या वर्षी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. अजून पर्यन्त मिसळपाव वर देशातील सर्वात मोठ्या संस्कृतिक आणि सामाजिक संघटणे बाबत एक ही लेख आला नाही. माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी.
आज RSS च्या ५ लाखांहून अधिक शाखा देशभर कार्यरत आहेत. या शाखा सांस्कृतिक राष्ट्रवाद, व्यक्तिमत्त्व विकास, आणि नैतिक शिक्षण यावर भर देतात. विद्या भारती ही शैक्षणिक संस्था १२,७५४ शाळा चालवते, जिथे भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण दिले जाते आणि आधुनिक विषयांचाही समावेश असतो. सेवा भारती ही सामाजिक संस्था आरोग्य, शिक्षण आणि आपत्ती मदतीसाठी हजारो प्रकल्प राबवते, विशेषतः दुर्बल आणि दुर्गम भागांमध्ये. राष्ट्र सेविका समितीसारख्या स्त्री संघटनांद्वारे महिलांना नेतृत्व आणि सांस्कृतिक प्रशिक्षण दिले जाते. या सर्व संस्था मिळून शिक्षण, सेवा आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देतात.
अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम सध्या देशभरातील ६३,९२६ वनवासी गावांपैकी २१,८२९ गावांमध्ये विविध सेवा प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पांमध्ये शाळा, बालवाडी, निवासी वसतिगृहे, आध्यात्मिक केंद्रे, दवाखाने आणि आरोग्य रक्षकांचे कार्य समाविष्ट आहे. महाराष्ट्रातील ५,६०० वनवासी गावांपैकी सुमारे २,००० गावांमध्ये आश्रमाचे कार्य सक्रिय आहे. याशिवाय, शिक्षण व आरोग्य सेवांबरोबरच ११३ कृषी विकास केंद्रेही कार्यरत आहेत, जी स्थानिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी मदत करतात.
१९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धकाळात RSS ने देशसेवेचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वयंसेवकांनी रक्तदान, अन्नवाटप, मदत शिबिरे, आणि अनेक ठिकाणी प्रत्यक्ष सीमेवर सैनिकांना मदत केली. या योगदानाची दखल घेत, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६३ साली, २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात RSS च्या स्वयंसेवकांना पथसंचलनासाठी आमंत्रित केले.
महात्मा गांधी यांनी १९३४ साली वर्धा येथे संघाच्या शिबिराला भेट दिली. त्या वेळी डॉ. हेडगेवार जिवंत होते. गांधीजींनी शिबिरातील शिस्त, अस्पृश्यतेचा अभाव आणि साधेपणा पाहून संघाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले, “संघाची सेवा आणि आत्मत्याग यावर आधारित प्रेरणा ही संघाला बळकट करणार आहे.” हे उद्गार ‘हरिजन’ साप्ताहिकात २८ सप्टेंबर १९४७ रोजी प्रसिद्ध झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ जानेवारी १९४० रोजी कराड (सातारा) येथे संघाच्या शाखेला भेट दिली. त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला आणि संघाच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण केले. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले, “जरी काही मुद्द्यांवर मतभेद असले, तरी मी संघाकडे आपुलकीच्या भावनेने पाहतो.” ही घटना ‘केसरी’ दैनिकात ९ जानेवारी १९४० रोजी प्रसिद्ध झाली होती.
देशावर जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतात किंवा कोरोना सारखे आजार पसरतात, तेव्हा आरएसएसचे कार्यकर्ते तत्काळ आपदाग्रस्त जनतेच्या सेवेसाठी सज्ज होतात. १९९३च लातूर भूकंप, २००१ गुजरात भूकंप, २०१३ उत्तराखंड पूर, २०१८ केरळ पूर अशा अनेक आपत्तींमध्ये संघाने मदत शिबिरे, वैद्यकीय सेवा आणि पुनर्बांधणीचे कार्य केले. हजारो कुटुंबांना नवजीवन मिळवून देण्यात संघाचा सेवाभाव महत्त्वाचा ठरला.
