देवाचं नांव कुणी ठेवलं ?

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
16 Jun 2020 - 12:34 pm

देवाचं नांव कुणी ठेवलं ?
या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्‍या संकल्पनेचा डोलारा कोसळतो.
तुमचं जीवन निर्भार होतं;
सुरुवातीला थोडी धाकधूक वाटते,
पण अवलंबित्व हाच भीतीचा आधार आहे,
एकदा निरावलंब झालो की सगळी भीती संपली !

कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही.
कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही.

कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत,
कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्‍याचं धन होणारी दानपेटी नाही.
कुठे दिवे लावायला नको, धूप जाळायला नको, कोणतेही यज्ञ-याग नाही.

कुठले नवस बोलायला नको की फेडायला नको,
कोणत्याही समस्येला वस्तुनिष्ठपणे आणि वैज्ञानिकदृष्टीनं, निर्भिडपणे सामोरं जायला आपण सज्ज.

घरातल्या सगळ्या भींती क्लिअर, सगळे कोपरे स्वच्छ;
सगळे ग्रंथ, पोथ्या, चरित्र रद्दीत, बुकशेल्फ निम्मी रिकामी.
स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ आणि
निर्बुद्धपणावर खर्च न झाल्यानं वाचलेला,
तुमच्या कष्टाचा पैसा !

आणखी काय हवं आयुष्य मोकळं व्हायला ?
_____________________________________

देवाचं नांव कुणी ठेवलं ?
इतका साधा, सोपा, वरकरणी बाळबोध वाटणारा पण लक्ष्याचा नेमका वेध घेणारा तीर !

प्रष्ण सुद्धा फक्त एकदाच विचारायचा, तोही स्वतःला;
आणि मग हसून सगळ्यातून मोकळं व्हायचं !

कुठल्या गुरुकडे जायला नको,
'मी कोण' असं स्वतःलाच विचारुन, स्वतःचा छळ नाही,
आणि चेहेर्‍यावर कायम प्रष्णचिन्ह घेऊन करायचा वेडगळ शोध नाही.
वर्षानुवर्ष करायची नामसाधना नाही,
जरा लक्ष विचलीत झालं की भंगणारा जप नाही,
की भ्रमिष्टावस्थेत नेणारा अजपा नाही.

एका प्रष्णात काम तमाम !

_____________________________

एक गोष्ट मात्र नक्की, स्वतःला बावळट समजायचं नाही !
इतकी वर्ष काय झक मारलीस का ?
या मनाच्या उपहासाला,
एकदाच हसून`हो !' म्हटलं की झालं.

मग मेलेल्याला जीवंत करणारे तुमचा पिच्छा सोडतील,
पोट दुखायला लागल्यावर तुम्ही कालीचा धावा करण्याऐवजी सरळ डॉक्टरकडे जाल,
वाघावर बसून आकाशमार्गे येणार्‍यांच्या आणि भींत चालवणार्‍यांच्या सिद्धींपेक्षा;
तुमचं आयुष्य सहज आणि सुलभ करणार्‍या वाहनांचे शोध लावणारे शास्त्रज्ञ,
तुम्हाला जवळचे वाटतील.
पाण्यात दिवे पेटवणार्‍यांऐवजी,
रात्रंदिवस खपून आपल्याला अखंड विजपुरवठा करणार्‍या कामगारांप्रती,
तुमचा मैत्रभाव जागेल.

चमत्कार, सिद्धी, असामान्यत्व असल्या भाकड कल्पनांमुळे,
आपण त्यांच्यापुढे छपरी,
हा नाहक खोल गेलेला न्यूनगंड संपेल.

एक सामान्य,
वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय,
संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी,
अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला,
साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही
निर्भ्रांत जगायला लागाल !

अगदी आजपासून !

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

25 Jun 2020 - 8:29 pm | संजय क्षीरसागर

१. > आपण सत्य आहोत याचा सतत उद्घोष करावा तर लागतोच ना? तसंच नामस्मरण सतत करावं लागतं.

आपण सत्य आहोत हा उलगडा एकदाच होतो
मग `तुम्ही सत्य आहात' हा उद्घोष, ज्यांना `उलगडा झालेला नाही' त्यांचासाठी केला जातो.
तो उद्घोष करणार्‍याचा छंद असतो, अनिवार्यता नाही.

या उलट नामस्मरणाचा हेतू (काल्पनिक) देव आहे, हे स्वतःला सतत पटवण्यापलिकडे काहीही नसतो.

नामस्मरण हा वरकरणी भक्ताचा आनंद वाटला, तरी मुळात ती त्याची अनिवार्यता असते.
थोडक्यात, ते खेळणं मागणार्‍या लहान मुलाचं (म्हणजे मनाचं) लक्ष दुसरीकडे वळवणं आहे.
एकदा मुलाचं लक्ष तुम्ही केलेल्या विक्षेपावरुन (नामस्मरणावरुन) हटलं की
मुलाचा पुन्हा खेळण्याचा हट्ट सुरु (मन पुन्हा कार्यान्वित) !

भक्तानी नामस्मरण थांबवलं की देव गुल !

___________________________________

आता मूळ विषय :

अ) तुम्ही नामसाधनेचा जोरदार पुरस्कार केलायं

ब) वर एका प्रतिसादात तुम्ही स्पष्टपणे म्हटलंय : ही शांतीच तर बेटी गायब आहे. म्हणून लोकं देवाकडे जातात. नवसात जे काही मागितलं असेल त्यातनं पुढे शांती मिळेल अशी आशा असतेच.

