शारदा साहित्य संमेलन रद्द हा निर्णय कौतुकस्पद..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
2 Dec 2008 - 11:26 pm

नुकत्याच मुंबईत घडलेल्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, त्या घटनेमागचे गांभिर्य जाणून रत्नांग्रीत होऊ घातलेले शारदा साहित्य संमेलन रद्द करण्यात आले असून त्या पैशांतून जखमींची आणि शहिदांची मदत केली जाणार आहे असे कळले.. मंगेश पाडगावकर हे या संमेलनाचे संकल्पित अध्यक्ष होते..

माझ्या मते ही घटना खरंच कौतुकास पात्र आहे!

महाराष्ट शासनाच्या २५ लाखांवर अमेरीकावारीची फुक्कटची पोळी भाजण्याचे स्वप्न रंगवीत असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संकल्पित अध्यक्ष पानतवणे आणि इतर पदाधिकारी यावरून काही धडा घेतील अशी अपेक्षा आहे, अर्थात ती व्यर्थ आहे!

तात्या.

वाङ्मयअभिनंदनमाहितीप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

सर्किट's picture

2 Dec 2008 - 11:53 pm | सर्किट (not verified)

शारदा संमेलन रद्द करण्याच्या निर्णयाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.

सध्या रद्द सत्र सुरू आहे, असे कळते.

सामान्य भारतीय नागरिकांच्या दैनांदिन जीवनावर परिणाम घडवून आणण्याचा अतिरेक्यांचा डाव यशस्वी होतोय, असे म्हणावे लागेल.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

विसोबा खेचर's picture

3 Dec 2008 - 12:13 am | विसोबा खेचर

सामान्य भारतीय नागरिकांच्या दैनांदिन जीवनावर परिणाम घडवून आणण्याचा अतिरेक्यांचा डाव यशस्वी होतोय, असे म्हणावे लागेल.

तो तर नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे यशस्वी झालाच आहे! दैनंदिन जीवनाचेच जर म्हणत असाल तर तीन दिवस मुंबईत कुलाबा विभागात कुणाही सामान्य नागरिका वावरता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु भारताच्या नालायक गृहखात्यामुळे पोलिसांना आणि सैन्याला आपले जवान मात्र गमवावे लागले. आणि म्हणूनच रत्नांग्रीत होऊ घातलेल्या शारदा साहित्य संमेलनाच्या संवेदनशील पदाधिकार्‍यांनी संमेलन रद्द करून त्या पैशांतून शहिदांना आणि जखमींना काही मदत करायचे ठरवले आहे..

फुकाच्या अमेरीकावारीला चटावलेल्या अभामसा संमेलनाध्यक्षांनी आणि पदाधिकार्‍यांनी रत्नांग्रीतल्या संमेलनातील पदाधिकार्‍यांकडून काही एक धडा घ्यावा व महाराष्ट्रात उद्भवलेल्या आजच्या दु:खाच्या प्रसंगी महाराष्ट्र शासनाचे २५ लाख रुपये तरी किमान वाचवावेत असे कळकळीने वाटते..!

एवढेच नव्हे, तर अनिवासी मराठी माणसांनीदेखील हे २५ लाख रुपये महाराष्ट्रातील गरजूंना कसे मिळतील हे याक्षणी पाहणे महत्वाचे आहे असेही कळकळीने वाटते! निदान या प्रसंगी तरी त्यांनी आपली सांस्कृतिक व साहित्यिक आवड संपूर्णपणे स्वत:च्या पैशांवर जोपासावी, महाराष्टीय जनतेच्या २५ लाख रुपयांपैकी नव्या पैशालाही हात लावू नये असे वाटते!

तात्या.

इथे वेगवेगळे कार्यक्रम आखण्यात सगळे बिझी आहेत.

कुणाला वेळ आहे असल्या गोष्टींचा विचार करायला?