२००१ साली कच्छ जिल्ह्यातील भूकंपानंतर, आरएसएस आणि सेवा भारतीच्या स्वयंसेवकांनी भुज, अंजार आणि गांधीधाम परिसरात शेकडो मदत शिबिरे उभारले. अन्न, पाणी, औषधे आणि तात्पुरते निवारे पुरवण्यात आले. हुनरशाला फाउंडेशन आणि कच्छ महिला विकास संघटन यांच्या सहकार्याने पारंपरिक भुंगा घरांची रचना पुन्हा उभी करण्यात आली. स्थानिक मजुरांना भूकंप प्रतिरोधक बांधकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आणि गुजराती भाषेत मॅन्युअल तयार करून मार्गदर्शन करण्यात आले.
कोरोना महामारीच्या काळात, RSS चे ५ लाखांहून अधिक स्वयंसेवक रस्त्यावर उतरून गरजूंना मदत करत होते. काही स्वयंसेवकांनी आपला जीव गमावला, तरीही सेवा थांबली नाही. पाच जून २०२१ पर्यंत, म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तानच्या सीमांपासून ते जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारण्यात आली. ११८ शहरांमध्ये कोविड केअर सेंटर्स, २८७ शहरांमध्ये आयसोलेशन सेंटर्स, ५ कोटी भोजन पॅकेट्स, ७३ लाखांहून अधिक कुटुंबांना राशन, आणि ४४ लाख स्थलांतरित मजुरांना सेवा पुरवण्यात आली.
२०२५ मध्ये, देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये संघाने पुन्हा ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारून लाखो गरजूंना अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवली.
शहरातील निवासी असो की वनवासी – सर्व भारतीयांची सेवा करणे आणि भारताला परम वैभवशाली बनविणे हेच आरएसएस च मुख्य ध्येय आहे.
प्रतिक्रिया
9 Oct 2025 - 1:53 pm | आग्या१९९०
हिंदू कधीच संघटित होणार नाही. उच्च नीच वर्गभेद संघाला नष्ट करता येणार नाही. कारण ते त्यांचे मूळ उद्दीष्ट नाही. हिंदू हिंदूला जोडे फेकून मारत असताना संघ सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे.
9 Oct 2025 - 4:24 pm | शाम भागवत
वरील वाक्य वास्तवाला धरून नाही आहे. कारण
आणिबाणीत सर्व विरोधीपक्ष तुरूंगात असताना घटनेच्या प्रस्तावने दुरूस्ती करून 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' या दोन शब्दांची भर घातली गेलेली आहे. १९७५ च्या अगोदरच्या घटनेच्या प्रस्तावनेत हे दोन शब्द नाहीत.
या शब्दांची योजना बरोबर आहे असे समजून चालणारे जे पक्ष आहेत त्यांची लोकसभेतील मतदान टक्केवारी गेली ५० वर्षे सातत्याने घटत चाललेली आहे. या उलट हे दोन शब्द मंजूर नसलेले व हिंदूहितैषी असलेले जे पक्ष आहेत त्यांची मतदान टक्केवारी वाढत जाताना दिसत आहे.
२०२४ च्या लोकसभेत हिंदूहितैषी पक्षांना बऱ्याच जागा गमवायला लागल्या असल्या तरी त्यातील मुख्य़ पक्षाची म्हणजे भाजपाची मतदान टक्केवारी ३७.७ टक्यांवरून ३६.५६ टक्के इतकीच घसरलेली आहे. मात्र बांगला देशातील घटनांनंतर हिंदूहितैषी मतदानात चांगलीच वाढ झालेली असून, त्याचा परिणाम लोकसभेच्या नंतरच्या विधानसभा निवडणूकांत पाहावयास मिळालेला दिसतो. त्याचप्रमाणे पहलगाम घटनेमुळे ही प्रक्रीया आणखी जोर पकडून हिंदूहितैषी पक्षांची मतदान टक्केवारी आणखीन वाढायची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा अंदाज बिहारच्या निवडणूकीत येऊ शकतो.
