महान इजिप्शियन संस्कृती

सागर's picture
सागर in जनातलं, मनातलं
24 Dec 2007 - 7:39 pm

महान इजिप्शियन संस्कृती

सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते. ह्या संस्कृतीने जगाला दिलेली अभूतपूर्व देणगी म्हणजे चक्र. चक्राचे उपयोग किती आहेत हे सांगण्याची गरजच नाही. आजकाल जगातील सर्व वाहने, यंत्रे वगैरे गोष्टी चक्रावरच चालतात. ही सुमेरियन संस्कृती युफ्रेटिस नदीच्या काठी उदयास आली. ज्याप्रमाणे सुमेरियन संस्कृतीचा आधार युफ्रेटिस नदी होती, त्याप्रमाणे इजिप्शियन संस्कृतीचा आधार नाइल नदी होती. यावरुन असे दिसून येते की जगातील बहुतेक प्राचीन संस्कृती नदीकाठी उदयास आल्या होत्या. आपली सिंधू संस्कृतीदेखील नदीकाठीच उदयास आली होती.

ह्या महान इजिप्शियन संस्कृतीचे तीन मुख्य काळ होते,’सुरुवातीचा काळ’, 'मध्य काळ' आणि 'अस्तकाळ'. सुरुवातीच्या काळात इजिप्शियन संस्कृती प्रगतीसाठी प्रयत्नशील होती. त्यानंतरचा मध्यकाळ हा इजिप्शियन संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ मानला जातो. याच मध्यकाळात इजिप्शियनांनी प्रगतीचे सुवर्णशिखर गाठले होते. त्यांच्या हातून अनेक अविस्मरणीय कलाकृतींची निर्मिती झाली. इजिप्शियन संस्कृतीने प्रगतीचे सुवर्णशिखर गाठले होते तो काळ सुमारे ४०० वर्षांचा मानला जातो. अशी ही महान इजिप्शियन संस्कृती सुमारे ५,१०० वर्षांपूर्वी उदयास आली.

इजिप्तचे 'अपर इजिप्त' म्हणजे 'दक्षिण इजिप्त' आणि 'लोअर इजिप्त' म्हणजे 'उत्तर इजिप्त' असे दोन भाग पडतात. इजिप्शियन संस्कृती मुख्यत: ह्या 'लोअर इजिप्त' म्हणजे 'उत्तर इजिप्त' मध्ये भरभराटीस आली. पुढील नकाशा ही गोष्ट स्पष्ट करेन.
http://www.civilization.ca/CIVIL/EGYPT/images/geogmape.gif

इजिप्तच्या सुवर्णमध्याच्या काळात तुतनखामुन (तुत-आँख-अमुन)(Tutankhamun) ' हा राजा इजिप्तच्या राजगादीवर आला. हा 'तुतनखामुन' राजा इजिप्तमध्ये अतिशय लोकप्रिय होता.'तुतनखामुन' हा 'फॅरोह' (pharaoh) वंशाचा राजा होता.ह्या 'तुतनखामुन'च्या कबरीचा पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे. इतिहास संशोधक आणि पुराणशास्त्रज्ञ यांच्या मते 'तुतनखामुन' चा पिरॅमिड जगातील सर्वोत्कृष्ट पिरॅमिड आहे. ते म्हणतात की, जगात जेवढे म्हणून पिरॅमिडस् असतील त्यात 'तुतनखामुन' चा पिरॅमिड सर्वोत्कृष्ट ठरेल. या 'तुतनखामुन'च्या पिरॅमिडचा शोध १९२२ मध्ये 'सर हॉवर्ड कार्टर' या इतिहास संशोधकाने लावला. 'तुतनखामुन'च्या पिरॅमिडमध्ये प्रवेश केल्यावर त्याच्या कबरीमध्ये त्याची 'ममी' पहायला मिळते.'तुतनखामुन' च्या ममीच्या चेहर्‍यावर जो मुखवटा आहे, तो पूर्णपणे शुद्ध सोन्याचा आहे. या मुखवट्यावरील कलाकुसर बघण्यासारखी आहे. या मुखवट्यावर नाग आणि गरुड ही दक्षिण इजिप्शियनांची चिन्हे आढळतात.
[तुतनखामुनच्या नावात येणारी (तुत-आँख-अमुन) अमुन ही इजिप्शियन देवता होती. तिची आणि इतर इजिप्शियन देवतांची माहिती येथे पहावयास मिळेल - http://www.ancientegypt.co.uk/gods/explore/main.html - या माहितीकरिता प्रियाली यांना खास धन्यवाद]