ममं च्या साईट वरती लाल अक्शराने काहीतरी खरडायच http://mmbayarea.org/ आणि लगोलग इ-मेल पाठवायची की "संमेलनाचं तिकिट काढा" म्हणून.
ममं ने २५ लाख घेतलेत की नाही नक्की माहित नाही. घेतले असतील तर त्यांच्यासारखे करंटे तेच. अश्या मंडळाबरोबर कधी काही कार्यक्रम केले हे सांगायची पण लाज वाटेल.

सर्किट's picture

3 Dec 2008 - 3:19 am | सर्किट (not verified)

अश्या मंडळाबरोबर कधी काही कार्यक्रम केले हे सांगायची पण लाज वाटेल.

काही वेगळ्या कारणांसाठी, माझा ह्या संमेलनातला कार्यक्रम मी रद्द केलेला आहे.

त्यामुळे मला अजीबात लाज वाटत नाही.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

एक's picture

3 Dec 2008 - 3:32 am | एक

२५ लाख घेतले असतील तर अश्या मंडळाबरोबर कधी काही कार्यक्रम केले होते हे सांगायची लाज वाटेल

सर्किट's picture

3 Dec 2008 - 9:57 am | सर्किट (not verified)

देवकुळेला (अध्यक्ष, महाराष्ट्र मंडळ, बे एरिया) "मित्रत्वाच्या भावनेतून" पाठवलेल्या मेल मध्ये मी असे लिहिले होते:

Also, I forgot to mention, that accepting the standard sammelan donation of Rs. 25 lakhs from Maharashtra Govt now, will be the biggest blunder on your part.

You should politely reject the donation from Maharashtra Govt publicly, with a lot of fanfare.

Let them know that by rejecting this amount, you stand with the overwhelmingly general sentiment of marathi people.

-- सर्किट

कोलबेर's picture

3 Dec 2008 - 10:00 am | कोलबेर

सर्किट राव तुमचे रोखठोक उत्तर आवडले, २५ लाखाचा मुद्दा सोडला तर संमेलनविरोधकांकडे कोणताच ठोस मुद्दा नव्हता.
माहाराष्ट्र मंडळ अध्यक्षाला एका मराठी माणासाची इमेल इंग्रजीत का?

सर्किट's picture

3 Dec 2008 - 10:02 am | सर्किट (not verified)

ज्याची इमेल ज्या भाषेत येते, त्याला त्याच भाषेत इमेल पाठवणे हा माझा धर्म आहे :-)

-- सर्किट

विसोबा खेचर's picture

3 Dec 2008 - 10:07 am | विसोबा खेचर

२५ लाखाचा मुद्दा सोडला तर संमेलनविरोधकांकडे कोणताच ठोस मुद्दा नव्हता.

माझा व्यक्तिश: विरोध फक्त त्या २५ लाखांकरताच होता, आहे, आणि राहील! संमेलनाला विरोध असण्याचे बाकी काहीच कारण नाही!

बाय द वे, सर्किटरावांना देवकुळेंचे काय उत्तर आले हेही वाचायला आवडेल! ;)

तात्या.

सर्किट's picture

3 Dec 2008 - 10:08 am | सर्किट (not verified)

बाय द वे, सर्किटरावांना देवकुळेंचे काय उत्तर आले हेही वाचायला आवडेल!

मीही वाट पाहतो आहे.

-- सर्किट

मुक्तसुनीत's picture

3 Dec 2008 - 10:14 am | मुक्तसुनीत

मामला पंचवीस लाखांपेक्षा जास्त रकमेचाही असू शकतो. (म्हणजे त्याबद्दल चर्चा होऊ शकते.)

रत्नागिरीचे संमेलन रद्द करून त्याच्या खर्चाची रक्कम दहशत-पीडीतांकरता जाणार आहे. सान फ्रान्सिस्कोकरांना हे खचितच करता येईल. मी स्वतः सान फ्रान्सिस्कोकरांच्या संमेलनाच्या बाजूने इथे मिपावर व काही अन्य ठिकाणी भांडलो आहे. पण जो त्याग रत्नागिरीच्या संमेलनकर्त्याना करता येणार आहे तो सान फ्रान्सिस्कोकरांना जमायला हवा असे मला वाटते. तरच सान फ्रान्सिस्कोकरांना किंवा कुठल्याही अनिवासी मराठी बांधवांना संमेलन भरवण्याचा अधिकार राहील.

