व्हाॅट्सअपवरची माणसं - व्हर्जन २०२४

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
1 Jan 2024 - 6:46 pm

*व्हाॅट्सअपवरची माणसं - व्हर्जन २०२४*

*कट्टर भाजप समर्थक* :

यांना देशातल्या प्रत्येक राज्यातच नव्हे तर देशातल्या प्रत्येक गावातला प्रत्येक ग्रामसेवक हा सुद्धा भाजपचाच हवा असतो. त्यामुळे सतत मोदी किंवा भाजप , राममंदिर यांच्या पोस्टचा तुफानी मारा करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्यासारखे पोस्टत राहतात. समजा एखाद्या समूहात सगळे भाजप समर्थक आहेत हे माहिती असले तरीसुद्धा ; समजा जर आपण हा मारा थांबवला आणि चुकून त्यातला एखादा भाजपपासून थोडासा लांब गेला ; त्याची विचारसरणी ही भाजपला प्रतिकूल अशी बनली तर काय करायचं ? तशी वेळच येऊ नये म्हणून हे मुसळधार पाऊस जसा पडतो तसं भाजप , राममंदिर , संघ , नरेंद्र मोदी हे चार प्रकारचे बाण सतत मारत राहतात.

*अतिजेष्ठ* :

नोकरीतून निवृत्त होऊन साधारणपणे दहा पंधरा वर्षे झालेली असतात. घरात बसून करायचं काय? बायकोला कटकट नको असते. नातवंडे , मुले आपापल्या व्यापात असतात. मग करायचं काय म्हणून हे लोक कुठलातरी व्हाट्सअप ग्रुप पकडतात. शांतपणे वाचन चालू असतं. कधी कुठे काही आपला अनुभव उपयोगी पडतो असं वाटत असलं तर ते लिहितात सुद्धा. पण विरंगुळा म्हणून पकडलेला व्हाट्सअप ग्रुप त्यांना फार काळ सोसवत नाही. कारण स्क्रीनचा उजेड , टाईप करणे ही खिंड त्यांना फार काळ लढवता येत नाही. मग वैतागून ते अचानक सोडून जातात.

*कायमचे वाचक* :

कायमचे वाचक हे कुठल्याही ग्रुपात शिरल्यानंतर पहिल्या क्षणापासून ते त्या ग्रुपात असेपर्यंत केवळ वाचकच राहतात. आपणही माणूस आहोत , आपले आज जे काही वय आहे त्या वयात येईपर्यंत आपणही उघड्या डोळ्यांनी हे जग बघितलेलं आहे , काहीतरी अनुभव घेतलेला आहे , आपल्याकडच्या एखाद्या चांगल्या माहितीचा कोणाला तरी काहीतरी उपयोग होऊ शकतो , अनुभवाचा उपयोग होऊ शकतो वगैरे शूद्र विचार यांच्या मनालाही शिवत नाहीत. आपल्याला परमेश्वराने या व्हाट्सअप ग्रुपवर दाखल केलेलं आहे ते फक्त वाचण्यासाठीच. आपण या ग्रुपची शान आहोत , आपण वाचतो आहोत म्हणूनच या ग्रुपवर कोणीतरी काहीतरी लिहिते आहे. आपण जर या ग्रुपमधून बाहेर गेलो तर मग यांचं लिहिलेलं वाचणार कोण? असा काहीतरी भ्रम होऊन लिहिणाऱ्यांना उपकृत करण्याच्या उद्देशाने हे तिथे शांतपणे महिनोंमहिने , वर्षानुवर्षे फक्त वाचत राहतात.

*देवाची तिजोरी* :

देवाची तिजोरी गटातल्या लोकांकडे दैवी शक्ती भरपूर असते. देवीदेवतांचे व्हिडिओ , फोटो , गाणी हा सगळा माल बक्कळ असतो. कुठून तरी आलेले हे देवादिकांचे फोटो , व्हिडिओ किंवा ते कमी पडले तर शेअरचॅट वरून उतरवून घेतलेले व्हिडिओज हे फॉरवर्ड करत राहतात. देवाची तिजोरी ; भक्तीचाच ठेवा ; तुम्हाला द्यायलाच हवा असं म्हणून या भक्तीसागराचा व्हॉल्व ते पूर्णपणे ओपन करतात. हे मुख्यत्वे ज्येष्ठ नागरिकच असतात.यांच्या दैवी व्हिडिओ , फोटोजना बरेच भक्त दोन हातांनी वंदन केलेली इमोजी पाठवून भक्तीभाव दाटून आल्याची पावतीही देतात.

