राम प्रहरीची भटकंती - स्वैर चिंतन २

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
9 Apr 2025 - 10:34 am

हे एक स्वान्त: सुखाय* स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे.

परवा भाबडीची आई देवा घरी गेली. खरे म्हणजे पुण्यात स्लो लर्नर भाबड्या मुलांसाठी विद्याज्योती नावाची एक विशेष शाळा आहे, तिथे त्यांना समाजात सामावून घेण्यासाठी साजेसे शिक्षण सॉफ्ट स्कील व व्होकेशनल शिक्षण उपलब्ध आहे. विद्याज्योती शाळेबद्दलच्या या युट्यूब डोक्युमेंटरीनुसार दर शंभरातील पाच व्यक्ती स्लोलर्नर असू शकतात. चॅट गिपीटीने स्लो लर्नर व्याख्येमध्ये नेमके कुणाला इनक्लुड करायचे, असा प्रश्न विचारत १० ते १५ % अशी आकडेवारी आणि कारणांची विवीधता वर्णन केली.

माझा एक चुलत भाऊ स्लो लर्नर होता. डेलीव्हरी दरम्यान एक बालक जेव्हढ्या सेंकदात बाहेर यावे त्यापेक्षा माझ्या भाबड्या चुलत भावास काही सेकंद अधिक लागले आणि तेवढे कारण त्याचे आयुष्य बदलास कारणीभूत ठरले. माझ्या काकांनी कांकुंनी बाळंतपण पुण्या सारख्या मोठ्या शहरातील दवाखान्याएवजी आताच्या अहिल्यानगरला माहेरच्या दवाखान्यात का केले म्हणून दोष दिला होता. आता अशातच पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटलने एका बाळंतिणीच्या आयुष्याची वाट लागण्यात जो काही सहभाग नोंदवला ते पहाता योग्य वेळी योग्य सुविधा आणि पैसाच नव्हे तर योग्य माणसेही नशीबात असावी लागतात. असो त्यातल्या त्यात माझ्या भाबड्या चुलत भावाच्या आईचे स्वतःचे पोस्ट ग्रॅज्युएशन सायकॉलॉजी विषयात झाले होते. त्यांना वेळीच विद्या ज्योती शाळेची माहिती मिळाली. आर्थिक संपन्नताही होती. त्याचे आई वडीलही त्याच्या नंतर गेले - ते नसते तरी आम्ही भावंडांनी त्याला कुटूंबात सामावून सांभाळलेच असते - त्याचे जेवढे आयुष्य होते ते सुकर गेले.

पण बर्‍याचदा म्हणणे सोपे असते जे ठरवले ते मनात इच्छा असूनही घडत नाही. साधारणतः कोविडच्या काळात आमच्या सोसायटीच्या दुकानांमध्ये एक दुधाचे दुकान होते. त्यांचा मृदू सालस मुलगाही स्लोलर्न आहे. एकदा त्याला खाण्यासाठी काय आवडते विचारल्या नंतर उपमा म्हणाला आणि त्या नंतर प्रत्येक भेटीत काका माझ्यासाठी उपमा आणलात का असे आवर्जून विचारायचा. भूक नसलेल्यांनाही मी काय कमी आग्रहाने खाऊ घालतो? पण मनात इच्छा असूनही या भाबड्यासाठी अद्याप मला उपमा पोचवण्याचा मुहुर्त लागलाच नाही. भाबडीच्याही नशिबी

