मिपाचे जावई व सुना, एक ओळख....! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
15 Dec 2008 - 6:13 pm

राम राम सभ्य मिपाकर स्त्रीपुरुषहो,

आपण सर्वच जण येथे नेहमी येत असता, लिहीत असता, वाचत असता. मिपावर येणे झाले नाही तर चुकल्याचुकल्या सारखे वाटते, मिपा आता कुटुंबाप्रमाणेच आहे, इत्यादी.. असेही आपल्यापैकी बरेच जण अनेकदा म्हणताना आढळतात..

आता कुटुंबाचाच विषय निघाला तेव्हा अर्थातच प्रत्येकाच्या जोडीदाराचा विषयही ओघानेच आला. आणि म्हणूनच हा पेश्शल धागा मिपाकर सदस्यांच्या जोडीदारांकरता आहे. त्यांची ओळख करून घेण्याकरताच आम्ही ह धागा सुरू करत आहोत..

मिपावरील पुरुष सभासदांच्या जोडीदारांना इथे मिपाच्या सुना मानले आहे आणि स्त्री सभासदांच्या जोडीदाराला येथे मिपाचे जावई मानले आहे. तर मंडळी, प्रत्येकाने आपापल्या जोडीदाराची, म्हणजेच पर्यायाने मिपाच्या जावईसुनांची ओळख येथे करून द्यायची आहे! :)

ओळखीचे स्वरूप -

विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून? :)
जोडीदाराच्या आवडीनिवडी,
एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या,
एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का? :)
इत्यादी इत्यादी इत्यादी...

जोडीदाराचा फोटूही येथे टाकल्यास उत्तमच, परंतु आग्रह अर्थातच नाही..

जे पतीपत्नी दोघेही इथले सभासद आहेत त्यांनीही एकमेकांची ओळख करून द्यायची आहे. अर्थात, ते शिक्रेट ठेवायचे असेल तर आग्रह नक्कीच नाही! :)

आमच्यासारख्या अविवाहितांना आणि ब्रह्मचार्‍यांना या धाग्यात स्थान नाही! :)

चला तर मंडळी,

होऊ द्यात सर्वांना मिपाच्या गुणी जावई-सुनांची ओळख..! :)

आपला,
(अविवाहीत परंतु कुटुंबवत्सल!) तात्या.

मौजमजाप्रकटनमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

चेतन's picture

15 Dec 2008 - 6:43 pm | चेतन

तात्या अनुष्का, सिंडी ची ओळख करुन दिलीत तर चालेल हो

(स्थानबध्द्द) चेतन

विसोबा खेचर's picture

15 Dec 2008 - 6:44 pm | विसोबा खेचर

हा हा हा! :)

विनायक प्रभू's picture

15 Dec 2008 - 6:45 pm | विनायक प्रभू

अहो एक अध्याय लिहायला लागेल आमच्या बायडीवर. मला काल तीचा फोन आला. दारावर टांगलेली दुधाची पिशवी कामाला जाताना नेलीत का? हे विचारायला.
मी एकदा मोबाईलच्या जागी टिवी रिमोट नेला होता म्हणुन काय झाले. "दुधाची पिशवी"- जरा जास्तच झाले हो.
माझ्यासारख्या विचीत्र प्राण्याबरोबर २३ वर्ष संसार केला म्हणुन तीला एक पदक द्यायला पाहिजे-इती आदिमाया दुर्बिट्णे.
पाकृबरोबर फोटो टाकीन कुटंबाचा.
माकडाला मोत्याची माळ असे आमचे हितशत्रु म्हणतात.
मुलाच्या बरोबर संगोपनाचे १००% श्रेय तीलाच.

विसोबा खेचर's picture

15 Dec 2008 - 6:49 pm | विसोबा खेचर

माझ्यासारख्या विचीत्र प्राण्याबरोबर २३ वर्ष संसार केला म्हणुन तीला एक पदक द्यायला पाहिजे-

हे मात्र खरे हो! :)

माकडाला मोत्याची माळ असे आमचे हितशत्रु म्हणतात.

हा हा हा! :)

आपला,
( लग्न करून स्वत:चं माकड करून न घेतलेला :) ) तात्या.

लिखाळ's picture

15 Dec 2008 - 6:55 pm | लिखाळ

मी एकदा मोबाईलच्या जागी टिवी रिमोट नेला होता म्हणुन काय झाले. "दुधाची पिशवी"- जरा जास्तच झाले हो.
हा हा हा हा.. हे मस्तच... दुधाची पिशवी नेली असतीत तर खरेच जास्त झालं असतं :)
-- लिखाळ.

अवलिया's picture

15 Dec 2008 - 7:02 pm | अवलिया

दुधाच्या किती पिशव्या टांगलेल्या असतात तुमच्या दाराला?

- अवलिया

अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

15 Dec 2008 - 7:04 pm | विनायक प्रभू

एकच.
आता स्टँड्बाय पिशवी चा पण विचार झाला असेल तर मला माहीत नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Dec 2008 - 7:04 pm | बिपिन कार्यकर्ते

आमच्या नात्यातल्या एकजण रोज आंघोळ झाल्यावर पंचा गुंडाळून पूजा वगैरे करायचे. तसे विसराळूच होते ते. एकदा पूजा वगैरे झाल्यावर ऑफिसला जायला पँट घातली पण पंचा काढायला विसरले. आत पंचा तसाच. तसेच गेले ऑफिसला. :)

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

15 Dec 2008 - 7:01 pm | टारझन

आधी मला हा धागा **** काढणे ने चालू केला की काय असंच वाटलं .. खरंच .. पण तात्याने काढलाय .. चांगल्या प्रतिक्रिया यायची अपेक्षा आहेत ..
आम्ही बैचलर असल्यामुळे आम्ही पण इथं बाद .. तसं होणारी सुन आहेच म्हणा मिपावर ! पण तात्याने ती अट टाकलेली आहे ..
मिपाची भावी सुन -- "जेन"

- जेनचा टारझन

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Dec 2008 - 7:05 pm | बिपिन कार्यकर्ते

ओळखी करून घ्यायला आवडेल. सध्या तरी माझी बायको इथे नाहिये मिपावर त्यामुळे काही लिहू नाही शकत. :)

बिपिन कार्यकर्ते

JAGOMOHANPYARE's picture

15 Dec 2008 - 7:25 pm | JAGOMOHANPYARE

माझ्या बायकोला मी इथल्या पाक कृती सांगतो आणि ती मला त्या करायला मदत करते ! ( हे वाक्य असेच आहे.... ती मला त्या करायला मदत करते .... टायपो मिस्टेक झालयाची शन्का कृपया काढु नये.)

पाक कृती च्या खाली लोकांच्या अनेक प्रकारच्या कमेन्ट्स असतात, असे सांगितले तर म्हणाली म्हणजे सगळे रिकामटेकडेच दिसताय की... आता काय बोलणार ?

टारझन's picture

15 Dec 2008 - 7:35 pm | टारझन

हो पण आम्ही एक नक्की म्हणू ... " अब तो जागो मोहन प्यारे "

- टारकोंबडा
(आम्ही झोपेचं सोंग घेतलेल्यांना पण जागे करू शकतो)

जे सध्या अविवाहीत आहेत ते आपल्या आदर्श जोडीदार बद्द्ल लिहु शकतील.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Dec 2008 - 7:31 pm | बिपिन कार्यकर्ते

खूप मोठे मोठे प्रतिसाद येतील. ;)

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

15 Dec 2008 - 7:36 pm | अवलिया

आणि काही जण लेखमाला लिहितील अन परत विचारतील माझे काय चुकले?

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

15 Dec 2008 - 8:12 pm | विनायक प्रभू

सेल्फ एक्सप्रेशन ने कुटंबाची ओळख करुन द्यायला पुर्ण वाव देणारा धागा आहे.
मला वाटते ही संधी सोडू नये लग्न झालेल्या सभासदांनी.
लग्नात मग्न
विप्र

लिखाळ's picture

15 Dec 2008 - 8:18 pm | लिखाळ

> सेल्फ एक्सप्रेशन ने कुटंबाची ओळख करुन द्यायला पुर्ण वाव देणारा धागा आहे. <
बरोबर आहे.

या धाग्यावर काय लिहावे ते घरी विचारुन मग लिहीन. :)
--(एक्सप्रेसिव) लिखाळ.

विनायक प्रभू's picture

15 Dec 2008 - 8:24 pm | विनायक प्रभू

विचारुन लिहा. नाहीतर उठाबशा काढायला लागतील.
उठा॑बशा काढलेला
विप्र.

नीधप's picture

15 Dec 2008 - 10:48 pm | नीधप

कोणीच काहीच लिहित नाही?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

आपला अभिजित's picture

15 Dec 2008 - 11:59 pm | आपला अभिजित

तात्यांनी हा धागा सुरू करण्यापूर्वीच आम्ही आमच्या लग्नाचे, संसाराचे, परिचयोत्तर विवाहाचे, साथ-साथ विवाह अभ्यास मंडळातल्या अनुभवांचे, कन्येबाबतच्या (म्हणजे ती झाल्यानंतरच्या! ती होण्याबाबतच्या नव्हे! चावट!!) अनुभवांचे "दुकान' यापूर्वी अनेकदा इथे लावले आहे. अधून-मधून ब्लॉगवरच्या तपशीलवार वर्णनाचे संदर्भही दिले आहेत. बायकोच्या डोहाळजेवणाच्या वेळी केलेल्या भोचक आणि आगाऊ काव्याचा रसास्वादही मिपाकरांना घडविला आहे. त्याचा त्यांनी किती आनंद घेतला आणि कुणाकुणाच्या पोटात मळमळले, याची कल्पना नाही. तर ते असो. आता तात्यांनी पुन्हा एकदा संधी दिल्याने, आमचे हे दुकान!
लग्नाच्या बाजारात साधारपणपणे सत्ताविसाव्या वर्षी उतरलो, पण लग्न जमता जमत नव्हतं. जगात आपणच एकमेव "मोस्ट एलिजिबल बॅचलर' असल्याचा फुगा फुटायला सहा महिने हात पोळून घ्यावे लागले. चहा-पोहे कार्यक्रमांचे हे अनुभव भीषण होते. (त्याविषयी नंतर कधीतरी!) एकतर मूळचा रत्नागिरीकर असल्याने "पुणेकर' मुलींना भेटताना जशी माझ्या मनात एक अढी होती, तशीच त्यांच्याही मनात होती. आई-वडिलांच्या दृष्टीने अगदी "आखूडशिंगी, बहुदुधी' (हा योग्य आणि समर्पक शब्द आहे. कृपया "कोटी'सम्राटांनी त्यावरून टिंगल-टवाळी करू नये!) असलेली मुलगी मी का नाकारतो, हे त्यांच्या दृष्टीने कल्पनेपलीकडले होते. असो. त्यातून हर्षदाशी माझी भेट झाली.
म्हणजे, तसे मी तिला आधी ओळखत होतो आणि पाहिलेही होते. आमच्याच संस्थेच्या कर्मचारी पतपेढीत ती कामाला होती. पाहण्यात येणाऱ्या प्रत्येक मुलीकडे मी "संभाव्य बायको' याच दृष्टिकोनातून पाहत असल्याने, तीदेखील त्या "स्कॅनर'खालून गेली होती. पण आधी नापास झाली होती. (त्यावेळी मी स्वतःला अभिषेक बच्चन समजत होतो!) एका ज्येष्ठ सहकाऱ्यांनी तिचे नाव मला सुचविले होते. पण मी नाकारले होते. माझ्या दृष्टीने "माझी बायको' या कॅटॅगरीत तिचा विचारही मी करू शकत नव्हतो!
नंतर सहा महिन्यांनी माझे विमान बऱ्यापैकी जमिनीवर नव्हे, तर जमिनीच्या दोन दशांगुळे खालीच उतरल्याने, आधी नाकारलेल्या मुलींचा नव्याने विचार करू लागलो होतो. त्यातून हर्षदाचे नाव पुन्हा दुसऱ्या एका सहकाऱ्याने मला सुचविले. "भेटून, बोलून तर बघायला काय हरकत आहे,' असा विचार करून आम्ही दोघे भेटलो. बोललो. पहिल्या भेटीत बऱ्यापैकी "ये हृदयीचे ते हृदयी' झाले. "साथ-साथ'च्या परंपरेला जागायची खाज असल्याने "देहभान' नाटक दोघांनी एकत्र पाहिले. त्यावर चर्चा केली. तिची मते आवडली. निदान, वेगळ्या विचारांची, (किंबहुना स्वतःचे विचार असलेली! कारण आधी भेटलेल्या अनेक "आखूडशिंगी' मुलींकडे हा पैलूच नव्हता!) आहे, हे लक्षात आले. मग आम्ही तीन-चारदा भेटलो. बऱ्याच विषयांवर बोललो. आपलं जमू शकेल, असं वाटलं आणि मग पक्कं करून टाकलं. नंतर आई-वडिलांना कळवलं. दोघांनीही!
असो. तर असं आमचं हे रामायण.
आता भांडणांविषयी!
भांडणाचा प्रमुख मुद्दा म्हणजे अर्थातच मातीचा अभिमान!
मी रत्नागिरीचे गोडवे गायचे आणि तिनं पुण्याचे. ती काही तथाकथित "स्वाभिमानी (आणि अर्थातच आडमुठेपणा असलेली) पुणेकर' नाही. पण भाषेवरून वाद झडतात नित्यनेमाने. ती मांजर की ते मांजर, ती लसूण की तो लसूण, ते फरसाण की तो फरसाण, हे वादाचे प्रमुख विषय. बाकी, घरातल्या पतीच्या जबाबदाऱ्या (भांडीधुणी, पाल्याची शी-शू काढणे, कपडे वाळत घालणे, बायकोचे पाय (धरणे) आणि जमल्यास दाबून देणे, वगैरे.) हाही प्रमुख विषय असतो. "मी घरात राबराब राबते आणि तुला इकडची काडी तिकडे करायला होत नाही,' हे तर समस्त भारतीय विवाहितांचं राष्ट्रीय घोषवाक्‍य आहे! तर ते असो.

