एक विलक्षण अनुभव

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in जनातलं, मनातलं
12 Dec 2008 - 9:40 am

आय.आय.टी.सारख्या अत्युच्च संस्थेतुन शिक्षण ,एक व्यवसाय,मुळ गाव अगदी साधे.ही माहीती ऐकल्यावर ती व्यक्ती तुम्हाला कोण वाटेल एखादी आय टी प्रोफेशनल किन्वा कष्टातुन भविष्य घडवलेली एखाद्या संस्थेची अध्यक्ष.अह! ती तशी नाही. कारण काल मी या व्यक्तीला भेटलो .ती नोकरी करत नाही आणि तीचा व्यवसाय तर नाहीच नाही मग ती करते तरी काय ??

पुर्णवेळ राजकारण !!!!!!!!!! हादरलात किंवा ती कोण ते आठवत नाही.बर सांगतो ती व्यक्ती मा.मनोहर पर्रिकर गोव्याचे माजी मुख्यमन्त्री आणि माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीचे यश म्हणजे मी स्वत: एक पैचा ही भ्रष्टाचार न करता ५ वर्षे हे पद सांभाळु शकलो असे सांगणारे आताचे विरोधी पक्षनेते.मनोहर पर्रिकरांचे विचार ऐकण्याची संधी मला काल मिळाली.त्यानी काल "राजकारण आणि चारित्र्य" या विषयावर पक्षातीत विचार मांडले.ते अत्युत्तम होते.पहिल्यांदाच एका राजकीय नेत्याकडुन इतके अभ्यासपुर्ण विचार ऐकावयास मिळाले.

त्यानी सांगीतलेल्या काही विचार करावयास लावणार्या आणि उपयुक्त गोष्टी येथे देत आहे.

प्रथम त्यानी एक गोष्ट स्पष्ट केली की राजकारणी हा चारित्र्यवान हवा आणि चारित्र्य म्हणजे फक्त पैसे न खाणारा न्हवे तर स्त्री,कुटुंब,पुर्वेतिहास या सर्व बाबतीत स्वछ चरित्र असणारा!

माझ्या मते आज आपण जी चर्चा करतो स्वच्छ चरित्राबाबत त्यात हा मुद्दा नक्की विचारात घेतला जावा.असे मला(लेखक्)वाटते.

यानतर त्यानी सांगीतले की आजही देशात स्वच्छ चारित्र्याचे राजकरणी आहेत,आणि सनदी अधिकारीही.मात्र त्यांची योग्य कदर न केली गेल्याने ते काम सोडतात.(यासाठी त्यानी आदल्यादिवशीच व्याख्यान दिलेल्या अरवींद इनामदारांचेउदाहरण दीले.)

फक्त शिक्षण म्हणजे चारित्र्य नव्हे यासाठी त्यानी एक उत्तम उदाहरण दीले.

त्यांच्याकडे आलेल्या एका प्रकरणात एक प्रस्ताव ४ लाख रुपयाने जादा आलेला होता.

नंतर असे सांगण्यात आले की चिखलाची जमीन आसल्याने पाया वाढवावा लागला(गोव्यतील परिस्थीती)पण त्याना शंका आल्याने त्यानी अक्षरशः पाया खोदला आणि भ्रष्टाचार सापडला म्हणजेच जमीनीखालचे कसे बाहेर काढणार अस विचार करणारे भ्रष्टाचारी शिक्षीत होतेच ना?

लोक म्हणतात की चांगली माणसे उभारली(निवडणुकीत) की पडतात यावर त्यांचे उत्तर असे की फक्त एकदा उभारुन काम संपत नाही सतत निवडणुक लढवली पाहीजे.यावेळी त्यानी जेनेटीक चे एक सुंदर उदाहरण दीले.लोकांची जबाबदारी कय असे विचारले असता मतदान करणे असे उत्तर मिळाले .ते असे म्हणतात की ज्यावेळी तुम्हाला मतदानाची सुट्टी मिळते तेव्हा जनाची नाही तर निदान मनाची लाज बाळगुन मतदान करावे.आणि तुम्ही म्हणता की सर्वच गुंड असतात तेव्हा त्यातल्या त्यात कमी गुंडाला मतदान करावे ज्यामुळे निदान वाइट गोष्टींची टक्केवारी कमी होइल.

चारित्र्यवान राजकारणी ही एका दिवसात होणारी गोष्ट नव्हे मात्र या साध्या उपायातुन ती प्रक्रिया घडत राहील असे त्यांचे मत होते.(हे सांगताना त्यानी गल्लीपासुन दील्लीपर्यंतची अनेक उदाहरणे दीली)

याशिवाय त्यांच्या भाषणातुन अनेक अवांतर मुद्दे विषयाला अनुसरुन आले त्यातील लोकांच्या आणि विषेशत: राजकारण्याम्च्या डोळ्यात अंजन घालणारे काही मुद्दे खालीलप्रमाणे.

