माहिती: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
30 Sep 2025 - 10:15 am

या वर्षी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. अजून पर्यन्त मिसळपाव वर देशातील सर्वात मोठ्या संस्कृतिक आणि सामाजिक संघटणे बाबत एक ही लेख आला नाही. माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी.

आज RSS च्या ५ लाखांहून अधिक शाखा देशभर कार्यरत आहेत. या शाखा सांस्कृतिक राष्ट्रवाद, व्यक्तिमत्त्व विकास, आणि नैतिक शिक्षण यावर भर देतात. विद्या भारती ही शैक्षणिक संस्था १२,७५४ शाळा चालवते, जिथे भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण दिले जाते आणि आधुनिक विषयांचाही समावेश असतो. सेवा भारती ही सामाजिक संस्था आरोग्य, शिक्षण आणि आपत्ती मदतीसाठी हजारो प्रकल्प राबवते, विशेषतः दुर्बल आणि दुर्गम भागांमध्ये. राष्ट्र सेविका समितीसारख्या स्त्री संघटनांद्वारे महिलांना नेतृत्व आणि सांस्कृतिक प्रशिक्षण दिले जाते. या सर्व संस्था मिळून शिक्षण, सेवा आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देतात.

अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम सध्या देशभरातील ६३,९२६ वनवासी गावांपैकी २१,८२९ गावांमध्ये विविध सेवा प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पांमध्ये शाळा, बालवाडी, निवासी वसतिगृहे, आध्यात्मिक केंद्रे, दवाखाने आणि आरोग्य रक्षकांचे कार्य समाविष्ट आहे. महाराष्ट्रातील ५,६०० वनवासी गावांपैकी सुमारे २,००० गावांमध्ये आश्रमाचे कार्य सक्रिय आहे. याशिवाय, शिक्षण व आरोग्य सेवांबरोबरच ११३ कृषी विकास केंद्रेही कार्यरत आहेत, जी स्थानिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी मदत करतात.

१९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धकाळात RSS ने देशसेवेचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वयंसेवकांनी रक्तदान, अन्नवाटप, मदत शिबिरे, आणि अनेक ठिकाणी प्रत्यक्ष सीमेवर सैनिकांना मदत केली. या योगदानाची दखल घेत, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६३ साली, २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात RSS च्या स्वयंसेवकांना पथसंचलनासाठी आमंत्रित केले.

महात्मा गांधी यांनी १९३४ साली वर्धा येथे संघाच्या शिबिराला भेट दिली. त्या वेळी डॉ. हेडगेवार जिवंत होते. गांधीजींनी शिबिरातील शिस्त, अस्पृश्यतेचा अभाव आणि साधेपणा पाहून संघाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले, “संघाची सेवा आणि आत्मत्याग यावर आधारित प्रेरणा ही संघाला बळकट करणार आहे.” हे उद्गार ‘हरिजन’ साप्ताहिकात २८ सप्टेंबर १९४७ रोजी प्रसिद्ध झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ जानेवारी १९४० रोजी कराड (सातारा) येथे संघाच्या शाखेला भेट दिली. त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला आणि संघाच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण केले. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले, “जरी काही मुद्द्यांवर मतभेद असले, तरी मी संघाकडे आपुलकीच्या भावनेने पाहतो.” ही घटना ‘केसरी’ दैनिकात ९ जानेवारी १९४० रोजी प्रसिद्ध झाली होती.

देशावर जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतात किंवा कोरोना सारखे आजार पसरतात, तेव्हा आरएसएसचे कार्यकर्ते तत्काळ आपदाग्रस्त जनतेच्या सेवेसाठी सज्ज होतात. १९९३च लातूर भूकंप, २००१ गुजरात भूकंप, २०१३ उत्तराखंड पूर, २०१८ केरळ पूर अशा अनेक आपत्तींमध्ये संघाने मदत शिबिरे, वैद्यकीय सेवा आणि पुनर्बांधणीचे कार्य केले. हजारो कुटुंबांना नवजीवन मिळवून देण्यात संघाचा सेवाभाव महत्त्वाचा ठरला.

२००१ साली कच्छ जिल्ह्यातील भूकंपानंतर, आरएसएस आणि सेवा भारतीच्या स्वयंसेवकांनी भुज, अंजार आणि गांधीधाम परिसरात शेकडो मदत शिबिरे उभारले. अन्न, पाणी, औषधे आणि तात्पुरते निवारे पुरवण्यात आले. हुनरशाला फाउंडेशन आणि कच्छ महिला विकास संघटन यांच्या सहकार्याने पारंपरिक भुंगा घरांची रचना पुन्हा उभी करण्यात आली. स्थानिक मजुरांना भूकंप प्रतिरोधक बांधकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आणि गुजराती भाषेत मॅन्युअल तयार करून मार्गदर्शन करण्यात आले.

