या १७ अनामिक बळींची माहिती त्यांच्या कुटुंबियांना कशी मिळेल?

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
2 Dec 2008 - 7:58 am

सध्या अनामिक आणि बेवारस अवस्थेत मुंबईत शवागारात पडून असलेल्या या अतिरेक्यांच्या १७ बळींचे चेहेरे त्यांच्या नातेवाईकांपर्यंत कसे पोहोचू शकतील? आणि फक्त याविषयीची बातमी प्रसिद्ध करून मटा का थांबले आहे? त्या वृत्तपत्राला (किंवा नको तेंव्हा investigative journalisitc spirit दाखविणार्‍या वाहिन्यांना) ही छायाचित्रे घेण्यास व प्रसिद्ध करण्यास काही कायद्याच्या अडचणी आहेत काय? मुंबईतील कोणी मिपा कर त्या शवागारात जाऊन त्यांच्या चेहेर्‍यांची छायाचित्रे घेऊन प्रसिद्ध करू शकतील का?

समाजजीवनमानप्रकटनमाध्यमवेध

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

2 Dec 2008 - 8:15 am | सखाराम_गटणे™

डी एन ऐ चाचणी करु शकतात.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

2 Dec 2008 - 9:52 am | घाशीराम कोतवाल १.२

अहो गट्णे साहेब ते कोन कुठचे त्यांचे नातेवाईक आले तर डी एन ए चाचणी करु शकतो
आता मृतदेहाची डी एन ए चाचणी करुन ती कंपेअर कोना बरोबर करणार

मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...