"मिपा'वरूनही अनेकदा भांडणं होतात.
घरीही इंटरनेट असल्याने (आणि ऑफिसात फुकटात इंटरनेट वापरण्याचे जास्त सुख आम्हाला नसल्याने) अनेकदा संगणकाचा उंदीर आणि आमचा हात नकळत "मिपा'कडे वळतो. तेव्हा शिव्या खाव्या लागतात. घरातली कामे सोडून या लष्कराच्या भाकऱ्या कशाला? "नस्ते उकिरडे फुंकायला सांगितलेत कुणी' वगैरे सुविचार ऐकून घ्यावे लागतात.
असो.
आलीया (नवऱ्याच्या) भोगासी, असावे सादर!

- अभिजित.
(अवांतर :
मांजर आणि नवरा : कुठेही नेऊन सोडला, तरी संध्याकाळी घरीच परत येतो!)

----
सगळ्यात महत्त्वाचे ः लग्नाच्या निर्णयाबद्दल आतापर्यंत एकदाही खेद वाटलेला नाही! अतिशय सुखी आहे! लग्नापूर्वी 58 किलो होतो, आता 82 किलो झालोय, यावरून काय ते ओळखा! मात्र, पत्नीची जाहीर तारीफ करायची नाही, असा अलिखित नियम आहे. म्हणून हे सगळ्यात शेवटी लिहिले आहे. असो!

विसोबा खेचर's picture

16 Dec 2008 - 12:51 am | विसोबा खेचर

अनेकदा संगणकाचा उंदीर आणि आमचा हात नकळत "मिपा'कडे वळतो. तेव्हा शिव्या खाव्या लागतात. घरातली कामे सोडून या लष्कराच्या भाकऱ्या कशाला? "नस्ते उकिरडे फुंकायला सांगितलेत कुणी' वगैरे सुविचार ऐकून घ्यावे लागतात.

मस्त..:)

योगी९००'s picture

16 Dec 2008 - 12:01 am | योगी९००

लग्नाचा प्रकार : घरच्यानी ठरवून ....
आमची माहिती खाली दिली आहे..जाड अक्षरातली माहिती ही मि.पा. च्या सुनेची, तर कमी जाड अक्षरातली माहिती माझी..

मी ती
नाव : अबक कबअ
गाव : कोल्हापूर नाशिक
फुल : मोगरा सर्व
फळ : कोणतेही कोणतेही
व्यवसाय : संगणक अभियंता होमियोपाथिक डॉक्टर
गोड पदार्थ : गुलाबजाम सोडून काहिही फक्त गुलाबजाम
तिखट : सर्व सर्व (पण थोडे कमी तिखट)
अभिनेता : शाहरूख तर अजिबात नाही फक्त शाहरूख
अभिनेत्री : बहुतेक सर्व माधुरी आणि मधुबाला
टि व्ही : विनोदी मालिका आणि खेळ सर्व मालिका...मराठी सारेगमा..
वाचनाची आवड : खुप माझ्यामानाने खुपच कमी
हिंडण्याची आवड : खुपच कमी भरपूर
आवडती खरेदी : खाण्याच्या गोष्टी, electronic gadgets कपडे, ग्रुहपयोगी वस्तू
संगणक खेळ : अतिशय प्रिय अप्रिय
चित्रपट आवड : विनोदी, गुढ आणि रहस्य विनोदी, प्रेम, त्याग यांनी ओतप्रत भरलेले..
कला : थोडीफार पेटी वाजवतो चित्रकला

वरील आवडीनिवडी वरुन आमच्यात किती कमी (?) भांडण होत असेल याची आपणास कल्पना यावी. मि.पा. वरून एकदाही भांडण झाले नाही, मात्र एकदा (चुकुन) मि.पा. च्या स्त्री सहकारीशी संवाद साधण्याचे प्रकट विचार तोंडातून आल्याने मार पडला होता.

खादाडमाऊ

विसोबा खेचर's picture

16 Dec 2008 - 12:30 am | विसोबा खेचर

गोड पदार्थ : गुलाबजाम सोडून काहिही फक्त गुलाबजाम

हे सर्वात मस्त! :)

भडकमकर मास्तर's picture

16 Dec 2008 - 12:26 am | भडकमकर मास्तर

... जेवण झाल्यानंतर थेट संगणकाकडे पावले वळतात तेव्हा बायकोच्या शिव्या खाणे नेहमीचे ... ( इथे आवरायला मदत कोण करणार?)
लेख पूर्ण करण्यासाठी आज मला मिपा उघडणं अत्यावश्यक आहे असं बायकोला पटवून देऊन ( थोडक्यात बर्‍यापैकी भांडून वगैरे झाल्यावर ) मी मिपा उघडलं आणि त्यावेळी नेमके संकेतस्थळ विश्रांतीअवस्थेत आहे, रात्री बारानंतर चालू होईल असा बोर्ड दिसला... तो पाहून माझा चेहरा पडला आणि बायकोने विकट हास्य केल्याचे आठवते....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

नीधप's picture

16 Dec 2008 - 8:30 am | नीधप

तात्यांच्या प्रश्नाबरहुकूम माझी उत्तरपत्रिका...
१. ओळखीचे स्वरूप - एका ऐतिहासिक सिरीयलच्या पायलट च्या शूटींग दरम्यान भेट झाली. तो दिग्दर्शक मी कॉश्च्यूम.
२. विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून? - पिरेमातूनच. माझं शिक्षण चालू होतं. एम ए (नाट्य) त्यामुळे लग्नाचं बघणं असं काही सुरूच केलं नव्हतं. दरम्यान मी परदेशात शिकायला जायचंही ठरलं त्यामुळे आईवडिलांच्या डोक्यात लग्नाचा विषय मागे ढकलला गेला आणि तितक्यात मी घरी हा बॉम्ब टाकून अमेरीकेला शिकायला जी निघून गेले ती मधे १ महिना सुट्टी सोडता एकदम ३ वर्षांनीच परत आले.
३. जोडीदाराच्या आवडीनिवडी, - कामाचे व्यसन, साध्या साध्या गोष्टी आवडतात, खाण्यापिण्याच्या बाबतीत नखरे असे नाहीत पण माश्यांवर प्रेम प्रचंड. एकुणातच सर्व कोकणी गोष्टींवर प्रेम. एकटे रहायला आवडते. लिखाण किंवा इतर कुठल्याही कलेत व्यक्ततेमधे प्रामाणिकपणा आवडतो. महत्वाचा असतो. रिकाम्या वेळात पार्टीतल्या दंगा मस्ती, धिंगाणा इत्यादी पेक्षा शांतपणे रहायला आवडते. मी आवडते अजूनही (लग्नाला साडेसहा वर्ष झालीत!)
४. एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या, - भरपूर आहेत की. त्याशिवाय मज्जाच नाही. सुरूवात करायची तर हनिमूनला गेलेलो असताना चित्रपटासाठी लोकेशन हंटींग करण्यावरून झालेलं आणि अजूनही चालू असलेलं भांडण आहेच की. बाकी छोटीमोठी अनेक उदा: - मला नाचायला आवडतं त्याला नाही, त्याला तांदळाची भाकरी आवडते मला नाही, मला प्रत्येक गोष्ट त्याच्याशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही आणि त्याला असं हागल्यापादल्या प्रत्येक गोष्ट माझ्याशी बोलणं जमत नाही... पण हीच तर गंमत आहे.
५. एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का? - मिपावर एवढी पडीक नसते मी. नेटवर असते अधून मधून. पण कामं रखडतील एवढी नाही. पण कधी कधी येतो नेटबद्दल नाराजीचा सूर. मग थोडा वाद घालायचा. पण मी नेट व्यसनी आहे हे मला माहितीये त्यामुळे वाद घालणं माझ्या बाजूने फुसकं असतं.

एक नक्की ह्या माणसाला 'टिपिकल नवरा' टाईप वागताच येत नाही तो माझा सुहृदच असतो. त्यासाठी मी देवाचे आभार मानू की स्वतःच्या निवडीवर स्वतःची पाठ थोपटू हे मात्र मला माहित नाही.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

विसोबा खेचर's picture

16 Dec 2008 - 8:42 am | विसोबा खेचर

उत्तम प्रतिसाद..

स्वत:च्या जोडीदाराबाबत अश्याच प्रकारच्या मनमोकळ्या शेअरिंगची या धाग्यामागे अपेक्षा होती..

धन्यवाद..

तात्या.

नीधप's picture

16 Dec 2008 - 10:28 am | नीधप

आता मला गलबलून/ गहिवरून इत्यादी येणार बहुतेक!!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सोनम's picture

16 Dec 2008 - 11:53 am | सोनम

तात्या नी हा लेख लिहिला
आपल्या जोडीदाराविषयी
याला सर्व प्रथम अजुक्का ताई या॑नी चा॑गल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तात्या अजुक्का ताईचा प्रथम क्रमा॑क . =D> =D> =D> =D> =D>

मैत्री ही करायची नसते कारण मैत्री ही होत असते
मैत्री ही तोडायची नसते कारण मैत्री ही जपायची असते.

( सर्

झकासराव's picture

16 Dec 2008 - 12:08 pm | झकासराव

खाली सगळी लाली जमली आहे.
टॅग बंद करण्याचा प्रयत्न.

बंद हो जा सिम सिम
जमल रे जमल. :)

नीधप's picture

16 Dec 2008 - 12:03 pm | नीधप

ह्या ह्या!!
कसचं कसचं!!
बर अचानक या पोस्टपासून खाली सगळा लाल रंग कसा उधळला गेलाय?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

नीधप's picture

16 Dec 2008 - 3:50 pm | नीधप
चित्रा's picture

16 Dec 2008 - 10:34 am | चित्रा

विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून?
घरच्यांनी पाहून नाही.

जोडीदाराच्या आवडीनिवडी
माझ्याहून वेगळ्या आहेत. माझ्या मते खरी एकच गोष्ट आवडते - वाद घालायला.

एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या
ते काय विचारायला हवे का?

एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का?
नाही, कारण दोघेही पडिक असतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Dec 2008 - 10:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून? अर्थात पिरेमातून. ओळख गेली बाराएक वर्ष असेल पण तेव्हा "हिच्याशी/याच्याशी" काय बोलणार मी?", असं होतं. पुढे मी थोडी जास्त म्याड झाले आणि तो थोडा माणसाळला, तेव्हा बोलायला सुरुवात झाली.
जोडीदाराच्या आवडीनिवडी, बर्‍यापैकी वेगळ्या, थोडथोड्या बदलत जाणार्‍या, पण दोघांसाठीही वाचन एक नंबरवर. मला खेळायला आवडतं, त्याला फारसं नाही. पण अधूनमधून बायकोची कटकट सहन करण्यापेक्षा तो बाहेर पडतो. मी त्याच्यासाठी कुठल्यातरी टेकडीवर जायला हो म्हणते. आणि हो, दोघांनाही स्कूटर, गाडी चालवायला अजिबात आवडत नाही.
एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या, मारामारी केली तर मीच जिंकेन म्हणून मारामारी होत नाही! ;-) पण वाद, भांडणं होतात, बाकीच्यांच्या तुलनेत काही फार जास्त होत असतील असं नाही वाटत.
एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का? फारशी नाही. "तू तुला आवडणारं काम कर मी माझं काम करते", यामधे दोघंजण समाधानी आहोत. घरातली कामं दोघंही जण वाटून घेऊन करतो आणि दोघांनाही हातातलं काम टाकून टाईमपास आवडत नाही, त्यामुळे चालतं.
जोडीदाराचा फोटूही येथे टाकल्यास उत्तमच, परंतु आग्रह अर्थातच नाही..
त्याला कॅमेर्‍याच्या समोर पकडणं कठीण असतं, त्यामुळे सध्या हाच फोटू मिळाला!

धमाल मुलगा's picture

16 Dec 2008 - 11:10 am | धमाल मुलगा

दोस्त लोकांना त्यांच्या पिरेमप्रकर्णात मदत करणारे, निरनिराळ्या टिप्स देणारे आणि सेटिंग लावून देणारे अस्मादिक, जे दोस्तांना सांगायचे, 'प्रेमात पडायचं तर पड, पर्वा इल्ले, पण साल्या अडकू नकोस...गळ्यात बांधून घेऊ नकोस..." आणि असंच एक दिवस आत्तेभावाच्या कॉलेजात त्याला भेटायला गेलो असताना, त्याची एक ज्युनियर समोर आली...बस्स्स.....
एकदम फिल्मी श्टाईलीत ब्याकग्राऊंडाला सतारबितार (सतारच असतं नाहो ते, हिरो हिरव्हीन एकमेकांना पहिल्यांदा भेटतात तेव्हा वाजतं ते ;) ) वाजायला लागले, डोक्यात चर्चची बेल, मंदीरातल्या घंटा, देवघरातला शंख, माझ्या गाडीचा हॉर्न, रिक्षाचा भोंगा......सगळं एकदम ठणठणायला लागलं...मला आधी वाटलं मायग्रेनचा ऍटॅकच आलाय की काय, पण तिची ओळख करुन दिल्यावर ती जे हसली.....हाऽऽऽय!!! आपुन साला एकदम फिनिश! दुनिया सगळी एकदम गारेगार वाटायला लागली :)
नंतर त्याचदिवशी पुढे साधारण ४ एक तास गप्पा मारत बसलो तिच्याशी, लय भारी वाटत होतं राव..(नंतर तीनं सांगितलं की घरी गेल्यावर माझ्या बडबडीपायी तिचं इतकं डोकं उठलं होतं की ती डोकेदुखीच्या गोळ्या घेऊन, कपाळावर अमृतांजन चोपडून झोपुन गेली!)
त्याच संध्याकाळी बाकीच्या मैतरीणींना फोनाफोनी करुन रीतसर तीची सगळी माहिती काढली..तीचं कोणाशीच प्रेमप्रकरण चालु नाहीय्ये ना, बा काय करतो, भाऊ आहे का? (हे दोन मोठ्ठे प्रश्न!) असल्यास लहान की मोठा? काय करतो.. इ.इ.इ. रात्री अकरा वाजेपर्यंत सगळा इंटेल डेटा ताब्यात. ताबडतोब आमच्या म्हातारीला फोन लावला, म्हणलं, "तयार रहा, लवकरच तुझ्या भावी सुनेला घेऊन येईन घरी"
दुसर्‍यादिवसापासुन पध्दतशीरपणे जाळं पसरवायला सुरु केलं ;) डॉट्ट सातव्या दिवशी विचारलं, "माझ्याशी लग्न करशील?" संध्याकाळी उत्तर होकारार्थी! आयला! एकदम छह दिन लडकी इन???
पुढे तब्बल ४ वर्षं बोंबलत हिंडलो, शेवटी दोघांच्या घरचे हातापाया पडायला लागले, म्हणाले, बाबांनो, निदान आतातरी लग्न करा... आणि अशा रितीनं आम्ही पारतंत्र्यात गेलो :)
लग्नाला आपली मिपाकर मंडळी हजर होतीच!

आवडीनिवडी:
मी उत्तरध्रुव, ती दक्षिणध्रुव :)
मला तिखट आणि झणझणीत प्रचंड प्रिय, ती एक नंबरची गोडघाशी!
मी नॉनव्हेजचा वेडा तर ती म्हणजे, ५ फुटावरुन अंडं दाखवलं तर आंघोळ करुन येईल अशी..
मी नॉनस्टॉप बडबड तर ती म्हणजे गुपचुप गुपचुप.
मी निर्लज्ज तर ती एक नंबरची लाजाळू
मला वाचनाची आवड तिला प्रचंड कंटाळा...
मला एक रेघ सरळ मारता येईल तर शपथ, तर तीची चित्रकला उत्तम!
मला डोंगरदर्‍यातुन भटकायची आवड तिला शॉपिंग मॉलमधून :(
हां, दोघांना माणसं गोळा करायचा मात्र छंद आहे. :)

एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या:

१. ती अट्टल सदाशीवपेठी पुणेकर, मी गावाकडचा गावंढळ! त्यामुळे "तुम्ही साले पुणेरी..."अशी माझ्या वाक्यांची सुरुवात, तर "तुमच्यासारख्या बाहेरुन आलेल्यांनीच आमचं पुणं बिघडवलं" असा तिचा समारोपाचा स्टान्स :)
२. माझी आंघोळ! च्यायला, काय असेल ते असेल, विकांताला उशीरा आंघोळ करण्यामध्ये काय सुख असतं हे माझ्या बायकोला कधीही कळलेलं नाही...सकाळी उठल्यापासून सारखं, "अरे जा ना...आंघोळ करुन घे..." पालुपद चालु असतं..अर्थात आज्ञाधारक आहे मी तसा त्यामुळे तिचं ऐकतोच, पण दुपारी चारनंतर ;)
३. महागदारोळः माझी सिगारेट! ह्या विषयावर नो कॉमेंट्स!
४.मी कोणत्या पँटवर कोणता शर्ट घालावा: ह्यात वाद घालण्यासारखं काही आहे का? नाही ना? पण (फक्त) आपल्या(च) नवर्‍याला ड्रेसिंगसेन्स नाही, आणि ती जबाबदारी आपली आहे असं हिला वाटतं. त्यामुळे मी अंगावर चढवलेले कपडे "शी: कै च्या कै काय घालतो रे तू...शर्ट बदल आधी...हा घाल!" ह्या वाक्यानं माझ्या अंगावरुन कपाटात परत जातात... पण हेच जर मी तिला तिच्या कपड्यांबाबत बोललो तर....तोबा तोबा तोबा....ग ह ज ब!!!!
५...६...७..८...चिल्लर चिल्लर बर्‍याच गोष्टी :)

एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का?
कोण्या एके काळी व्हायची, पण आता तिलाच मिपाचं सदस्यत्व घ्यायला लाऊन तो प्रश्नच निकालात काढलाय ;)
आपण बारामतीचे हौत म्हणलं, कसा एकदम राजकीय डावपेच लढवला की नाही?

जोडीदाराचा फोटूही येथे टाकल्यास उत्तमच,

आमच्या लग्नाचे काही फोटु तात्यांनी मिपावर टाकले आहेतच. शिवाय अभिरुची कट्ट्याच्या फोटोतही आहेच की ती!

आनंदयात्री's picture

16 Dec 2008 - 12:14 pm | आनंदयात्री

ह्म्म .... आम्ही जोडावी का काही पुरवणी या जोडप्याबद्दल ??
जाउद्या .. आपल्याला या धाग्यापेक्षा आपले विकांताचे गोड धोड प्यारे हाय !!

इनोबा म्हणे's picture

16 Dec 2008 - 3:21 pm | इनोबा म्हणे

ह्म्म .... आम्ही जोडावी का काही पुरवणी या जोडप्याबद्दल ??
जाउद्या .. आपल्याला या धाग्यापेक्षा आपले विकांताचे गोड धोड प्यारे हाय !!

अगदी सहमत आहे.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

ऍडीजोशी's picture

16 Dec 2008 - 1:58 pm | ऍडीजोशी (not verified)

वैणी मिपा वर आल्या पासून धम्या बराच सुधारल्या सारखा दाखवतोय :)

श्रीया's picture

16 Dec 2008 - 2:40 pm | श्रीया

महागदारोळः माझी सिगारेट! ह्या विषयावर नो कॉमेंट्स!
का?????????????????????????????????????????

शितल's picture

17 Dec 2008 - 1:19 am | शितल

धमे,
तुझ्या "का "पुढे जेवढे प्रश्न चिन्ह आले आहेत तेवढ्या सिगारेट ओढतो का ग हा एका दिवसात.
तरी आमची धमी आहे म्हणुन ठीक धम्या, नाही तर...
भेटल्यावर बोलुच ;)

मृगनयनी's picture

16 Dec 2008 - 3:08 pm | मृगनयनी

सकाळी उठल्यापासून सारखं, "अरे जा ना...आंघोळ करुन घे..." पालुपद चालु असतं..अर्थात आज्ञाधारक आहे मी तसा त्यामुळे तिचं ऐकतोच, पण दुपारी चारनंतर
=))

=))

धम्या आणि धमी..... या दांपत्याला पाहताक्षणीच ते "मेड फॉर इच अदर" असल्याची खात्री पटते....

धम्याने वर उल्लेखलेल्या माहितीतला शब्द न शब्द खरा आहे...

धम्या आणि धमी २ ध्रुवांवरचे जरी असले, तरी दोघांत एक..गोष्ट कॉमन आहे.. ती म्हणजे
"मित्र परिवाराला ( मिपावर्च्या) अगत्याने बोलावुन त्यांचा मस्त पाहुणचार करणे,सगळ्यांना उत्तमोत्तम रेसिपी'ज करून , त्या खायला घालुन तृप्त करणे....

विविध पाककृती करुन (नेहमीच हसतमुखाने) अतिथींना यथेच्छ खायला घालण्यात धमीचा (सौ. श्रीया धमाल चा)हात कोणीही धरु शकणार नाही.

या दोघांच्या एकत्रित जोडीचा मी नेहमीच आदर करते....
:)

मिंटी's picture

16 Dec 2008 - 3:11 pm | मिंटी

सहमत आहे मी पुर्ण पणे मृगनयनीच्या मताशी...... :)

आनंदयात्री's picture

16 Dec 2008 - 3:15 pm | आनंदयात्री

असेच म्हणतो. मृगनयनीने आमच्या मनातले बोलुन दाखवल्याने मृगनयनीप्रती आम्ही आदर व्यक्त करतो.

भास्कर केन्डे's picture

18 Dec 2008 - 4:40 am | भास्कर केन्डे

तुम्हा दोघांचेही हाबिनंदण!

