सरकारी इतमामात मरण.

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
2 Dec 2008 - 9:29 am

त्या काळरात्रीची ही काही प्रकाश(?)चित्रे.
आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचे सकारी इतमामात दहन होणार नाही पण मरण मात्र सहज मिळेल सरकारी इतमामात.
हे सर्व फोटो मिपा सदस्य आणि एक पत्रकार श्री उदय तानपाठक यांच्या मदतीने.

(मा. तात्या अभ्यंकर यांच्या पूर्वपरवानगीने प्रसिद्ध करत आहे.)

No man was hacked in the city;

those were only names

that were murdered.

Nobody beheaded anyone;

only the severed hats

had heads in them

And the the blood

you see on the streets

belongs to the butchered voices.

कुणास ठाउक?
कधी ?
कुठे?
केव्हां ?
मला भिती वाटते.
मरण्याचं ठिक आहे
येईल एकदाच
अनोळखी अंधार्‍या कोपर्‍यातून
भिती वाटते पावलोपावली
जगण्याची.

हे ताजे रक्त
वाळूत वाळेस्तो
सावल्या पळून जातील
अंधाराच्या आश्रयाला.
थोड्या वेळानी उगवेल एखादा चंद्र
अंधारावर मात केल्याची
देत ग्वाही.
एक आणखी दिवस पराभवाचा.

या फोटोसोबत कवितेच्या चार ओळी लिहीण्यात काही अर्थ नव्हता पण उद्या फोटो विसरायला होतील पण गुलझारच्या या रुपांतरीत कविता कुणीतरी वाचेल ,लक्षात ठेवील.

समाजलेखबातमी

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Dec 2008 - 9:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मरण्याचं ठिक आहे
येईल एकदाच
अनोळखी अंधार्‍या कोपर्‍यातून
भिती वाटते पावलोपावली
जगण्याची

अगदी खरं आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

2 Dec 2008 - 9:43 am | विसोबा खेचर

मरण्याचं ठिक आहे
येईल एकदाच
अनोळखी अंधार्‍या कोपर्‍यातून
भिती वाटते पावलोपावली
जगण्याची

खर आहे!

(व्हीटी स्टेशनावर खूप प्रेम असणारा मुंबईकर) तात्या.

ऋषिकेश's picture

2 Dec 2008 - 11:11 am | ऋषिकेश

मरण्याचं ठिक आहे
येईल एकदाच
अनोळखी अंधार्‍या कोपर्‍यातून
भिती वाटते पावलोपावली
जगण्याची

इतक्या ताकदीच्या शब्दांसोबत खरंच फोटोची गरज होती का?
सुन्न होतोच.. त्या सुन्नतेत आता अशी कणा-मणाने भर पडतेय

-(गोंधळलेला) ऋषिकेश

धमाल मुलगा's picture

2 Dec 2008 - 10:31 am | धमाल मुलगा

रामदास काका,

खरंच गरज होती का हो हे फोटो दाखवायची??????
:(

मदनबाण's picture

2 Dec 2008 - 10:44 am | मदनबाण

निघालो घरातुन
कधीच न परतण्यासाठी
ठेवुन गेलो तुला एकटाच मागे
कधीच न भेटण्यासाठी...
:(

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

दत्ता काळे's picture

2 Dec 2008 - 11:22 am | दत्ता काळे

? ? काय ल्याहावे . . .
शब्द ओसरुन गेले . . . .

अनामिका's picture

2 Dec 2008 - 11:29 am | अनामिका

रामदासकाका
जाणिवा बधिर करणारी दृष्य आहेत.
खरच आताशा जगायचीच भिती वाटु लागलीय.................
"नि:शब्द अनामिका"

परिकथेतील राजकुमार's picture

2 Dec 2008 - 12:00 pm | परिकथेतील राजकुमार

..........
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

सर्किट's picture

2 Dec 2008 - 12:01 pm | सर्किट (not verified)

होय, हे फोटो दाखवण्याची गरज होती.

हे फोटो राजकारण्यांच्या पोस्टर्स वर का नाहीत ?

देशमुखांचा / आबांचा / मनमोहनचा / शिवराजचा वाढदिवस कधी आहे ? त्यादिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या पोस्टरवर ह्यातील एखादा फोटो लावावा असे वाटते.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Dec 2008 - 12:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

देशमुखांचा / आबांचा / मनमोहनचा / शिवराजचा वाढदिवस कधी आहे ? त्यादिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या पोस्टरवर ह्यातील एखादा फोटो लावावा असे वाटते.

सर्किटरावांशी सहमत.
पण काय माहित, देशमुख हे फोटो रामूच्या पिक्चरच्या पोस्टरसाठीही वापरतील.

विनायक प्रभू's picture

2 Dec 2008 - 12:10 pm | विनायक प्रभू

हे फोटो नाममात्र आहेत. खरे फोटो बघुन अवलिया जन्माला आला.
खरे बघाल तर माणुस़की वरचा विश्वास उडेल.

धमाल मुलगा's picture

2 Dec 2008 - 12:19 pm | धमाल मुलगा

म्हणजे???

ह्याहुन आणखी विदारक काय आहे? .....आहे????

विनायक प्रभू's picture

2 Dec 2008 - 12:24 pm | विनायक प्रभू

माणुस असाल तर प्रत्येक घास अड्केल गळ्यात.

सर्किट's picture

2 Dec 2008 - 12:26 pm | सर्किट (not verified)

मास्तर,

माझं ऐका, पुन्हा पुन्हा त्या सीडीज नका बघत जाऊ.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

विनायक प्रभू's picture

2 Dec 2008 - 12:31 pm | विनायक प्रभू

सर्किटराव,
जातीने मास्तर ना. काय करणार. एकदा बघितले. आता मरेपर्यंत मेंदुचा सी.डी. प्लेयर चालूच राहणार.

टुकुल's picture

2 Dec 2008 - 12:18 pm | टुकुल

-----------

अनिल हटेला's picture

2 Dec 2008 - 12:22 pm | अनिल हटेला

..............................
----------------------

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

नाम्या झंगाट's picture

2 Dec 2008 - 1:19 pm | नाम्या झंगाट

वरील फोटो बघून खरोखर बधिर झालो.... सर्वांच्या मनात प्रवासाचे, आपल्या प्रियजनांना भेट्ण्याचे आणि सु़ख:दुखाचे दोन क्षण एकमेंकाबरोबर व्यतित करण्याचे प्रयोजन केलेले असेल... नियति असे भंयकर रुप घेऊन येईल कुणाच्या मनात पण नसेल...
शब्द नाहित इतकचं म्हणेल.........
(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट

लिखाळ's picture

2 Dec 2008 - 3:43 pm | लिखाळ

>मरण्याचं ठिक आहे
येईल एकदाच
अनोळखी अंधार्‍या कोपर्‍यातून
भिती वाटते पावलोपावली
जगण्याची. <
ह्म्म्म ! खरं आहे !
यातल्या एखाद्या जरी फोटोमुळे.. या आधी घडलेल्या अनेक प्रसंगातील एखाद्या जरी क्षणाच्या आठवणीने आपली झोप उडाली तरच उद्या बद्द्ल थोडे अश्वासन देता येईल.
-- लिखाळ.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

2 Dec 2008 - 3:47 pm | घाशीराम कोतवाल १.२

लिहायला शब्द नाहित खरच ..........
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...