१.त्यानी आतापर्यन्त एक पैशाचाही भ्रष्टाचार केलेला नाही.ते म्हणाले की मला मुख्यमंत्री व्हायच्या ३ तास आधीपासुन ५० लाख ते ५० कोटी एवढ्या ऑफर आल्या पण मी त्या नाकारल्या आणि य सर्वांचे लिखित पुरावे माझ्याकडे आहेत.याशिवाय माझ्या काळात सरकारमधील भ्रष्टाचार ७० टक्याने कमी झाला.आणि एवढे मोहाचे क्षण मी नाकारु शकलो ते फक्त संघाच्या संस्कारामुळे.

२.सरकारी अधिकारी खाजगी क्षेत्रापेक्षा २पट चांगले काम करु शकतात्.ते म्हणाले की फिल्म फेस्टीवल वेळी आम्ही सहा महिन्यात चित्रपट्ग्रुह बांधले.जे होणे अशक्य आहे असे मला माझ्या आय्.आय्.टी मधील मित्राने सांगीतले होते.यावेळी रात्री एक एक वाजेपर्यन्त थांबणारा मी प्रसिद्ध झालो पण त्यावेळी अगदी सचिवापासुन सर्व जण तेथे थांबलेले असत .पण ते प्रसिद्ध झाले नाहीत.

३.याउलट हे अधिकारी भ्रष्टाचारही करु शकतात .एका प्रयोगात गावकर्यानी ८० हजार रक्कम सांगीतली तेव्हा अधिकार्यानी ८ लाख सांगीतली होती एवढे पैसे जातात कुठे?

एकुण काय तर दोष अधिकार्यांचा नाही तो संगतीचा आहे.

४.(जे ऐकुन मी थक्क झालो ती ही गोष्ट)आजही गोव्यात ११वी १२वीतल्या कोणत्याही विद्यार्थ्याला अवघ्या ५०० रुपयात संगणक मिळतो.

३.समाज खुप चांगला आहे फक्त पैसे मिळाल्यावर मते फेकणारा समाज नव्हे जेव्हा गोव्यात लघु उद्योगासाठी ५०% सरकारी सहाय्य अशी योजना चालु झाली तेव्हा याच लोकानी ती १३५% यशस्वी केली आहे याचा अर्थ माणसे बदल घडवु शकतात. फक्त त्यासाठी वेळ दीला पाहीजे.

४.योग्य राजकारण्याचे ध्येय हे समाधानी समाज असावे असे त्यानी सांगीतले.यासाठी त्यानी गोव्यात चालु असलेल्या पेन्शन योजनेचे उदहरण दीले.तेथे सध्या व्रुद्ध्,अपंग,विधुर्,अनाथ याना दरमहा १००० रु.पेन्शन मिळते.ज्यामुळे समाज सुखात राहतो.

तर मनोहर पर्रिकरानी मांडलेले हे विचार .प्रभावी इंग्लीश ,उत्तम उदाहरणे,आणी संत वान्ग्मय ते आजच्या म्हणी इत्यादींचा चपखल वापर यामुळे भाषण खुपच छान झाले त्यांच्या स्पष्ट बोलण्याने तेथे उपस्थीत असलेल्या राजकारण्यान्चे चेहरे पाहण्यासारखे झाले होते.

मला स्वतला हे भाषण आवडले .आजही राजकारण पुर्णपणे वाइट नाही याची जाणीव झाली.आशेचा किरण गवसला.आणि त्याच आनंदात येथे हा व्रुतात्न लिहित आहे.लिहिताना बरेच राहुन गेले आहे.क्रम जमलेला नाही .पण जे जसे आठवेल तसे लिहित गेलो आहे.

या लेखाच्या अनुशंगाने मला त्यांचे विचार्,स्वत: ते,आजचे राजकारणी यासंबंधी आपली मते जाणुन घ्यायला आवडेल.

(त्यांची सर्व मते ही वैयक्तीक असुन त्याचा व त्यांचा पक्ष यांचा काहीही संबंध नाही.