तुम्ही फक्त एक गोष्ट सिद्ध करा :

नामघोषातून शांती कशी मिळते ? आणि
नामस्मरणात विक्षेप आल्यावर किंवा नाम घेणं बंद केल्यावर त्या शांतीचं काय होतं ?

क) नामसाधनेची परिणीती इष्ट देवता दिसण्यात होते हा सर्व संतांचा दावा आहे.
उदा. परमहंसांना कालीमाता दिसे आणि ते तिच्याशी गप्पा मारत.
मग तोतापुरींना तो भ्रम घालवण्यासाठी,
त्यांच्या आज्ञाचक्रावर तीक्ष्ण वस्तूनं हल्ला करावा लागला.

हा नामस्मरणाचा हा नोन रिझल्ट आहे.

शेवटी काली घालवायचीचे तर इतका खटाटोप कशापायी ?
आणि सगळ्यांना भास व्हायला लागले,
तर इतके तोतापुरी आणायचे कुठून ?

कोहंसोहं१०'s picture

26 Jun 2020 - 3:14 am | कोहंसोहं१०

पुन्हा तोतापुरी!!
मागच्या एका धाग्यात रामकृष्ण परमहंस आणि तोतापुरीची पूर्ण कथा देऊन मी तुमचे अज्ञान उघडे पडले होते. मी तेंव्हाच सांगितले होते की तोतापुरींनी कालीचे अस्तित्व कसे मान्य केले आणि त्या कथेचा संदर्भ, पुरावा ही दिला होता. हेही सांगितले होते की हा प्रसंग रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य यांनी त्यांच्या पुस्तकात नोंदवला आहे. एवढेच नाही तर आणि तो प्रसंग अगदी चित्रपटात सुद्धा आला होता आणि मी त्या चित्रपटाची लिंक अगदी वेळेसकट दिली होती. एवढे देऊन सर्वांना इथे तुमचे अज्ञान समजले आहे अर्थात तुमच्यासारख्या अहंकारी माणसाने ते कळूनही केवळ अहंकारास्तव त्यालाही विरोध केला होता पण पुन्हा तोच विषय इथे काढून परत परत स्वतःचा अज्ञानीपणा कशाला चव्हाट्यावर आणलाय?
उगाच आपला चुकीचा मुद्दा प्रूव्ह करण्यासाठी नवीन धागा काढायचा आणि आडून आडून त्याच गोष्टी परत लिहायच्या यावरून खरंच मलाही तुम्ही हे सर्व पेड अजेन्डयाखातर करताय अशी शंका यायला लागलीये.

संजय क्षीरसागर,

१.

तुम्ही फक्त एक गोष्ट सिद्ध करा :
नामघोषातून शांती कशी मिळते ? आणि

शांती ही अनुभवायची चीज आहे. ती मिळवण्यासाठी नामस्मरण हा पहिला टप्पा आहे. मात्र तुमचा मार्ग वेगळा असू शकतो.

२.

शेवटी काली घालवायचीचे तर इतका खटाटोप कशापायी ?

शेवटी हा#यचं आहे तर गिळायचं कशाला, असा हा प्रश्न आहे. थेट सूर्यप्रकाश का नये पिऊ?

याचं उत्तर असं की बहुसंख्य शरीरांची रचनाच तशी आहे म्हणून. निर्गुणसाधना करण्यासाठी आधी सगुणसाधनेत पारंगत असावं लागतं.

३.

आणि सगळ्यांना भास व्हायला लागले,
तर इतके तोतापुरी आणायचे कुठून ?

गुरूंचा शोध हा साधनेचा भाग आहे. डिमांड-सप्लाय व्यवहार नव्हे.

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

26 Jun 2020 - 12:36 pm | संजय क्षीरसागर

१. > शांती ही अनुभवायची चीज आहे. ती मिळवण्यासाठी नामस्मरण हा पहिला टप्पा आहे

खरा मुद्दा हा आहे :

नामघोषातून शांती कशी मिळते ? आणि
नामस्मरणात विक्षेप आल्यावर किंवा नाम घेणं बंद केल्यावर त्या शांतीचं काय होतं ?

२. > शेवटी काली घालवायचीचे तर इतका खटाटोप कशापायी ?

शारीरिक प्रक्रिया साधनेच्या फलिताशी जोडणं हा तर्कहीन प्रकार आहे.
खाण्याचा आणि साधनेचा काहीएक संबंध नाही.

शिवाय तुमच्या तर्कहीन विधानातून होणारा विनोद पाहा :

नामस्मरणाची परिणीती देव दिसण्यात होते असा सर्व संतांचा दावा आहे > नाम हे खाणं असेल तर मग रिझल्ट काय येईल ?

३. > गुरूंचा शोध हा साधनेचा भाग आहे. डिमांड-सप्लाय व्यवहार नव्हे.

तुम्हाला मुद्दा कळला नाही, किंवा तुम्ही तो सोयिस्कररित्या टाळतायं !

प्रश्न गुरु शोधण्याचा नाही. पुन्हा वाचा :

क) नामसाधनेची परिणीती इष्ट देवता दिसण्यात होते हा सर्व संतांचा दावा आहे.
उदा. परमहंसांना कालीमाता दिसे आणि ते तिच्याशी गप्पा मारत.
मग तोतापुरींना तो भ्रम घालवण्यासाठी,
त्यांच्या आज्ञाचक्रावर तीक्ष्ण वस्तूनं हल्ला करावा लागला.