ही महान इजिप्शियन संस्कृती इजिप्तमधील पिरॅमिडस् साठी प्रसिद्ध आहे. कारण हे पिरॅमिडस् म्हणजे जगातील एक आश्चर्यच आहे. ह्या पिरॅमिडसची बांधणी विशिष्ट प्रकारची आहे. पिरॅमिडला चार बाजू असतात. सर्व बाजू ज्या टोकापाशी मिळतात, त्या ठिकाणी ९० अंशांचा कोन होतो. आज आपण असा पिरॅमिड बांधायला गेलो तर आपण असा पिरॅमिड बांधू शकत नाही. कारण पिरॅमिड बांधायचे इजिप्शियनांचे एक विशिष्ट तंत्र होते. ते तंत्र आपल्याला अजून तरी अवगत नाही. पिरॅमिडस् बांधण्यासाठी इजिप्शियनांनी मोठ-मोठे अवजड दगड वापरले आहेत. इतके अवजड दगड इजिप्शियनांनी वाहून कसे नेले हे एक न सुटलेले कोडे आहे. हा पिरॅमिडस् चा काळ साधारणत: सुमारे ५०० वर्षांचा मानला जातो.

एकदा दक्षिण इजिप्तच्या राजाने स्वत:च्या कबरीसाठी खास इमारत बांधायचे ठरवले. त्याप्रमाणे त्याने त्याच्या वजिराला ते काम सांगितले. त्या राजाचा "इमहॉटेप" नावाचा हुशार वजिर होता. त्याने आधी पिरॅमिडची आखणी केली. मग पक्के दगड वापरुन जगातील पहिला पिरॅमिड बांधला. हा पहिला पिरॅमिड उभारायला बराच वेळ लागला. हा पिरॅमिड बांधण्यासाठी 'इमहॉटेप'वजिराने
खूप मजूर कामास लावले होते. ह्या पिरॅमिडनंतर असे अनेक पिरॅमिडस् बांधले गेले. हे पिरॅमिडस् बांधणे खूप अवघड होते. पण कारागिरांना एकदा हे तंत्र कळाल्यावर हे पिरॅमिडस् वेगात बांधले गेले. पण हे पिरॅमिडस् बांधणे अतिशय खर्चाचे काम असल्यामुळे ते केवळ राजे व श्रीमंत लोक यांनाच शक्य होते.

इजिप्शियन लोकांच्या अद्भुत पिरॅमिडस् प्रमाणेच इजिप्शियनांच्या 'ममीज्' देखील प्रसिद्ध आहेत. राजे किंवा श्रीमंत लोक स्वत:च्या मृत्यूनंतर स्वत:च्या पिरॅमिडमध्ये स्वत:ची 'ममी' तयार करुन ठेवायचे. शेकडो वर्षे उलटली तरी या 'ममीज्'जशाच्या तशाच आहेत.
'ममी' म्हणजे शरीरावर काही विशिष्ट प्रक्रिया करुन ते शरीर सुकवणे. अशा अनेक 'ममीज्' इजिप्तमधल्या अनेक पिरॅमिडमध्ये सापडल्या आहेत. सध्या पिरॅमिडस् ची बरीच पडझड झाली आहे. तरीही आज अनेक पिरॅमिडस् सुस्थितीत आहेत.पाच हजार वर्षांपूर्वीच्या 'ममीज्' जशाच्या तशा आढळतात हे ही एक आश्चर्यच आहे.ह्या 'ममीज्' कशा तयार करायच्या ह्याविषयी आपल्याला काहीच माहीत नाही. पण हे इजिप्शियन 'ममीज्' सहज बनवायचे.अर्थातच स्वत:ची ममी तयार करणे हेही खर्चाचेच काम होते, त्यामुळे हे ही फक्त राजे आणि श्रीमंत लोक यांनाच परवडत असे.