दोनाचे तीन्/चार झाल्यावर सुद्धा असेच आनंदात रहा ;)

आपला,
(चार चाकी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

चला या नीमित्ताने तरी आमचे मिपा वर काही खरडणे होईल...
आता आमच्या बद्द्लः
अर्थातच आमचा प्रेम विवाह झालाय. आम्ही एकाच कॉलेज मध्ये शिकत होतो. तुमचा जावई कमर्शियल आर्टिस्ट तर मी फाईन आर्टिस्ट. नन्तर एकाच हापीसात दोघान्ना ही नोकरी मिळाली. नशिबाने दोन्ही घरुन काहीच विरोध झाला नाही. प्रेमात पडल्या नन्तर तब्बल नऊ वर्षानी आमचे शुभमन्गल झाले. एव्हाना लग्नाला चार वर्स होऊन पण गेली आहेत. आता वादविवाद-भांडणाच बोलाल तर यान्च्या शिवाय मजाच नाही बुवा..... ती आपली होतच असतात्...(काहीही कारण चालतात आम्हाला :))

आवडीनिवडी सान्गायच्या तर त्याला चित्रपट पाहण्याची भरपूर आवड. आणि हो वेगवेगळे पदार्थ खाण्याची खुप खुप आवड, खास करून नॉनव्हेज. आणि सगळ्यात मह्त्वाचे म्हणजे तो अतीशय चान्गले जेवण बनवू शकतो... बास्स... या एका गुणावर त्याच्या बाकी चुका आरामात माफ होतात :)

शितल's picture

17 Dec 2008 - 1:22 am | शितल

>>>आणि सगळ्यात मह्त्वाचे म्हणजे तो अतीशय चान्गले जेवण बनवू शकतो... बास्स... या एका गुणावर त्याच्या बाकी चुका आरामात माफ होतात
आरती,
अगदी लाख बोललीस..
नव-याला जेवण बनविता येणे खुप छान गोष्ट असते. :)

भाग्यश्री's picture

17 Dec 2008 - 3:32 am | भाग्यश्री

याला मी ही सहमत!! नवर्‍याला जेवण बनवता येणे, आणि ते आपण करतो त्यापेक्षाही टेस्टी असणे यासारखं सुख नाही!

बाकी, निनाद आणि माझं लग्न; तसं घरच्यांनी बघूनच झालं... आधी भाऊ,बहीण भेटले.. मी त्याला आधी वेबकॅमवर आणि नंतर कित्येक महीन्यांनी प्रत्यक्ष बघितलं.. :) ऑफीसच्या नसलेल्या सुट्ट्यांची कृपा.. ! सो, पूर्णपणे ऍरेंज्ड मॅरेज नाही म्हण्ता येणार... आमचं लग्न म्हणजे एक किस्साच आहे!! असो..

आवडीनिवडी : त्याला खाणं,झोपणं,पिक्चर पाहणं प्रचंड आवडतं.. मला पुस्तकांचे(आता साईट्सचे म्हणायचे) व्यसन.. दोघांनाही खेळ,लाँग ड्राईव्हला जाणे, एकंदरीतच भटकंती आवडते..
वादविवादः होतात की.. त्याशिवाय काय मजा.. मेन मुद्दा असतो तो अतीअतीअती व्यवस्थितपणा X अळमटळम करणे. यातली मी दुसरी हे साहजिक... बाकी फार भांडणं नाही करत, समजुतदार आहे खूप(तो!)..
मिपामु़ळे भांडणं?? आईग.. सतत! :) वाईट्ट वैतागतो तो.. पण पिडाकाकांकडचा कट्टा झाल्यापासून त्यालाही उत्साह आलाय मिपाबद्दल... माझ्यासारखा तित्का टाईमपास करत नसल्याने अजुन तो मिपावर आला नाही. मी एकटी पुरते मिपावरच्या / इतर संस्थळावरच्या घडामोडी कळवायला... :)

बाकी फोटो मिपाकरांनी पाहीलाच आहे कट्ट्याच्या फोटोंत..

हा धागा सहीए पण! मस्त वाटत आहे लोकांचे किस्से वाचायला! :)
http://bhagyashreee.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

17 Dec 2008 - 8:45 am | विसोबा खेचर

हा धागा सहीए पण! मस्त वाटत आहे लोकांचे किस्से वाचायला!

अगं करशील काय! संस्थळ चालवायचंय. अश्या काही ना शकला लढवाव्या लागतात! मिपा आज उगाच नाय म्हराटीतलं लंबर वन संस्थळ आहे!

कं बोल्ते? :)

आपला,
(भाग्यश्रीचा मित्र) तात्या.

वेताळ's picture

16 Dec 2008 - 11:18 am | वेताळ

मला प्रत्येक गोष्ट त्याच्याशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही आणि त्याला असं हागल्यापादल्या प्रत्येक गोष्ट माझ्याशी बोलणं जमत नाही... पण हीच तर गंमत आहे.

हे मात्र खर आहे.माझ्या बायकोचे दररोज हेच टुमणे असते की आज दिवसभर तुम्ही माझ्याशी काहिच बोलला नाही,तेव्हा आता आपण बोलत बसु.आता बोलणार तर काय? बायकांचा नवर्‍याशी बोलायचा आवडता विषय म्हणजे दुसर्‍या बायकाचे उणेदुणे काढणे,नवी खरेदी काय करायची किंवा फिरायला कुठे जायचे. ह्याशिवाय दुसरे काही नाही.तसे आमचे लग्न ठरवुन झाले आहे.ती मिपा वापरत नाही.पण माझ्या संगणक प्रेमाचा ती सवतीमत्सरातुन तिरस्कार करते.बाकी लग्नाआधीचे माझे सर्व वर्णन आपला अभिजित ने अगदी व्यवस्थित केले आहे ते वाचा.लग्नानंतर माझ्या जीवनात विशेष असा फरक पडला नाही फक्त मी जरा आळशी झालो आहे. वजन म्हणाल तर माझे ६५ किलो होते व आहे.(लग्नाला ४ वर्षे झाली)४ वर्षातील बराचसा वेळ भांडणातच गेला व जातो आहे. :T फोटो निवांतपणे टाकतो.
अदिती फोटो पण काय मस्त टाकला आहेस. उजेडात मॉनीटर नेला तरी काहीच कळले नाही. =))
वेताळ

नीधप's picture

16 Dec 2008 - 3:45 pm | नीधप

>>बायकांचा नवर्‍याशी बोलायचा आवडता विषय म्हणजे दुसर्‍या बायकाचे उणेदुणे काढणे,नवी खरेदी काय करायची किंवा फिरायला कुठे जायचे. ह्याशिवाय दुसरे काही नाही.<<
छे हो काहीतरीच काय? एकदा वेळ देउन बघा ना बायकोशी बोलायला, ओझं म्हणून नाही मनापासून. ह्यापलिकडे बरंच काही असतं. असं झटकू नका हो.

आणि बादवे.. माझा नवरा टिपिकल नसल्याने माझ्याशी गप्पा मारायला, मी जे बोलेन ते ऐकायला माझ्या त्याची काही हरकत नसते. त्यावर चर्चा करायलाही हरकत नसते पण स्वतःच्या मनात आलेलं काही उठसूठ आणि आपणहून शेअर करणं जमत नाही. सवय नाही इतकंच.

बाकी राजकारणापासून अस्तित्ववादापर्यंत, रेम्ब्रॉ पासून माजिदीपर्यंत कशावरही आम्ही दोघंच भरपूर गप्पा मारतो.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

श्रीमंत दामोदर पंत's picture

16 Dec 2008 - 11:52 am | श्रीमंत दामोदर पंत

तात्या एकदम मस्त धागा काढला राव तुम्ही..... :)
आता तुमच्या सगळ्या प्रशांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करतो -

विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून?

अर्थातच प्रेम विवाह..... तसा मी तिच्या कॉलेजमधला नाही...ती आर्टस ची तर मी कॉमर्सचा.... तिच्या पेक्षा ४ वर्षांनी सिनियर.....एका मित्राच्या कॉलेज ग्रुप मधली ती....त्याच्याच ओळखीतुन हिच्याशी ओळख झाली.....ती कॉलेजची टॉपर तर मी तसा सर्वसाधारण......तिला शास्त्रीय संगिताची प्रचंड आवड आणि शास्त्रीय नृत्य शिकलेली असल्यानी तिकडे जास्त ओढा असलेली आणि मी मात्र त्यातला दगड......पण तरीही एकत्र आलो आणि तब्बल ४ वर्ष फिरल्यानंतर विवाह बंधनात अडकलो.......

जोडीदाराच्या आवडीनिवडी,
वर सांगितल्याप्रमाणे तिला शास्त्रीय संगित आणि नृत्याची आवड ....आणि मला माझ्या हापिसात बसुन काम करण्याची प्रचंड आवड. हो पण दोघांनाही वाचनाचे प्रचंड आवड आहे....मित्र - मैत्रिणींना भेटणे...आणि खांद्यावर सॅक टाकुन मनसोक्तपणे भटकंती करणे.....

एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या,
खुप होतात, कारण एकच मी सतत हापिसात असणं.....तिला मी वर्कहॉलिक वाटतो...पण कितीही राग आला तरी पटकन सगळं विसरते ती.....

एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का?
नाही कारण आम्ही दोघंही मिपावर पडीक असतो....त्यामुळे तो प्रश्नच येत नाही.... उलट जर एखाद्या दिवशी आमच्या दोघांपैकी कोणाला जमलं नाही मिपावर यायला तर आवर्जुन विचारतो आज काय विशेष मिपावर ते :)

आणि पार्टनरचा फोटो द्यायला काहिच हरकत नाही पण तो तिनी आधिच दिला आहे माथेरानच्या धाग्यावर ....... :)

धमाल मुलगा's picture

16 Dec 2008 - 12:01 pm | धमाल मुलगा

तिला मी वर्कहॉलिक वाटतो...
तिला? फक्त तिला??
:? तुला ओळखणारा कोणीही हेच्च म्हणतो.

(हे अवांतर होऊ शकतं की नाही हे खरोखरच ठाऊक नाही हो! न पटल्यास निर्णय-ए-संपादक कबूल है कबूल है कबूल है!)

योगी९००'s picture

16 Dec 2008 - 12:16 pm | योगी९००

खुप मजा आली..

असाच एक धागा आपल्या मुलांच्या बाल लिला वर्णन करण्यासाठी सुरू करा..

खादाडमाऊ

क्लिंटन's picture

16 Dec 2008 - 12:31 pm | क्लिंटन

१) विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून?
माझी आणि हिलरीची गाठ पडली इंटरनेटवरून. आणि ती शादी.कॉम किंवा तत्सम संकेतस्थळावरून नाही तर चॅटवरून. म्हणजे आमचा हिलरीबरोबरचा विवाह प्रेमातूनच झाला. मी अमेरिकेत होतो तेव्हाची गोष्ट. लग्नाचा विचार सुध्दा केला नव्हता आणि सिंगल राहण्यात धन्यता मानायच्या काळात हिलरीची आणि माझी गाठ चॅटवर पडली. सुमारे ४ वर्षात अनंतवेळा चॅट करून (अनेकदा वबकॅम चॅट सुध्दा) आणि फोनवर बोलून जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा नवीन काही विचारायचे बाकीच नव्हते कारण आम्हाला एकमेकांविषयी सर्वकाही माहित होते.अनेक मंडळी या प्रकाराला मूर्खपणा म्हणतात पण माझा तरी अनुभव आहे की मी आणि हिलरी म्हणजे अगदी 'मेड फॉर इच अदर' आहोत.

२) जोडीदाराच्या आवडीनिवडी
माझी आवड म्हणजे मिसळपाव, इतिहास,अर्थशास्त्र, राजकारण, किशोरदा किंवा येसुदास यांची अर्थपूर्ण गाणी ऐकणे आणि हो गुलाम अलींच्या गझला सुध्दा. हिलरीची आवड मानसशास्त्र,चित्रपट आणि संगीत

३) एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या
नाही बुवा. वादविवाद आणि भांडणं मारामार्‍या या गोष्टी म्हणजे काय आणि त्या कशाशी खातात?

४) एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का?
नाही कधीच नाही.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

धमाल मुलगा's picture

16 Dec 2008 - 1:50 pm | धमाल मुलगा

३) एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या
नाही बुवा. वादविवाद आणि भांडणं मारामार्‍या या गोष्टी म्हणजे काय आणि त्या कशाशी खातात?

४) एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का?
नाही कधीच नाही.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

तद्दन खोट्टं!!!! च्यायला, लगिन केलं ना? मग भांडण नाही म्हणता? साधे वादही नाहीत?
हॅ: बिनफोडणीचं मिळमिळीत वरणच म्हणायचं की हो बिन वादाचा संसार म्हणजे! (ह. घ्या. तद्दन इनोद केला आहे!)

मिष्टर एक्स प्रेसिडेंट, यु हॅव नो आयडिया व्हॉट यु आर मिसिंग इन लाइफ :D

विनायक प्रभू's picture

16 Dec 2008 - 5:15 pm | विनायक प्रभू

ह्या धाग्यावर काही ड्रीम शिक्वेन्स आहेत रे धमु

प्रभाकर पेठकर's picture

16 Dec 2008 - 12:39 pm | प्रभाकर पेठकर

'राम राम सभ्य मिपाकर स्त्रीपुरुषहो'

अशी सुरुवात केल्यामुळे आपल्याला लिहायला परवानगी आहे की नाही ह्या संभ्रमात इतके दिवस होतो. पण आता जाणवले की 'भल्याभल्यां'नी लिहीलय आपण त्या मानाने बरेच 'सभ्य' आहोत, असो.

मिपालाच सहचारिणी मानल्यामुळे मी मिपाचा जावई होऊ शकत नाही.

मिपाबद्दल काय लिहू? तुम्ही सर्वजण ओळखताच.

माझ्या आवडी निवडी (चारचौघात तरी) सात्विक.मिपाच्या (खूपवेळा) भडक.
मला माझ्या मित्र मैत्रीणींबद्दल आपुलकी वाटते. मिपाला माझ्या शत्रूपक्षाबद्दलही आपुलकी वाटते (हे माझे दु:ख)
मला माझ्या खर्‍या नांवानीशी वावरायला आवडते, मिपा (आपल्या सदस्यांच्या) खोट्या आयडींतून वार करते.
मी मिपाशिवाय राहू शकत नाही, मिपा माझ्याशिवाय नुसती राहातच नाही तर प्रगतीही करते आहे.
मला कोणाचा दुस्वास करायला आवडत नाही, मिपा मनोगताचा विनाकारण दुस्वास करते.
मी 'मनोगता'वर प्रेम केले तर मिपाला राग येतो पण मिपावर सर्व (सदस्य) प्रेम करतात ते मात्र मी खपवून घेतो.
मी मिपाशी कधीच 'कट्टी' करत नाही, मिपा मात्र मला न कळवता अनेक 'कट्टे' भरवते.

असो. लिहायला गेलो तर खूप लिहिता येईल पण मिपाचे आणि माझे संबंध कधीच तुटू नयेत असे वाटते म्हणून सध्या इथेच थांबतो.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

भास्कर केन्डे's picture

18 Dec 2008 - 4:43 am | भास्कर केन्डे

आदरणीय पंत,

आपण आपल्याला साजेशा शैलीत मिपाची ओळख करून दिलीत. भल्ली भारी!

लिहायला गेलो तर खूप लिहिता येईल पण मिपाचे आणि माझे संबंध कधीच तुटू नयेत असे वाटते म्हणून सध्या इथेच थांबतो
हे एकदम खल्लास!

आपला,
(चाहता) भास्कर
आम्ही येथे वसतो.

सायली पानसे's picture

16 Dec 2008 - 12:43 pm | सायली पानसे

नमस्कार मंडळी
मी तशी नविन आहे मिपा वर.... पण ज सकाळी मिपा उघडल्याशिवाय दिवस सुरु होत नाहि.

तर माझी ओळख
मी सायली .... आमची मुंबई
हे - विजयन ... केरळ

आमचे हे मल्लु आहेत आणि मी मराठी.....
आम्ही एकत्र होतो पुन्यात शिकयला..... अर्थत तेव्हा फकस्त बेश्ट फ्रेन्ड्स होतो....... नंतर जमल... माझ्या आधि घरचे हो म्हणाले.... मग मी....

जोडीदाराच्या आवडीनिवडी
तश्या वेगवेग्ळ्याच्....एक गाणे ऐकणे आणि वाचन ... आणि मुलांबरोबर वेळ घालवणे या शेम टु शेम.
मला भटकायला .. जेवण बनवायला... चित्र काढायला.... आणि गप्पा मारायला खुप आवडते...त्याला गप्प बसायला...
दोघांना ड्राएव्ह करायला खुप आवडते.... मला बाईक जास्त चांगली येत अस्ल्याने तिथे भांडण होत नाही पण गाडी कोणी चालवायची हा वाद कायम असतो नी मी कायम हारते कारण पोरांना पोरगी चांगली गाडी चालवु शकते आणी ति चालवत असताना शेजारी बसणे मान्य नसते....
बाकी जेवणखाणाच म्हणाल तर मी जितक्या आवडीने डोसा पुट्टु खाते तितक्याच आवडीने तो थालिपीठ , भगर आमटी , कांदे पोहे खातो.... तो गोडघाशा नी मी पाणीपुरी भक्त...कुठे ही केव्हांहि कितिहि खायला तयार.... त्याला त्या भैयाने पाण्यात हात घातलेला पाहुन मळमळते.
पण मला खायला बंदी नाही. घरात जेवण मस्त असत मिक्स... मल्लु मराठि पंजाबी गुज्जु ... एकदा श्रि . राज ठाकरेंना बोलवायचा विचार आहे जेवायला..

एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या

तो सगळ्या कामात परफेक्ट आणि मी थोडि निवांत .थोडीशी आळशी.... जेव्हांच्या तेंव्हा काम करणे ह्यावर भरपुर लेक्चर मिळतात आधि आई कडुन आता....इकडुन
त्यामुळे कामावरुन होतात थोडे फार ...
बाकि काही वाद हास्यास्पद आहेत उदा. मी गणपति भक्त तो गोपाळ भक्त.... मग... एखादी मनासारखी गोष्ट झालि कि तुझ्या गणपति मुळे कि माझ्या गोपाळा मुळे... असा मुद्दा असतो.... अर्थात दोघांचा वरद हस्त असल्यामुळे मी खुश.

बाकी मिपा वरुन वाद होत नाहित कारण आमचा असा नियम आहे कि आम्ही घरात असताना नेट जास्त वापरत नाहि... टी व्ही सुध्दा जास्त नाहि... अर्थात लावायचा तर बातम्या......मरठि आणी मल्लु वाहिन्या एक एकटे असताना पाहतो.... एखादा विशेष कार्यक्रम असेल तर एकत्र पाहतो..... त्यात आजकाल मिपा वरील लेखांचि भर आहे.... चांगले लेख त्यांना भाषांतर करुन वाचुन दाखवते... तो हि आल्यावर आज काय खबर तुमच्या मिपा वर?अस विचरतोच.

आंघोळ हा वादाचा विषय असतो विकांताला... पण इथे उलट आहे मी ४ नंतर आणी हा सकाळी ६ ..... सुट्टीला माणुस ६ वाजत भल्या पहाटे कसा काय उठु शकतो हा माझ्यासाठी आणि माणसांना सकाळी ६ नंतर झोप कशी काय येते हा त्याच्यासाठी अनुत्तरित प्रश्न आहे आणी त्यावर उत्तर सापडले नसल्याने आम्ही त्यावर वाद घालणे बंन्द केले आहे.... आठवड्याचे पाच दिवस मी माझ्या मध्यरात्रि म्हणजे सकाळी साडे चार ला उठुन डबा करुन देते ह्या बद्दल दर शुक्रवार शनिवार ( दुबई मधे हाच विकांत) सकाळचा चहा तो करतो....

बाकि भांडण करायला चान्स नाहि कारण मला कायम मदत करतो अगदि मुलांना जेवण भरवणे ते डायपर बदलणे पर्यंत सर्व मदत करतो....... सगळी कामे आम्ही वाटुन करतो ...फक्त माझ्या वाटणीची कामे जरा उशीराने होतात ... म्हणुन डोस मिळ्तो मधे मधे..... मग परत माझि गाडी रुळावर.

घरात मुले हिंदी मराठी मल्लु आणि इन्ग्लिश या ४ भाषा उत्तम बोलतात...त्यामुळे सगळे आजि आजोबा खुश असतात आणी सासु सासरे यांना खुश ठेवण्या ईतक मल्लु आणि मराठी दोघांना येत असल्याने हसत खेळत भांडत संसार चालु आहे....

नो रिग्रेटस दोंघांना ही....
तर ...एकदा पाहावे करुन ... लग्न.

टीप
माझे शुध्द्लेखन अप्रतिम आहे त्याबद्दल माफी असावी.

भास्कर केन्डे's picture

18 Dec 2008 - 4:46 am | भास्कर केन्डे

वेगळा अभुभव वाचायला मिळाला. आपले सुखात चालले आहे हे पाहून आनंद वाटला. अभिनंदन!

घरात मुले हिंदी मराठी मल्लु आणि इन्ग्लिश या ४ भाषा उत्तम बोलतात...त्यामुळे सगळे आजि आजोबा खुश असतात आणी सासु सासरे यांना खुश ठेवण्या ईतक मल्लु आणि मराठी दोघांना येत असल्याने हसत खेळत भांडत संसार चालु आहे....
उत्सुकतेपोटी एक अवांतर चौकशी - तुम्हा दोघांच्या संभाषणाची भाषा कोणती?

आपला,
(चौकस) भास्कर
आम्ही येथे वसतो.

सायली पानसे's picture

18 Dec 2008 - 11:23 am | सायली पानसे

धन्यवाद.
आम्हि घरात ४ हि भाषा बोलतो... पण प्रामुख्याने हिंदी.
फक्त भांडण चालु असताना मी शुध्द मराठी वापरते हो.... त्यामुळे मी मराठी सुरु केला कि लगेच समजते कि राग आलेला आहे...

भास्कर केन्डे's picture

18 Dec 2008 - 10:30 pm | भास्कर केन्डे

फक्त भांडण चालु असताना मी शुध्द मराठी वापरते हो.... त्यामुळे मी मराठी सुरु केला कि लगेच समजते कि राग आलेला आहे...
-- हे लयीच भारी. आमची ही पण राग आला की इंग्रजीतला एक असभ्य सौम्य(?) शब्द वापरते (एरव्ही मात्र शुद्ध मराठी). मग आम्ही काय ते ओळखून तलवार म्यातच नाही तर थेट अटलांटिक मध्ये टाकून शरणागती पत्करतो. ;)

आमचा एक मित्र चढल्यावरच भांडतो. एरव्ही शांत असतो व मराठीतच बोलतो. मात्र चढल्यावर भांडताना अशी अस्खलीत इंग्रजी बोलतो की विचारु नका. त्याची आठवण आली. :)

आपला,
(त्रिभाष्या) भास्कर
आम्ही येथे वसतो.

राघव's picture

16 Dec 2008 - 1:11 pm | राघव

ओळख - उत्तरे :)
विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून?
आमच्या ओळखीने अन् घरच्यांनी पाहून!! :D

जोडीदाराच्या आवडीनिवडी,
ती वर्कोहोलिक आहे. अन् म्या येक नंबरचा आळशी!! मन मानेल तेव्हा झोप घेण्यात काय सुख आहे ते सांगुन नाही समजायचे!
जेवणात आपल्याला काहीही चालते (शाकाहारी अर्थातच!).. तिचे नखरे असतात.. कधी कधी जास्त होतात.. मग झापावे लागते!! (अर्थात् मी झापण्याच्या संधी मुळात फार कमी वेळ येतात!!) दोघांनाही वाचण्याची आवड, (मला आळस सोडून उठल्यानंतरच अन् तिला कधीही)फिरायची आवड, फोटोग्राफीची आवड! त्यामुळे तिथे आमचे जरा जुळते!

एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या,
दणकून होतात वाद... मारामार्‍याही होतात ना.. मी मार खातो!!! बाकी मार आपण खायचा अन् वरून मारतांना तिला स्वतःला लागले त्यासाठीही बोलण्या खायच्या हा प्रकार मला जरा जड जातो पचवायला.. माझा उलट मार चुकवण्यासाठी असलेला तो एक जबर अभिनय आहे अशी मला धूर्त शंका आहे!!

एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का?
नाही.. अजून तरी असे झालेले नाही. मी हाफिसात असतांना मिपावर पडिक असल्यामुळे तेवढा फरक पडत नसावा. ती मात्र अजून मिपावर सदस्य झालेली नाही! पण होईल लवकरच!!

तिच्यासाठी एक कडवे लिहिलेले इथे देतोय-

ऋण कोणाचे कोण स्तवे अन् प्रेम कुणाचे श्रेष्ठ ठरे?
सतजन्माचे नाते अपुले तुझ्या(च) व्रताचे बंध खरे!
या जन्मातील साथ तुझी मज मिळती कैसी सांग बरे?
तूच मनातील अमृतधारा तव प्रेमाने विश्व तरे!!

:) मुमुक्षू

माझे सासरे आणि माझे काका कानपूरच्या एअरफोर्स बेसवर एकत्र काम करत होते. त्या ओळखीतून प्रस्ताव आला. मी पाह्यलेली ही तिसरी मुलगी होती.
आधीच्या दोघींनी मला नकार दिला होता. मैत्रीणींनी (ओळखत असल्याने) आधीच नम्र नकार देऊन सुटका करून घेतली होती.
आवडी निवडी कळायला तिला वाव मिळाला नाही.आता पश्चात्ताप झाला आहे.
नक्षत्रासारखी दोन मुलं आहेत म्हणून नाहीतर....असं रोज म्हणते
अर्थातच भांडणं हा आमचा संवाद आहे.त्याचा मुलांवर काडीइतका परीणाम झालेला नाही.भांडणाचे विषय मुलांचा अभ्यास ,माझं बेजबाबदार वागणं,वगैरे वगैरे.
मारामारी नाहीच .
ती स्टेट-लेवलची ऍथलेट आणि गोळाफेक चँपीअन असल्यामूळे मी जोखीम घेत नाही.
मिपा वाचत नाही.एकूण काहीच वाचत नाही.वाचनाचा प्रचंड कंटाळा आहे.
सुग्रण आहे.माझी आणि मुलांची खाण्याची हौस भागवणं हा जीवनाचा एकमेव हेतू आहे.

मुक्तसुनीत's picture

17 Dec 2008 - 1:55 am | मुक्तसुनीत

मी व ती कॉलेज स्वीटहार्टस. लायब्ररीत पुस्तकांबरोबर प्रेम एक्स्चेंज केले.
बायको आमच्यापेक्षा हुषार. ती आय आय टी ला गेली. मी पुण्याला. (साले कुठल्या आय आय टी पेक्षा कमी आहे काय पुणे ! ) =))
आय आय टी चे वीमेन्स होस्टेल (एच १०) बर्‍यापैकी माहिती झाले. दारात येऊन उभा राह्यचो तिला घ्यायला तर बाकीच्या साळकायामाळकाया हजर आम्हाला पहायला ;-) पुढील काव्यशास्त्रविनोद पवई लेकवर. =))
बायकोस गाण्याची आवड. अस्मादिकांच्या शिंगे फुटण्याच्या वयातल्या फुटकळ गाण्यांची पहिली श्रोती. पुस्तकांचे वाचन एकेकाळी चांगले होते. दोघांनी मिळून "भावसरगम" हा गाण्यांचा कार्यक्रम सुमारे १० वेळा ऐकला होता.
मुले व्हायच्या आधीची बायको आणि नंतरची बायको या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. मिसळपावचा शोध मुले व्हायच्या आधी लागला असता तर तिने गाजविले असते. आता मुले हेच सर्वस्व. पदवी , करत असलेली नोकरी , नवरा वगैरे गोष्टी दुय्यम.

धमाल मुलगा's picture

17 Dec 2008 - 9:53 am | धमाल मुलगा

जियो सुनितराव :)
मी व ती कॉलेज स्वीटहार्टस.
सह्ही....

लायब्ररीत पुस्तकांबरोबर प्रेम एक्स्चेंज केले.
एकदम हिंदी पिच्चर? :)

>>पुढील काव्यशास्त्रविनोद पवई लेकवर.
:D

शितल's picture

17 Dec 2008 - 4:09 am | शितल

मी आणी अमर
अरेन्ज मॆरेज, लग्न झाल्यावर कळले बागेच्या अलीकडे मी आणि पलीकडे तो रहात होता (अर्थात तो पुण्यात होता शिकायला त्यामुळे कोल्हापुरला येणे कमी होते तसे )
आम्हाला पाहुन बरेच जण विचारत - लव्ह मॆरेज आहे का, तर मी सांगायचे जो/जी हा प्रश्न विचारेल त्याला/तीला १०० उठाबशा काढायला सांग. ;)
डोक्यावर अक्षता पडल्यापासुन जे वाद चालु आहेत ते ही प्रतीक्रीया देण्याच्या क्षणा पर्यत. ;)
मी बडबड करत असते तर तो मितभाषी, पण मी न बोलता बसले तरी ते ही चालत नाही. :)
पण त्याच्या विसराळु पणामुळे मी अगदी हैराण होते, आणी त्याच्या बरोबर पिक्चर पहायला गेल्यावर, थिएटर मध्ये ह्याला एकट्यालाच तो जोक कळाला आहे असे हसायला लागला की खुप राग येतो.
स्वत: दागिणे घ्यायचा आग्रह करणार्‍या दुर्मिळ नवरावर्गा पैकी एक आहे. :)
गावी जाऊन शेती करायची त्याची इच्छा मात्र मला अजिबात आवडत नाही.
सर्वात आवडता गुण म्हणजे पदार्थ केला की तो अजिबात तोंड वेडे वाकडे न करता सरळ पोटात घालतो :)

शितल's picture

17 Dec 2008 - 4:14 am | शितल

मिपावर सकाळी ८ ते स्ंध्याकाळी ६ प. मी, ६ नंतर तो. :)
त्याच्याकडुनच मला मिपा बद्दल कळले .:)

मृण्मयी's picture

17 Dec 2008 - 5:09 am | मृण्मयी

मि.पा.वाश्यांना लग्नाबद्दल इतकं सगळं आठवतं म्हणजे अलीकडेच लग्न झाली असावीत किंवा अजून दोनाचे तीन झाले नसावेत. :)
मला फक्त 'बर्‍याच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं खरं 'येव्हडंच आठवतं. का कसं वगैरे आता गौण! :D
गेल्या १५-१६ (किंवा जास्तही झाली असतील) वर्षात अनिरुध्दला रागवलेलं चिडलेलं बघीतलं नाही. ती कसर मी भरून काढतेच म्हणा. एव्हाना त्यानं माझ्याकडे बघून 'पदरी पडलं पवित्र झालं' हे मनोमन पटवून घेतलं असावं. :D
मि.पा. चं व्यसन लागण्याची चिन्ह आहेत. आजकाल माझा नवरा 'बरं काय म्हणते पाणीपुरी' असं आवर्जून विचारतो. :D

पिवळा डांबिस's picture

17 Dec 2008 - 5:58 am | पिवळा डांबिस

ओळखीचे स्वरूप -
एकमेकांना पुरेपूर ओळखून आहोंत...
विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून?
पिरेमातून! आणि बिबिशीआयला जीआयपीचा डबा जोडलाय....
(ओळख कशी झाली आणि विवाह या विषयावर एक स्वतंत्र लेख होईल!!! सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन!:))

जोडीदाराच्या आवडीनिवडी,

मी/ ती
नाव : डांबिसकाका/ डांबिसकाकू
गाव : मुंबई/ मुंबई
फुल : गुलाब/ मोगरा
फळ : आंबा/ आंबा (दुसरं कोणतं असणार तिच्यायला!!! आमच्या पैशावर क्रॉफर्ड मारकिटमधल्या अडत्यांनी मोटारी घेतल्या!!)
व्यवसाय : नवनवीन औषधांचे रेणू बनवणे/ त्या रेणूंवर शक्तिशाली रेडिएशन सोडून ते मोडून टाकणे!!:)
पदार्थ : तिखट (अपवादः जिलेबी!!)/ तिखट (अपवादः कॅडबरी!!!!)
सिनेमा/ टि व्ही आवड: विनोदी, राजकीय, साहसपट/ चिकफ्लिक
नेहमी पाहिले जाणारे सिनेमा/ टीव्ही: अर्थातच चिकफ्लिक!!!:(
वाचनाची आवड : खूप/ खूप
हिंडण्याची आवड : खुपच कमी / अत्यंत, अतिशय, भरपूर!!!
आवडती खरेदी : खाण्याच्या गोष्टी/ बाकी सर्व
संगणक खेळ : अप्रिय/ अप्रिय
कला : बागकाम/ पाककला (जय हो!!!)
एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या,
वादविवाद - दैनंदिन गोष्टींवरून अजिबात नाहीत. तात्विक गोष्टींवरून भरपूर!! उदा. मी रिपब्लिकन ती डेमोक्रॅट!! ती शिवसेना मी मनसे!!! होऊन जाऊ द्या!!!:)
मारामार्‍या - कधीच केल्या नाहीत, करत नाही आणि करणार नाही!!!
एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का?
माझ्या मिपावर असण्यामुळे भरपूर शिव्याशाप उच्चारले जातात (शिवसेना - एकदम बाळासाहेब स्टाईल!!), पण ते बहुतेक वेळा तात्याला उद्देशून (मिपा काढल्याबद्दल!!!:)) असल्याने मी मुळीच मनाला लावून घेत नाही!!!!

इत्यादी इत्यादी इत्यादी...
जबाबदार्‍यांची आणि कामांची व्यवस्थित वाटणी करून घेतल्याने बराच फायदा होतो....
उदा.
१. ती उत्तम खादाडी बनवते, मी त्या पदार्थांचा पुरेपूर आस्वाद घेतो...
२. मी माझ्या बागेत मेहनत करून फुलं फुलवतो, ती बिनदिक्कत तोडून केसांत माळते....
३. मी माझ्यासोबत तिच्या गाडीचाही मेन्टेनन्स व्यवस्थित ठेवतो. ती मनसोक्त ड्रायव्हिंग करते... (वीसापेक्षा जास्त वर्षे स्वतःची गाडी चालवत असूनसुद्धा गाडीत पेट्रोल भरण्याव्यतिरिक्त ऑईल बदलणे, टायर रोटेट किंवा चेंज करणे अशा काही गोष्टी असतात याची बाईसाहेबांना फारशी कल्पना नाही!!)
४. संसाराचे स्ट्रॅटेजिक प्लानिंग करण्यात मी रमतो, तिचा मोठेपणा हा की ती बाकीच्या फुटकळ, चिल्लर गोष्टींचा त्रास माझ्या डोक्याला होऊ देत नाही...

(अवांतरः "मिपाची सून" म्हटल्याबद्दल काकूकडून तात्याचा जाहीर निषेध!!! शब्दशः प्रतिक्रिया - "मला सून म्हणतोय? माझ्या बारशाला आला होता का? आता भेटू दे तो तात्या!!! नाय त्याचे डेंगे मोडून चिंबोरीबरोबर उकळायला टाकला तर कायस्थाचं नांव नाय सांगणार!!!")
:)

विसोबा खेचर's picture

17 Dec 2008 - 8:44 am | विसोबा खेचर

पण ते बहुतेक वेळा तात्याला उद्देशून (मिपा काढल्याबद्दल!!!) असल्याने मी मुळीच मनाला लावून घेत नाही!!!!

आयला, हे बरं आहे! :)

मी माझ्या बागेत मेहनत करून फुलं फुलवतो, ती बिनदिक्कत तोडून केसांत माळते....

ओहो! क्या केहेने.. :)

"मला सून म्हणतोय? माझ्या बारशाला आला होता का? आता भेटू दे तो तात्या!!! नाय त्याचे डेंगे मोडून चिंबोरीबरोबर उकळायला टाकला तर कायस्थाचं नांव नाय सांगणार!!!")