अवांतर-त्याना स्व.प्रमोद महाजन यानी राजकारणात आणले)

यासंदर्भात सकाळ्मध्ये आलेली अर्थहीन बातमीदेखील येथे प्रसिद्ध करत आहे.
चांगले राजकारणी घडविण्याची जबाबदारी मतदारांचीच - मनोहर पर्रीकर

कोल्हापूर, ता. ११ - केवळ शिक्षणामुळेच चरित्र चांगले घडविता येत नाही खरे तर जास्त शिकलेल्या माणसाकडून जास्त भ्रष्टाचार होतो.
यामुळे शिक्षणाला चांगल्या संस्काराची जोड असणेही महत्त्वाचे आहे. राजकारणीही मतदाराकडून घडतात. म्हणून चांगले राजकारणी घडविण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्नांची गरज असते, अशी अपेक्षा गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे व्यक्त केली.

तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेत "राजकारण व चारित्र्य' या विषयावर श्री. पर्रीकर यांनी अखेरचे पुष्प गुंफले. ते म्हणाले, ""राजकारण्यांना आपण नालायक समजो; पण त्याला आपणच निवडून दिलेले असते. राजकारण कसेही असले तरी सरकार हे कोणीतरी चालवावेच लागते. मात्र ते चालविण्यासाठी नालायक लोक तिथे बसू नयेत, याची खबरदारी घेणे मतदारांच्या हाती असते.''

श्री. पर्रीकर म्हणाले, ""अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला; पण नंतरच्या सात वर्षांच्या काळात एकही दहशवादी हल्ला पुन्हा झाला नाही. याला कारण तेथील कठोर व्यवस्था आहे. आपल्याकडे असे हल्ले किती होतील, हे सांगता येणे ही मुश्कील आहे. सरकारमध्ये येऊन भ्रष्टाचार करण्यास व्यक्ती आपल्या नको आहेत. समाजात जशा वाईट प्रवृत्ती असतात, तशा राजकारणातही असतात. त्यांना वेळीच बाजूला ठेवण्याचे काम समाजाचे आहे.''

या वेळी महापौर उदय साळोखे यांनी व्याख्यानमालेसाठी दहा हजार रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले. आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राजाराम शिपुगडे, पी. एस. कुलकर्णी, फिलिप डिसिल्वा व तेंडुलकर परिवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या बातमीत मुळ विचारांचा उल्लेखही केलेला नाही.
(अक्षेपार्ह वाटल्यास संपादकानी कळवावे,लगेच बातमी काढुन टाकेन)

मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही.
आपला,
(अपक्ष्)कोल्हापुरी दादा.

धोरणराजकारणप्रकटनविचार

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

12 Dec 2008 - 11:53 am | योगी९००

आहो कोल्हापुरी दादा,

मोठे मोठे अशुद्ध लेख लिहीण्यापेक्षा थोडे छोटे पण शुद्ध लेख लिहीले तर आमच्या कडून पुर्णपणे वाचले जातील ..आणि जास्त प्रतिक्रिया मिळतील..

संपादक मंडळी..या गोष्टीची नोंद घ्यावी.. मि.पा. चा दर्जा घसरू नये हाच हेतू..

खादाडमाऊ
(मी पण कोल्हापुरी (पण शुद्ध बोलणारा आणि वाचणारा))

मनस्वी's picture

12 Dec 2008 - 12:15 pm | मनस्वी

मनोहर पर्रिकरांचे विचार चांगले मांडले आहेस कोल्हापुरी दादा.
पुढच्या वेळी अजून थोडे समजेल (वाचायला) असे लिहायचा प्रयत्न कर.

टारझन's picture

12 Dec 2008 - 3:51 pm | टारझन

मने मने .. माजं बी आसुदलेकन पहा णा .. मी ऐक लेख लैहीला .. आणि त्यावर ऐकही प्रतिक्रिया णाही आली .. हे माझ्या असुदलेकनामुळेच काय ?
मंग मला हैपी बर्थडैच्या शुभेच्छा का णाही मिळाल्या ... मी तुमा समद्यांच्या लै लै लै जाज्वल्य निशेध करतो. आणि आज पास्न आसंच आसुद लिवाचा पण करतो ... ऐक अजुन सांगतो ... पुढच्या गोश्टी खरडवही (स्क्रैपबुक) वर सांगतो .

आवांतर आणि आसुद लेकनाबदल मापी नाय मागत.. काय करणार गं/रं काय करणार ?

- शुद्धाराम लेटणे
(आम्ही जालिय आसुदलेकणाचे पुरस्कर्ते आहोत.)

पक्या's picture

13 Dec 2008 - 12:33 am | पक्या

ए गप रे टार्‍या. किती अवांतर बकबक करतोस .

उम्मीच्या खालील प्रतिसादाशी सहमत.