*कुतूहलाचे किडे* :

यांना व्हाट्सअपवरची बरीच फीचर्स नवीन असल्याने यांच्या आतले कुतूहल चाळवले जाते. मग हे कधी ग्रुप कॉल सुरू करतात तर कधी व्हिडिओ कॉल सुरू करतात. Admin ने ग्रुप परमिशन सेट केलेल्या नसतील तर हे एडमिन ओन्ली म्हणजे नक्की काय असतं ते वापरून बघतात. जमतील तेवढी फिचर्स वापरून त्या ग्रुपचे खेळणे करून आपलं बालसुलभ कुतूहल शमवू बघतात. मग त्यानंतर admin त्यांना ओरडतो किंवा मनातल्या मनात शिव्या घालत त्यांनी केलेली सेटिंग पूर्ववत करत बसतो.

*शुभेच्छुक* :

इतरवेळी चर्चेत कधीही भाग न घेणारे , काही माहिती न देणारे हे लोक सणावाराला मात्र आवर्जून शुभेच्छा देतात. त्या पण अक्षरी नव्हे. कुठून तरी चित्र/फोटोरुपी बॅनर घेऊन येतात. नव्या वर्षाचे स्वागत असो , हनुमान जयंती असो , राम नवमी असो , गुढीपाडवा असो , दसरा , दिवाळी असो. त्या सणाच्या दिवशी येतातच. यांच्या आधी कोणी शुभेच्छा दिलेल्या असल्या तरी त्या आपण दिलेल्या नसल्याने दुसऱ्याचे पोस्टर आपले कसे समजायचे? असा विचार करून हे स्वतःकडचे तसेच शुभेच्छा असणारे पोस्टर चिटकवून जातात.

:) :) :)

मुक्तकजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

कंजूस's picture

2 Jan 2024 - 4:26 am | कंजूस

हं.

विरंगुळा.

सर टोबी's picture

2 Jan 2024 - 8:50 am | सर टोबी

विषय आवडला. सध्या जेवढे सुचतील तेवढे ॲडवतो आणि मग जमेल तशी भर घालतो.

पापभिरू
समाज माध्यमांवर सर्वात मोठी असलेली ही जमात आहे. माणूस कळप करुन रहायला लागल्यानंतर कधीतरी ही पापभिरू साथ आली आणि अजूनही जाण्याचं नाव घेत नाही. चार चौघे जसं वागतात तसं वागलं म्हणजे आपण फारसं दखलपात्र होत नाही ही या वृत्तीची उर्मी.

नात्यामध्ये, शाळा-कॉलेजच्या मित्र समूहामध्ये वा तत्सम व्हॉट्सऍप ग्रुपवर कोणी दुःखद बातमी टाकली की “ॐ शांति”, “हरी ओम” वा RIP आणि हात जोडलेली इमोजी यांचा पूर येतो. संबंधित व्यक्तीशी कधी संपर्क न झालेली मंडळी देखील या पुरात आपले अर्ध्य अर्पण करतात.

वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवसाच्या वेळेस तर विचारुच नका. खिशाला कोणतीही तोशीस पडणार नसल्याने केक, रिबन्स, चॉकलेट्स यांच्या इमोजींचा सढळ मारा होतो.

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Jan 2024 - 12:56 pm | राजेंद्र मेहेंदळे

"बेंबट्या--चार लोक वागतील तसे वाग हो!! म्हणजे तुला कोणी नावे ठेवणार नाही--कसें?"

उपयोजक's picture

2 Jan 2024 - 2:19 pm | उपयोजक

आहेत असेही :)

फूलवाले राहिले. सकाळी सकाळी किलोभर फुले, गुच्छ, ताटवे..

आणखी अचाट माहितीपूर्ण मेगाबायटी लेख फॉरवर्ड करणारे. युनेस्कोने केलेल्या घोषणा, नारायण मूर्ती, विश्वास नांगरे पाटील, अब्दुल कलाम, नाना पाटेकर यांचे केलेले, न केलेले कोट्स..