ह्या इजिप्शियनांची एक श्रद्धा होती की, राजा मेल्यानंतर पुन्हा जिवंत होतो. आपल्या प्रिय राजाला पुढे उपयोगी पडाव्यात म्हणून त्या राजाच्या पिरॅमिडमध्ये इजिप्शियन लोकांनी भाकरीचे तुकडे, घोडे वगैरे प्राणी इ. अनेक वस्तूंच्या 'ममीज्' बनवून राजाच्या कबरीजवळ ठेवल्या आहेत. तसेच मातीची भांडीदेखील राजाच्या कबरीजवळ ठेवलेली आढळतात. एकदा तर इजिप्शियनांनी आपला राजा जिवंत झाल्यावर समुद्रपर्यटनासाठी त्याला उपयोगी पडावी म्हणून नावेचे तुकडे त्याच्या पिरॅमिडमध्ये पुरुन ठेवले होते. पुरातत्त्व संशोधकांनी हे तुकडे जोडल्यावर १३० फूट लांबीची भलीमोठी नाव तयार झाली. ह्या नावेची डोलकाठी २९ फूट उंच होती.

इजिप्शियन लोकांची लेखनाची जी लिपी होती, ती लिपी 'हायरोग्लिफ' या नावाने ओळखली जाते. आपली जशी अक्षरलिपी आहे तशी इजिप्शियनांची 'हायरोग्लिफ' ही चित्रलिपी होती. इजिप्शियनांना अक्षरलिपी ज्ञात नव्हती, पण त्यांना ही चित्रलिपी चांगली अवगत होती.
इसवी सन ३१०० वर्षी 'हायरोग्लिफ' लिपी अप्पर आणि लोअर इजिप्त मध्ये प्रचलित झाली...
(या माहितीसाठी बिपीन यांना धन्यवाद. या ठिकाणी या लिपिबद्दल अधिक माहिती पाहू शकाल - http://www.ancientegypt.co.uk/writing/home.html)

हे इजिप्शियन लिहिण्यासाठी कागदासारखी एक वस्तू वापरायचे. 'पेपिरस' नावाच्या झाडाचा पांढरा रंग असलेला पापुद्रा, विशिष्ट प्रक्रिया करुन तो वाळवून, त्यापासून कागदासारखी एक वस्तू तयार करायचे. आपल्या कागदापेक्षा त्यांचा कागद हा वेगळ्या प्रकारचा होता. इजिप्शियनांनी तयार केलेला कागद वजनाने हलका आणि लवचिक असल्याने त्या कागदाच्या घड्याही पडायच्या.

नाइल नदी ही इजिप्तची देणगीच होय. एका विशिष्ट दिवशी नाइलला प्रचंड असा महापूर यायचा. पण वर्षातून फक्त एकदाच. ह्या नाईलला एवढा महापूर यायचा की, कित्येक गावे, कित्येक जमीन पाण्याखाली जायची. ह्या नाइल नदीमुळेच इजिप्शियनांनी पंचांग वा कॅलेंडर बनवले. 'ग्रहण' एकाच ठिकाणी दर १८ वर्षे १० दिवसांनी होते, हे इजिप्शियनांना माहित होते. (आजचे सौरचक्र २२ वर्षांचे मानले जाते. कदाचित त्या काळचा पृथ्वी आणि सूर्यसापेक्ष वेग आणि आजचा वेग यात तफावत असू शकेल)

एवढेच नव्हे तर कोणता तारा, कोणत्या महिन्यात कुठे दिसेल, हेही इजिप्शियन्स सांगू शकत होते. यावरुनच कळून येते की इजिप्शियनांची खगोलशास्त्रातदेखील चांगली गती होती. खरोखर हे इजिप्शियन्स् म्हणजे जगातील आश्चर्याचा नमुनाच होते.

सर्वात शेवटी येतो तो ह्या इजिप्शियन संस्कृतीचा अस्त काळ. ह्या संस्कृतीचा अस्त साधारणपणे इ.स्.पूर्व ४,०००-इ.स्.पूर्व ३,९०० वर्षांपूर्वी झाला. एवढी प्रगत, थोर संस्कृती नष्ट झाली. पण ही संस्कृती कशी नष्ट झाली हे मात्र कोणालाच माहित नाही. आजचे संशोधक, पुराणशास्त्रज्ञ ह्या विषयावर केवळ तर्क लढवित आहेत, पुरावे गोळा करत आहेत.पण अजून तरी त्यांच्या हाती या संस्कृतीच्या अस्ताविषयी काहीच लागलेले नाही.