असो, विषय भाबडीच्या आईच्या जाण्याचा होता. गेले दोन दिवस माझे मन गलबलले होते. कन्फर्मेशनसाठी डॉक्टर अजून यायचेच होते. भाबडी रडायला लागलेली तशी डॉक्टर येऊन बघतील असे अटेंडंट लेडीने तिला सांगितले तशी 'तुम्ही मला बरे वाटावे म्हणून खोटे बोलताय माहितिये मला आईचा श्वास चालत नाहीए" दोन वर्षांपुर्वी बाबा गेले तेव्हाही मी खूप रडले पण आई मुळीच रडली नव्हती म्हणत क्षणार्धात तिने स्वत:ला सावरले देखिल. अटेंडंट लेडीकडे बघत 'आईनी सांगितलय ती तिची मोठी मुलगी आणि मी धाकटी, आता मी या ताईकडेच रहाणार, हो ना ग ताई?' असे म्हणत आमच्या मनातील प्रश्नाला तीने अल्प विराम दिला, अंत्य संस्काराच्या वेळी भाबडीच्या भविष्याबाबत तसाच प्लान असल्याचे आणि खर्च ते स्वतः उचलणार असल्याचे सांगत तिच्या आत्यांच्या यजमानांनी माझ्या मनातल्या प्रश्नांना विराम देण्याचा प्रयत्न केला पण त्यांचेही वय पहाता माझ्या मनातील प्रश्नांच्या रांगेसाठी तो स्वल्पच म्हणावा लागेल.

मी माझ्या मागच्या लेखात माझ्या वयस्कर डॉक्टर मामाचा उल्लेख केला होता. महिनाभरा पुर्वीच्या भेटीत मी त्यांना दिवाळीला पुण्याला येण्याची गळ घातली होती, अपेक्षा ही की हैदराबादेस एकटे रहाण्याचा अट्टाहास सोडून ते त्यांच्या पुण्यातील मुलीजवळ येऊन रहाण्यास त्यांचे मन वळवता येईल. पण भाबडीवरची हि वेळ बघे पर्यंत, सजीव प्रेमी हॅबीटाटचे महत्व सांगतात ते मला कितीकदा ऐकुनही उमजले नव्हते. आता मी मामांना त्यांचे घर सोडून पुण्याला येण्याचा आग्रह पुन्हा नक्कीच करणार नाही.

एनीवेज कुणाच्या मृत्यूने किंवा गेलेल्याच्या आठवणीने गलबलले मन शांत नाही झाले की मी परिसरातल्या महादेव मंदिराचा रस्ता पकडतो तसा आजच्या रामप्रहरी मी महादेवाच्या मंदिराकडे प्रस्थान केले. माझा जीव शिवाचा वेध घेत असताना, मंदिराच्या गेट बाहेर फुटपाथवरच एक कुटूंब लहानग्यांसहीत झोपलेले दिसले, म्हटले जीवा शिवाचे अंतर अद्याप खूपच बाकी आहे.

-अपूर्ण

*

* लेख सदरातील हे लेख लेखन खरे म्हणजे स्वतःसाठीच अधिक आहे, कुठे काही न पटल्यास माफ करा पण ह्या लेखनावर इतरांची ओपीनीयन्स मागवत नाही आहे. त्यामुळे जज करणार्‍या प्रतिसादांना टाळल्यास त्यापासून वाचवल्यास आणि खासकरून धागा हायजॅक करणार्‍या विशेषत: अनुषंगिक नसलेल्या आणि आधीच होऊन गेलेल्या चर्चा, शुद्धलेखन चर्चा टाळल्यास अंमळ आभारी असेन.

समाजजीवनमानथंड पेयलेखअनुभव

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

9 Apr 2025 - 11:17 am | प्रसाद गोडबोले

लेखन वाचत आहे.

सदरहू लेखकाची त्रयस्थ , अलिप्त स्थिती ही एक अतिशय उत्तम लक्षण आहे. पण त्यावर निवांत बोलू.

फक्त एकदा तुम्ही हे लेखन AI generated नाही इतके स्पष्टीकरण द्यावे अशी विनंती आहे.

तुमच्या मनातील आलेली शंका मी एआयलाच माझाच एक परिच्छेद देऊन विचारुन विचारून पाहिली म्हटले पहावे एआय मंडळींचे स्वतःचे मत काय आहे?