मस्त! :)

आपला,
तात्या गुप्ते! :)

धमाल मुलगा's picture

17 Dec 2008 - 9:51 am | धमाल मुलगा

माझ्या मिपावर असण्यामुळे भरपूर शिव्याशाप उच्चारले जातात (शिवसेना - एकदम बाळासाहेब स्टाईल!!), पण ते बहुतेक वेळा तात्याला उद्देशून (मिपा काढल्याबद्दल!!!
"मला सून म्हणतोय? माझ्या बारशाला आला होता का? आता भेटू दे तो तात्या!!! नाय त्याचे डेंगे मोडून चिंबोरीबरोबर उकळायला टाकला तर कायस्थाचं नांव नाय सांगणार!!!"

अग्गायायायाया.....
ओ तात्या...सांभाळून हो...क्यालिफोर्नियाला जायचं म्हणताय शिंडीला भेटायला, डांबिसकाकांनापण भेटणार असाल तर बाहेरच भेटा...घरी नका जाऊ :)

पिवळा डांबिस's picture

17 Dec 2008 - 11:39 am | पिवळा डांबिस

ओ तात्या...सांभाळून हो...क्यालिफोर्नियाला जायचं म्हणताय शिंडीला भेटायला, डांबिसकाकांनापण भेटणार असाल तर बाहेरच भेटा...घरी नका जाऊ
असं नाय हां!!! ही बाई कितीही तडकली तरी आतिथ्याला मागे पडणार नाय हां!!!! आता जवळीक शिवसेनेची, त्याला कोण काय करणार?:)
तेंव्हा तू निश्चिंत मनाने ये रे तात्या, आम्ही वाट पहात आहोत!!!:)

सखाराम_गटणे™'s picture

18 Dec 2008 - 1:35 pm | सखाराम_गटणे™

>>तेंव्हा तू निश्चिंत मनाने ये रे तात्या, आम्ही वाट पहात आहोत!!!

बरेच दिवस कोणी सापडला पण नाही.

ह. घे णे

----
सखाराम गटणे

नीधप's picture

17 Dec 2008 - 10:01 am | नीधप

तात्या,
अवांतर, समांतर भरपूर चाल्लाव की.
ओळख १६ जोड्यांची आणि प्रतिसाद १७६०...
कसं करताव आता?
बघा बुवा.. मजा येतेय खरंतर..
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

ओळखीचे स्वरूप -
कसलं स्वरुप अन काय? ही मला चांगलीच ओळखून आहे. मी तिला ओळखून आहे असं मला दर काही दिवसानी नव्याने वाटत असतं! ;)

विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून?
विवाह रीतसर एकमेकांना पाहून ठरला. तिने पाहिलेला पहिलाच मुलगा मी पण मी पाहिलेली ही सातवी मुलगी (आधीच्या सहा पैकी कोणी कोणास नाकारले ही माहिती गुप्त ठेवली आहे! [( ) नंतर बोलताना दोघांनीही एकमेकांना सांगितलं की पाहता क्षणीच दोघांच्याही डोक्यात घंटा वाजली की हाच माझा जोडीदार!

जोडीदाराच्या आवडीनिवडी,
मी/ती
सिनेमा - बहुतेक सिनेमा बघताना मी झोपतो (फार कमी अपवाद)/ती कोणताही सिनेमा बघू शकते (असा तिला सार्थ अभिमान होता) (पण अलिकडेच काही सिनेमे असे निघाले की तिचे गर्वहरण झाले आहे! :B )
खाद्यपदार्थ - मोदक, गुलाबजाम, पावभाजी, शिरा आणि इतर असंख्य/पोहे, भेळ, पाणी-पुरी, रगडा-पॅटीस चटकमटक कडे जास्त ओढा.
पुस्तके - दोघांनाही वाचायला आवडते.
टीवी - घरी टीवी घेतलेला नाही त्यामुळे प्रश्न नाही!
खेळ - बुद्धीबळ, क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल (हाताने खेळायचा अमेरिकन फुटबॉल नव्हे यूरोपियन!) / खेळ ह्या प्रकाराशी फारशी सलगी नाही. त्यातल्यात्यात पत्ते (भिकार-सावकारमधे ती कायम सावकार!)
फळे - आंबा, पिकलेली गोड पपई, रसदार कलिंगड, मधुर केळी, रसरशीत स्ट्रॉबेरीज, जांभळं, पेरु जवळजवळ सगळीच मधुर फळं / आंबा (तोही शक्यतो हापूस) सोडला तर बाकीच्यांच्या वाटेला फारशी जात नाही.
फिरणे - मला एकेकाळी फिरायची अवड होती हे मी आता विसरुन गेलोय! / तिला फारसे भटकायला आवडत नाही. शक्यतो घरीच मैफिल जमवावी, खावे प्यावे, भरपूर गप्पा कराव्यात ही आवड.
माणसे - दोघांची समान आवड माणसे. घरी बोलवा. खा-प्या मजा करा, गप्पा करा, रात्ररात्र गप्पा करायचा उत्साह आहे (माझा तिच्यामुळे वाढला हे नक्की!)
माणसांच्या पोटात शिरण्याची कला मात्र तिला अवगत आहे ह्यात काही वाद नाही!
गोष्टी लक्षात ठेवणे - मी यथातथाच लक्षात ठेवतो. "कोण कोणास काय म्हणाले?" वगैरे प्रकारात माझे डोके चालत नाही! टेलीफोन नं, पासवर्डस, सांख्यिकी माहिती पक्की लक्षात ठेवतो! / ती म्हणजे काय लक्षात ठेवेल हे सांगता येत नाही. म्हणजे आमच्या चिरंजिवांच्या बारशाला (साधारण सात वर्षापूर्वी) माझ्या मामीने कोणती साडी नेसली होती (आणि कसा शिष्ठपणा केला - हे जास्त महत्त्वाचे ;) ) इथपासून ते मागल्या भारतवारीत निघता निघता मी कोणते छानछान ड्रेसेस तिला घ्यायला हवे होते इथपर्यंत सगळे लक्षात रहाते! ;)
शिस्त - साधारणपणे नीट असल्या गोष्टी की चालते मला / प्रत्येक गोष्ट ही शिस्तीतच झाली पाहिजे ह्या तिच्या आग्रहामुळे माझ्या अनेक 'चांगल्या सवयी' मातीमोल ठरल्या आहेत (सूज्ञास अधिक सांगणे न लगे! ;) ) (उद्या चिरंजिवांनी दिवे लावले ना की माझ्याच नावाने फोडणार खडे - हे आवडतं पालुपद शिस्तीवरुन झालेल्या युद्धप्रसंगातलं)

एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या,
भांडणं भरपूर! खच्चून!! अहो तेरा वर्ष नियमाने करत आलोय ती. पण भांडणांनंतर ती जवळजवळ नेहेमीच उत्तम पदार्थ करुन खाऊ घालते! ;) त्यामुळे मी तिला चिडवतो की तुझं माथं गरम असतानाच तू पदार्थ बनवत जा, कसा झणझणीत होतो! तात्विक भांडणं भरपूर व्हायची हल्ली कमी होतात (कोण कोणास काय म्हणाले ह्याबाबतीतला माझा विसराळूपणा इथे नडतो - दुसरे काय?)
मारामार्‍या नाही. फक्त शाब्दिक. (ती स्वयंपाकघरात असताना शक्यतो तेही नाही कारण लाटणे जवळच असते :O )

एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का?
मी एकटाच सभासद होतो तेव्हा सुरुवातीला व्हायची. ती आधीपासून फक्त वाचनमात्र होती पण नंतर मी धीराने आणि नेटाने तिला बराचकाळ मनवत हळूहळू सभासदत्त्वापर्यंत आणल्याने माझा डाव यशस्वी झाला आणि ती भांडणे संपली! :)

आमचा फोटू - मिपावर झालेल्या बर्‍याच कट्ट्यातून तुम्हाला आस्मादिकांचे आणि आमच्या सौं चेदर्शन घडलेच आहे.

खरं सांगू, घर, मुलगा, नवरा, स्वयंपाक, माणसं हे तिचं खरं प्रेम आहे! घरासाठी खपते ती. आज आमचा संसार ज्या काही भल्या स्थितीत आहे त्यात हिचा वाटा नि:संशय माझ्यापेक्षा जास्त आहे!!

चतुरंग

भास्कर केन्डे's picture

18 Dec 2008 - 10:32 pm | भास्कर केन्डे

खरं सांगू, घर, मुलगा, नवरा, स्वयंपाक, माणसं हे तिचं खरं प्रेम आहे! घरासाठी खपते ती. आज आमचा संसार ज्या काही भल्या स्थितीत आहे त्यात हिचा वाटा नि:संशय माझ्यापेक्षा जास्त आहे!!
वाह! क्या बात है! खर्‍या अर्थी भावना पोचल्या! संसारात एकमेकांप्रती असेच प्रेम व आदर असावा.

दीपुर्झा's picture

17 Dec 2008 - 2:51 pm | दीपुर्झा

खूप मजा आली सगळं वाचून :) तुम्ही लोकांनी छान शेअर केले अनुभव :)

संदीप चित्रे's picture

17 Dec 2008 - 10:50 pm | संदीप चित्रे

मी / ती -- नवरा / बायको
----
नावः तिचं बदललं नाही / ती मला नावं ठेवत नाही
(राम मिलाई जोडी असल्या सारखी आमची नावं अनुरूप आहेत !)
वयः मी वयापेक्षा मोठा दिसतो असं तरूण मुलींना वाटतं / तिच्या पंचविशीनंतर तिचं वय वाढणं थांबलंय (असं मला बजावण्यात आलंय !)
लग्न कसं जमलं?: पत्रिका बित्रिका बघून
(तिला प्रेमविवाह करायचा नव्हता आणि माझे प्रेमविवाहाचे प्रयोग यशस्वी होत नव्हते !!!)

लग्नाची अटः मला वकील किंवा डॉक्टर मुलगी नको होती / तिला फार काळ परदेशी वास्तव्य नको होतं
(लग्न ठरलं तेव्हा ती पुण्यात वकिली करायची / लग्नानंतर एका वर्षात आम्ही अमेरिकेला आलो)
पुस्तकं : दिसामाजी काही वाचावे / दिसामाजी काही वाचावे
(माझं लेखन बाकी कुणी वाचो वा ना वाचो, घरी एक हक्काची वाचक आहे. महत्वाचे म्हणजे लेखनाबद्दल सडेतोड मत मिळतं... नवरा - बिवरा स्टेटस आड येत नाही... असं काही स्टेटस असतं का रे भाऊ ? !!!)
जेवायच्या आवडी-निवडी: भरपूर (नखरे म्हणण्यापेक्षा जास्त) .. मी भेळ मात्र आदल्या दिवशी डिनर आणि दुसर्‍या दिवशी ब्रेकफास्टलाही खाऊ शकतो / ती सगळ्या भाज्या- बिज्या आवडीने खाते... (कसं काय जमतं माहिती नाही.... ज्या गावी जायचं नाही त्याची वाट का विचारावी? :) )
पसारा: असल्याशिवाय काम सुचत नाही / तिला पसारा दिसला की तो आवरायला लागते
(ह्या बाबतीत मी चंद्रशेखर गोखलेंची ' घर दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं... एकाने पसरलं तर दुसर्‍याने आवरायचं' ही कविता पक्की लक्षात ठेवली आहे. :) )

पदार्थः ' आज जेवायला काय आहे? ' हा माझा आवडता प्रश्न / मला काय खावंसं वाटतंय ते माझ्याआधी तिला कळतं
खाणं आवडतं?: मला बारा महिने, चोवीस तास / ती सुगरण (ह्याची खात्री पटल्यावरच लग्नाला हो म्हणालोय ना राव!!! माझ्या सासूबाई पुण्यात कुकिंग क्लासेस घेतात त्याचा पोटाला होणारा फायदा वेगळाच !!)
(मिपाकर मित्र / मैत्रिणी घरी आल्याशिवाय कसं समजेल ? त्यामुळे हे आमंत्रण समजावे :) )

प्रकृती : बैठी / चळवळी
भांडणं: त्याला काय कारण लागतं का? त्याशिवाय कुठला संसार सुखी असतो?
नाटक / सिनेमा: कुठलाही सिनेमा पाहू शकतो / तिला चांगले तरी आवडतात किंवा 'चिक फ्लिक' :)
छंद : भरपूर पण 'लष्कराच्या भाकर्‍या..' टाईपचे / खूप पण काळ्-वेळेचं भान राखून
स्मरणशक्ती : मोजक्या तारखांशिवाय आकडे माझ्या लक्षात रहात नाहीत / ती माझी चालती-बोलती डिरेक्टरी आहे

तूर्तास इथेच थांबतो !
---------
जोक्स अपार्ट, आयुष्यातल्या प्रत्येक चढ उतारांमुळे एकमेकांवरचा विश्वास वाढतच गेलाय हे एक सत्य !!
---------

भास्कर केन्डे's picture

18 Dec 2008 - 4:34 am | भास्कर केन्डे

आयुष्यातल्या प्रत्येक चढ उतारांमुळे एकमेकांवरचा विश्वास वाढतच गेलाय हे एक सत्य !!
चित्रे साहेब, लाखात एक बोललात.

