राम राम मंडळी,
मनुष्य म्हटला की त्यासोबत त्याचे गुणदोष हे आलेच. सर्वगुणसंपन्न कुणीच नसतो, तसेच सर्वस्वी दोषी, पापी, दुरचारीही कुणीच नसतो. स्त्रीपुरुष म्हटलं की त्यासोबत एकमेकांबद्दल प्रेमप्रकरणं, कुजबूज, कानगोष्टी, लफडी-कुलंगडी, या गोष्टीही येणं काही अस्वाभाविक म्हणता येणार नाही!
तुम्हाआम्हाला (म्हणजे निदान मला तरी!), प्रथमपासूनच कुणाचं सूत कुणासोबत जमतंय, कुणाचं लफडं भलतंच रंगात आलं आहे, कुणाचं मेतकूट आहे, कुणाचं सध्या फाटलं आहे यासारख्या भानगडीत इंटरेस्ट अगदी चिक्कार! त्यातून आम्हा कोकणातल्या लोकांना तर यासारख्या गॉसिपिंगमध्ये भारीच रस!
तर ते असो! सांगायचा मुद्दा असा की आपली हिंदी फिल्म इंडष्ट्री म्हणजे तर यासारख्या गॉसिपिंगचा खजिनाच! तेच गॉसिपिंग इथे करण्याकरता, जरा विरंगुळा म्हणून आम्ही हे सदर इथे सुरू करत आहोत. हिंदी फिल्म इंडष्ट्री मधल्या तुम्हाला माहीत असलेल्या, तुमच्या कानावर आलेल्या प्रेमप्रकरणांबद्दल, लफड्याकुलंगड्याबद्दल इथे मुक्त चर्चा करा आणि दोन घटका जरा गंमत करा!
मात्र एक लहानशी अट - स्वत:च्या मनाने बातम्या बनवू नका! :) तुम्ही लिहीत असलेल्या भानगडींचा कुठल्यातरी वर्तमानपत्रात किंवा फिल्मी मासिकात उलेख हवा. (दुवा द्यायची गरज नाही!)
चला तर मंडळी, मीच सुरवात करतो -
अलिकडे दिपिका पडूकोन हे नांव मी फार ऐकतोय. ही म्हणे कुणा क्रिकेटियर सोबत ऑस्ट्रेलियाला फिरायला गेली होती! असो.. (मेलीला ऑस्ट्रेलिया फिरायला तात्या मोकळाच होता तो दिसला नाही!) असो, तशीही दिपिका मला फारशी आवडत नाही!
करिना कपूरने अलिकडे शाहिद कपूरला टाकला म्हणतात. तिची आवशी बबिता, तिला म्हणे ते पसंद नाही. नाहीतरी करिना अगदी सगळ्या गोष्टी आईला विचारूनच करते म्हणा! :)
हल्ली करिना आणि आमच्या शर्मिलाचा मुलगा सैफ यांचं बरंच सूत जुळलं आहे असं मी ऐकून आहे. सैफने त्याची बायडी अमृता सिंगला हल्ली टाकली म्हणे! :)
प्रियांका चोप्रा आणि महेन्द्रसिंग धोणी यांनी एकत्र जमून गेल्या वर्षीचा ३१ डिसेंबर परदेशात साजरा केला म्हणतात! असो.. खरंखोटं देव जाणे! :)
चला! पुरे झाल्या देवगडी पारावरील गप्पा! घरी जाऊन आन्हिकं आवरली पाहिजेत. आज त्या हलकट आप्पा पेंडश्याकडे सत्यनारायण सांगायला जायचंय! फोकलिच्याच्या चेहेर्यावर एकवीस रुपये दक्षिणा देतांना एकवीस लाख रुपये दिल्याचा आविर्भाव असतो! :)
आपला,
(देवगडी गजालीकार!) तात्या.
प्रतिक्रिया
11 Jan 2008 - 11:17 am | इनोबा म्हणे
काय म्हणतोस तात्या...म्हणजे आता आपण सुद्धा 'चिंगम' खायचं... हरकत नाही... नाहीतरी आम्हाला लफड्यांमधे भलताच इंटरेस्ट आहे.
स्वतःची लफडी नाही चालणार का?
(लफडेबाज) -इनोबा
11 Jan 2008 - 11:20 am | बहुरंगी
अरे तात्या काय हे .... तु मोकळा असताना ती तिकडे ऑस्ट्रेलियाला फिरायला गेलीच कशी .... मोठच कोडं आहे. आणि तिकडे जाऊन तिला मिळाल काय तर भोपळा. म्हणे युवराज त्या दिवशी शुन्यात बाद झाला. मेल्याला एवढी घाई झाली होती तिला भेटायची. हो, बिचार्याला वाटलं असेल, हा लवकर परत नाही गेला तर तो ढोणी चान्स मारुन जाईल.....
आपला,
बहुरंगी मिसळे
20 Mar 2010 - 4:19 pm | सुधीर काळे
नवाब ऑफ पतौडी (ज्यू) जेंव्हा ओळीने शून्यावर बाद होत असे तेंव्हाचा एक किस्सा सांगतात....
