बर्फ जादाचा जणू...

केसुरंगा's picture
केसुरंगा in जे न देखे रवी...
13 Jan 2009 - 1:30 am

मिल्याचे 'स्वप्न एखादे जणू...' वाचताना आम्हाला सत्याची जाणीव झाली! ;)

चार चौघांसारखे माझे पिणे हे चालले
चार चौघांसारखे मी चार प्याले ढोसले

स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या ग्लासातले
बर्फ जादाचा जणू घालून आहे गोठले

टेबलाला धडकुनी पडलो कितींदा मी जरी
भंगले नाही तरी प्याले कधी हातातले

घेतली काढून त्यांनी बाटली हातातली
वाटले मी टुन्न झालो; ग्लास सारे तोडले

दोष हा माझा कसा? जर पाजले त्यांनी मला
मीच हवर्‍यासारखे प्याले 'विरोधी' ढोसले?

मी किती ठोठावले पण दार ती उघडेच ना
का असे अमुचे कलत्र आज ही रागावले?

हाय! छळवादी किती आहे बघा हा सासरा
मी असा 'कोमेजलो' तेव्हाच ते ही उगवले!

ह्याचसाठी 'टाकुनी' जाण्यास घाबरतो घरी
'पंच', झाडू, लाथ हे! सारे हिच्या टप्प्यातले

केसुरंगा

कवितागझलविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jan 2009 - 1:33 am | बिपिन कार्यकर्ते

मेलो.

=)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

प्राजु's picture

13 Jan 2009 - 1:36 am | प्राजु

हाय! छळवादी किती आहे बघा हा सासरा
मी असा 'कोमेजलो' तेव्हाच ते ही उगवले!

ह्याचसाठी 'टाकुनी' जाण्यास घाबरतो घरी
'पंच', झाडू, लाथ हे! सारे हिच्या टप्प्यातले

हाहाहा..! खूप दिवसांनी येणे केलेत. मस्त विडंबन. मजा आली वाचून.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

13 Jan 2009 - 1:37 am | चतुरंग

लई म्हणजे लईच खास हां केसुरंगा भाई!
खूप दिवसांनी षटकार मारलात! ;)

(खुद के साथ बातां : रंगा, काँपिटिशन आली रे परत, लेखणी परजायला हवी! :? )

चतुरंग

चेतन's picture

13 Jan 2009 - 10:47 am | चेतन

ह्याचसाठी 'टाकुनी' जाण्यास घाबरतो घरी
'पंच', झाडू, लाथ हे! सारे हिच्या टप्प्यातले

फर्मास जमलयं
बर्‍याच दिवसांनी तुमच्याकडुन मस्त विडंबन वाचायला मिळालं

अवांतरः मिपावरचे विडंबनकार सुस्तावलेत की चांगला कच्चा माल मिळत नाही आहे :?

चेतन

विसोबा खेचर's picture

13 Jan 2009 - 1:13 pm | विसोबा खेचर

चार चौघांसारखे माझे पिणे हे चालले
चार चौघांसारखे मी चार प्याले ढोसले

स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या ग्लासातले
बर्फ जादाचा जणू घालून आहे गोठले

मस्त रे! :)

तात्या.

केशवसुमार's picture

14 Jan 2009 - 3:43 am | केशवसुमार

चार चौघांसारखे माझे पिणे हे चालले
चार चौघांसारखे मी चार प्याले ढोसले

स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या ग्लासातले
बर्फ जादाचा जणू घालून आहे गोठले

चांगल चालयं.. चालू दे..

केशवसुमार