मोजक्या तारखांशिवाय आकडे माझ्या लक्षात रहात नाहीत / ती माझी चालती-बोलती डिरेक्टरी आहे
आमचेही हे असेच आहे.

आपला,
(सहमत) भास्कर
आम्ही येथे वसतो.

संदीप चित्रे's picture

18 Dec 2008 - 7:53 pm | संदीप चित्रे

केन्डेसाहेब ... दाद देण्यासाठी धन्यवाद.

वाटाड्या...'s picture

18 Dec 2008 - 12:59 am | वाटाड्या...

तात्या...काय जबरा काढलाय धागा...केवढं मोठं संकट..बोलायचं असतं खुप पण काय आहे की नीट बोलाव लागतं नाहीतर इथे लिहीताना मागुन मार पडायचा...तर आमचं असं...

ओळखीचे स्वरूप -
विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून? : पिरेमातुन...हसु नका..लहानपणापासुन आम्ही पोरींच्या बाबतीत औरंगजेब होतो. रस्त्यावरुन मुलगी येताना दिसली की आम्ही आडबाजुची गल्ली धरुन जाणारे. त्यामुळे पिरेमातुन म्हणजे आम्हाला एक धक्काच होता आणि पालकांना तर आमच्यापेक्षा...

जोडीदाराच्या आवडीनिवडी,
मी/ती
१. शाकाहारी/शाकाहारी...फक्त आम्हाला शाकाहारात आम्हाला पोळी/भाजी/वरण/भात इतकच माहीत..तर तीला कसल्या कसल्या फळांचे रस, कसले कसले सॅलड(कच्ची भाजी हो)....
२. वडा-पाव/भेळ
३. भाजलेले शेंगदाणे/अजिबात नाय...(कॉलेस्ट्रोल वाढतं म्हणे...)
४. मिसळ(गोटा साफ करणारी :D ) /पाव-भाजी(अजुबाची)
५. गाणं गायचं/तबला वाजवते मित्रांनो (१-२ परीक्षा पण झाल्यात)...गुरुजींची आवडती विद्यार्थीनी..
६. स्वयंपाक हे फक्त खावा/स्वयंपाक हा चांगला करावा व खावा..बघा मंडळी(लग्नानंतर ५७ किलो वरुन आपलं वजन ८० किलो झालं..२ वर्षात..काय समजलात मिश्टर)..
७. पिच्चर हे फक्त बघावेत/पिच्चर हे झोपण्यासाठीच असतात...
८. मला फुलं आवडुन घ्यावी लागतात/तिला दिलेलीही चालतात...

एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या,
१. हे काय चार चौघांच्यात चघळायचा विषय आहे का?? इति "ती"
२. वैचारिक वाद कायम...पण आपण एक जोक नेहेमीच लक्षात ठेवलाय..
"नवरा बायकोच्या भांडणात एक नेहेमीच बरोबर असतो, दुसरा नवरा असतो"..
३. नो मारामारी...आम्ही(म्हणजे मी) कौटूंबिक हिंसाचाराच्या विरोधात आहोत...त्यावर माझा विश्वास आहे.....तसा तिचा नसावा बहुतेक...
एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का?
नाही...कारण "ती" कविता वगैरे करते...त्यामूळे ती काय चाल्लं आहे आज मिपावर विचारत असते मधुन मधुन...

एकूण छान चाल्ल आहे...कधी कधी ती माझ्या कपड्यांवरुन माझा पोपट करते. कधी कधी वेळ पाळण्यावरुन (?) घायकूतीला आणते. तरी पण पक्की पुणेकरीण आहे. शिस्त म्हणजे शिस्त. पण स्वयंपाक म्हणजे बघा लैच भारी करते...नशिब आपलं आपलं...सगळ्यांना निमंत्रण..कधी येताय सांगा..मस्त अण्णांचा 'रामकली' लावू आणि मिसळ/वाफाळलेला चहा/कॉफी करु...

स्वगत : "आलो आलो....भांडी राहीली वाटतं आज माझ्या कडुन घासायची.. ;) "

भास्कर केन्डे's picture

18 Dec 2008 - 4:38 am | भास्कर केन्डे

"आलो आलो....भांडी राहीली वाटतं आज माझ्या कडुन घासायची..
आगदी खल्लास. =)) =))

नो मारामारी...आम्ही(म्हणजे मी) कौटूंबिक हिंसाचाराच्या विरोधात आहोत...त्यावर माझा विश्वास आहे.....तसा तिचा नसावा बहुतेक...
=)) =))

मस्त अण्णांचा 'रामकली' लावू आणि मिसळ/वाफाळलेला चहा/कॉफी करु...
काय आठवण काढली राव... चला आता स्वयपांक घरात काय चाललं आहे याचा कानोसा घेतो...

आपला,
(खादाड) भास्कर
आम्ही येथे वसतो.

वाटाड्या...'s picture

18 Dec 2008 - 11:26 pm | वाटाड्या...

धन्यवाद केन्डे साहेब...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Dec 2008 - 1:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लहानपणापासुन आम्ही पोरींच्या बाबतीत औरंगजेब होतो. रस्त्यावरुन मुलगी येताना दिसली की आम्ही आडबाजुची गल्ली धरुन जाणारे. त्यामुळे पिरेमातुन म्हणजे आम्हाला एक धक्काच होता आणि पालकांना तर आमच्यापेक्षा...
हाहाहा .... आमची (माझी आणि अभिरची अशीच काहीशी श्टूरी आहे)
आमच्या लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी आमचा एक कॉमन मित्र (वयाने बराच मोठा आहे तो, ५०-५५!) घरी आला होता. त्याचं म्हणणं, "अदितीचं लव्ह मॅरेज झालं यात काहीही आश्चर्य नाही. पण अभिरचंपण! आणि ते पण अदितीशी!!". अर्थात आमच्याबद्दल जेव्हा "कुजबूज" सुरु झाली तेव्हा आम्ही दोघे मुंबईत नव्हतो पण कानावर आलेलं गॉसिप याच अर्थाचं होतं, "अदिती आणि अभिर? काहीतरी चूक होत आहे का?"

वाटाड्या...'s picture

18 Dec 2008 - 11:38 pm | वाटाड्या...

असेच...माझ्या बायकोला तिच्या मैत्रीणीने हेच म्हटलेलं...

अनिल हटेला's picture

18 Dec 2008 - 11:26 am | अनिल हटेला

छान चालू आहे जावई -सुना परीचय.....
मजा आली वाचुन.....
उरलेली मंडळी कधी येताये......

(शिंगल & खुष )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

रेवती's picture

18 Dec 2008 - 9:36 pm | रेवती

काही लिहिण्याची गरज नाही.
पढवल्याप्रमाणे रंगरावांनी सगळं लिहिलय (नाहीतर धडगत नव्हती ना...).;)

रेवती

भिडू's picture

18 Dec 2008 - 11:38 pm | भिडू

तात्या,
हे सर्व अनुभव एकत्र करुन पुस्तक काढा. मजबूत खपेल.
-भिडु

केवळ_विशेष's picture

22 Dec 2008 - 4:14 pm | केवळ_विशेष

ओळखीचे स्वरूप - किस्सा आहे...

माझं इंजिनिअरिंग संपलं तेव्हा माझी एका मुलीशी ओळख झाली आणि तिच्याकडून माझ्या बायकोशी...

ती मैत्रिण सायडिंगला पडली आणि आमची गाडी ट्रॅकवरून धावू लागली...:)

विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून?

विवाहः- आंतरजातीय... बायको सी. के. पी
अर्थातच प्रेम विवाह.

भयंकर विरोध, माझ्याघरातून!

नुकताच इंजिनिअर झालो होतो...ते ही गचके खात खात बोली भाषेतः- लै वेळा नापास होऊन (४ अक्षरी चार वर्षे) गाडी माझी धक्क्याला लागली होती...आणि बायको व्यवथित सेटल होती...तिचं त्यावेळी बुटीक होतं आणि मी नोकरीच्या शोधात...तिच्याघरातून तिच्या लग्नाचं बघत होते आणि हिचा जीव माझ्यावर!...

एक ठरवलं होतं की, पळून जाऊन लग्न करायचं नाही...कधी कधी परीस्थिती बिकट वाटत असे...
शेवटी २-२.५ वर्ष घासल्यानंतर २५ डिसेंबर २००५ ला लग्न लागलं...औंदा ३ वर्ष होतील...:)

जोडीदाराच्या आवडीनिवडी,
माझ्या- झोपा काढणे...दुपारीपण! त्यावरून तिची चिडचिड...

दोघांनाही मासे प्र चं ड आवडतात...आणि पक्की सी के पी असल्यामुळे तिला मी आणलेले अजिबात पटत नाहीत, स्वत: जाऊन आणते.

उत्तम सुगरण आहे...आणि खवय्यापण...लग्नाआधी मी अन्नभक्षण करणे एवढचं करायचो... लग्नानंतर चवीने खायला लागलो...

छान चित्र/रांगोळी काढते... आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत एस एन डी टी पुणे कडून असणारी फेमस विद्यार्थिनी.
फॅशन डिझायनिंग केलंय तिनं...
दोन्ही घरातल्यांना सांभाळण्याची तारेवरची कसरत यशस्वीपणे चालू आहे तिची!

नाटक, सिनेमा, मैफिली,फिरायची दोघांनाही आवड आहे...माणसं जोडायला मी तिच्याकडून शिकलो.
तिला बाईक पण चालते फिरायला आणि मला कार शिवाय जायचा कंटाळा येतो...आणि गाडी स्पॉट पर्यंत जायला हवी हा माझा आग्रह असतो...त्यामुळे तिची इच्छा असूनही माथेरानला गेलेलो नाही अद्याप. पण आता जावसं वाटतंय...:)

एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या- डायरेक्ट अशा नाहीत्...पण मी कामानिमित्त मुंबईत आणि ती घरी पुण्यात असल्यामुळे (मी ही अस्सल पुणेरी आहे पण गेले ६ महिने जॉब मुंबईत असल्यामुळे शुक्र. पुणे आणि सोम. मुंबईत येतो) आमच्या पावणे दोन वर्षाच्या मुलीचं सगळं तीच करते...मी आल्यावर फक्त २-३ दिवस मुलीला तयार करणे शी धुणे वगैरे कामं मी करावीत अशी रास्त अपेक्षा. त्यावरून.
मी हरतो.

एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का?
नाही. कारण मी सोम्-शुक्र मिपा हापिसातून एक्सेस करतो...आणि पुण्याला गेल्यावर पूर्ण वेळ त्या दोघींना देतो...संगणकाला हातही लावत नाही.

मला तिचा खूप अभिमान वाटतो! टचवूड:)
मी त्या दोघींना खूप खूप 'मिस' करतोय आणि त्या पण मला! :(

चांगला धागा आहे. सौ. ची परवानगी घेऊन आमच्याबद्दल लिहीन सावकाश. ;-)