हा नामस्मरणाचा हा नोन रिझल्ट आहे.

शेवटी काली घालवायचीचे तर इतका खटाटोप कशापायी ?
आणि सगळ्यांना भास व्हायला लागले,
तर इतके तोतापुरी आणायचे कुठून ?

गामा पैलवान's picture

26 Jun 2020 - 4:48 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

तुमच्या प्रश्नांना यथाशक्ती उत्तरं देतो.

१.

नामघोषातून शांती कशी मिळते ?

हे असं असल्याचं अनेकांच्या अनुभवास आलेलं आहे.

२.

नामस्मरणात विक्षेप आल्यावर किंवा नाम घेणं बंद केल्यावर त्या शांतीचं काय होतं ?

नामस्मरण पक्कं झालं की अजपाजप सुरू होतो. शांती तशीच राहते. हे (किंवा तत्सम) माऊलींनी सांगितलेलं आहे.

३.

शारीरिक प्रक्रिया साधनेच्या फलिताशी जोडणं हा तर्कहीन प्रकार आहे.

शारीरिक प्रक्रिया उदाहरण म्हणून दिली होती. तुम्ही मेमरी स्ट्रिंग्ज, आणि डिस्क ड्राईव्ह फॉर्माटिंगची उदाहरणं दिलेली होती. त्याच धर्तीवर मी खाण्याच्या रचनेचं उदाहरण दिलं.

४.

खाण्याचा आणि साधनेचा काहीएक संबंध नाही.

साधकाने साधकासारखं वागणं इष्ट असतं. मात्र तुमच्या स्वत:च्या आवडी भिन्न असू शकतात.

५.

नामसाधनेची परिणीती इष्ट देवता दिसण्यात होते हा सर्व संतांचा दावा आहे.

बरोबर. सर्वंच नसले तरी बहुतांश संत हेच म्हणतात.

६.

हा नामस्मरणाचा हा नोन रिझल्ट आहे.

आजीबात नाही. ही नामस्मरणाच्या मागे उभ्या असलेल्या निर्गुण तत्त्वाची अनुभूती आहे.

७.

शेवटी काली घालवायचीचे तर इतका खटाटोप कशापायी ?

काली सगुण आहे. सगुण घालवायचं असेल तर त्यासाठी निर्गुणाची अनुभूती यायला हवी. तुम्हाला काली झटकून टाकायची ( = डिसमिस करायची ) आहे. याउलट तोतापुरींना कालीच्या पल्याड असलेलं निर्गुण तत्त्व दाखवून द्यायचं होतं.

मात्र प्रत्येकाची प्रक्रिया वेगळी असते. ज्ञानेश्वरांनी नामदेवाचा सगुण विठोबा घालवला नाही. त्यांनी नामदेवांस विसोबा खेचरांकडे पाठवलं.

८.

आणि सगळ्यांना भास व्हायला लागले,
तर इतके तोतापुरी आणायचे कुठून ?

म्हणूनंच साधक परमेश्वरास आर्तपणे विनवतात.

आ.न.,
-गा.पै.

त्याबद्दल प्रथम तुम्हाला शुभेच्छा !

१. > नामघोषातून शांती कशी मिळते ? हे असं असल्याचं अनेकांच्या अनुभवास आलेलं आहे.

थोडक्यात, तुमचा तसा अनुभव नाही, आणि
जे तसा अनुभव क्लेम करतात ते `माझा पास' म्हणून उत्तर टाळतायंत.

म्हणजे एकूणात काय परिस्थिती आहे हे लक्षात आलं असेल.
__________________________________

२. > नामस्मरण पक्कं झालं की अजपाजप सुरू होतो. शांती तशीच राहते. हे (किंवा तत्सम) माऊलींनी सांगितलेलं आहे.

आता नीट वाचा :

अजपा याचा अर्थ मन पूर्णपणे अनैच्छिक होणं,
मनाची क्रिया इतकी अनियंत्रित होते की ती थांबवणं अशक्य होतं.

एखादा अविरत ध्वनी मेंदूत घुमू लागला तर तो मनाच्या ऐच्छिक क्रियेत कायम विक्षेप करत राहील.
अशा व्यक्तीची स्मृती अस्ताव्यस्त होईल कारण काही आठवायचं म्हटलं की तो ध्वनी सारखा मधेमधे येत राहील.

अशीच अवस्था तरुण प्रेमिकांची होते,
(तारुण्यात प्रेम केलं असेल, तर आठवून पाहा)
त्यांना एकमेकांशिवाय इतर काही सुचत नाही;
याचं कारण मन अनैच्छिक होणं हे असतं,
त्यामुळे यांचा वास्तवावरचा फोकस दिशाहीन होतो.
_________________________________________

३.> नामसाधनेची परिणीती इष्ट देवता दिसण्यात होते हा सर्व संतांचा दावा आहे. >बरोबर. सर्वंच नसले तरी बहुतांश संत हेच म्हणतात.

एकाही संतानी नाम बंद करा असं सांगितलेलं नाही.
__________________________________

४. > हा नामस्मरणाचा हा नोन रिझल्ट आहे. >आजीबात नाही. ही नामस्मरणाच्या मागे उभ्या असलेल्या निर्गुण तत्त्वाची अनुभूती आहे.

तोच तर मुद्दा आहे !

एका हातानं नामस्मरणाची घंटा सतत बडवत राहिल्यावर दुसरीकडे,
त्यातून निर्गुण शांती लाभेल हा दावाच हास्यास्पद आहे !