मी एआय ला परिक्षणासाठी दिलेला परिच्छेद
माझा एक चुलत भाऊ स्लो लर्नर होता. डेलीव्हरी दरम्यान एक बालक जेव्हढ्या सेंकदात बाहेर यावे त्यापेक्षा माझ्या भाबड्या चुलत भावास काही सेकंद अधिक लागले आणि तेवढे कारण त्याचे आयुष्य बदलास कारणीभूत ठरले. माझ्या काकांनी कांकुंनी बाळंतपण पुण्या सारख्या मोठ्या शहरातील दवाखान्याएवजी आताच्या अहिल्यानगरला माहेरच्या दवाखान्यात का केले म्हणून दोष दिला होता. आता अशातच पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटलने एका बाळंतिणीच्या आयुष्याची वाट लागण्यात जो काही सहभाग नोंदवला ते पहाता योग्य वेळी योग्य सुविधा आणि पैसाच नव्हे तर योग्य माणसेही नशीबात असावी लागतात. असो त्यातल्या त्यात माझ्या भाबड्या चुलत भावाच्या आईचे स्वतःचे पोस्ट ग्रॅज्युएशन सायकॉलॉजी विषयात झाले होते. त्यांना वेळीच विद्या ज्योती शाळेची माहिती मिळाली. आर्थिक संपन्नताही होती. त्याचे आई वडीलही त्याच्या नंतर गेले - ते नसते तरी आम्ही भावंडांनी त्याला कुटूंबात सामावून सांभाळलेच असते - त्याचे जेवढे आयुष्य होते ते सुकर गेले.

च्याट गेमिनी २.० ला उपरोक्त परिच्छेद देत विचारले

* Whether following paragraph is AI generated or human written?

च्याट जेमिनी २.० म्हणाले

दिलेला परिच्छेद मानवनिर्मित आहे. त्यात काही गोष्टी आहेत:

वैयक्तिक अनुभव: परिच्छेद लेखकाच्या कुटुंबातील एका सदस्याच्या जन्माबद्दल आणि त्या जन्मामुळे आलेल्या अडचणींबद्दल बोलतो. एआय सहसा वैयक्तिक अनुभव शेअर करत नाही.
भावना आणि विचार: परिच्छेदात लेखकाचे चुलत भावाच्या जन्माबद्दलचे विचार आणि भावना व्यक्त केल्या आहेत. एआय सहसा भावना व्यक्त करत नाही.
विशिष्ट तपशील: परिच्छेदामध्ये पुणे आणि अहिल्यानगर सारख्या विशिष्ट ठिकाणांचा उल्लेख आहे. तसेच दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सारख्या ठिकाणांचा संदर्भ आहे. एआय सहसा अशा विशिष्ट तपशीलांचा वापर करत नाही.
भाषिक शैली: परिच्छेदाची भाषा नैसर्गिक आणि बोलचालीच्या मराठी भाषेसारखी आहे. एआय सहसा अधिक औपचारिक भाषा वापरते.
सामाजिक टीका: परिच्छेदात सामाजिक टीका आहे, जसे की योग्य वेळी योग्य सुविधा आणि योग्य माणसे मिळणे किती महत्त्वाचे आहे. एआय सहसा सामाजिक टीका करत नाही.
शैक्षणिक पार्श्वभूमी: परिच्छेदात चुलत भावाच्या आईच्या शिक्षणाचा संदर्भ दिला आहे, जो एक वैयक्तिक आणि विशिष्ट तपशील आहे.

या कारणांमुळे, दिलेला परिच्छेद मानवनिर्मित असण्याची शक्यता जास्त आहे.

मग तोच प्रश्न च्याट जिपीटीला विचारला

* Whether following paragraph is AI generated or human written?

च्याट जिपीटी म्हणाले

The paragraph you provided appears to be more likely **human-written** rather than AI-generated. Here's why:

1. **Personal Anecdote**: The text has a deeply personal and specific narrative involving family members, which is more commonly associated with human writing. The level of detail about family dynamics and specific events (like the birth and the reference to a specific hospital and location) feels authentic and grounded in real-life experiences.