अशी होती ही इजिप्शियन संस्कृती ... महान इजिप्शियन संस्कृती ...
(वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास करण्याची आवड असलेला) - सागर

संस्कृतीइतिहासलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Dec 2007 - 11:56 pm | बिपिन कार्यकर्ते

छान आहे लेख. अभ्यासपूर्ण आहे. तुम्हाला इतिहासात रस आहे असे दिसते. आपली आवड मिळतीजुळती आहे बहुतेक.

वरील लेखात एक चूक मात्र सांगविशी आटते, क्षमस्व. 'अप्पर इजिप्त' म्हणजे दक्षिण इजिप्त आणि 'लोअर इजिप्त' म्हणजे उत्तर इजिप्त. कारण असे की, नाईल नदी ही जगातिल एकमेव प्रमुख नदी आहे जी उत्तरवाहिनी आहे. आणि म्हणूनच जे नाईलच्या उगमाजवळ ते 'वर' आणि जे शेवटाजवळ ते 'खाली'. हे प्रचिन इजिप्शियन संस्कृति चे एक 'युनिक' असे लक्षण आहे.

'हायरोम्लाइट' हे 'हायरोग्लिफ' असे आहे बहुतेक. 'हिप्पोक्रेटस' ग्रीक होता.

बिपिन.

बिपीन ,

या माहितीबद्दल अनेक धन्यवाद.
दोन्ही बदल लेखात केले आहेत

(अभ्यासपूर्ण मार्गदर्शकांच्या प्रतिसादांमुळे आनंदीत होऊन झालेल्या चुका सुधारण्यास तयार असलेला) सागर

प्रियाली's picture

25 Dec 2007 - 3:33 am | प्रियाली

विरस करायचा नाही पण झाल्यास क्षमस्व! तरीही सांगावेसे वाटते की असे लेख लिहिताना कृपया, अधिक माहिती गोळा करून लिहा. बिपिन यांनी वर चुका काढल्या आहेतच.

अधिक चुका:

तुतान खामेन हे अत्यंत चुकीचे नाव. तुतन खामुन चालले असते किंवा मूळ नाव तुत-आँख-अमुन हवे. तुतन खामुनचा अर्थ अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाची जिवंत प्रतिकृती.
फराओ नाही फॅरोह् पण ही केवळ लेखनातील चूक.
इमोटेस नाही इमहॉटेप
हे दिजॉं म्हणजे काय ते ही कळले नाही. इमहॉटेपने Djoser या राजासाठी (उच्चार बहुधा दोसीर) पायर्‍यांचे पिरॅमिड्स बांधले होते आणि इमहॉटेप हा जगातील आद्य स्थापत्त्यशास्त्रज्ञ गणला जातो.

हिपोक्रेट्स आणि हायरोम्लाइटबद्दल वाचून असे लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी तुम्ही इजिप्शियन संस्कृतीचा अभ्यास अधिक करावा असे वाटले.

स्पष्ट मताबद्दल राग मानू नये. या इतक्या चुका वर वर दिसल्या. खोलात अधिकही चुका असाव्यात असे वाटते. संशोधनपर किंवा तथ्याधारीत लेखात त्या अक्षम्य आहेत.

सागर's picture

26 Dec 2007 - 6:45 pm | सागर

प्रियाली ताई ,

सर्वप्रथम तुम्हाला अनेक धन्यवाद की हा लेख वाचून त्यांतील नेमक्या उणीवा तुम्ही दाखवून दिल्या.
बर्‍याच दिवसांपूर्वी (खरे तर अनेक वर्षांपूर्वी ) लिहिलेल्या लेखात चुका असू शकतील याचा विचार न करताच हा लेख प्रकाशित केला होता.
असो.

विरस करायचा नाही पण झाल्यास क्षमस्व! तरीही सांगावेसे वाटते की असे लेख लिहिताना कृपया, अधिक माहिती गोळा करून लिहा. बिपिन यांनी वर चुका काढल्या आहेतच.