एक's picture

3 Dec 2008 - 11:22 pm | एक

तिकडून काय उत्तर आलं याची उत्सुकता आहे!

उत्तर आलं तर जाहिर कराल काय?

सर्किट's picture

3 Dec 2008 - 11:50 pm | सर्किट (not verified)

उत्तर आलं तर जाहिर कराल काय?

नाही. मला आलेल्या इमेल्स, पाठवणार्‍याची परवानगी असल्याशिवाय (किंवा एफ बी आय च्या वॉरंटशिवाय) मी प्रसिद्ध करणार नाही.

(ता. क. उत्तर आले आहे, परंतु मी दिलेल्या सल्ल्याशी प्रतिकूल असे.)

-- सर्किट

एक's picture

3 Dec 2008 - 11:52 pm | एक

.

मुक्तसुनीत's picture

3 Dec 2008 - 11:55 pm | मुक्तसुनीत

(ता. क. उत्तर आले आहे, परंतु मी दिलेल्या सल्ल्याशी प्रतिकूल असे.)
म्हणजे देवकुळे आणि समस्त एसेफो मराठी कार्यकर्त्यांनी ( बिपीन नव्हे ! ;-) ) आता चहूकडून लोकक्षोभाचे फटके खायला तयार व्हायला हरकत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2008 - 11:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला आलेल्या इमेल्स, पाठवणार्‍याची परवानगी असल्याशिवाय (किंवा एफ बी आय च्या वॉरंटशिवाय) मी प्रसिद्ध करणार नाही.

हा हा हा हा !

(ता. क. उत्तर आले आहे, परंतु मी दिलेल्या सल्ल्याशी प्रतिकूल असे.)

सल्ला काय होता,ते कळेल का ?

-दिलीप बिरुटे

सर्किट's picture

4 Dec 2008 - 12:25 am | सर्किट (not verified)

सल्ला वरच दिलेला आहे.

-- सर्किट

विसोबा खेचर's picture

4 Dec 2008 - 12:10 am | विसोबा खेचर

(ता. क. उत्तर आले आहे, परंतु मी दिलेल्या सल्ल्याशी प्रतिकूल असे.)

आपण त्यांना लिहिलेले पत्र जसे इथे प्रसिद्ध केलेत, त्याच न्यायाने त्यांचे जे उत्तर आपल्याला आले आहे आहे तेही आपण येथे प्रसिद्ध करावेत असे वाटते!

तात्या.

सर्किट's picture

4 Dec 2008 - 12:23 am | सर्किट (not verified)

मी लिहिलेले पत्र पाठवणारा मी होतो, आणि माझी ते प्रसिद्ध करण्यास परवानगी होती, त्यामुळे मी ते प्रसिद्ध केले.

हा फरक कृपया लक्षात घ्यावा ही विनंती.

-- सर्किट

विसोबा खेचर's picture

4 Dec 2008 - 12:27 am | विसोबा खेचर

हा फरक कृपया लक्षात घ्यावा ही विनंती.

नाही, हा मुद्दा योग्यच आहे. तरीही पाठवा बिनधास्त तिच्यायला. बघुया तो देवकुळे काय करतो!

तात्या.

छोटा डॉन's picture

4 Dec 2008 - 12:34 am | छोटा डॉन

>>तरीही पाठवा बिनधास्त तिच्यायला. बघुया तो देवकुळे काय करतो!
=)) =))
मस्तच हो तात्या, लै भारी, आवडले एकदम ...

सर्किटभाय, जर तो / ते देवकुळे जास्त डोक्याला शॉट व्यक्ती नसतील तर उत्तर वाचायला आवडेल ...
नसेल तर द्या सोडुन ...

छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना

आजानुकर्ण's picture

3 Dec 2008 - 12:13 am | आजानुकर्ण

नुकत्याच मुंबईत घडलेल्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, त्या घटनेमागचे गांभिर्य जाणून रत्नांग्रीत होऊ घातलेले शारदा साहित्य संमेलन रद्द करण्यात आले असून त्या पैशांतून जखमींची आणि शहिदांची मदत केली जाणार आहे असे कळले.. मंगेश पाडगावकर हे या संमेलनाचे संकल्पित अध्यक्ष होते..

अतिशय चांगला निर्णय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2008 - 9:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जमा असलेल्या पैशांतून जखमींची आणि शहिदांची मदत केली जाणार आहे ,शारदा साहित्य संमेलन रद्द झाले त्यांनी घेतलेला निर्णय उत्तमच !! आता एक साहित्य संमेलन रद्द झाले म्हणून अमेरिकेतील अभाविसासं रद्द व्हायलाच पाहिजे असे काही नसावे. नागरिकांच्या दैनंदिन जीवन व्यवहारावर परिणाम घडवून आणण्याचा अतिरेक्यांचा डाव यशस्वी होतोय असे अतिरेक्यांना वाटू नये, त्यासाठी जगरहाटी थांबता कामा नये. शो मस्ट गो ऑन !!!

-दिलीप बिरुटे

सर्किट's picture

3 Dec 2008 - 9:47 am | सर्किट (not verified)

बिरुटे गुर्जी,

पानतावण्यांचे ह्या संमेलनाविषयी काय विचार आहेत, ते एकदा पुन्हा मुलाखत घेऊन कळवा...

ह्या साहित्य सम्मेलनाच्या निमित्ताने सारेगम ही संगीत स्पर्धा होणार आहे असे कळते, त्यात पानतावणे कोणती गाणी म्हणणार आहेत ? हेही कळवा..

दरम्यान आमचेही काही मूलभूत विचार आम्ही पानतावण्यांना कळवू इच्छितो ;-)

-- सर्किट

विसोबा खेचर's picture

3 Dec 2008 - 10:41 am | विसोबा खेचर

आता एक साहित्य संमेलन रद्द झाले म्हणून अमेरिकेतील अभाविसासं रद्द व्हायलाच पाहिजे असे काही नसावे.

नक्कीच नसावे. परंतु महारष्ट्राच्या जनतेच्या २५ लाखांवर संमेलनाची मजा मारली जाऊ नये एवढेच आमचे म्हणणे! आज त्या पैशांची महाराष्ट्राला अधिक गरज आहे. शिवाय, पूर्णत: स्वत:च्या हिंमतीवर साहित्य संमेलन भरवण्याइतकी परदेशस्थ मराठी माणसे नक्कीच समर्थ आहेत..

अभामसासं च्या अध्यक्षांची आणि पदाधिकार्‍यांची महाराष्ट्रीय जनतेच्या पैशांवर परदेशवारीची पोळी पिकली जाऊ नये असे कळकळीने वाटते!

बिरुटेसर, पानतावणेसर आपल्या व्यक्तिगत परिचयाचे आहेत. त्यांच्यापर्यंत आंतरजालावर मराठीच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी मिसळपाव हे २५०० + सभासदसंख्या असलेल्या एका संस्थळाचा जबाबदार चालक, या नात्याने माझे म्हणणे कृपया पोहोचवा ही विनंती!

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2008 - 6:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंचवीस लाखाच्या मुद्याशी सहमत आहे. अध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांचा खर्च बे एरियाचे मंडळ उचलणार असल्यामुळे त्यांनी काही अवांतर खर्चाला फाटा देऊन जर महाराष्ट्रातील नुकत्याच घटनेतील जखमींना काही मदत केली, काही आधार दिला तर मलाही आपल्याइतकाच आनंद होईल.

पानतावणे सरांइतकेच तात्या,सर्किट, आणि मिपावरील मित्रमंडळींच्या भावनेवरही तितकेच प्रेम असल्यामुळे एखाद्या धावत्या भेटीत आपला विचार नक्की बोलून पाहीन.

-दिलीप बिरुटे