वपुंचे कोट्स पुलं च्या नावावर खपवणारे. इकडचा प्रतिसाद तिकडे नाव पुसून पोस्ट करणारे हे राहिले की.

विजुभाऊ's picture

2 Jan 2024 - 10:52 am | विजुभाऊ

परवा माझाच एक मिपावरचा लेख लेखक विसुभाऊ या नावाने मला एकाने पाठवला होता

उपयोजक's picture

2 Jan 2024 - 2:20 pm | उपयोजक

प्रेरणा , फुले :)

गवि's picture

2 Jan 2024 - 6:03 pm | गवि

कळले नाही..

Bhakti's picture

2 Jan 2024 - 10:45 am | Bhakti

शुभेच्छा प्रिय जण- आला सण की दे शुभेच्छा,आला सोमवार, मंगळवार... चतुर्थी की दे शुभेच्छा,आला ऐतिहासिक की दे शुभेच्छा!

व्हिडिओ प्रिय जण- १ मिनिटांनचा व्हिडिओ पाहायचं जीवावर येतं तिथे हे पाच दहा मिनिटांचे मूल्यशिक्षणाचे व्हिडिओ कसे पाठवू शकतात ;)

स्व कौतुक प्रिय जण-आयुष्यातला प्रत्येक क्षण अनमोल आहे तो जगाला कळलाच पाहिजे अस़ म्हणत ग्रुपवर असंख्य फोटो टाकून कौतुकाच्या झाडांसाठी आसुसलेले जीव ;)

वामन देशमुख's picture

2 Jan 2024 - 12:14 pm | वामन देशमुख

१ मिनिटांनचा व्हिडिओ पाहायचं जीवावर येतं

मी तर १५ सेकंदांपेक्षा जास्त असलेला विडिओ डाउनलोडदेखील करीत नाही.

जिन्हें घर अच्छा लगता था वो घर में रहे,
हमे आवारगी पसंद थी हम पूरे शहर में रहे." - रेख्ता...

आता विसाव्याचे दिन. कायप्पा सारखा तारणहार दुजा न कोई.

वामन देशमुख's picture

2 Jan 2024 - 12:04 pm | वामन देशमुख

*कट्टर भाजप द्वेष्टे* :

यांना देशातल्या कोणत्याही राज्यातच नव्हे तर देशातल्या कोणत्याही गावातला कोणत्याही ग्रामसेवक हा सुद्धा भाजपचा नको असतो. त्यामुळे सतत मोदी किंवा भाजप , राममंदिर यांच्या विरुद्ध पोस्टचा तुफानी मारा करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्यासारखे पोस्टत राहतात. समजा एखाद्या समूहात सगळे भाजप द्वेष्टे आहेत हे माहिती असले तरीसुद्धा ; समजा जर आपण हा मारा थांबवला आणि चुकून त्यातला एखादा भाजपच्या थोडासा जवळ गेला ; त्याची विचारसरणी ही भाजपला अनुकूल अशी बनली तर काय करायचं ? तशी वेळच येऊ नये म्हणून हे मुसळधार पाऊस जसा पडतो तसं भाजप , राममंदिर , संघ , नरेंद्र मोदी या चार प्रकारांना विरोध बाण सतत मारत राहतात.

उदा. मोदींनी १५ लाख देण्याचे वचन दिले होते अशी थाप मारतात. पुरावा द्या म्हटले तर पळ काढतात.

वामन देशमुख's picture

2 Jan 2024 - 12:13 pm | वामन देशमुख

असे लोक मग भाजप नको, मोदी नको, राममंदिर नको, भारताची प्रगती नको, मग तुम्हाला कोण / काय हवे आहे यावर मोघम गोलगोल बोलतात.

मुक्त विहारि's picture

2 Jan 2024 - 5:12 pm | मुक्त विहारि

+१

वामन देशमुख's picture

2 Jan 2024 - 12:09 pm | वामन देशमुख

मजकूर ठळक करण्यासाठी -

*असं व्हाट्सऍपवर लिहितात.*

असं मिपावर लिहितात.