कोरोना महामारीच्या काळात, RSS चे ५ लाखांहून अधिक स्वयंसेवक रस्त्यावर उतरून गरजूंना मदत करत होते. काही स्वयंसेवकांनी आपला जीव गमावला, तरीही सेवा थांबली नाही. पाच जून २०२१ पर्यंत, म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तानच्या सीमांपासून ते जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारण्यात आली. ११८ शहरांमध्ये कोविड केअर सेंटर्स, २८७ शहरांमध्ये आयसोलेशन सेंटर्स, ५ कोटी भोजन पॅकेट्स, ७३ लाखांहून अधिक कुटुंबांना राशन, आणि ४४ लाख स्थलांतरित मजुरांना सेवा पुरवण्यात आली.

२०२५ मध्ये, देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये संघाने पुन्हा ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारून लाखो गरजूंना अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवली.

शहरातील निवासी असो की वनवासी – सर्व भारतीयांची सेवा करणे आणि भारताला परम वैभवशाली बनविणे हेच आरएसएस च मुख्य ध्येय आहे.

समाजलेख

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

9 Oct 2025 - 1:32 am | गामा पैलवान

धन्यवाद. इथे या धाग्यावरच चर्चा करूया.
-गा.पै.

विवेकपटाईत's picture

8 Oct 2025 - 12:10 pm | विवेकपटाईत

संघाचे बाबतीत अनेकांचे पूर्वग्रह आहेत. जो व्यक्ति आपल्या देशाला मातृभूमी मानतो तो हिंदू (यात मुस्लिम ईसाई सर्व येतात. काही प्रमाणात मुस्लिम ही संघाच्या शाखेत जातात). संघ हिंसावर कधीच विश्वास ठेवत नाही. सामाजिक कार्य करताना हिंदू मुस्लिम भेदभाव करत नाही. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की विचारधारा से प्रभावित विद्या भारती के सरस्वती विद्या मंदिर के नाम से पूरे देश में संचालित स्कूलों में भी अभी 64000 मुस्लिम और 10000 ईसाई बच्चे पढ़ रहे हैं। दर्जनों शिक्षक भी मुस्लिम हैं। अभी पूरे देश में 12,500 औपचारिक और 12,000 अनौपचारिक विद्यालय चल रहे हैं।"https://www.jagran.com/jharkhand/ranchi-jharkhand-news-in-hindi-64000-mu...

कपिलमुनी's picture

9 Oct 2025 - 9:39 am | कपिलमुनी

दात खायचे वेगळे..

एक बेसिक प्रश्न जगात एकूण किती हिंदू राष्ट्रे आहेत ?
एकूण किती ख्रिस्ती राष्ट्रे आहेत ?
एकूण किती इस्लामिक राष्ट्रे आहेत ?
म्हणजे शुद्ध हिंदू शुद्ध इस्लामिक शुद्ध ख्रिस्ती असलेली विचारतोय.
अजिबात धर्म निरपेक्ष नसलेली अशी.
आणि त्यात म्हणजे अशा धर्मनिरपेक्ष नसलेल्या राष्ट्रात जगण्याचा स्टार ते राष्ट्र धर्माधिष्ठित असल्याने वाईट झालाय की चांगला झालाय ?
तसेच जगातील लोकसंख्या wise सर्वात मोठी पहिले तीन प्रमुख धर्म कुठले ?

तसेच मोठी लोकसंख्या असूनही हिंदू राष्ट्र एकही नसेल याचा अर्थ
1 हिंदुलोक हे पुरेसे सहिष्णु आहे असा काढता येऊ शकतो का ?
2 की हिंदुलोक पुरेसे दुबळे आहेत असा काढता येऊ शकतो का ?
3 की हिंदुलोक आणि हिंदू धर्मातील मूलतत्वे पुरेशी आक्रमक नाहीत असा काढता येऊ शकतो का ?
4 की हिंदू लोक हिंदू हा Way of life म्हणुन स्वीकारत असल्याने त्यांना याचे सोयर सुतक नसते का ?
5 आणि समजा भारत इतर देशा प्रमाणे इस्लामिक किंवा ख्रिस्ती प्रमाणे हिंदू राष्ट्र झाला तर याचा परिणाम काय होणार ?
6 सर्वात रोचक बाब already जे एक धर्मीय देश आहेत ते व अधार्मिक किंवा नास्तिक अशी कम्युनिस्ट विचारसरणी असलेले देश वरील सर्व 3 धर्मीय देशा पेक्षा उच्चतम जीवन स्तर असलेली आहेत का ?

युयुत्सु's picture

9 Oct 2025 - 9:32 am | युयुत्सु

श्री० मारवा,

आपण उपस्थित केलेले प्रश्न कोणत्याही ए०आय्०ला जर विचारलेत तर पुरेशी समर्पक उत्तरे मिळतील अशी खात्री आहे.

समता नव्हे समरसता असे संघ आवर्जून प्रतिपादन करतो.
ही संघाची सर्वात deep खेळी aahe.

अभ्या..'s picture

9 Oct 2025 - 7:11 pm | अभ्या..

आदिवासी ऐवजी वनवासी ही सगळ्यात डिपेस्ट आहे.
.
दोन्ही मिळून अडाणीवासी अशी आगामी काळात दिसणारे बघा.
.
हिंदुहितैशी पक्ष म्हणे आपले गोग्गोड काका. ह्याट.........