माझा विरस करायचा नाही ही तुमची भावना मला कळाली. आणि मोठ्या मनाने चुका दाखवून देत आहात याबद्दल आपला आभारी आहे.

अधिक चुका:
तुतान खामेन हे अत्यंत चुकीचे नाव. तुतन खामुन चालले असते किंवा मूळ नाव तुत-आँख-अमुन हवे. तुतन खामुनचा अर्थ अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाची जिवंत प्रतिकृती.
हा बदल केला आहे. आणि अधिक माहितीसाठी एक संदर्भाची लिंक देखील दिली आहे.

फराओ नाही फॅरोह् पण ही केवळ लेखनातील चूक.
इमोटेस नाही इमहॉटेप

चुकीची दुरुस्ती केली आहे

हे दिजॉं म्हणजे काय ते ही कळले नाही. इमहॉटेपने Djoser या राजासाठी (उच्चार बहुधा दोसीर) पायर्‍यांचे पिरॅमिड्स बांधले होते आणि इमहॉटेप हा जगातील आद्य स्थापत्त्यशास्त्रज्ञ गणला जातो.

मी खूप वर्षांपूर्वी एका पुस्तकात ही माहिती वाचली होती. दुर्दैवाने पुस्तकाचे नावही आठवत नाही आणि कोठे याबद्दल संदर्भही सापडत नाहीये. या कारणाने ही अर्थहीन माहिती लेखातून काढून टाकली .

हिपोक्रेट्स आणि हायरोम्लाइटबद्दल वाचून असे लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी तुम्ही इजिप्शियन संस्कृतीचा अभ्यास अधिक करावा असे वाटले.

चूक एकदम मान्य. माझ्या ग्रीक संस्कृतीच्या लेखनातील हा भाग अनावधानाने कॉपी पेस्ट झाला होता. तो नष्ट केला आहे.

स्पष्ट मताबद्दल राग मानू नये. या इतक्या चुका वर वर दिसल्या. खोलात अधिकही चुका असाव्यात असे वाटते. संशोधनपर किंवा तथ्याधारीत लेखात त्या अक्षम्य आहेत.

प्रियालीताई स्पष्ट आणि परखड मतांबद्दल राग का यावा? उलट तुमच्या या स्पष्ट मतांमुळे मलाच हा लेख अचूक करण्यास मदत झाली आहे.
तेव्हा राग तर अजिबात नाही, तुम्ही जेवढ्या अधिक चुका दाखवाल, सूचना कराल तेवढा माझ्यातही बदल हा होणार आहेच. आणि तुमचा हेतु निखळ आणि प्रामाणिक आहे तेव्हा वेळोवेळी यापुढेही तुम्ही तुमची मते सांगून मार्गदर्शन करीत रहावे ही विनंती.

धन्यवाद
सागर

ऋषिकेश's picture

25 Dec 2007 - 5:26 am | ऋषिकेश

इतक्या मोठ्या संस्कृतीचा हा परिचय बर्‍याच अंगाने तुटपुंजा वाटला. प्रियालीताईंशी सहमत.. लेख बाळबोध आहे. माहितीपर लेख नीट संशोधन करून लिहिल्यास वाचणार्‍यास वेगळाच आनंद मिळतो.
तसेच शैलीही विस्कळीत वाटली. एखाद्या लेखातील अथवा पुस्तकातील वेगवेगळ्या परिच्छेदांचे भाषांतर असावे असा कधी कधी भास झाला (असे असल्यास कृपया नमुद करावे)

वाईट मानू नका पण पुराणकथांमधे ढोबळपणा चालतो, पण अश्या लेखांत बारिकसा तपशीलही अचुक असण्याची अपेक्षा आहे. असो, आवड आहे तेव्हा तुम्ही अधिक अभ्यास केल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास वाटतो. पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा!