रंगीला रतन's picture

2 Jan 2024 - 5:30 pm | रंगीला रतन

*असं व्हाट्सऍपवर लिहितात.*
तुम्हाला लेखकाची किर्ती माहित नाही का? :=)

सर टोबी's picture

2 Jan 2024 - 12:24 pm | सर टोबी

वैचारीक फुस फुस
बऱ्याच वेळा समव्यावसायिक लोकांमध्ये एकत्र येऊन वैचारिक देवाण घेवाण करण्याची टूम निघते. वर वर पाहता ती एक चांगली कल्पना वाटते. पण असा ग्रुप तयार झाल्यानंतर जी वैचारिक घुसळण होते त्याचा हा नमुना:

कुणी तरी नवशे अगदी फुसके प्रश्न विचारतात. हाताशी इंटरनेट असतांना ज्याची सहज माहिती मिळू शकते असे प्रश्न विचारले जातात. अगदीच काही हिरमोड नको व्हायला म्हणून आपण काही माहितीचे संदर्भ पाठवतो. पण ते देखील वाचण्याची तसदी न घेता काही सॅम्पल्स आहेत का अशी विचारणा होते.

आतल्या गाठीचे: वैचारिक घुसळण समूहामध्ये काही संपन्न अशी बडी मंडळी असतात. प्रत्यक्ष गाठीभेटींच्या कार्यक्रमात यांना प्रतिष्ठेचं निमंत्रण असतं, ते जे काही बोलतात त्याला keynote address असं काही तरी म्हटलं जातं. घूसळण कार्यक्रमात चुकून माकून, आपल्या व्यग्रतेतून थोडा वेळ काढून, हे प्रकटलेच तर असे विचारमोती सांडतात: “तसं नक्की नाही सांगता येणार. या विषयाला खुप पैलू आहेत आणि त्यातील प्रत्येक पैलूचा अभ्यास करनं गरजेचं आहे”.

उपयोजक's picture

2 Jan 2024 - 2:23 pm | उपयोजक

भारी :)

कर्नलतपस्वी's picture

2 Jan 2024 - 1:24 pm | कर्नलतपस्वी

विवीध विषयांवर असलेले समुह पकडले आहेत. जमेल तसे एखादे कोंबडीचे पिल्लू सोडून द्यायचे. दिवसभर पकाक पक ऐकू येते दिवस छान जातो.

व्हिडीओ,ढकलपत्रे, त्रिकाळ संध्या म्हणजेच गुडमॉर्निंग, गुडनाईट वगैरे वाचत नाही. नुसतीच नजर फिरवायची.

उरला सुरला वेळ मिपा आहेच.

माहीत नव्हतं सेवानिवृत्त आयुष्य इतक भारी असतं,केव्हांच व्हिआरेस घेतली असती.

चौथा कोनाडा's picture

2 Jan 2024 - 6:10 pm | चौथा कोनाडा

हा हा हा ... खुसखुशीत ! मस्त, झकास, फस्ट्क्लास !

असो,

तुम्हाला नविन वर्ष २०२४ च्या हार्दिक शुभेच्छा !
(तुमचा प्रतिसाद आला की फुलं पाठ्विन म्हणतो)
:)

पर्णिका's picture

3 Jan 2024 - 12:23 am | पर्णिका

लेख छान आहे. ग्रुपमधील बरेच किस्से, गमती-जमती आठवल्या. शुभेच्छुकांचा अनुभव आहे.:)
व्हाॅट्सअपमुळे भारतातील नातेवाईक/मित्रमंडळी यांच्या संपर्कात राहणे सोप्पे झाले हे मात्र निश्चित!

सौन्दर्य's picture

4 Jan 2024 - 12:14 am | सौन्दर्य

कोणताही सण आला की फराळाची ताटे, मिठाईचे बॉक्सेस, जिलेब्या, चकल्या, रांगोळी, देवदेवतांची चित्रे, ह्यांचा भडीमार करणारे हा देखील एक मोठा ग्रुप आहे. खिशात हात न घालता आपण किती धार्मिक किंवा सोशल आहोत, हे दाखविण्याचा ते एक केविलवाणा प्रयत्न करतात.

मी माझ्या व्हाटसप मंडळींना सांगून ठेवलंय की जर तुम्हाला, मला खरंच शुभेच्छा द्यायच्या असतील तर फोनवर बोलून द्या, मग भले तो फोन व्हाटसपवरचा चकटफू फोन असो. उगाचच इकडून आलेला संदेश तिकडे पाठवला की जीवनाची इतिकर्तव्यता पूर्ण झाली अशा विचारांच्या लोकांचा भयंकर राग येतो.