पक्या's picture

12 Dec 2008 - 3:03 pm | पक्या

मनोहर पर्रिकरांचे विचार चांगले मांडले आहेस . पैसे न खाणारा नेता लाभणं हे गोव्याचं भाग्य.

सूचना: शुद्धलेखन सुधारलेस तर लेख वाचताना त्रास होणार नाही.

पांथस्थ's picture

12 Dec 2008 - 3:23 pm | पांथस्थ

असेच म्हणतो. लेख आणि उद्देश छान पण वाचतांना डोकं जाम झालं राव!

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

लिखाळ's picture

12 Dec 2008 - 4:01 pm | लिखाळ

लेख चांगला आहे. आवडला. तुम्ही लिहिलेले मुद्दे चांगले आहेत.

-- लिखाळ.

विनायक पाचलग's picture

12 Dec 2008 - 5:40 pm | विनायक पाचलग

प्रथमतः मी आपणा सर्वांची जाहीर माफी मागतो.
गेल्या काही दीवसात मी येथे एकुण १२ लेख टाकले.
या सर्व लेखाना वैचारीक प्रतिक्रियेपेक्षा टोमणे ,अवान्तर मुद्दे जास्त आले.
या सर्वामुळे मी निराश झालो होतो .
पण जेव्हा या सर्वाचा आढावा घेतला तेव्हा असे ल़क्षात आले की या सर्वास बर्‍याच प्रमाणात माझे अशुद्ध लेखन कारणीभुत आहे.
मी येथे मनापासुन मान्य करतो की माझे सर्व लिखाण हे अशुद्ध होते.
यासाठी लिखाण पद्धत माहित नसणे व घरातील डायल अप कनेक्शन ही दोन कारणे असावीत असे मला वाटते.
मात्र ते दोन्ही प्रश्न नुकतेच सुटले आहेत मगाशीच मला आलेल्या खरडीतुन मला येथील लिखाणाविशयी सम्पुर्ण माहिती मिळाली.
यापुढे मी शुद्ध लिखाण करीन याची खात्री देतो व आपण त्याला योग्य प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो.
याशिवाय जुने सर्व लेख शुद्ध करत आहे मात्र त्याला वेळ लागेल.
तसदीबद्दल क्षमस्व.
आपला,
(सतत लिहिते राहण्याची इच्छा असणारा)कोल्हापुरी दादा

लिखाळ's picture

12 Dec 2008 - 5:43 pm | लिखाळ

शुभेच्छा !
-- लिखाळ.

घाटावरचे भट's picture

12 Dec 2008 - 6:52 pm | घाटावरचे भट

शुभेच्छा!!!

टारझन's picture

12 Dec 2008 - 7:19 pm | टारझन

लिखाळ राव आणि घाटावरच्या भटाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

शुभेच्छूक
अध्यक्ष, टारझन मित्र मंडळ

सुनील's picture

12 Dec 2008 - 7:20 pm | सुनील

सहमत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

घाटावरचे भट's picture

12 Dec 2008 - 7:24 pm | घाटावरचे भट

टार्‍याच्या वाढदिवसाच्या काय???

सुनील's picture

12 Dec 2008 - 7:26 pm | सुनील

टार्‍यालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुनील's picture

12 Dec 2008 - 6:11 pm | सुनील

सतत लिहिते राहण्याची इच्छा असणारा
जरूर लिहा...

पुलेशु

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

क्लिंटन's picture

13 Dec 2008 - 5:14 pm | क्लिंटन

नमस्कार कोल्हापुरी दादा,

आपले लेख वाचून आपली लिहायची तळमळ समजते. सर्व लेखांवर प्रतिक्रिया देता येणे शक्य नसते तरीही यावर प्रतिक्रिया देत आहे.

मनोहर पर्रिकर हे गोव्याच्या चांगल्या मुख्यमंत्र्यांपैकी एक होते असे माझा गोव्यातील मित्र सांगतो. त्यांनी बरेच विकासकार्य ही घडवून आणले असे वाचले आहे. त्यांची अभ्यासूवृत्ती पण त्यांच्यात आणि इतर राजकारण्यांमधील वेगळेपणा दाखवून देते. तरीही काही प्रश्न उभे राहतातच.

कोणताही राजकारणी 'हो मी पैसे खाल्ले' असे जाहिरपणे बोलणार नाही. अगदी कॅमेर्‍यावर पैसे स्वीकारताना पकडलेले बंगारू लक्ष्मण सुध्दा 'मला अडकवले गेले' अशी सारवासारव करतात. तेव्हा ते स्वत: आपल्याविषयी काय म्हणतात ते कितपत गांभीर्याने घ्यावे?