-ऋषिकेश

प्रतिसादाबद्दल धन्यवाद ऋषिकेश,

तसेच शैलीही विस्कळीत वाटली. एखाद्या लेखातील अथवा पुस्तकातील वेगवेगळ्या परिच्छेदांचे भाषांतर असावे असा कधी कधी भास झाला (असे असल्यास कृपया नमुद करावे)

खरेतर हा लेख मी बर्‍याच वर्षांपूर्वी लिहिला होता आणि त्यावेळी अनेक वेगवेगळ्या पुस्तकांचा आधार घेतला होता.त्यामुळे शैली विस्कळीत वाटत असेल तर त्याबद्दल क्षमस्व आहे. पण हा लेख मी सर्वस्वी माझ्या भाषेतच लिहिण्याचा प्रयत्न केला होता.
आणि भाषांतर असावे असा भास जो तुम्हाला झाला त्याकरितादेखील क्षमस्व. पण हा लेख म्हणजे कोणत्याही उतार्‍याचे भाषांतर नक्कीच नाही हे मात्र मी सांगू शकतो. कदाचित अनेक संदर्भ घेतल्यामुळे त्या त्या ठिकाणी मूळ संदर्भाचा भाव उमटला असेन.

अशाच चुका दाखवून देत रहावे म्हणजे यांपुढील लेखांत अशा चुका टाळता येतील
धन्यवाद
सागर

सुधीर कांदळकर's picture

25 Dec 2007 - 7:16 pm | सुधीर कांदळकर

२००१ साली वडाळा येथील आयमॅक्क्स मध्ये याच विषयावरील एक दोनएक तासांचा लघुपट पाहिला. त्याच्या स्मृति जाग्या झाल्या. जास्त संदर्भ हाताळून विशेष़द्नांच्या मार्गदर्शनाने लिहिले तर मजा येईल. पुलेशु.

जास्त व्यासंगाची जरूर आहे.

सुधीरराव,

अशा विषयाला हात घालण्यापूर्वी व्यासंग अधिक हवा हे खरे आहे. यापुढे अशा चुका नक्की टाळेन.
सागर

सुधीर कांदळकर's picture

27 Dec 2007 - 5:40 pm | सुधीर कांदळकर

सुरेख. आपल्या अप्रतिम प्रतिसादाची तारीफ करावी तेवढी थोडीच. सोबत जोडलेल्या महितीबद्दल धन्यवाद.

चतुरंग's picture

25 Dec 2007 - 10:52 pm | चतुरंग

त्यामुळे विरस करत नाही पण खूपच सुधारणा हवी. फक्त माहिती व अभ्यासपूर्ण लेख ह्यात फार फरक आहे.
असो.

संस्कृत्यांचा - असा शब्द नाहीये - संस्कृतींचा असे हवे.

चतुरंग

चतुरंग (हे नाव चतुरस्त्र बुद्धी असल्याचे द्योतक असल्याने आवडले.)

खूपच सुधारणा हवी.

या लेखाकरिता मिळालेल्या तुमच्यासकट अनेक हितचिंतकांचे प्रतिसाद पाहून माझीही अशीच भावना झाली आहे.
आणि यापुढे असे लेखन करताना नक्कीच आधी संदर्भाची खात्री करेन, मगच लिहिन.

संस्कृत्यांचा - असा शब्द नाहीये - संस्कृतींचा असे हवे.
हा बदल केला आहे.

पुनश्च धन्यवाद
सागर

पुष्कर's picture

26 Dec 2007 - 11:33 am | पुष्कर

यातल्या अनेक गोष्टींबाबत पुरातत्त्ववेत्त्यांमध्ये दुमत( किंवा अनेकमत) आहे.(उदा.-सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते.)

>>'ग्रहण' दर १८ वर्षे १० दिवसांनी होते, हे इजिप्शियनांना माहित होते.>>
यात आपण कोणत्या ग्रहणाबद्दल बोलत आहात? कारण माझ्या माहितीप्रमाणे (चू.भू.द्या.घ्या.) पृथ्वीवर दरवर्षी २/३ सूर्यग्रहणे आणि ५/६ चंद्रग्रहणे होतात. एकाच ठिकाणी आढळणार्‍या ग्रहणांबाबतीत पाहिले तरी तुम्ही दिलेला आकडा हा सूर्य/चंद्रग्रहणाच्या बाबतीत सत्य नाही.

>>हा पिरॅमिडस् चा काळ साधारणत: इ.स.पूर्व ४,४०० ते इ.स.पूर्व ४,२०० असा सुमारे ५०० वर्षांचा मानला जातो.>>
इसपू. ४४०० ते इसपू.४२०० म्हणजे २०० वर्षे होतात.