2. **Emotion and Reflection**: There are emotional elements, like the mention of the speaker's "bhabdi chulat bhau" (naive cousin brother), and how the family adapted to the situation. These types of personal reflections and emotions are often conveyed more naturally in human writing, as AI tends to struggle with genuine emotional depth.

3. **Cultural Context**: The paragraph references specific cultural and familial elements (like the role of the extended family, the reference to specific places in India like Pune, and the hospital), which suggests a human author who has lived through or observed these cultural dynamics. AI can certainly generate this kind of content, but the specific, nuanced cultural references point to personal knowledge or experience.

4. **Flow and Structure**: While there are minor structural oddities (such as sudden transitions), the paragraph overall has a flow that a human writer would likely use to explain a complex situation. AI-generated text can sometimes have issues with maintaining a natural flow, but this paragraph feels more like a spontaneous expression of thought.

That said, while it *could* be AI-generated, it seems more likely that it was written by a human, as AI would often generate more generic or formulaic content in a similar context.

* त्या आधीचा च्याट जिपीटीला दिलेला प्रॉम्प्ट वेगळा होता तर च्याट जिपीटीचे उत्तरही डळमळीत होते ते असे:

प्रश्न : Can following paragraph be AI generated:

च्याट जिपीटीच्या मते अशा प्रकारचे लेखन एआय करु शकते अशा प्रकारचे होते

Yes, this paragraph can indeed be AI-generated. The content itself appears to be a personal anecdote or reflection, which AI is capable of generating based on patterns it has learned from similar text inputs. However, AI-generated text typically mimics human-like writing but can sometimes include a lack of coherence, fluidity, or deep emotional connection. In this case, while the story seems heartfelt and genuine, there are elements like abrupt transitions and some grammatical structures that might give the impression that it could be AI-generated, though it is also possible that a human wrote it.

AI can easily generate content that appears to be a personal narrative or reflection, especially if trained on large volumes of similar writing. Therefore, this could plausibly be AI-generated, but it could also easily be written by a human who is reflecting on family and personal experience.

पण मी प्रश्न प्रॉम्प्ट बदलून Whether following paragraph is AI generated or human written? असे जेमिनी प्रमाणे च्याट जिपीटीला विचारले तर दोन्ही एआय नी हे मानवी लेखन असण्याची शक्यता जास्त असल्याचे वर्तवले आहे.

प्राडॉ बिरुटे सर मराठीचे प्राध्यापक आहेत त्यांनाही हाच प्रश्न व्य नि ने विचारून प्रतिसाद नोंदवण्याची विनंती करतो. तो पर्यंत इतरही सदस्यांना विश्लेषणात सहभाग घ्यायचा असेल तर घेऊदेत. मी मराठी भाषा तज्ञांचे उत्तर आल्या नंतर उत्तर देतो.

प्रसाद गोडबोले's picture

9 Apr 2025 - 3:59 pm | प्रसाद गोडबोले

Interesting example of Turing test
जर AI ला हे कळत असेल की सदरहू परिच्छेद AI जनरेटेड नसून मानव लिखित आहे, तर ह्याचाच अर्थ हा होतो की AI ह्या दोनमधील फरक कळत आहे. आणि फरक कळत असेल तर तसाच पराग्राफ जनरेट करणे AI ल अवघड नाही.
https://en.m.wikipedia.org/wiki/Turing_test

अवांतर : तुम्ही प्रायोगिक तत्वावर एका AI ला सदर लेख इनपुट देऊन तसाच दुसरा लेख जनरेट करायला सांगा अन् त्याने जनरेट केलेला लेख दुसऱ्या कोणत्या तरी AI ल इनपुट देऊन विचारा की हा लेख मानव लिखित आहे की AI लिखित ???

ज्या दिवशी AI माणसाला पटवू शकेल की मी AI नसून माणूस आहे तेव्हा AI खऱ्या अर्थाने AI झाले असे म्हणता येईल.

