वर्ष २००८ - अनेक शुभेच्छा..२!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
31 Dec 2007 - 10:52 am

हे ठिकाणसद्भावनाशुभेच्छा

प्रतिक्रिया

विसुनाना's picture

31 Dec 2007 - 11:03 am | विसुनाना

तात्या, आपल्या भावना पोचल्या! ;);)
आपणालाही याच शुभेच्छा!

३१ डिसेंबर २००७ रोजी रात्री वाहने चालवताना आणि रस्त्यावरून चालताना
स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या!

विसोबा खेचर's picture

31 Dec 2007 - 11:11 am | विसोबा खेचर

३१ डिसेंबर २००७ रोजी रात्री वाहने चालवताना आणि रस्त्यावरून चालताना
स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या!

नानासाहेब, सल्ल्याबद्दल आभार, परंतु आम्ही आज रिक्षाचा वापर करणार आहोत! :)

नुकतंच आम्हाला (गेल्या बुधवारी!) पोलिसांनी कलम १८५ च्या अंतर्गत (मद्य पिऊन वाहन चालवणे!) पकडलं होतं. ठाणे कोर्टाने आमच्यावर फौजदारी खटला चालवून आम्हाला दोन हजार रुपये दंड आणि कोर्ट उठेपर्यंत साध्या कैदेची शिक्षा (कोर्टाच्या आवारतच राहणे!) सुनावली होती!

तो सर्व किस्सा आम्ही लवकरच मिसळपाववर लिहिणार आहोत! :))

आबा पाटलांचा विजय असो....:)

आपला,
(भा दं कलम १८५ अंतर्गत शिक्षा झालेला!) तात्या.

श्री's picture

31 Dec 2007 - 11:41 am | श्री

आपणा सर्वाना हार्दिक शुभेछा

मिसळपावच्या सर्व वाचकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

आजानुकर्ण's picture

31 Dec 2007 - 1:14 pm | आजानुकर्ण

मिसळपावच्या सर्व वाचकांना, सरपंचांना व हितचिंतकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

(शुभेच्छुक) आजानुकर्ण

धोंडोपंत's picture

31 Dec 2007 - 2:37 pm | धोंडोपंत

आमच्या तर्फे मिसळपावच्या सर्व सभासदांना हार्दिक शुभेच्छा.

तात्या,

तुला अक्ख्या बाटली एवढ्या द्रवरूपी शुभेच्छा. बाटली नुसती शोभेसाठी आहे की आम्हाला त्याचा लाभही मिळ्णार आहे.

काय हो प्राध्यापक साहेब,

बरोबर बोललो ना?

आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Dec 2007 - 6:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुला अक्ख्या बाटली एवढ्या द्रवरूपी शुभेच्छा. बाटली नुसती शोभेसाठी आहे की आम्हाला त्याचा लाभही मिळ्णार आहे.

काय हो प्राध्यापक साहेब,

बरोबर बोललो ना?

नाय तर काय !!!
धोंडोपंत, इतके दिवस झाले. तात्याच्या नुस्त्या गप्पा चालू आहेत. अरे कधी ठाण्याला बोलवा म्हणावं !!!
तीन पेट्रोल पंपाजवळील पंजाबला बसू .........!!! नाय तर पोलीस लाइनला........आयना :)

आमच्या तर्फे मिसळपावच्या सर्व सभासदांना हार्दिक शुभेच्छा.

विसोबा खेचर's picture

31 Dec 2007 - 7:37 pm | विसोबा खेचर

अरे कधी ठाण्याला बोलवा म्हणावं !!!

अहो त्यात बोलवायचं काय? अरे या की कधीही! आपलं मनापासून स्वागतच होईल याची खात्री बाळगा बिरुटेशेठ!

तीन पेट्रोल पंपाजवळील पंजाबला बसू .........!!!

पंजाबला नको, तिकडचं जेवण एवढं खास नसतं. त्यापेक्षा हॉटेल मालवणला बसू. सुकं मटण, कोलंबी, तळलेले बोंबिल वगैरे जेवणही चांगलं मिळतं!