थोडक्यात, व्यक्ती पळायचं सोडणार नाही आणि मनात मात्र स्थिर व्हायची इच्छा करणार !
___________________________________________

४. > तुम्हाला काली झटकून टाकायची ( = डिसमिस करायची ) आहे. याउलट तोतापुरींना कालीच्या पल्याड असलेलं निर्गुण तत्त्व दाखवून द्यायचं होतं.

आता हे तर खरंच शांतपणे वाचा :

काली ही निर्गुणानं स्वतःची केलेली भ्रमिष्ठ अवस्था आहे.
निर्गुण कालीच्या मागे असता तर एक वेळ ठीक आहे,
पण निर्गुणंच काली सोडायला तयार नाही !

म्हणून तोतापुरींना वार करायला लागतो.
______________________________________
५. > आणि सगळ्यांना भास व्हायला लागले, तर इतके तोतापुरी आणायचे कुठून ? > म्हणूनंच साधक परमेश्वरास आर्तपणे विनवतात.

आता परत वरचा ४ शांतपणे वाचा !

ज्या परमेश्वराची तुम्ही निर्मिती केलीये तो बोगस आहे, आणि
ज्याला तुम्ही त्याच्यापासून सुटकेसाठी बोलावतायं,
तोही तितकाच बोगस आहे.

कारण दोन्हीही परमेश्वर तुमच्या मेंदूपलिकडे कुठेही नाहीत !

_____________________________________

आणि ही उघड गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा संपूर्ण लेखाचा आणि माझ्या प्रतिसादांचा एकमेव उद्देश आहे.

निर्गुणाचा (ही) बोध हे केवळ उपांग आहे. सगुण-निर्गुण एकच तत्व आहे हा संपूर्ण बोध, हे देखील नामस्मरण साधनेचं एक फलीत आहे.
ज्याप्रमाणे दुधात पोषक तत्वं असतात, व दुध पिल्याने ति पोषक तत्व शरीरात आत्मसात होतात, त्याचप्रमाणे नामात सच्चीदानंद आहे.. नाम साधनेने ते तत्व शरीर, मन, बुद्धी आणि आत्म्याला आत्मसात करायला होतं. अगदी पहिल्या दिवसापासुन हा अनुभव येतो का? तर सुरुवात अगदी पहिल्या स्मरणापासुन होते. पण ज्या प्रमाणे प्रत्येक शरीराची पचन क्षमता भिन्न असते व त्याप्रमाणे दुधातले पोशकतत्वे आत्मसात केले जातात त्याच प्रमाणे प्रत्येक मनुष्याला नामसाधनेतुन सच्चीदानंद कसा आणि कधि गवसतो यात भिन्नता असते. पण एण्ड रिझल्ट पक्का असतो.

तुमच्या चर्चेत लुडबुड करण्याची अजीबात इच्छा नाहि. पण यदाकदाचीत कोणि हि चर्चा वाचलीच तर उगाच त्याचे/तिचे नामसाधनेबद्दल गैरसमज होऊ नये म्हणु हा प्रतिसाद प्रपंच.

गामा पैलवान's picture

27 Jun 2020 - 1:13 am | गामा पैलवान

अर्धवटराव,

तुमचा प्रतिसाद योग्य व उचित आहे.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

27 Jun 2020 - 2:53 am | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझं मत सांगतो.

१.

थोडक्यात, तुमचा तसा अनुभव नाही, आणि
जे तसा अनुभव क्लेम करतात ते `माझा पास' म्हणून उत्तर टाळतायंत.
म्हणजे एकूणात काय परिस्थिती आहे हे लक्षात आलं असेल.

जेव्हढा अनुभव आहे त्यावर तर्क बांधायला काय हरकत आहे?

२.

अजपा याचा अर्थ मन पूर्णपणे अनैच्छिक होणं,

I doubt that. माझ्या मते अजपा म्हणजे स्वत: मुद्दाम न करता आपोआप होणारा जप.

३.

मनाची क्रिया इतकी अनियंत्रित होते की ती थांबवणं अशक्य होतं.

असू शकेल.

४.

एखादा अविरत ध्वनी मेंदूत घुमू लागला तर तो मनाच्या ऐच्छिक क्रियेत कायम विक्षेप करत राहील.

आजिबात होत नाही. स्वानुभव आहे.

५.

अशा व्यक्तीची स्मृती अस्ताव्यस्त होईल कारण काही आठवायचं म्हटलं की तो ध्वनी सारखा मधेमधे येत राहील.

नाही होत असं. स्वानुभव आहे.

६.

.... त्यामुळे यांचा वास्तवावरचा फोकस दिशाहीन होतो.

अमान्य. ऐच्छिक मनाच्या पलीकडे बरंच मोठं अनैच्छिक मन आहे.

७.

काली ही निर्गुणानं स्वतःची केलेली भ्रमिष्ठ अवस्था आहे.
निर्गुण कालीच्या मागे असता तर एक वेळ ठीक आहे,
पण निर्गुणंच काली सोडायला तयार नाही !
म्हणून तोतापुरींना वार करायला लागतो.

उलट उदाहरणही उपलब्ध आहे. विसोबा खेचरांनी कुठलाही वार न करता नामदेवांचा सगुण विठोबा अलगदपणे सोडवला.

८.