पण
हिंदू कधीच संघटित होणार नाही.
असा तुमचा आदर्शवाद असेल किंवा, तुमची तशी इच्छा असेल तर त्याला काहीच हरकत नाही. ते तुमचे स्वातंत्र्य अबाधित आहेच.
असो.
9 Oct 2025 - 8:03 pm | आग्या१९९०
कसला आदर्शवाद आणि कसली इच्छा ? वस्तुस्थिती आहे. संघटीत म्हणजे जातपात मानणे, आपल्याच धर्मातील दलितांवर अत्याचार करणे, त्यांच्या जमिनी हडप करणे. ह्यात हिंदुवादी सरकार ,पोलिस सामील असणे. ही तुमची हिंदू संघटितची व्याख्या असेल तर मला व्याख्या तपासून घ्यावी लागेल.
ह्यात संघाचे योगदान काय? हे हिंदुत्ववादी राजकीय पक्षाचे कारस्थान आहे. संघ ही राजकीय संघटना नाही. राजकीय संघटना असती तर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला असता असे सध्या संघाचे कार्यकर्ते बचाव करताना म्हणू लागले आहेत.
राजकीय संघटन आणि सामाजिक संघटन ह्यात गोंधळ करू नका. हिंदूंचे सामाजिक संघटन व्हावे हे संघाचे स्वप्न किंवा उद्दीष्ट नाहीच आहे. नैसर्गिक आपत्तीच्यावेळी संघवाल्यांनी मदतकार्य केले म्हणजे हिंदूंचे संघटन केले असे संघाला वाटते का? आणि जेव्हा हिंदू सवर्ण हिंदू दलितांवर अत्याचार करतो तेव्हा संघवाले तेथे काय आणि कोणाला मदत करतात? तोंड तरी उघडतात का?
8 Oct 2025 - 12:13 pm | विवेकपटाईत
जो व्यक्ति आपल्यादेशला मातृभूमि मनातों तो हिन्दू (त्यात सर्व धर्मीय येतात) ही संघाची अवधारणा आहे। संघा सामाजिक कार्य करताना हिंदू मुस्लिम भेदभाव करत नाही. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की विचारधारा से प्रभावित विद्या भारती के सरस्वती विद्या मंदिर के नाम से पूरे देश में संचालित स्कूलों में भी अभी 64000 मुस्लिम और 10000 ईसाई बच्चे पढ़ रहे हैं। दर्जनों शिक्षक भी मुस्लिम हैं। अभी पूरे देश में 12,500 औपचारिक और 12,000 अनौपचारिक विद्यालय चल रहे हैं।"https://www.jagran.com/jharkhand/ranchi-jharkhand-news-in-hindi-64000-mu...
7 Oct 2025 - 11:40 pm | गामा पैलवान
कपिलमुनी,
तुम्ही संघाशी जोडले गेले होतात हे नव्याने कळलं. तुम्ही संघात असतांना त्याने राजकारण केल्याचं तुम्हांस आढळून आलं का ? तुमचा रोकडा अनुभव काय म्हणतो ?
यापूर्वी संघाने राजकारण केल्याचं कधी ऐकलेलं नव्हतं. संघ राजकारणाच्या बाहेरंच असेल अशी शिस्त आखून दिली होती. तर मग संघावर स्वातंत्र्यलढ्यात भाग न घेतल्याचा आरोप कितपत उचित वाटतो ?
