कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का..
काल काय ऐकलं ते खरं हाय का...
सातार्याचे तुमी, तासगावचे तुमी, ते न्हाय न्हाय न्हाय लातूरचे तुमी
सांगा आमी काय ऐकलं ते खरं हाय का..
काल म्हनं तुमी मीटिंगला गेला.
मॅडमना राजीनामा देऊन आला.
केली कुनी खोडी, गेली लाल गाडी.
आज काय शिल्लक र्हायलंय का..!
आमी काय ऐकलं ते खरं हाय का..
कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का..
काल काय ऐकलं ते खरं हाय का...
दिल्लीमधे जवा बाँबस्फोट झाला.
तीन तासात तीन सूट बदलून आला.
हाय काय कोडं, सांगा तरी थोडं.
खाली नका बगू आता लाजताय का..!
काल काय ऐकलं ते खरं हाय का..
कसं काय पाटील बरं हाय का अहो बरं हाय का..
काल काय ऐकलं ते खरं हाय का..
मागच्या वेळी जवा निवडणूका झाल्या.
लोकसभेची सीट हरवून आला.
तरी झालात मंत्री, मागं पुढं संत्री.
यावेळी पुन्हा उभं राहताय का..!
आमी काय ऐकलं ते खरं हाय का..
कसं काय पाटील बरं हाय का अहो बरं हाय का..
काल काय ऐकलं ते खरं हाय का..
-- अभिजीत दाते
प्रतिक्रिया
1 Dec 2008 - 10:26 am | अनामिका
............................
"अनामिका"