ज्या परमेश्वराची तुम्ही निर्मिती केलीये तो बोगस आहे, आणि
ज्याला तुम्ही त्याच्यापासून सुटकेसाठी बोलावतायं,
तोही तितकाच बोगस आहे.
कारण दोन्हीही परमेश्वर तुमच्या मेंदूपलिकडे कुठेही नाहीत !

आपल्या मेंदूवर सर्वस्वी आपलंच नियंत्रण असतं, असं थोडंच आहे? मेंदूची बरीच ( ९० % ? ) क्षमता म्हणे सुप्त असते.

९.

.... आणि ही उघड गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा संपूर्ण लेखाचा आणि माझ्या प्रतिसादांचा एकमेव उद्देश आहे.

मेंदूच्या पलीकडे चैतन्य असतं, ही एकमेव गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझ्या प्रतिसादांचा एकमेव उद्देश आहे.

१०.

गामा पैलवान : नामस्मरणावरचा एकमेव प्रामाणिक प्रतिसाद !
त्याबद्दल प्रथम तुम्हाला शुभेच्छा !

प्रसंसेबद्दल धन्यवाद! मला मात्र हे कथन नैसर्गिक वाटतं. खास काही सांगितल्याचं वाटंत नाही. तुम्हांस ते प्रामाणिक वाटलं, हा तुमचा मोठेपणा आहे.

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

27 Jun 2020 - 11:12 am | संजय क्षीरसागर

पुन्हा एकदा प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

सर्व नामसाधकांना या प्रतिसादाचा अतोनात आणि कायमचा उपयोग होईल.
आता शांतपणे वाचा :

१. > जेव्हढा अनुभव आहे त्यावर तर्क बांधायला काय हरकत आहे ? > आजिबात होत नाही. स्वानुभव आहे. > नाही होत असं. स्वानुभव आहे.

याचा अर्थ शांती लाभेल हा तुमचा अनुभव नसून तर्क आहे आणि
अजपाजप हा स्वानुभव होऊनही तुम्हाला ती लाभलेली नाही.

थोडक्यात, नामस्मरणाच्या दुसर्‍या पायरीवरही रिझल्ट नाही.
_______________________________________________________________

आता नामसाधनेच्या अंतीम पायरीवरचा इष्ट देवतेचं दर्शन,
हा शेवटचा भ्रम उरला आहे !

आणि त्याबद्दल तुमची अशी कल्पना आहे :

> विसोबा खेचरांनी कुठलाही वार न करता नामदेवांचा सगुण विठोबा अलगदपणे सोडवला.

हे भव्य विधान आहे !
याचा अर्थ तुम्ही आधी विठोबा तयार करणार आणि
मग तुम्हाला अनिवार्यपणे,
त्याच्यापासून सुटका करुन घेतल्याशिवाय गत्यंतर नाही.

थोडक्यात, हा तुम्हीच निर्माण केलेला विठ्ठल,
तुम्हाला निर्गुणाचं दर्शन होण्याच्या मार्गात अडसर होणार !

मग त्या कामासाठी तुम्ही तोतापुरींऐवजी विसोबा शोधणार !
_______________________________________________

एकतर विसोबानी नामदेवांचा विठ्ठल कसा सोडवला, या प्रक्रियेची तुम्हाला काहीही माहिती नाही,

दुसरी गोष्ट, इथे फुल कॉपी / पेस्ट मारणार्‍या एका सदस्याच्या लेखातला हा उतारा वाचा :

संत नामदेवांचे नामस्मरणाची महती सांगणारे एक पुस्तक १९३७ साली महर्षींच्या वाचनात आले. महर्षींच्या पलंगाजवळ असलेल्या पुस्तकांच्या छोट्या कपाटावर सहज हाती येईल अशा जागी त्या पुस्तकाची एक प्रत महर्षींनी ठेवली. ही प्रत आयुष्याच्या शेवटच्या १३ वर्षांच्या कालखंडात महर्षींनी तिथून कधीच हलवली नाही. जप किंवा नामस्मरणाविषयी आश्रमात आलेल्या अभ्यागतांनी प्रश्न विचारले, तर महर्षी नेहेमी त्या पुस्तकातली वचने वाचून दाखवत असत. महर्षींनी कित्येक वेळा या पुस्तकाचे मुक्तकंठाने गुणगान केल्याने तसेच या पुस्तकातले सातत्याने दाखले दिल्याने महर्षी त्यातल्या आशयाशी पूर्णपणे सहमत होते असे म्हणावे तर ते वास्तवाला धरूनच होईल. प्रकरण ११ - मंत्र, जप आणि नामस्मरण.

थोडक्यात, उपलब्ध कागदपत्रांनुसार, विसोबांनी नामदेवांचा विठ्ठल सोडवलेला दिसत नाही.
_________________________________

एकूणात तुमच्या प्रामाणिक आणि स्वानुभवातून लिहीलेल्या प्रतिसादाची इतीश्री अशी की
नामस्मरण हा निव्वळ टाइमपास आहे,
त्यातून शांती लाभणं तर दूरच, परत विसोबा खेचर शोधावा लागतो, आणि
तो विसोबा सुद्धा नामदेवांचा विठ्ठल सोडवू शकत नाही !

_______________________________

> मेंदूच्या पलीकडे चैतन्य असतं, ही एकमेव गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझ्या प्रतिसादांचा एकमेव उद्देश आहे.

अर्थात !

पण ते चैतन्य पराकोटीच्या ध्वनीशून्यतेत काम करतं,
त्याचा नामस्मरणाशी सुतराम संबंध नाही.

