मुख्यमंत्र्यांचे संतापजनक वक्तव्य.

सुनील मोहन's picture
सुनील मोहन in जनातलं, मनातलं
2 Dec 2008 - 12:02 pm

शहीद मेजर संदीप उन्नीकॄष्णन यांचे घर नसते तर तिथे कुत्रेही फिरकले नसते.

असे निर्बुद्ध आणि चीड आणणारे वक्तव्य केरळचे मुख्यमंत्री श्री. अच्युतानंद यांनी केले आहे.
मूळचे केरळचे सुपुत्र असणारे मेजर उन्नीकॄष्णन यांच्या अंत्यसंस्काराला अच्युतानंद उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर दोन दिवसांनी ते उन्नीकॄष्णन यांच्या परिवाराला भेटण्यासाठी त्यांच्या बेंगलुरु स्थित निवासस्थानी पोहोचले.
तत्पूर्वी उन्नीकॄष्णन यांच्या घराची सुरक्षारक्षक आणि श्वानपथकामार्फत तपासणी करण्यात आली होती. कदाचित याच मुळे मे.उन्नीकॄष्णन यांच्या वडीलांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्यास नकार दिला होता.

यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री महोदयांनी वरील प्रमाणे वक्तव्य केले असे सकाळ मधे म्हटले आहे.

राजकारणी लोकांनी जरा विचार करून, संयत प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत. उन्नीकॄष्णन यांच्या वडीलांची मानसिक स्थिती लक्षात घेता त्यांनी कठोर शब्द वापरले असतील .ज्या बापाचा तरूण मुलगा देशासाठी शहीद झालाय त्याला दु:खावेग आवरता आला नसेल तर ते स्वाभाविकच आहे. पण केरळ च्या मुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे
माणुसकीहीन वक्तव्य करणे हे निषेधार्ह आहे.

म्हणूनच केरळचे मुख्यमंत्री अच्युतानंद यांचा जाहीर निषेध.

समाजराजकारणविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

2 Dec 2008 - 12:21 pm | घाशीराम कोतवाल १.२

केरळचे मुख्यमंत्री अच्युतानंद यांचा जाहीर निषेध.
मुख्यमंत्री अच्युतानंद तुम्हाला चपलेनि मारले पाहीजे

मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

लवंगी's picture

3 Dec 2008 - 7:37 am | लवंगी

१०० जोडे हाणून १ मोजायला हवा

केरळचे मुख्यमंत्री अच्युतानंद या फडतूस माणसाची कुत्रा होण्याची तरी लायकी आहे का ?
तो तरी इमानी असतो.
नाव अच्युतानंद लावतात आणि वक्तव्य षंढासारखे करतात.

संदीप उन्नीकृष्णन सारख्या देशासाठी शहीद झालेल्या शूर सैनिकाच्या परिवाराचा संताप योग्यच आहे.
कुत्र्यांनी घराची तपासणी करायला काय अतिरेक्याचे घर आहे होय?

अरे त्या अच्युतानंदाच्याच घराची झडती घ्या, त्याच्याच घरी अतिरेक्यांना मदत केल्याचे पुरावे सापडतील.
असे लोक आपल्या देशात दुर्दैवाने मुख्यमंत्री होतात हे केरळ्सारख्या पर्यटनक्षेत्राचे दारिद्र्य आहे.

अरे एवढी हिम्मत आहे तर अतिरेक्यांशी दोन हात करायला संदीप उन्नीकृष्णन च्या जागी जायचे होते.
(देशप्रेमी) सागर

केरळचे मुख्यमंत्री अच्युतानंद या फडतूस माणसाची कुत्रा होण्याची तरी लायकी आहे का ?
सहमत
डिझाईनींगच्या विचारात गढुन गेलेला SANDEEP

भारत देश ह लोकशाही प्रधान देश आहे.

आपली जनताच मुख्यमन्त्री निवडुन देते.

अशा नालायक माणसाला निवडुन का दिले ?

पुन्हा मत देताना हजार वेळा विचार करा.

ऋषिकेश's picture

2 Dec 2008 - 1:22 pm | ऋषिकेश

केरळाचे मुख्यमंत्री (अ)च्युतानंद यांचा निषेध!!!
काम आयबीएन वर या कोपिष्ट मुख्यमंत्र्यांचा विडीयो दाखवत होते.. ह्या मुख्यमंत्र्याने देऊ केलेले काहि पैसे /देणगी उन्नीकृष्णनच्या कुटुंबीयांनी नाकारले तेव्हा म्हणे हा रागावला :)

-(गोंधळलेला) ऋषिकेश

विसोबा खेचर's picture

2 Dec 2008 - 4:56 pm | विसोबा खेचर

शहीद मेजर संदीप उन्नीकॄष्णन यांचे घर नसते तर तिथे कुत्रेही फिरकले नसते.