आधी समाज सुधारला पाहिजे अशी टिळकपूर्व मवाळांची धारणा होती. मग तेच धोरण संघाने चालवलं तर काय बिघडलं ? फक्त संघाने इंग्रजांशी सहकार्य वा विरोध काहीही उघडपणे केला नाही. बाकी, इंग्रजांशी सहकार्य म्हणाल तर गांधींनी दोन महायुद्धांसाठी हिंदी सैनिकांची भरती करायचं आवाहन केलेलं होतंच. मग संघावर आगपाखड नेमकी कशासाठी ?
याच न्यायाने भगतसिंगांची फाशी रद्द करण्यासाठी आंदोलन उभारणं हे राजकीय पाऊल आहे. ते संघाने उचलावं, अशी अपेक्षा का ठेवली जाते ? मनांत आणलं असतं तर भगतसिंगांची फाशी गांधी सहज रद्द करू शकले असते. ते राजकारणी असूनही त्यांनी ती रहित केली नाही. आणि संघ राजकारण करीत नसूनही त्याने राजकीय आंदोलन उभारायला पाहिजे, असं कसं काय ?
आ.न.,
-गा.पै.
8 Oct 2025 - 8:13 am | कपिलमुनी
आपण न भांडता मुद्देसूद चर्चा करू. वेळ मिळाला की प्रतिसाद टाकतो
9 Oct 2025 - 1:32 am | गामा पैलवान
धन्यवाद. इथे या धाग्यावरच चर्चा करूया.
-गा.पै.
8 Oct 2025 - 12:10 pm | विवेकपटाईत
संघाचे बाबतीत अनेकांचे पूर्वग्रह आहेत. जो व्यक्ति आपल्या देशाला मातृभूमी मानतो तो हिंदू (यात मुस्लिम ईसाई सर्व येतात. काही प्रमाणात मुस्लिम ही संघाच्या शाखेत जातात). संघ हिंसावर कधीच विश्वास ठेवत नाही. सामाजिक कार्य करताना हिंदू मुस्लिम भेदभाव करत नाही. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की विचारधारा से प्रभावित विद्या भारती के सरस्वती विद्या मंदिर के नाम से पूरे देश में संचालित स्कूलों में भी अभी 64000 मुस्लिम और 10000 ईसाई बच्चे पढ़ रहे हैं। दर्जनों शिक्षक भी मुस्लिम हैं। अभी पूरे देश में 12,500 औपचारिक और 12,000 अनौपचारिक विद्यालय चल रहे हैं।"https://www.jagran.com/jharkhand/ranchi-jharkhand-news-in-hindi-64000-mu...
9 Oct 2025 - 9:39 am | कपिलमुनी
दात खायचे वेगळे..
8 Oct 2025 - 4:41 pm | मारवा
एक बेसिक प्रश्न जगात एकूण किती हिंदू राष्ट्रे आहेत ?
एकूण किती ख्रिस्ती राष्ट्रे आहेत ?
एकूण किती इस्लामिक राष्ट्रे आहेत ?
म्हणजे शुद्ध हिंदू शुद्ध इस्लामिक शुद्ध ख्रिस्ती असलेली विचारतोय.
अजिबात धर्म निरपेक्ष नसलेली अशी.
आणि त्यात म्हणजे अशा धर्मनिरपेक्ष नसलेल्या राष्ट्रात जगण्याचा स्टार ते राष्ट्र धर्माधिष्ठित असल्याने वाईट झालाय की चांगला झालाय ?
तसेच जगातील लोकसंख्या wise सर्वात मोठी पहिले तीन प्रमुख धर्म कुठले ?
8 Oct 2025 - 4:51 pm | मारवा
तसेच मोठी लोकसंख्या असूनही हिंदू राष्ट्र एकही नसेल याचा अर्थ
1 हिंदुलोक हे पुरेसे सहिष्णु आहे असा काढता येऊ शकतो का ?
2 की हिंदुलोक पुरेसे दुबळे आहेत असा काढता येऊ शकतो का ?