सूर्याभोवतीचं १५ कोटी किलोमिटर त्रिज्येचं वर्तुळ, पृथ्वी ज्या सहजतेनं आवर्तीत करतेयं
त्यात इतकी ध्वनीशून्यता आहे की आपणही तिच्याबरोबर ती परिक्रमा करतोयं,
याची कुणाला यत्किंचितही जाणीव नाही.

गामा पैलवान's picture

27 Jun 2020 - 1:36 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

१.

याचा अर्थ शांती लाभेल हा तुमचा अनुभव नसून तर्क आहे आणि
अजपाजप हा स्वानुभव होऊनही तुम्हाला ती लाभलेली नाही.
थोडक्यात, नामस्मरणाच्या दुसर्‍या पायरीवरही रिझल्ट नाही.

मी नाम घेतो ते देवाचं अनुसंधान साधण्यासाठी. म्हणजे देव माझ्या सोबत आहे ही जाणीव जागृत ठेवण्यासाठी. यातनं उत्पन्न झालेल्या उपफळांचा मी फारसा विचार करीत नाही.

२.

आता नामसाधनेच्या अंतीम पायरीवरचा इष्ट देवतेचं दर्शन,
हा शेवटचा भ्रम उरला आहे !

मला देवदर्शनाची आंस नाही. तो बरोबर असला म्हणजे झालं. दिसला नाही तरी माझं व्यक्तीश: काहीही बिघडंत नाही. पण दिसला तर आवडेल मला.

३.

थोडक्यात, हा तुम्हीच निर्माण केलेला विठ्ठल,
तुम्हाला निर्गुणाचं दर्शन होण्याच्या मार्गात अडसर होणार !

विठ्ठल नामदेवाने निर्माण केलेला नाही. तो पंढरपुरात स्वयंभूपणे उभा आहे.

४.

मग त्या कामासाठी तुम्ही तोतापुरींऐवजी विसोबा शोधणार !

हा 'तुम्ही' म्हणजे नेमकं कोण? विसोबा शोधणं हे ज्ञानदेवांचं काम आहे. नामदेवाचं नाही.

५.

एकतर विसोबानी नामदेवांचा विठ्ठल कसा सोडवला, या प्रक्रियेची तुम्हाला काहीही माहिती नाही,

मला गरज नाही. माझ्याकडे भरपूर बुद्धी आहे. पाहिजे तेव्हा त्यातला हवा तेव्हढा विदा जाणून घेऊ शकेन, इतका आत्मविश्वास आहे.

६.

थोडक्यात, उपलब्ध कागदपत्रांनुसार, विसोबांनी नामदेवांचा विठ्ठल सोडवलेला दिसत नाही.

विठ्ठल सोडवणे म्हणजे सगुण रुपापल्याड असलेलं निर्गुण रूप दाखवणे.

७.

नामस्मरण हा निव्वळ टाइमपास आहे,

आहेच मुळी. एकदा का जप मनात मुरला की तो मस्तपैकी टाईमपास होऊन राहतो. कबीर म्हणून गेलेत : राम हमारा जप करे, हम बैठे आराम

८.

त्यातून शांती लाभणं तर दूरच, परत विसोबा खेचर शोधावा लागतो, आणि

मला आजवर लाभली नाही म्हणून तुम्हांस लाभणार नाही असं थोडंच आहे? शिवाय मला उद्या शांती लाभू शकते. ती शक्यता जागृत आहेच. नामस्मरणातनं अनेकांना शांती मिळाली आहेही.

९.

पण ते चैतन्य पराकोटीच्या ध्वनीशून्यतेत काम करतं,
त्याचा नामस्मरणाशी सुतराम संबंध नाही.

तरीही स्पंदन असतंच. ते स्पंदन म्हणजे नाम.

१०.

त्यात इतकी ध्वनीशून्यता आहे की आपणही तिच्याबरोबर ती परिक्रमा करतोयं,

तिथेही स्पंदन आहेच. थोडक्यात 'नाम' सर्वत्र आहे.

आ.न.,
-गा.पै.

१. मी नाम घेतो ते देवाचं अनुसंधान साधण्यासाठी. म्हणजे देव माझ्या सोबत आहे ही जाणीव जागृत ठेवण्यासाठी.

थोडक्यात, नामाच्या आधारावर तुम्ही एक काल्पनिक देव धरुन ठेवला आहे.
नाम बंद की देव गुल !

२. मला देवदर्शनाची आंस नाही. तो बरोबर असला म्हणजे झालं. दिसला नाही तरी माझं व्यक्तीश: काहीही बिघडंत नाही. पण दिसला तर आवडेल मला.

तुमच्या कल्पनेतला देवच तुम्हाला दिसू शकतो !
गोंदवलेकरांना राम शिकवला नसता तर त्यांना तो दिसला (?) नसता !

३. विठ्ठल नामदेवाने निर्माण केलेला नाही. तो पंढरपुरात स्वयंभूपणे उभा आहे.
मोदी युगपुरुष आहेत या भक्तांच्या श्रद्धेत आणि तुमच्या वरच्या विधानात फारसा फरक नाही.

४. विसोबा शोधणं हे ज्ञानदेवांचं काम आहे. नामदेवाचं नाही.

तुमच्यासाठी विसोबा शोधणारे ज्ञानदेव ऑलरेडी आहेत ?
कुठे असतात आणि केंव्हा भेटले ते तुम्हाला ?