नाय तर पोलीस लाइनला........आयना :)

आयला बिरुटेशेठ! तुम्हाला आयन्याबद्दल कशी काय हो माहिती? तो तर डान्सबार आहे! यापूर्वी कधी तिकडे गेला होतात की काय?! :)

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Dec 2007 - 7:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आयला बिरुटेशेठ! तुम्हाला आयन्याबद्दल कशी काय हो माहिती? तो तर डान्सबार आहे! यापूर्वी कधी तिकडे गेला होतात की काय?! :)

तो डान्सबार आहे का ?
च्यायला कोणाच्या माहितीच्या आधारावर थाप मारायचा प्रयत्नात तुरुंगवास घडला असता आम्हाला !!!

सुनील's picture

31 Dec 2007 - 11:07 pm | सुनील

तो डान्सबार आहे का ?

आहे नव्हे, होता (जय आबा पाटील) आणि तोदेखील थर्ड्-ग्रेड!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दुपारचे १२ वाजून गेले.....
पळा आता आणि स्टॉक आणून ठेवा, रात्री कमी पडल्यावर मिळल न मिळल ....
शिवाय टून्न होऊन हिंडने म्हणजे पोलिसांचा ताप आहेच .... [संपर्क = तात्या ]
मिसळपावच्या सर्व वाचकांना, सरपंचांना व हितचिंतकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

छोटा डॉन [ आमची कुठेही शाखा नाही ]

Share this!

धनंजय's picture

31 Dec 2007 - 4:46 pm | धनंजय

मिसळपावावर सर्वांना नववर्षाचे अभिनंदन!

ब्रिटिश टिंग्या's picture

31 Dec 2007 - 5:43 pm | ब्रिटिश टिंग्या

राम राम मंडळी,
मी आज प्रथमच मिसळपावच्या अड्ड्यावर आलो आहे आणि हा माझा पहिलाच प्रतिसाद आहे.
माझ्यातर्फे मिसळपावच्या सर्व वाचकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
आपला,
(टून्न झालेला) छोटी टिंगी

ता.क. पहिलाच प्रतिसाद असल्यामुळे चु.भु.दे.घे.

तात्या विंचू's picture

31 Dec 2007 - 6:12 pm | तात्या विंचू

आपणा सर्वाना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

व्यंकट's picture

31 Dec 2007 - 8:08 pm | व्यंकट

नववर्ष आपणा सर्वाना सुखाचे, समाधानाचे आणि भरभराटीचे जावो ही शिवचरणी (आज सोमवार) प्रार्थना !!!!

विसोबा खेचर's picture

31 Dec 2007 - 8:18 pm | विसोबा खेचर

हा हा हा व्यंकटराव! सोमवारचा उपास असतो की काय तुमचा?

बाय द वे, शंकरदेखील जाम दारू प्यायचा/पितो अशी माझी माहिती आहे! :)

चूभूद्याघ्या!

आपला
(शिवभक्त) तात्या.

ते असो, रात्रीचे ८ वाजले आहेत. आता आमची निघायची वेळ झाली. एका मित्राच्या घरी मस्तपैकी गाण्याची बैठक जमणार आहे! पुरिया कल्याणने सुरवात करेन म्हणतो! दोन पेग झाल्यावर बिहाग किंवा मालकंस गाऊ! येताय का बोला? :)

आपला,
(अण्णांचा एकलव्यशिष्य) तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

31 Dec 2007 - 10:54 pm | प्रकाश घाटपांडे

बाय द वे, शंकरदेखील जाम दारू प्यायचा/पितो अशी माझी माहिती आहे! :)
तात्या शिवभक्त "बम भोलेनाथ!" असं म्हणुन बंटा/घोटा/चिलिम मारतात. सोमरस पिणारे ते इंद्राच्या दरबारातील देव मंडळी. तुम्ही मस्त पैकी "मारु" बिहाग "टाका"
( शिव! शिव! भक्त)
प्रकाश घाटपांडे