वरील उद्गार काढणारे केरळचे मुख्यमंत्री माझ्या मते अत्यंत भयानक मानसिक रोगाने ग्रासलेले असून मला त्यांची कीव येते! सबब, ठाण्याच्या मनोरुग्णालयात त्यांच्या नेण्या-आणण्याचा, उपचारांचा सर्व खर्च करायला मी तयार आहे!

तात्या.

टारझन's picture

2 Dec 2008 - 11:42 pm | टारझन

-- (उपचारपेमी) तात्या
हे लिहायचं राहिलं ... चु.भू.द्या.घ्या.

- टारझन

सहज's picture

2 Dec 2008 - 5:39 pm | सहज

आता तरी कम्युनिस्ट असो वा कॉग्रेस वा भाजप किंवा अन्य प्रादेशीक पक्ष सर्वच्या सर्व कसे नालायक लोकांनी भरले आहेत हे सगळ्यांना पहायला मिळाले.

तरी आता प्रश्न हा की यातले कोणी ना कोणी परत निवडून येणार. पर्याय काय? :-(

सध्यातरी ह्या प्रकरणाचा छडा लावणे व लवकरात लवकर दोषींना शिक्षा करणे [खटले भरुन शिक्षा अशक्य असेल तर ते लोक जिथे आहेत तिथे जाउन त्यांच्या शिक्षा ....] हे तरी झालेच पाहीजे. शिवाय आपली सुरक्षा व्यवस्था अजुन भक्कम करणे.

एकलव्य's picture

2 Dec 2008 - 6:47 pm | एकलव्य

एका शहीद जवानाच्या मरणोत्तर हेटाळणी करणार्‍या या वाक्यावरून हा मुख्यमंत्री किती हरामखोर असावा हे कळते. केऱळच्या जनतेने या मुख्यमंत्र्याला हाकलून द्यावे. (नाही झाले तर कोणीतरी काहीतरी करावे.)

- एकलव्य

कपिल काळे's picture

2 Dec 2008 - 7:39 pm | कपिल काळे

संपादक मंडळी धावा धावा.. इथे कम्युनिस्ट येणार थोड्याच वेळात..
अरे अच्युतानंद सारख्या महान नेत्याची तुलना तुम्ही कुत्र्याशी कशी करता. त्यांच्याएवढा आदर्शवादी, तत्वनिष्ठ कोणी नाही बरं.

सुनील भो..
तुम्हाला कालचा मी टाकलेला धागा माहित नाही वाटतं . अहो काल मी पण हाच धागा टाकला. तेव्हा मिपावरचे एक कॉम्रेड चवताळले. त्यांच्या असभ्य भाषेमुळे माझा मूळ धागा उडवावा लागला.

अहो हा अच्युतानंद आहे लाल भाई. ह्या लाल भाईंना कामं तर काही करायला नकोत. शेतकरी आणि कामगारांचा पक्ष असून बंगालात रिक्षा हाताने ओढली जाते. सरकारमध्ये होते गेली चार वर्षे तर प्रत्येक वेळी वेठीस धरायचे.

अश्या लाल तोंड्यांकडून वाकुल्यांचीच अपेक्षा करायची.

अच्युतानंदाचा निषेध!!

http://kalekapil.blogspot.com/

शिंगाड्या's picture

3 Dec 2008 - 6:59 pm | शिंगाड्या

शेतकरी आणि कामगारांचा पक्ष असून बंगालात रिक्षा हाताने ओढली जाते. सरकारमध्ये होते गेली चार वर्षे तर प्रत्येक वेळी वेठीस धरायचे.
सहमत
अच्युतानंदाचा निषेध!!

आजोबा तुम्ही मुख्यमंत्री नसता तर........ तुमच्या &^%^&* वर रोगट कुत्र्याने देखील ^$*(((^&^ केली नसती त्याचे काय ?

भिडू's picture

3 Dec 2008 - 10:00 pm | भिडू

मुंबई च्या आज च्या मोर्च्यामधे हा बॅनर पाहिला.

" I would rather a dog visited my house than a politician"

केवळ_विशेष's picture

5 Dec 2008 - 11:54 am | केवळ_विशेष

नावातला 'अ' सायलेंट आहे

भडकमकर मास्तर's picture

5 Dec 2008 - 4:31 pm | भडकमकर मास्तर

सत्तर ऐंशी वयाचे हे म्हणे मुरलेले राजकारणी...
...काय बरळतात यांचं यांना तरी कळतंय का?

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/