५. मला गरज नाही. माझ्याकडे भरपूर बुद्धी आहे. पाहिजे तेव्हा त्यातला हवा तेव्हढा विदा जाणून घेऊ शकेन, इतका आत्मविश्वास आहे.

वरच्या प्रतिसादांवरुन तुम्हाला इष्ट देवता दिसायला लागली तर
तिच्यापासून सुटकेचा, तुमच्याकडे कोणताही मार्ग दिसत नाही.

६. विठ्ठल सोडवणे म्हणजे सगुण रुपापल्याड असलेलं निर्गुण रूप दाखवणे ?

तुम्हाला अजून सगुण दिसायला तयार नाही,
ते दिसल्यावर तुमचे ज्ञानेश्वर तुमच्यासाठी विसोबा आणणार
मग ते तुम्हाला निर्गुण दाखवणार, आणि
कसा ते तुम्हाला माहिती नाही !

तुम्ही माझे सगळे मुद्दे यथोचित सिद्ध केले !

७. आहेच मुळी. एकदा का जप मनात मुरला की तो मस्तपैकी टाईमपास होऊन राहतो.

पुन्हा एकदा धन्यवाद !

८. मला आजवर लाभली नाही म्हणून तुम्हांस लाभणार नाही असं थोडंच आहे? शिवाय मला उद्या शांती लाभू शकते. ती शक्यता जागृत आहेच. नामस्मरणातनं अनेकांना शांती मिळाली आहेही.

पुन्हा तीच चूक !
शांती आपण खुद्द आहोत. त्यासाठी नामस्मरणाची आवश्यकताच नाही.
पण आता तुमचे प्रतिसाद तर्कहीन झाल्यामुळे ते कळण्याची शक्यता मालवली.

९. तरीही स्पंदन असतंच. ते स्पंदन म्हणजे नाम.

स्पंदनासाठी नामाची आवश्यकता नाही.
हृदय चालू आहे म्हणून धडधड ऐकू येतेयं,
तुम्ही घोड्याच्या पुढे गाडी जोडतायं !

१०. तिथेही स्पंदन आहेच. थोडक्यात 'नाम' सर्वत्र आहे.

शांततेत स्पंदन आहे आणि स्पंदन आहे म्हणून नाद आहे.

तस्मात, मूळ शांतता आहे; नाद नाही

____________________________________________

एकूणात तुमच्याशी आतापर्यंत चर्चा छान झाली
पण आता प्रतिसाद तर्कशून्य आणि भवविवश होत चालल्यानं मला चर्चेत स्वारस्य उरलेलं नाही.
तरीही गामाश्री, तुमच्या सभ्य आणि सयंमशील प्रतिसादांना मनःपूर्वक दाद देतो !

सोत्रि's picture

27 Jun 2020 - 8:31 pm | सोत्रि

शांततेत स्पंदन आहे

शांततेत जर स्पंदन असेल तर ती शांतता नाही!
शांतता म्हणजे शून्य.

- (शांत होण्याची आस असलेला) सोकाजी

काय बोल्ता ?

शांतता सर्वव्यापी आहे, स्पंदन नाद सर्व काही तिच्यात आहे.
शून्य हे शांततेचं दुसरं नांव आहे, आणि
सर्व प्रकटीकरण (हे अस्तित्त्व) शून्यानं तर धारण केलंय !

ती शांतता किंवा ते शून्यच तर सर्व चराचर व्यापून आहे, आणि
त्यामुळे तेच आपलं स्वरुप आहे.

अर्धवटराव's picture

29 Jun 2020 - 9:01 pm | अर्धवटराव

मुळात ज्याला इथे शांतता म्हटलं जातय ति म्हणजे स्पंदन जाणवणार्‍याची क्षमता संपणं आहे. एका मर्यादेपलिकडे ध्वनी ग्रहण करता येत नाहि... त्यालाच शांतता म्हटलं तर ति ग्रहण करणार्‍याची लिमीटेशन झाली. तिथे खरच शांतता आहे कि ध्वनी तरंगांचं आपल्याला न उमगलेलं रूप आहे याचा अंदाज बांधता येतो किंवा आणखी खोलात जायचे प्रयत्न करता येतात. शांतताच सर्वकाहि आहे म्हणणे अर्धसत्य तरी आहे किंवा संपूर्ण असत्य तरी.

कानडाऊ योगेशु's picture

27 Jun 2020 - 1:53 pm | कानडाऊ योगेशु

४.

मग त्या कामासाठी तुम्ही तोतापुरींऐवजी विसोबा शोधणार !

हा 'तुम्ही' म्हणजे नेमकं कोण? विसोबा शोधणं हे ज्ञानदेवांचं काम आहे. नामदेवाचं नाही.