3 की हिंदुलोक आणि हिंदू धर्मातील मूलतत्वे पुरेशी आक्रमक नाहीत असा काढता येऊ शकतो का ?
4 की हिंदू लोक हिंदू हा Way of life म्हणुन स्वीकारत असल्याने त्यांना याचे सोयर सुतक नसते का ?
5 आणि समजा भारत इतर देशा प्रमाणे इस्लामिक किंवा ख्रिस्ती प्रमाणे हिंदू राष्ट्र झाला तर याचा परिणाम काय होणार ?
6 सर्वात रोचक बाब already जे एक धर्मीय देश आहेत ते व अधार्मिक किंवा नास्तिक अशी कम्युनिस्ट विचारसरणी असलेले देश वरील सर्व 3 धर्मीय देशा पेक्षा उच्चतम जीवन स्तर असलेली आहेत का ?
9 Oct 2025 - 9:32 am | युयुत्सु
श्री० मारवा,
आपण उपस्थित केलेले प्रश्न कोणत्याही ए०आय्०ला जर विचारलेत तर पुरेशी समर्पक उत्तरे मिळतील अशी खात्री आहे.
9 Oct 2025 - 6:50 pm | मारवा
समता नव्हे समरसता असे संघ आवर्जून प्रतिपादन करतो.
ही संघाची सर्वात deep खेळी aahe.
9 Oct 2025 - 7:11 pm | अभ्या..
आदिवासी ऐवजी वनवासी ही सगळ्यात डिपेस्ट आहे.
.
दोन्ही मिळून अडाणीवासी अशी आगामी काळात दिसणारे बघा.
.
हिंदुहितैशी पक्ष म्हणे आपले गोग्गोड काका. ह्याट.........
10 Oct 2025 - 8:42 pm | शाम भागवत
:)))
10 Oct 2025 - 10:43 am | सुबोध खरे
इथे चर्चा करणे म्हणजे च्युईंग गम चघळण्यासारखे आहे.
कितीही चघळा पोटात काही जात नाही.
थोड्या वेळाने स्वादही राहत नाही.
आलात तर तुमच्या सह
नाही आलात तर तुमच्या विना
आणि मध्ये आलात तर तुम्हाला आडवे पाडून
या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे रा स्व संघ पुढे जातच राहील.
बाकी डावे आणि समाजवादी रडत राहतील हि काळ्या दगडावरची र्रेघ आहे.
मग त्यांनी त्याच दगडावर कितीही डोके आपटू द्या.
10 Oct 2025 - 11:29 am | अमरेंद्र बाहुबली
संघ पुढे जातच राहील.
ज्या संस्थेचा (जिची अधिकृत नोंदणी आहे की नाही?) समाजाला काडीचा उपयोग नाही, फक्त दसरा संचलन करून ट्रॅफिक वाढवून समाजाला उपद्रव द्यायचे काम करते ती संस्था पुढे गेली काय किंवा मागे गेली काय? काय फर के पडतो?
10 Oct 2025 - 11:49 am | युयुत्सु
श्री० अमरेंद्र बाहुबली
अशा ठिसूळ पायावर काम करणार्या संस्था / संघटना उन्माद वाढला की स्वतःच्या वजनाखाली कोसळून पडतात... तेव्हा निश्चिंत असा. संघाचे तळागाळातले मंदबुद्धी कार्यकर्ते हे त्यांचे बलस्थान आहे. त्यांना संघाने निर्माण केलेला भ्रम आणि वास्तव यात ताळमेळ साधायची क्षमता नसते. या मंडळीनी २०२४ च्या निवडणुकीच्या वेळी घातलेला गोंधळ आणि त्याचा निवडणूक निकालावर झालेला परिणाम सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ...
मूलभूत भेडसावणारे प्रश्न सोडवायची क्षमता आणि इच्छा संघामध्ये नाही. २०२९ च्या निवडणूकीच्या वेळी हा उन्माद वाढला तर आणखी मजा येईल. काँग्रेस आणि इतर पक्षांनी मात्र स्वतःची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे.