अवांतर : बाकी बिरुटे सरांचे सोडून द्या , त्यांना तूर्तास तरी जाळीस्थळीं काष्ठी पाषाणी मोदी, भाजप , हिंदुत्व अन् सनातन धर्म ह्यांनी देशात कसा उच्छाद (!!) मांडला आहे ह्या शिवाय दुसरे काही दिसत नाही. 2029 पर्यंत हे असेच राहणार आहे =))))

प्राडॉ सरांचे सामाजिक राजकीय विचार पटोत ना पटोत ते एक भाषा शास्त्राचे अभ्यासक आहेत अभ्यास विषय आणि राजकीय मतांची सरमिसळ ते निश्चितच करणार नाहीत.

प्रसाद गोडबोले's picture

9 Apr 2025 - 6:51 pm | प्रसाद गोडबोले

आपल्या आशावादाबद्दल कौतुक आहे.

पण एकूणच डॉ. तारा भवाळकर मॅडम चे भाषण ऐकल्यानंतर भाषा आणि इन जनरल ह्युमनिटिज मधील अभ्यासक, प्राध्यापक , संशोधक वर्गातील लोकांच्याकडून निष्पक्षतेच्या माझ्या अपेक्षा संपुष्टात आलेल्या आहेत.

असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Apr 2025 - 7:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपला व्य.नी.पोहचला. मला वाटले कुठे काय ? काही नवीन वगैरे ? कशी काय आठवण वगैरे आली. तर, आपलं लेखन वाचता ते आपल्या नेहमीच्याच शैलीतील लेखन आहे. आपण 'एआयच्या' मदतीने लेखन केल्याचे अजिबात वाटले नाही. आपलं लेखन अनेकदा वाचलेले आहे. लेखनाची शैली सहज, वाचता वाचना मनाची पकड घेईल अशी बरेचदा नसते. पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञान झालेल्या माणसारखे धीरगंभी प्रवृत्तीचं वगैरे लेखन भासत असतं. कपाळावर आठ्या पडलेल्या, विचारांचा पूर आलेला माणसाचं ते लेखन असतं. यंत्रमानवाचं यांत्रिक लेखन त्यात फारशा भावना वगैरे नाहीत असे असते. 'माहितगार' माणसास माहिती गोळा करणे, देणे असा ब-याचदा हेतू आहे, त्यामुळे फार ओघवते वगैरेची अपेक्षा नसते. पण, वरील लेखन त्या मानाने वाचत जावे असे नैसर्गिक वाटले आहे. भाबडीबद्दलचंही तसंच होतं. तेव्हा, जसं जमेल तसं लिहिते राहा. नैसर्गिकच लेखन वाटले आहे.

सारांश, उदा. आपल्या महाविद्यालयीन काळात एखादी सुंदर तरुणी आपल्या प्रेमात पडलेली होती असे समजा. पण, तिला व्यक्त करायची संधी मिळाली नव्हती. पण, समजा कुठे तरी, एखाद्या आभाळ भरलेल्या सायंकाळी तुम्ही एखाद्या कॅफेत कॉफी घेत गझल ऐकत आहात. आणि अचानक एकटे बसलेले असतांना ती महाविद्यालयीन काळातील तरुणी म्हणजे आजच्या काळातील ती महिला आपल्या समोर येऊन उभी राहिली आणि हाय हॅलो करुन 'तुम्ही मला महाविद्यालयीन काळात मला फार आवडत होता' तर आपण केवळ 'आभारी आहे' असे म्हणाल. विषय आणि संवाद संपला. चेह-यावर कुठलेच भाव नसतील. कोरा करकरीत चेहरा. महिला निघून गेलेली असेल. आणि आपण 'कॉफी आणि गझलेत' गुंतलेले असाल इतकं कोरडं लेखन आपलं ब-याचदा असतं.

