१. अर्थातच ही कविता पूर्णपणे काल्पनिक आहे.
२. कुणालाही आक्षेपार्ह वाटल्यास उडवून लावली तरी चालेल.
अल्फा असो वा याहू! बेटा
'गामा' पैलवान फाटे फोडी
पिंक टाकून चौपाटीवर
ठेल्यावर तंबाखू चोळी
अनिवासी त्या बोधकथेतील
चिखल पसरे जिकडेतिकडे
कुणा दिसती अनेक माद्या
कुणा दिसती गोरी माकडे
सदाचाच हा खेळ चालला
जुने गडी पण नवेच भांडण
वैशाखाचा वणवा 'चैत्री'
कळपांचे माद्यांना आंदण
वाचा चावा फरक कळेना
'किट'ले अमुचे कान
एबीजीएस कुणी बोलतो
बलसागर देश महान
'शिरा' ताणुनि पान ओरडे
पुरे जाहला चुना
चंचीबांधव आपण सगळे
का मग हा 'सामना'
नवे वदति नवल देखुनि
हे अमुच्याहूनही सान
ल्हानांहुनि पण ल्हान जाहले
विसरूनी सारे भान
पुन्हा 'मिसळ'तील सारे
जरी आज उठे आकांत
शिमग्यामागून येते उफराटी
गोडबोली संक्रांत
प्रतिक्रिया
22 Nov 2008 - 10:44 am | सर्किट (not verified)
नंदन,
अर्थगर्भित कविता, आणि छंदबद्ध देखील !
नवे वदति नवल देखुनि
हे अमुच्याहूनही सान
ल्हानांहुनि पण ल्हान जाहले
विसरूनी सारे भान
तुकोबारायांनी (;-) म्हटलेले "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा" आठवले, उगाच. (मुंगी झाली तरी काय झले, गूळ खाणार नाही, साखरच खाणार.)
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
22 Nov 2008 - 11:03 am | विसोबा खेचर
नंदनसायबा,
मस्तच कविता केली आहेस रे..! :)
पण तू मनाला लावून घेऊ नको.. वादाभांडणांचं मिपाला तसं विशेष काही नाही...
चार मराठी माणसं एकत्र आली की वादविवाद, भांडणं, हेवेदावे हे होणारच..! :)
काय बोल्तो? :)
तात्या.
22 Nov 2008 - 11:07 am | कपिल काळे
आता कसं अगदी ग्वाड वाटतय पघा.
अगदी मनातलं बोललास बघ.
22 Nov 2008 - 11:08 am | बिपिन कार्यकर्ते
सिक्सर...
बिपिन कार्यकर्ते
22 Nov 2008 - 11:12 am | घाटावरचे भट
ओ बीपीन्भौ,
ह्यो सीक्सर नाय स्लोवर वन व्हता.....समद्ये ब्र्येट ली वानी झमाझम बॉल फेकाया लागले म्हनूनश्यान नंदनरावांनी स्लोवर वन फेकून विकीटी उडवायचा ट्राय मारलाय बघा....आन फुल्टू रापचीक ट्राय बघा...
-(फास बॉलर) भट्या ढिशक्यांव
22 Nov 2008 - 11:09 am | वेताळ
नंदन शेट
नवे वदति नवल देखुनि
हे अमुच्याहूनही सान
ल्हानांहुनि पण ल्हान जाहले
विसरूनी सारे भान
हे मात्र खरोखर.
अल्फा असो वा याहू! बेटा
'गामा' पैलवान फाटे फोडी
पिंक टाकून चौपाटीवर
ठेल्यावर तंबाखू चोळी
=)) =D>
वेताळ
22 Nov 2008 - 11:31 am | यशोधरा
नंदन :)
23 Nov 2008 - 8:47 am | विनायक प्रभू
नंदन नव्हे चंदन
23 Nov 2008 - 5:38 am | सर्किट (not verified)
नंदन,
एक मूलभूत शंका आहे:
पुन्हा 'मिसळ'तील सारे
जरी आज उठे आकांत
शिमग्यामागून येते उफराटी
गोडबोली संक्रांत
कशावरही, किंवा कुणावरही संक्रांत येणे म्हणजे, मोठ्ठे संकट येणे असे मराठीत आपण समजतो.
तेव्हा,
शिमग्यानंतर संक्रांत येत असेल, तर त्यापेक्षा शिमगाच असणे काय वाईट, म्हणतो मी ??
(नाही, म्हणजे जुना एक अनुभव सांगतो. एका चौपाटीवर शिमगा सुरू होता, म्हणून तिथल्या भेळवाल्याने बोंबाबोंब करणार्या सर्वांना हाकलले. आता तिथे सुतकी संक्रांत आहे, कुणी ढुंकूनही बघत नाही रे आता तिकडे.)
-- (शंकेखोर) सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
23 Nov 2008 - 8:59 am | विसोबा खेचर
(नाही, म्हणजे जुना एक अनुभव सांगतो. एका चौपाटीवर शिमगा सुरू होता, म्हणून तिथल्या भेळवाल्याने बोंबाबोंब करणार्या सर्वांना हाकलले. आता तिथे सुतकी संक्रांत आहे, कुणी ढुंकूनही बघत नाही रे आता तिकडे.)
अहो पण प्रत्येक भेळवाल्याचा स्वभाव वेगळा असतो, भेळेच्या चवीतही फरक असतो, चौपाट्याही वेगवेगळ्या असतात! :)
असो..
आपला,
(भेळवाला) तात्या.
23 Nov 2008 - 8:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संवेदनशील लेखंकावर परिस्थितीचा परिणाम होतो त्याचे प्रतिबिंब लेखनात दिसते ते असे :)
नंदन, कविता आवडली.
पुन्हा 'मिसळ'तील सारे
जरी आज उठे आकांत
शिमग्यामागून येते उफराटी
गोडबोली संक्रांत
मस्त !!!
-दिलीप बिरुटे
23 Nov 2008 - 9:42 am | प्राजु
फुल टॉस आल्यावर सिक्सर मारलीत..!
अभिनंदन!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Nov 2008 - 12:02 pm | सखाराम_गटणे™
ह्याच संक्रातीचा आणि मराठ्यांचा विलक्षण योगायोग आहे.
मराठे १४ जानेवारी १७६१ ला पानिपत हारले
23 Nov 2008 - 12:12 pm | सुक्या
बहुतेक त्यामुळेच मराठी माणसाला संक्रांत धार्जिनी नाही असं काहीसं म्हणतात. संक्रांत येणे हा वाक्प्रचार बहुतेक त्यानंतरच आला असावा.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
23 Nov 2008 - 5:56 pm | चतुरंग
सुरेख छंदबद्ध काव्य! भा.पो.
(काटेरी असला तरी हलवा असतो मात्र गोड तशीच तुझी कविता आहे!)
चतुरंग
23 Nov 2008 - 8:35 pm | पिवळा डांबिस
कविता सुरेख.
भा. पो.
-पिडां
24 Nov 2008 - 4:53 am | सुवर्णमयी
जबरदस्त! मस्त!