10 Oct 2025 - 12:25 pm | अमरेंद्र बाहुबली
सहमत आहे! देशात जसजसा सुशिक्षित वर्ग वाढतो आहे, संघाचे कुटील डाव ओळखायची क्षमता देखील वाढत आहे. त्यामुळे बहुजन संघ पासून दूर जात आहेत.
10 Oct 2025 - 2:50 pm | स्वधर्म
श्री. युयुत्सु,
आपला प्रतिसाद जबरी भेदक आहे. पण '२०२९ च्या निवडणूकीच्या वेळी हा उन्माद वाढला तर आणखी मजा येईल.' या वाक्याशी अडखळायला झालं. आधीच हाताला काम नसलेली तरूण मुले मुली धर्माच्या नशेत ओढली जात असताना जर अजूनच उन्माद वाढला तर कुणाची मजा? उलट एका पिढीचं प्रचंड नुकसान होईल. आता राष्ट्रीय शिक्षण धोरणात संघाच्या प्रभावामुळे अनेक बदल झालेत उदा. डार्विनचा सिंध्दांत एन सी इ आर टी च्या अभ्यासक्रमातून काढणे, बनारस हिंदू विद्यापीठात भुत विद्या व ज्योतिष्य या विशयाचे अभ्यासक्रम सुरू करणे इ. हे बदल ऊगवत्या पिढीसाठी कसे आहेत असे आपल्याला वाटते? त्यात जर अजून धर्माधिष्ठीत प्रतिगामी संघटनांचा प्रभाव वाढला, तर देशाचे जास्तच नुकसान होण्याचा धोका नाही का?
10 Oct 2025 - 3:12 pm | समाधान राऊत
मुस्लिम युनिव्हर्सिटी माहिती आहे का , भरपूर आहेत ...
संत फ्रान्सिस्को शाळा माहिती आहे का , भरपूर आहेत ...
काय शिकवतात तिथे ते सर्वांना माहितीच असेल ...
त्याचे परिणाम काय होत आहेत ते सुद्धा सर्वांना माहिती आहे ... उन्माद कोणाचाच चांगला नाही हे मान्य ...
मुग स्वस्त झाले आहेत एवढेच सांगतो ...
10 Oct 2025 - 4:50 pm | स्वधर्म
कोणत्याही धर्माची शालेय व महाविद्यालयीन शिक्षणात भेसळ करून अवैज्ञानिक गोष्टी करणे हे घटनेत सांगितलेल्या तत्वांच्या विरूध्द आहे.
'दुसरे' (म्हणजेच दुसर्या धर्माचे) चुकीचे करतायत म्हणून 'आपण' तसेच चुकीचे केले पाहिजे असे संघाचे तत्वज्ञान आहे काय?
10 Oct 2025 - 3:25 pm | युयुत्सु
श्री० स्वधर्म
अजून चार वर्षात देशाची लोकसंख्या अजून वाढणार आहे. वाढलेल्या लोकसंख्येच्या ताणाने, वेगाने ढासळणारे पर्यावरण भारतीयांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य विषयक अनेक समस्या आणखी गंभीर करेल. त्यात भरीला भर म्हणून लायकी असून देशाबाहेर जाऊ न शकणारे आणखी वैफल्यग्रस्त बनतील. देश चालवणे आणखी अवघड बनेल. विश्वगुरु, अखंडभारत सारख्या पुड्या सोडल्याने काहीही साध्य झाले नाही. समरसतेच्या गप्पा तोंडी लावायला पण उपयोगी नाहीत. "सनातन धर्म" हा पण एक लवकरच फुसका बार ठरेल. ज्या धर्माचे धर्मगुरु (प्रेमानंद, अविमुक्तेश्वरानंद, रामभद्राचार्य पातळी सोडून एकेमेकांची निंदानालस्ती करतात) तो धर्म आपल्या अनुयायांना कसले स्थैर्य देणार?