आणि पर्रिकरांनी मुख्यमंत्री असताना इसिदोर फर्नांडिस विरोधी पक्षाच्या आमदारांना फोडून त्यांना पोटनिवडणुकीत परत निवडून आणले होते.पुढे त्यांचाच डाव त्यांच्यावर काँग्रेसने उलटवला आणि त्यांचे सरकार खाली खेचले. तरीही विरोधी पक्षाचे आमदार फोडून स्वतःचे बहुमत सिध्द करणे हे काही राजकारणातील संतसज्जनाचे लक्षण नक्कीच नव्हे. तसे करून कोणते विधायक राजकारण पर्रिकर खेळले? असो.

आपल्या मिसळपाववरील भावी वाटचालीस शुभेच्छा.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

सुनील's picture

13 Dec 2008 - 5:46 pm | सुनील

मनोहर पर्रिकर हे गोव्याच्या चांगल्या मुख्यमंत्र्यांपैकी एक होते असे माझा गोव्यातील मित्र सांगतो
भाऊसाहेब बांदोडकरांचा समावेशदेखिल "चांगल्या मुख्यमंत्र्यांपैकी एक" असा करता येईल.

माझ्या मुख्यमन्त्रीपदाच्या कारकिर्दीचे यश म्हणजे मी स्वतह एक पैचा ही भ्रश्टाचार न करता ५ वर्शे हे पद साम्भाळु शकलो
असे कोण राजकारणी उघडपणे म्हणत असेल तरी विश्वास कसा ठेवावा?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Dec 2008 - 6:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

याच धर्तीवर कोणीही स्वतःचंच कौतुक सांगत असेल तर त्यावर किती विश्वास ठेवणार? म्हणजे उद्या मी म्हटलं, मी फार्फार हुशार आहे, तर तुम्ही विश्वास ठेवणार का? :?
हेच दुसर्‍या कोणी तटस्थ माणसाने म्हटलं असतं तर ते जास्त विश्वासार्ह वाटलं असतं.
अर्थात मुद्दा पर्रीकर यांनी भ्रष्टाचार केला का नाही हा नाहीच आहे.

शंकरराव's picture

12 Dec 2008 - 6:15 pm | शंकरराव

शुभेच्छा !!

एवढा मोठा वैचारिक लेख वाचुन त्याच कौतुक करण्याऐवजी शुदधलेखनाचा बाऊ करणार्या वर्गाचा जाहीर निषेध...

शुदधलेखन should not be a barrier in communication.

विचार महत्त्वाचा....
लिहा हो दादा तुम्ही बिनधास्त...

उम्मि.

टारझन's picture

13 Dec 2008 - 12:33 am | टारझन

सहमत ,

उम्मी तुम बढो हम तुम्हारे साथ है !! तुम लढो हम कपडे संभालता है

-टम्मी

भडकमकर मास्तर's picture

12 Dec 2008 - 11:37 pm | भडकमकर मास्तर

कोल्हापुरी दादा,
चांगला लेख लिहिला आहे..
आवडला...
राजकारण्यांना सतत शिव्या ऐकून कंटाळा आलेला असताना हा लेख म्हणजे रिफ्रेशिंग चेंज ( ताजातवाना करणारा बदल) वाटला

अवांतर : शुद्धलेखनाच्या प्रतिक्रियांचे फार मनावर घेऊ नये....
प्रयत्नाने जमेल...लिहित रहा...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विनायक पाचलग's picture

13 Dec 2008 - 9:32 am | विनायक पाचलग

मी नुकताच सर्व चुका काढुन(ज्या मला जमल्या त्या) आणि काही नवी माहिती टकुन लेख अद्ययावत केला आहे.माझ्यामते मी दीलेला विशय्ही महत्वाचा आहे,तेव्हा आता लेखावर व त्यातील मुद्यांवर खुप चर्चा व्हावी अशी अपेक्षा करतो.

वेताळ's picture

13 Dec 2008 - 3:40 pm | वेताळ

तेव्हा आता लेखावर व त्यातील मुद्यांवर खुप चर्चा व्हावी अशी अपेक्षा करतो
सदर लेखावर खुप चर्चा व्हावी हे माझे देखिल मत आहे. तेव्हा चर्चेच गुर्‍हाळ चालवणार्‍याना व प्रतिक्रियेचे रतीब घालणार्‍याना माझे जाहिर आवाहान आहे की आपल्या चकल्या इथे पाडाव्यात.
वेताळ

विनायक पाचलग's picture

14 Dec 2008 - 11:36 pm | विनायक पाचलग

आणि एवढे सगळे होवुन चर्चा होतच नाही आहे
जावु दे आता तरी होइल