व्यंकट's picture

1 Jan 2008 - 5:59 am | व्यंकट

तात्याराव,
आमच्या मातोश्री ज्या दिवशी साबुदाण्याची खिचडी व खीर, बटाट्याचा शिरा, उकडलेली अथवा पाकातील रताळी , भगर, शेंगदाणे घालुन केलेली ताकाची आमटी वैगेरे पदार्थ करतात, त्या दिवशी आम्ही भरपेट उपवास करतो. घरापासून दूर आणि महिनाखेरीस खिशात दमडीही नसल्यामुळे सुद्धा आम्हांस काही कडकडीत उपवास घडले आहेत, पण ते असो.
शिवचरणी प्रार्थना करावयाचे प्रयोजन म्हणजे शिव ही निवृत्तीची, शेवटाची इष्टदेवता आहे, आणि २००७ चा शेवट सोमवारी झाला आहे. जय शंकर!

शंकर मद्यपान करीत होते / करतात किंवा कसे ह्याबद्दल आम्हांस पुरेशी पौराणीक माहिती नाही, परंतु देवकल्याणा करिता त्यांनी हलाहल प्राशन केल्याची कथा वाचल्याचे आठवते. अध्यात्मिक दृष्ट्या तुमच्या आमच्यात शिवाचा निवास असल्याने त्यांच्या कडून सुरापान होत असावे, किंवा जे घडते आहे ते सत्य आहे आणि सत्य ही शिव है, अशा द्रविडी प्राणायामावर विश्वास ठेवावयास आम्ही तयार आहोत.

आपले निमंत्रण वाचून अत्यंत आनंद झाला, ठाणे-मुंबई परिसरात आमचे येणे झाल्यास आपल्या सूर-(आणि सुरा)-संध्येत सहभागी होण्यास अनुक्रमे कान व कंठ उत्सुक असतीलच.

पुन्हा एकदा शिवचरणी खालील शिवपंचाक्षरी अर्पून वर्षाचा शेवट व नव्या वर्षाचे स्वागत करूयात...

ओंकारम बिंदू संयुक्तम नित्यं ध्यायंन्ती योगिनः !
कामदं मोक्षदंचैव ओंकाराय नमो नमः ||

नमन्ती ऋषयो देव नमन्त्याप्सरसंगणा |
नरा नमन्ती देवेशम काराय नमो नमः ||

महादेवम महात्मानम महाध्यायम परायणम |
महापापहरंदेवम काराय नमो नमः ||

शिवमशांतम जगन्नाथम लोकानुग्रह कारकम |
शिवमेका पदम नित्यम शिकाराय नमो नमः ||

वाहनम वृषभो यस्य वासुकी कंठ भुषणं |
वामे शक्ती धरं देवं काराय नमो नमः ||

यत्र यत्र स्थितो देव सर्व व्यापी महेश्वरः |
योगुरू सर्व देवानाम काराय नमो नमः||

विसोबा खेचर's picture

1 Jan 2008 - 9:21 am | विसोबा खेचर

आमच्या मातोश्री ज्या दिवशी साबुदाण्याची खिचडी व खीर, बटाट्याचा शिरा, उकडलेली अथवा पाकातील रताळी , भगर, शेंगदाणे घालुन केलेली ताकाची आमटी वैगेरे पदार्थ करतात, त्या दिवशी आम्ही भरपेट उपवास करतो.

वा वा, तुमची भरपेट उपास करण्याची पद्धत आवडली! :)

अध्यात्मिक दृष्ट्या तुमच्या आमच्यात शिवाचा निवास असल्याने त्यांच्या कडून सुरापान होत असावे, किंवा जे घडते आहे ते सत्य आहे आणि सत्य ही शिव है, अशा द्रविडी प्राणायामावर विश्वास ठेवावयास आम्ही तयार आहोत.