एकदा पतौडी फलंदाजीला गेला आणि दुसर्याच क्षणी शर्मिलाने त्याला पॅव्हेलियनमध्ये फोन केला. तिला सांगितले गेले कीं ते नुकतेच फलंदाजीला गेलेत. शर्मिला म्हणाली, "No problem! I will hold the line"
युवराजचीही अशी दशा न होवो!
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
Write to President: presidentofindia@rb.nic.in; Write to PM: pmosb@pmo.nic.in
11 Jan 2008 - 3:36 pm | स्वयम्भू (not verified)
ह्या सीने तरकांच काही खरं नही. इतक्या भानगडी सुरु असतात की आपण नक्की कुणाबरोबर आहोत हे त्या सुद्धा रोज सकाळचा पेपर पाहुन ठरवत असतील.
आपला,
स्वयंभू
20 Mar 2010 - 2:00 am | शेखर
हल्ली दिपीका सिध्दार्थ मल्या बरोबर फिरते आहे म्हणे... :)
20 Mar 2010 - 2:10 am | शुचि
त्या टायगर वूड्स च कोणत्या तरी वेट्रेसबरोबर प्रकरण आहे म्हणे.
मला तरी दया येते या प्रसिद्ध लोकांची च्यामारी साधी लफडी करता येत नाहीत मनमोकळेपणानी ;) .... काय चाटायचय त्या प्रसिद्धीला?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
20 Mar 2010 - 4:15 pm | सुधीर काळे
शुचीताई, टायगर वुड्सची निष्ठा पहा कशी त्याच्या गोल्फक्लबशी आहे. तिला कसं पटवतोय तो!
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
Write to President: presidentofindia@rb.nic.in; Write to PM: pmosb@pmo.nic.in
20 Mar 2010 - 2:42 am | राजेश घासकडवी
तात्याला दिपिका आंबट? पण मग त्या देवगडी कच्च्या कैऱ्या कराकरा चावून खाण्याच्या विख्यात आंबटशौकीनपणाचं काय?:-)
राजेश
20 Mar 2010 - 3:15 am | इंटरनेटस्नेही
त्यातून आम्हा कोकणातल्या लोकांना तर यासारख्या गॉसिपिंगमध्ये भारीच रस!
जाम भारी! अगदी १००% खरय..
--
(कोकणी, पक्षी: मालवणी) इंटरनेटप्रेमी..
20 Mar 2010 - 5:52 am | विसोबा खेचर
कात्रिनाचं आणि त्या नादान अवलक्षणी रणबीरचं हल्ली जमतंय म्हणतात.. कात्रिना हाती लागल्यापासून रणबीरने दिपिकाला भाव द्यायचा बंद केला म्हणे..
करीनाचं पूर्वीचं शाहीदप्रेम आता पुन्हा थोडंथोडं जागं होतं आहे म्हणतात..सैफसोबत सारे चाळे करून झाले, आता पुन्हा शाहीद..!
असो..
तात्या.
20 Mar 2010 - 5:56 am | शुचि
सैफसोबत सारे चाळे करून झाले =)) =)) =))
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
20 Mar 2010 - 5:59 am | गोगोल
तुमचा ते पवित्र अमर प्रेम आणि त्यांचे ते चाळे.
पण कतरिना आणि रणबीर? सलमानचा पत्ता गुल का?
20 Mar 2010 - 6:02 am | शुचि
नाही आपला तो हळूवार मूक-संवाद दुसर्याचे ते चावट चाळे =)) =)) =)) ;)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
20 Mar 2010 - 8:29 am | तुका म्हणे
तुम्हारा प्यार वो प्यार, और हमारा व्यभिचार?
20 Mar 2010 - 10:03 am | II विकास II
>>तुमचा ते पवित्र अमर प्रेम आणि त्यांचे ते चाळे.
थोडी सुधारणा
तुमचा ते पवित्र जीव प्रेम आणि त्यांचे ते चाळे.
20 Mar 2010 - 8:12 am | तुका म्हणे
तात्या हल्ली अनुष्काला सोडून, पद्माप्रीयासोबत इडली चटणी रापताना मंगरूळ मधल्या कुठल्याश्या उडप्याच्या दुकानात दिसतो म्हणे. म्हणजे, असा आमचा सन्ध्यानन्द चा मंगरूळ मधला वार्ताहर सांगत होता.
अनुष्का सोबत सारे चिकन लौलीपौप खाऊन झाले, आता पद्मप्रिया ....!
असो,
तुक्या.
20 Mar 2010 - 10:05 am | II विकास II
>>तात्या हल्ली अनुष्काला सोडून, पद्माप्रीयासोबत इडली चटणी रापताना मंगरूळ मधल्या कुठल्याश्या उडप्याच्या दुकानात दिसतो म्हणे.
एकंदर अनुष्काला बरेच संपत्ती मिळेल असे दिसते,
20 Mar 2010 - 10:13 am | II विकास II
तात्या, तुम्ही अनुष्काची जीवनाडी पाहीली आहे का? सहज शंका
20 Mar 2010 - 12:59 pm | युयुत्सु
का हो? उंची मुळे का?
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.