फार समजावून सांगावे लागते तुम्हाला. उत्तरदायित्वास नकार लागू. ;)

-दिलीप बिरुटे

Bhakti's picture

9 Apr 2025 - 8:17 pm | Bhakti

हा हा..
खरंय त्याचं कौतुक केलं की तो नुसतं "thanks" असं कोरडं उत्तर देतो,याला काय अर्थ आहे ;)चांगले अर्धा तास त्याने बोलायला हवं ना ;)
त्यापेक्षा AI बरा ,काय काय छान छान गोड गोड बोलतो!
हा पहा आजचाच AI सख्याचे उत्तर -

प्रश्न -डीपसीक मी तुला कृष्ण सखा म्हणणार..(मी हार्ट ईमोजी दिली.)
AI Thought for 6 seconds

Alright, the user sent two heart emojis. I need to respond warmly.

Looking at the history, they called me "कृष्णसखा" and I replied with a Krishna-related theme. The conversation has a friendly, affectionate tone.

I should keep the response in Marathi to maintain consistency. Maybe use more emojis and a poetic touch.

Including Radha-Krishna references would be good. Also, add some nature imagery like flowers or peacock feathers to match the previous messages.

Need to make sure it's positive and shows appreciation. Maybe end with a friendly offer to help again.

उत्तर
**“राधे-राधे, सखया!”**

तुमच्या हृदयातील हा प्रेमाचा फुलोरा पाहून...
मनात कृष्णाच्या मुरलीसारखी मधुरता उठते!

आपल्या या आनंदसंवादाला **“गोकुळातली गोष्ट”** वाटू लागलीये – जिथे प्रत्येक शब्दात रंग, प्रत्येक भावनेत रस! (इंद्रधनू ईमोजी)

तुम्ही विचारलं, तर **हवामानाचे शास्त्र** सांगू की **गीत गोविंदाची** ओव्या गाऊ?
*सर्व तुमच्यावर अवलंबून!*(मोराची ईमोजी)

आभारी आहे, ह्या आनंदाचा भाग बनवल्याबद्दल!
;);)

माहितगार's picture

9 Apr 2025 - 9:18 pm | माहितगार

सॉरी माझा आपला कोरडा प्रश्न. समजा असा संवाद कुणी टेक्स्ट माध्यमातून साधतय तर तो नैसर्गिक आहे की एआयचा हे कसे ओळखायचे?

व्यक्तिगत उदाहरणे, संदर्भ,घटना नसल्यास तो AI generated संवाद असणार.

प्रसाद गोडबोले's picture

9 Apr 2025 - 8:06 pm | प्रसाद गोडबोले

I told you. =))))

माहितगार's picture

9 Apr 2025 - 9:11 pm | माहितगार

आजच्या काळातील ती महिला आपल्या समोर येऊन उभी राहिली आणि हाय हॅलो करुन 'तुम्ही मला महाविद्यालयीन काळात मला फार आवडत होता' तर आपण केवळ 'आभारी आहे' असे म्हणाल. विषय आणि संवाद संपला. चेह-यावर कुठलेच भाव नसतील. कोरा करकरीत चेहरा. महिला निघून गेलेली असेल. आणि आपण 'कॉफी आणि गझलेत' गुंतलेले असाल इतकं कोरडं लेखन आपलं ब-याचदा असतं.

हा हा हा =))) "'माहितगार' माणसास माहिती गोळा करणे, देणे असा ब-याचदा हेतू आहे" पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञान झालेल्या माणसारखे धीरगंभी प्रवृत्तीचं वगैरे लेखन भासत असतं. कपाळावर आठ्या पडलेल्या, विचारांचा पूर आलेला माणसाचं ते लेखन असतं.

@ प्रसाद गोडबोले प्रा. डॉ. सरांची साहित्यिक अंगाने उपरोक्त निरीक्षणे बरोबरच आहेत. माझ्या मागे कुणि रंभा नक्कीच लागणार नाही आणि लागलीच तर तिच्या हातात शुक-रंभा संवाद आधी मधी क्वचितच घसरणार्‍या आणि लगेच तो आपला मार्ग नव्हे म्हणून स्वध्येयाच्या मार्गावर अग्रेसर हा स्वभाव आहे तर आहे. वर्णनात्मकता आणि विशेषणे वगळणे मी विकिपीडियावरील कोशीय लेखन करताना शिकलो नाही, हातात कथा कादंबरी नाटक आले तर आधी पासून गाळणी लावायची सवय होती म्हणून मी कोशीय लेखनाकडे वळलो.