तेव्हा आपण स्वस्थपणे बघत राहणे हे केव्हाही शहाणपणाचे....
10 Oct 2025 - 3:34 pm | आग्या१९९०
तेव्हा आपण स्वस्थपणे बघत राहणे हे केव्हाही शहाणपणाचे
सहमत.
10 Oct 2025 - 7:42 pm | समाधान राऊत
भूत विद्या चा अभ्यासक्रम काय आहे काही कळू शकेल का??
10 Oct 2025 - 8:08 pm | सुबोध खरे
डार्विनचा सिंध्दांत एन सी इ आर टी च्या अभ्यासक्रमातून काढणे
There is a current controversy claiming that Darwin's Theory of Evolution has been removed from science books by the NCERT and periodic tables have been dropped. I would like to publicly state that nothing of this kind has happened." Dharmendra Pradhan said.
ते १० वि ला कशाला काढले आहे हा मुद्दा वादास्पद असू शकतो
पण डाव्या पुरोगामी गँगने लगेच रडारड सुरु केली कि हा हिंदुत्वाचा अजेंडा आहे आणि त्यांना परत जाती वाद आणायचा आहे.
https://www.ndtv.com/india-news/no-changes-minister-on-deletion-of-darwi...
10 Oct 2025 - 8:23 pm | सुबोध खरे
भूत विद्या किंवा ज्योतिष विद्यापीठात शिकवणे यावर इतकी रडारड करण्यासारखे काय आहे?
जोवर या पदव्या इतर पदव्याच्या समकक्ष मानल्या जात नाहीत तोवर त्यावर संशोधन करणे किंवा शिकवणे यात इतके रडारड करण्यासारखे काय आहे?
भारतात इस्लामिक स्टडी मध्ये पदव्या पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पी एच डी करणारे हजारो विद्यार्थी आहेत. आता कुराणात पृथ्वी स्थिर असून सूर्य तिच्या भोवती अल्लाच्या इच्छेने फिरतो हे सांगितलेले आहे ते मान्य करून हे लोक एम ए करतात पी एच ड्या घेतात आणि आय ए एस ला सुद्धा जातात त्याबद्दल कोणी डाव्या ने आक्षेप घेतल्याचे दिसत नाही. ( सर तन से जुडा झालं तर काय या भीतीने असावे)
London School of Astrology
https://www.londonschoolofastrology.com/
The University of Wales Trinity Saint David offers a master's degree in Cultural Astronomy and Astrology. Other options include the Faculty of Astrological Studies, which offers short courses and summer schools.
भारतात २५० च्या यावर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजेस आहेत.
आतापर्यंत जितके संशोधन झाले त्यात होमिओपॅथी हि प्लॅसिबोपेक्षा जास्त गुणकारी आहे हे सिद्ध झालेले नाही.
मीठ पाण्यात विरघळवल्यावर मीठ हे मीठ रहात नाही किंवा एखादा पदार्थ विरळ केल्यावर त्याची शक्ती कितीतरीपट वाढते हे मूलभूत शास्त्राविरुद्धच्या सिद्धांतावर अवलम्बुन असलेले तत्वज्ञान आहे.
त्याला शास्त्र म्हणणे अशक्य आहे.
जगभर होमिओपॅथी हे छद्म शास्त्र मानले जाते. त्याबद्दल कुणाला काही आक्षेप नाही इथे मिपावरच किती तरी लोक होमिओपॅथीचे हिरीरीने समर्थन करताना आढळेल.
डावे पुरोगामी मुळातूनच दांभिक असतात आणि ते तसं परत परत अट्टहासाने सिद्ध करून दाखवत राहतात हेच खरं.
10 Oct 2025 - 12:19 pm | सुबोध खरे
अजून डोकं आपटा
10 Oct 2025 - 8:38 pm | शाम भागवत
:))