प्रियाली आणि बिपीन यांनी काही मुद्देसूद चुका काढल्या आहेतच. त्यांचाही विचार करा.

पण ह्या अश्या सूचनांनी दबून/निराश होऊन जाऊ नका. तुमच्या लेखामुळे काही नव्या गोष्टीही आम्हाला कळल्या. नवनवीन विषयाला तुम्ही स्पर्श करत आहात. तेव्हा लिखाण चालू द्या.

पुढच्या अधिक अभ्यासपूर्ण लेखनासाठी शुभेच्छा.

सागर's picture

26 Dec 2007 - 7:18 pm | सागर

प्रतिसादाबद्दल धन्यवाद पुष्कर,

यातल्या अनेक गोष्टींबाबत पुरातत्त्ववेत्त्यांमध्ये दुमत( किंवा अनेकमत) आहे.(उदा.-सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते.)

मान्य, पण ज्ञात असलेली (म्हणजे जिचे पुरावे उपलब्ध आहेत अशी) सुमेरियन संस्कृती ही पहिली मानवी संस्कृती मानली जाते. तसे माया , मायसिनियन आणि मिनोअन या संस्कृतींच्या कालखंडाबद्दलही पुरातत्ववेत्त्यांमध्ये दुमत आहेच.

>>'ग्रहण' दर १८ वर्षे १० दिवसांनी होते, हे इजिप्शियनांना माहित होते.>>
यात आपण कोणत्या ग्रहणाबद्दल बोलत आहात? कारण माझ्या माहितीप्रमाणे (चू.भू.द्या.घ्या.) पृथ्वीवर दरवर्षी २/३ सूर्यग्रहणे आणि ५/६ चंद्रग्रहणे होतात. एकाच ठिकाणी आढळणार्‍या ग्रहणांबाबतीत पाहिले तरी तुम्ही दिलेला आकडा हा सूर्य/चंद्रग्रहणाच्या बाबतीत सत्य नाही.

पुष्कर , येथे एक विनंती करावीशी वाटते की , तुमच्याकडे ही माहिती असेल तर कृपया ती द्यावी. कारण माझ्या माहितीप्रमाणे एकाच ठिकाणी पुन्हा सूर्यग्रहण होण्यासाठी आजच्या कालमानाप्रमाणे २२ वर्षे लागतात. आणि ६०००-६५०० वर्षांपूर्वी हा काल १८ वर्षांचा असणे अशक्य नाहिये. माहिती अभावी अजून हा बदल मी लेखात केला नाहिये. तुम्ही संदर्भ देऊ शकाल का? म्हणजे ही देखील माहिती अद्ययावत करता येईल.

>>हा पिरॅमिडस् चा काळ साधारणत: इ.स.पूर्व ४,४०० ते इ.स.पूर्व ४,२०० असा सुमारे ५०० वर्षांचा मानला जातो.>>
इसपू. ४४०० ते इसपू.४२०० म्हणजे २०० वर्षे होतात.

येथे गणितच काय पण डोके पण चक्रावले माझे. असो, या.सहज लक्षात येणार्‍या (खरे तर सहज टाळता येणार्‍या) चुकीबद्दल क्षमस्व.

प्रियाली आणि बिपीन यांनी काही मुद्देसूद चुका काढल्या आहेतच. त्यांचाही विचार करा.

प्रियालीताई आणि बिपीनरावांचे अनेक धन्यवाद आणि त्यांच्या चुका दुरुस्त केल्या आहेत.

पण ह्या अश्या सूचनांनी दबून/निराश होऊन जाऊ नका. तुमच्या लेखामुळे काही नव्या गोष्टीही आम्हाला कळल्या. नवनवीन विषयाला तुम्ही स्पर्श करत आहात. तेव्हा लिखाण चालू द्या.
पुढच्या अधिक अभ्यासपूर्ण लेखनासाठी शुभेच्छा.

या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल धन्यवाद. दबून आणि निराश न होता अधिक जोमाने लेखन करेन. खरे सांगायचे तर तुम्हा सर्व टीकाकारांचा मी आभारी आहे. कारण टीका झाली तरच चुकांत सुधारणा होते. नवीन विषयांवर लेखन करण्याचा मानस नक्की आहे. आणि सुमेरियन , मायसिनियन आणि मिनोअन संस्कृतीवर एका लेखात माहिती देण्याचा विचार आहेच.पाहूयात कसे जमते ते...

