 - 9:02 pm | लिखाळ
लेख छान आहे. पुस्तक काळजीपूर्वक वाचून छान परिक्षण करायचा प्रयत्न केला आहे. अभिनंदन !
हेची फळ काय मम तपाला असे काहीसे तुकाबा म्हणाले ते म्हणूनच का? :) (ह.घ्या. )
विवेकानंदांचे साहित्याचा जालावर शोध घ्या. रामकृष्ण मठाच्या प्रकाशनाची अनेकानेक पुस्तके वाजवी किंमतीला दुकानांत मिळतात. त्यांचा नक्कीच उपयोग होईल. समग्र विवेकानंद साहित्य 'विवेकानंद ग्रंथावली' या नावाने दहा खंडात उपल्ब्ध आहे. त्यांची किंमतही फार नसावी.
सारेगमपच्या निर्णयाबद्दल दुमत आहे. प्रेक्षकांना हवे म्हणून सर्व मुलांना महाअंतिम फेरीसाठी ठेवले यामध्ये रोहित राऊत या स्पर्धकाला झुकते माप मिळाले असे मला वाटले. तो महाअंतीमसाठी निवडला गेला नसता तर मला ठीक वाटले असते.
तुमच्या लेखाला पहिले बक्षिस मिळाले याबद्दल अभिनंदन.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
15 Jan 2009 - 9:53 pm | घाटावरचे भट
>>रामकृष्ण मठाच्या प्रकाशनाची अनेकानेक पुस्तके वाजवी किंमतीला दुकानांत मिळतात. त्यांचा नक्कीच उपयोग होईल. समग्र विवेकानंद साहित्य 'विवेकानंद ग्रंथावली' या नावाने दहा खंडात उपल्ब्ध आहे. त्यांची किंमतही फार नसावी.
हजार ते बाराशे रुपये बहुधा. जास्तही असेल कदाचित. पण त्या पुस्तकांत जे काही अनमोल विचार भरलेत त्याच्यामानाने किंमत अगदीच किरकोळ आहे.
16 Jan 2009 - 3:50 pm | विनायक पाचलग
हो घेइन
माझयाकडे आहेत आणखी काही
पण मेल मधुन वगैरे कोणाला काही आले असेल तर पाठवावे असे मला म्हणायचे होते
असो लेखावर पण प्रतिक्रिया द्या
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
16 Jan 2009 - 5:05 pm | राघव
सुंदर लिहिलेले आहेस. अभिनंदन! :)
विवेकानंदांची पुस्तके वाचण्याचा मानस छानच आहे. जरूर वाच. ती व्यक्तीच अफाट होती! पण विवेकानंद नीट समजून घेण्यासाठी त्यांच्या ठाकुरांनाही समजून घ्यावे लागते!! शक्य झाले तर "श्रीरामकृष्ण वचनामृत" हेही वाच. मास्तर महाशयांनी लिहिलेला मास्टर पीस आहे! ब्येश्टेश्ट!!
संत वाङमयातले आणखी वाचायचे असेल तर बेलसरेबाबांनी लिहिलेले श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे चरित्र वाच.
श्रीमहाराजांच्या आठवणींचे एक पुस्तक श्री. ल. गो. मराठे तथा अप्पासाहेब मराठे लिखित "श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या हृद्य आठवणी" म्हणून प्रसिद्ध झालेले आहे. तेही सुंदर आहे.
संत वाङमयाच्या संगतीत आपली दृष्टी निर्मळ होत जाते, जगणे आनंददायी होत जाते हा स्वानुभव आहे. :)
याहून अधिक माझा व्यासंग नाही. त्यामुळे बाकी जास्त नाही सांगू शकत. क्षमस्व. :)
टीप: साधारण तुझ्याच वयाचा आहे मी. म्हणून अरे-तुरेच करतो.
16 Jan 2009 - 5:19 pm | लिखाळ
अचानक आठवले म्हणून लिहितो.
'रामकृष्ण आणि विबेकानंद' या नावाचे वि रा करंदीकरांचे पुस्तक फार छान आहे.
या दोघांची चरित्रं त्या मध्ये आहेत. मिळाले तर जरूर वाच.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.