हल्ली तर आयुष्यात कधीही न ऐकलेल्या, पाहिलेल्या किंवा साजऱ्या केलेल्या एखाद्या बुवांची जयंती, एखादी सप्तमी, एखादी अमावस्या ह्यावर देखील शुभेच्छा येतात, नुसता वैताग झाला आहे.

अजून एक कॅटेगरी सांगतो.
व्हाट्सअप एडमिन
फुलांच्या गुच्छ पासून म्हशीच्या पुच्छापर्यंत कशावरही हे लोक ग्रुप तयार करू शकतात आणि त्याचे एडमिन पद भूषवू शकतात.
कोणी जास्त नडायला लागला तर त्याला सरळ ग्रुप मधून बाहेर काढतात पण टेन्शन घेत नाही

घायाळ's picture

4 Jan 2024 - 2:56 pm | घायाळ

मी माझ्या व्हाट्सअ‍ॅपच्या ग्रुपमधून काढून टाकलेल्या एक कोटी लोकांचा व्हाट्सअ‍ॅप ग्रुप
ह्या बाळासाठी प्रसववेदना सुरू झाल्याचे आमच्या पुणे मुंबईच्या शिवेवरील खात्रीलायक सूत्रांकडून समजते

खटपट्या's picture

7 Jan 2024 - 8:29 am | खटपट्या

यात एक ऍड करू इच्छितो,
काही विषय शोधायचा आणि व्हाट्सअप्प ग्रुप काढायचा,

1)सकाळी लवकर उठणाऱ्या चा ग्रुप
2)मिळून मिसळून ग्रुप - ज्यात स्वतःचे घोडे दामटायचे
3)मराठी बोला चळवळ ग्रुप - यात सद्य परिस्थिती लक्षात न घेता उगाच आमका हिंदीत बोलला म्हणून रोज सकाळी बांग द्यायची,
4) गुंतवणूक ग्रुप - यात गुंतवणूक सोडून सर्व चर्चा करायची,
5) मन स्वास्थ्य ग्रुप - स्वतःचे चित्त थाऱ्यावर नाही आणि दुसऱ्या ला शहाणपणा शिकवत बसायचे,

अजून असे बरेच ग्रुप - यात स्वतःला काही पटले नाही की पोस्ट डिलीट करायची, मस्तरा सारखी छडी घेऊन दिवसभर कंडू शमवत राहायचा,

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Jan 2024 - 12:00 pm | अमरेंद्र बाहुबली

)मराठी बोला चळवळ ग्रुप - यात सद्य परिस्थिती लक्षात न घेता उगाच आमका हिंदीत बोलला म्हणून रोज सकाळी बांग द्यायची, सद्य परिस्थीती काय आहे??? आणी राज्यभाषेची मागणी करणं म्हणजे बांग देणं?? मराठी भैय्ये हे प्रकरन खरंच इंटरेस्टींग आहे हे तुमच्याकडे पाहून कळतं. :)

खटपट्या's picture

7 Jan 2024 - 8:20 pm | खटपट्या

लेकी बोले सुने लागे,
हा हा हा
मजा आ गया

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Jan 2024 - 12:26 pm | अमरेंद्र बाहुबली

हॅ हॅ हॅ

उपयोजक's picture

8 Jan 2024 - 7:08 pm | उपयोजक

शीघ्रकोपी लोकांना मात्र त्रास होतो. :)

खटपट्या's picture

10 Jan 2024 - 1:16 pm | खटपट्या

आले आले,
शीघ्र कोपी होऊन लोकांना गृपातून काढणारे आले,
तिर निशाने पे लगा

:)

मराठी भाषा शुद्धीकरण ग्रुप - यात परत हिंदी ची कशी दादागिरी चालते? भारताला कॉमन भाषा कोणती असावी?
त्यात कोणी सल्ले दिले तर ते न मानता उगाच पाळणा हलत ठेवण्यासाठी रोज सकाळी एक पिल्लू सोडून द्यायचे,

यथावकाश ग्रुप वर येऊन नको असलेले प्रतिसाद उडवायचे आणि परत दुसऱ्या ग्रुप वर उकिरडे फुंकायला जायचे

तळमळत तिथंच कशाला थांबायचं? :))

खटपट्या's picture

10 Jan 2024 - 1:17 pm | खटपट्या

कोण थांबलय,

शीघ्रकोपी :)