धन्यवाद
सागर

सुनील's picture

26 Dec 2007 - 10:13 pm | सुनील

ग्रीक समजला जाणारा टॉलेमी ही तत्त्ववेत्ता मुळात इजिप्शियन होता असे वाचले होते. अशी आणखीही काही उदाहरणे असू शकतील.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रियाली's picture

27 Dec 2007 - 1:46 am | प्रियाली

टोलेमी हा अलेक्झांडरचा मित्र ज्याने इजिप्तची सत्ता ग्रहण केली तो ग्रीक. तत्ववेत्ता टोलेमी हा नाही. तत्त्ववेत्ता टोलेमी जो इसवी सनानंतर झाला तो रक्ताने ग्रीक पण नागरिकत्वाने इजिप्शियन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धनंजय's picture

26 Dec 2007 - 10:35 pm | धनंजय

अभ्यास करून चुका सुधारण्याची तुमची वृत्ती स्तुत्य आहे.

> इतिहास संशोधक आणि पुराणशास्त्रज्ञ यांच्या मते
> 'तुतनखामुन' चा पिरॅमिड जगातील सर्वोत्कृष्ट पिरॅमिड आहे.

यात तुम्हाला त्या राजाचे "दफनगृह" असे तर म्हणायचे नाही? पिरॅमिड या विशिष्ट आकाराच्या इमारती आहेत. त्या वेगळ्या. "राजांच्या दरीत" खडकाळ टेकड्यांत लेण्या कोरून दफनगृहे बांधली गेलीत. पैकी एका लेणीत 'तुतनखामुन' सापडला. तो प्रसिद्ध आहे, कारण ते दफनगृह जवळजवळ परिपूर्ण सापडले, लुटलेले नव्हते. अभ्यासकांसाठी ही पर्वणीच होती. पण तुतनखामुन हा फारसा महत्त्वाचा राजा नव्हता.

असो. या निमित्ताने तुमच्या आवडीचा अभ्यास तुमच्याकडून होतो आहे. शुभेच्छा!

प्रियाली's picture

27 Dec 2007 - 2:01 am | प्रियाली

>>पण तुतनखामुन हा फारसा महत्त्वाचा राजा नव्हता.

हो आणि किंचित नाही असे म्हणता येईल. महत्त्वाचा राजा नव्हता कारण त्याने ९ व्या वर्षी सत्ताग्रहण केले आणि १८ वर्षी तो मारला गेला त्यामुळे त्याचे राज्य आय/ अय या त्याच्या वजिरामार्फत चालवले गेल्याची शक्यता अधिक पण अगदीच महत्त्वाचा नव्हता असे नाही.

तुतनखामुनचे वडिल आंखनेतन यांनी वेगळा धर्म/ पंथ स्थापन करून मूळ इजिप्शियन धर्म आणि देवता यांवर बंदी घातली. प्रजेत यामुळे प्रचंड असंतोष होता. राज्यात बंड होण्याची चिन्हे होती. तुतनखामुनच्या राज्यात प्रजेला मूळ धर्म पाळायची परवानगी मिळाली. या काळात काही युद्धे लढली जाऊन राज्यात शांतताही प्रस्थापित झाली. प्रत्यक्षात तरूण किंग टट युद्ध लढायला गेला नसावा.

पण अर्थातच तुतनखामुन म्हणजे खुफु, रामसीस किंवा क्लिओपात्रा नाही.

अवलिया's picture

27 Dec 2007 - 5:50 pm | अवलिया

भारतीय पुराणकथांकडे बाष्कळ कथा म्हणुन त्यांची अवहेलना करणारे
भारतीय इतिहासाला पराभुतांचा इतिहास म्हणुन हिणवणारे
जे जे भारतीय ते ते त्याज्य मानणारे
सुशिक्षीत लोक इतर देशांच्या इतिहासाविषयी इतके आपुलकिने बोलतात व माहिती ठेवतात हे पाहुन आनंद वाटलाओ

अवांतरः रक्त रक्ताकडे धाव घेते

नाना