जीवनात कितीतरी लोक येतात,जातात.काही आठवणीत रहातात काहींचे विस्मरण होते.काहीच बोटावर मोजण्याइतपत व्यक्ती की ज्या चटका लावून जातात.त्यातील काही खुपच महत्वाच्या तर काही अगदीच नगण्य.
माणसाच्या स्वभावावर बरेच काही अवलंबून आसते.आशीच आमच्या सोसायटीतील कचरा उचलणारी बाई.कधीच गैरहजर नाही.दुर्मुखलेला,केविलवाणा चेहरा स्वताच्या गरिबीचे रडगाणे कधीच नाही.
वेळ ठरलेली,अशिक्षित,एकदाच घंटी वाजवणार,दार उघडताच सुहास्य मुद्रेने "गुडमॉर्निंग "'जरूर म्हणणार. दिवाळी होळीत "पोस्त ",द्या म्हणून हात पसरलेला कधी आठवत नाही."आजी कशा आहात,ऐ छोटी तुझी बाहुली मला देतेस का", म्हणून प्रत्येकाची चौकशी जरूर करणार.करोना मधे विषेश विचारपूस आणी वृद्ध दाम्पत्यांना लागेल तशी व जमेल तशी मदत केली.आज अचानक बातमी आली की तीने आत्महात्या केली.सर्व सोसायटी हळहळली.
तीचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आला.तशी घरची गरीबी पण हसतमुख म्हणून सगळे चांगले नसले तरी ठीकच असणार आसा समज.आता परत दिसणार नाही.
ती रोज येत होती
लेवून वस्त्रे विस्तवांची
कळली कुणास नाही
धग त्या अग्निशिखांची
नव्हते कुणास ठावे
रहस्य प्रसन्न मुखड्याचे
कळले कुणास नाही
त्या मागले गुपित दुखड्याचे
रोजची सकाळ आली
टळली वाट तीच्या येण्याची
बधीर सर्व झाले
ऐकुन वार्ता तीच्या निधनाची
संपविला अचानक खेळ
तीनेच आपल्या जीवाचा
तेव्हां खरा कळाला
भेद हसर्या प्रसन्न मुखड्याचा
होती जरी ती नगण्य पण
गरीब ,नेक ,स्वाभिमानी
घेऊनी कचरा घरा घरातून
सुहास्य पेरून जात होती
१५-४-२०२२
भावपूर्ण श्रद्धांजली.
प्रतिक्रिया
15 Apr 2022 - 9:50 pm | भागो
चटका लावणारा लेख. कविताही तशीच.
लोक अशी धाडकन आत्महत्त्या का करतात सगळे मायेचे पाश तोडून. अवघड आहे.
15 Apr 2022 - 11:11 pm | मुक्त विहारि
अरेरे ...