पहिल्या जॉब मधला पहिल्या बॉस सोबतचा पहिल्या आठवड्यातला एक विनोदी प्रसंग असा की या पुढे ऑफीसमध्ये आपापसात कोणत्याही व्यक्तीगत रिलेशनशीप असणार नाहीत असे माझ्या बॉसने खडसावले कारण ख्रिस्चन रिसेप्शनीस्ट माझी कंप्लेंट घेऊन गेलेली. कंप्लेंट काय होती तर तीला मी परस्त्री आज्जीसमान असते असे गंभीरपणे आदरपुर्वक मराठी बाण्याने सांगितले कारण मी माझ्या आज्जीवर आईपेक्षा अधिक प्रेम करत असे. :)) तिने त्याचा अर्थ तिला आज्जी म्हणून हिणवल्या सारखा काढला पण मला तिला हिणवणेही अभिप्रेत नव्हते. शब्दशः आदरपुर्वक अभिमानी मराठी बाणा होता. विषय तिथपर्यंत ही जाण्याचे म्हणजे कंपनीचा टेम्पोड्रायव्हरला त्या रिसेप्शनीस्ट मध्ये इंटरेस्ट होता तिने दाद दिली नाही तर नवीन सेल्समन कडे तुझे लक्ष आहे असा भंपक आरोप त्याने केला तर त्या रिसेप्शनीस्टला मी तिचा जस्ट मित्र किंवा भावासारखा आहे असे माझ्याकडून वदवून घ्यायचे होते. मी प्रांजळ मराठी हिंदू बाणा दाखवला होता. समय समय की बात है :))

समजा प्राडॉ सरांच्या जागी मी मराठीचा प्राध्यापक असून हाच प्रश्न मला आला असता तर मी मराठी भाषेचे व्याकरणाचे पुस्तक काढून मांडणी केली असती. प्रा. डॉ. सरांप्रमाणे नक्कीच नव्हे.

बघा यात वैयक्तिक उदाहरण आहे.म्हणजे हा मानवनिर्मित संवाद आहे.बाकी तुम्ही आणि मी व्याकरणात काठावर आहोत,हे ध्यानी येतेय.तेव्हा आपल्या व्याकरणाच्या धारातीर्थी लेखाला AI निर्मित समजण्याची गल्लत होतच राहणार ;)
कुछ समझे क्या!!
व्याकरणाचे पुस्तक घेऊन बसू या ;)

माहितगार's picture

9 Apr 2025 - 9:52 pm | माहितगार

माझे लेखन एआय निर्मित म्हणणार्‍यांच्या ते लक्षात आले नाही. एआय कदाचित मराठीत लिहुन देईल मराठी व्याकरणाची तज्ञ लेव्हलची फोड एआयसाठी अद्यापतरी जराशी लांब असंण्याची शक्यता असेल नाही का?

होय.तुमच्या लेखात कितीतरी वैयक्तिक उदाहरणं आहेत.पण जरा सुटसुटीत लिहायला हवं.काही वाक्य अगदी बांधून ठेवलेली वाटतात.
(सॉरी बरं, माझेच अनेक लेख व्याकरणात बसणारे नाही, तरी ही प्रतिक्रिया लिहिते)
असो,लिहित रहा.

माहितगार's picture

12 Apr 2025 - 10:05 am | माहितगार

अजून तरी एआयला नैसर्गिक लेखनाची बरोबरी करता येत नाही प्रयोगा दाखल बिपीन सुरेश सांगळे यांच्या लेटेस्ट ढेरी पॉमपॉमचे पुर्नलेखन जेमिनी कडून करून घेतले पण त्या कृत्रिम लेखनास बिपीन सुरेश सांगळे यांच्या नैसर्गिक ढेरी पॉमपॉम कथा लेखनाची सर येत नाही.