हम्म! आमच्यातला शंकरच बहुधा दर बुधवारी आणि शनिवारी संध्याकाळी आमच्याकडून सुरापानाचे कार्य करवून घेत असावा! शेवटी कर्ताकरविता तो आहे हेच खरं! :))

आपले निमंत्रण वाचून अत्यंत आनंद झाला, ठाणे-मुंबई परिसरात आमचे येणे झाल्यास आपल्या सूर-(आणि सुरा)-संध्येत सहभागी होण्यास अनुक्रमे कान व कंठ उत्सुक असतीलच.

अगदी अवश्य भेटू. आम्हाला निश्चितच आनंद वाटेल! आपली भेट बुधवारी किंवा शनिवारी झाल्यास आमच्यातल्या शिवाशीही तुमची गाठ पडेल! :)

सत्यं शिवं सुंदरम! असो..!

अवांतर - कृपया येताना आमच्याकरता 'डूटीफरी' मधुन एक बाटली ग्लेन मोरांजी घेऊन या. त्याचे जे काही पैशे होतील ते आम्ही आपणास प्रत्यक्ष भेटीत नक्की देऊ!

आपला,
(ग्लेन मोरांजीप्रेमी!) तात्या.

व्यंकट's picture

1 Jan 2008 - 10:44 pm | व्यंकट

ठरलं तर.... ग्लेनचा आमचा दरवर्षीचा २ लिटर ( आयातीची सरकारमान्य कमाल मर्यादा) चा रतीब असतो आणि त्याचे आम्ही पैसे घेत नाही. इट्स लाईक इन्लुडेड इन द प्राईस ऑफ द टिकीट.

विसोबा खेचर's picture

3 Jan 2008 - 5:12 am | विसोबा खेचर

ठरलं तर मग व्यंकटराव! :)

तात्या.

मुक्तसुनीत's picture

31 Dec 2007 - 8:09 pm | मुक्तसुनीत

सर्व "रसिक" मिसळपावकराना आमच्या तर्फे नववर्षाच्या शुभेच्छा !

सुनील's picture

31 Dec 2007 - 11:09 pm | सुनील

सर्व मिसळपावकरांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !!!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नीलकांत's picture

1 Jan 2008 - 10:48 am | नीलकांत

सर्व मिसळपावकरांना नव्या वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !

नीलकांत

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Jan 2008 - 1:03 am | बिपिन कार्यकर्ते

सर्व मिसळपावकरांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !!!!

बिपिन.

इनोबा म्हणे's picture

2 Jan 2008 - 1:21 am | इनोबा म्हणे

बोंबला!आम्ही उशिरा आलो म्हणायचे.पण काय झाले; आमच्या छोट्या भावाला एक छोटासा अपघात झाल्यामुळे इस्पितळात दाखल करावे लागले त्यामुळे आमची वर्षाखेर दवा'दारूत' गेली,तरीही आम्ही वेळ साधून 'नं.१'(समझनेवालेको इशारा काफी है) रिचवलीच्.असो!आमची 'कर्म्'कहाणी सांगून तुमचे नविन वर्ष खराब करणे नाही.
नुतन वर्ष सुखसमृद्धीचे आणी भरभराटीचे जावो!

विसोबा खेचर's picture

2 Jan 2008 - 6:23 pm | विसोबा खेचर

अनिवसे साहेब,

आता आपल्या भावाची तब्येत कशी आहे? काळजी घ्या...

असो, आपल्या दोघांनाही नववर्षाच्या शुभेच्छा!

तात्या.

इनोबा म्हणे's picture

3 Jan 2008 - 2:06 pm | इनोबा म्हणे

तात्या,
आता तब्येत ठिक आहे,पण हात 'प्लास्टर' नामक आवरणात गुंडाळून ठेवला आहे.

झकासराव's picture

2 Jan 2008 - 3:44 pm | झकासराव

तिकडे सुंदरी इथे सुरा
क्या बात है.
सर्व मिसळपाव प्रेमीना नववर्षाच्या अनेकोत्तम शुभेच्छा. :)

मनीष पाठक's picture

2 Jan 2008 - 4:58 pm | मनीष पाठक

आम्हालाही तसा उशिराच झाला की! सर्व मिसळपाव प्रेमीना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!

मनीष पाठक