रस्त्याने जातांना अचानक
उंच इमारती डोंगर होतात
त्यावरील काचेची तावदाने
डोंगरावरील हिरवळ होते
रस्त्यांच्या नद्या होतात
त्यातून रहदारीचे पाणी वाहते
जाणारी वाहने होड्या होतात
बाजूची घरे शेतातली झाडे होतात
त्यावेळी मात्र मी
शहरातल्या गर्दीपासून दूर गावात पोहोचतो
- पाभे
२१/१०/२०२२
प्रतिक्रिया
21 Oct 2022 - 7:40 pm | चौथा कोनाडा
व्वा खुप छान... कल्पनारम्य!
आवडली ही छोटीशी रचना.
26 Oct 2022 - 9:46 am | चित्रगुप्त
मस्त कल्पना आणि रचना.
26 Oct 2022 - 7:11 pm | कर्नलतपस्वी
पाऊस जर असाच पडत राहीला तर घरांवर शेवाळ साचून शेतातल्या झाडाचं रूप नक्कीच येईल.
बाकी कल्पना मस्त.
27 Oct 2022 - 10:17 pm | चित्रगुप्त
कोणताही अनुभव टोकाला गेला की कधीकधी असे काहीतरी झाल्याचे अनुभवाला येते, असे अनुभवी लोक सांगतात, तसे मलाही काही अनुभव आलेले आहेत, ते इथे लिहीण्याचा अनुभवही घ्यायला हवा, पण सध्या टंकाळा अनुभवत आहे.
28 Oct 2022 - 11:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त. आवडली कविता. ही जरा वेगळी आहे.
लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
9 Dec 2022 - 4:52 pm | कुमार१
मस्त कल्पना आणि रचना.
9 Dec 2022 - 5:40 pm | श्वेता२४
भारी विरुद्ध कल्पना केली आहे! आवडली
9 Dec 2022 - 8:25 pm | शानबा५१२
आपण वेगात चालणा-या गाडीत होतात का? ही कल्पना अशा सिनारियोमध्ये खुप सुट होते. जेव्हा आपण खुप दीवसांनी गावाला जातो. :-)