गा.पैंशी सहमत.
ह्यावरुन एक कथा आठवली.
अरबस्थानातील एका उंट व्यापाराकडे १७ उंट होते.तो मृत्युशय्येवर असताना त्याच्या ३ मुलांच्या भवितव्याबाबत चिंता वाटत असे.३ मुले साधारण बुध्दीमत्तेचे असल्याने कुणा एका मार्गदर्शकाची त्यांना गरज आहे हे तो ओळखुन होता. आपल्या मृत्युपत्रात त्याने असे लिहिले कि एकुण उंटांपैकी १/२ मोठ्याला,१/३ मधल्याला व १/९ धाकट्याला द्यावेत.कुठलाही उंट मरता कामा नये व जोपर्यंत वाटणी बरोबर होत नाही तोपर्यंत तिघांनी मिळून काम करावे जेव्हा होईल तेव्हा ज्याने कोणी मदत केली त्याचा सल्ला पुढे मानावा वगैरे. तिघांनाही वाटणी काही करता येईना. शेवटी एक फकिर तिथुन स्वतःच्या उंटावरुन जात असताना त्याला ह्या समस्येबद्दल कळले व त्याने त्यांना मदत करायची इच्छा दर्शविली. मदत म्हणुन त्याने आपला एकुलता एक उंट त्या ३ बंधुंना दिला. मग आता नवीन संख्येनुसार १८ मधले ९ उंट मोठ्याने घेतले,६ उंट मधल्याने व २ उंट धाकट्याला मिळाले. एकुण वाटणी झालेले उंट ९+६+२ मिळुन १७ असे झाले व फकिराने आपला उंट परत घेतला.
सगूणापलिकडील निर्गुण दाखवणे हा प्रकार मला वरील उदाहरणातील फकिराने फिरवलेल्या उंटासारखा वाटतो. उंट वापरलाही गेलाय व वापरला नाहीही गेलाय.

संजय क्षीरसागर's picture

27 Jun 2020 - 2:49 pm | संजय क्षीरसागर

निर्गुण असा कशात काढता घालता येत नाही !
तो एकच आहे आणि त्यातच सगळं आहे.

कानडाऊ योगेशु's picture

27 Jun 2020 - 3:52 pm | कानडाऊ योगेशु

निर्गुण असा कशात काढता घालता येत नाही !
तो एकच आहे आणि त्यातच सगळं आहे.

तुम्ही म्हणता तसे असुही शकेल. पण हे विधान फार थेऑरिटिकल आहे.

पण हे विधान फार थेऑरिटिकल आहे.

जो पर्यंत स्वानुभूती येत नाही तोपर्यंत सर्वच थियराॅटिकल असतं, सायंन्समधेही!

- (प्रॅक्टिकल) सोकाजी

कानडाऊ योगेशु's picture

27 Jun 2020 - 9:02 pm | कानडाऊ योगेशु

>जो पर्यंत स्वानुभूती येत नाही तोपर्यंत सर्वच थियराॅटिकल असतं, सायंन्समधेही!
एक्झॅक्टली सोत्रिसर.
विज्ञानात सिध्दता असते तर अध्यात्म्यात प्रचिती.!
वरील उंटाच्या उदाहरणात ही फकिराच्या बाजुने पाहिले तर उंटाची गरज नाही म्हणजे नसलेला उंट तीन बंधुंना दिला व त्यांची समस्या सोडवली व तो नसलेला उंट परत स्वतःकडे आणला. पण ते तिघे बंधु फकीराच्या पातळीवरचे नसल्याने त्यांच्यासाठी एक उंट असा फिरवावा लागला. समजा इथे फकिराने असे म्हटले असते कि बाबांनो माझ्याकडे एक उंट आहे त्याचे नाव "अल्लारखा" वा "अल्लाबक्ष" वगैरे तत्सम काहीतरी ठेवु. तो मी तुम्हाला इथे दिला असे समजा आता कॅलक्युलेशन करा व समस्या सोडवा.तशीही समस्या सुटली असती पण इथे जर तिघा बंधुंनी कुतर्क केला असता कि जो उंट नाहीच आहे त्याचे नाव तुम्ही कसे ठेवता तर ही समस्या कदाचितही ना सुटती.

करेक्ट !

प्रचिती नसल्यानं अशी उदाहरण पसरली आहेत आणि
कुणी संतांनं असं उदाहरण दिलं की पब्लिकला वाटतं `हाऊ ग्रेट !'
पण मजा म्हणजे त्यालाही त्यातलं काही कळलेलं नसतं,
तो त्याच्या गुरुकडून मिळालेला माल पुढे पोहोचवत असतो.

सत्य ही निर्वस्तू आहे आणि
तीच सर्व चराचर अंतर्बाह्य व्यापून आहे.
तुम्ही ती काढणार कशातून ? आणि
ठेवणार कुठे ? कारण निर्वस्तू असल्यानं तीचं विभाजनही होऊ शकत नाही,
म्हणून तर नैनं च्छिंदंती शस्त्राणी म्हटलंय.

आणि तीनंच सर्व व्यापल्यानं तीला कुठेही ठेवता येत नाही.
म्हणून निर्वस्तू अक्षय आहे; तीच्यात वृद्धी किंवा घट होत नाही.
___________________________________________

त्यामुळे तुमचं ऊंटाचं उदाहरण गैरलागू आहे.

तसंच ते सगुणातून निर्गुण अलगद काढता येईल या भ्रामक कल्पनेला ही गैरलागू आहे.

त्यामुळे अध्यात्म एकदम क्लिअर-कट आहे : एकतर निर्गुणाचा उलगडा झाला किंवा मग नाही झाला.

आधी सगुण साधू मग नामदेवाला, ज्ञानदेव विसोबा खेचराकडे पाठवतील, आणि
तो अलगद सगुणातून निर्गुण वेगळा काढून दाखवेल,
याला काव्यात्मक कल्पनेपलिकडे काही अर्थ नाही.

कारण निर्गुण ही निर्वस्तू आहे.

कानडाऊ योगेशु's picture

27 Jun 2020 - 11:05 pm | कानडाऊ योगेशु

त्यामुळे तुमचं ऊंटाचं उदाहरण गैरलागू आहे.

ते कसे? माझ्यामते भावंडांच्या मटेरिअलिस्टीक सत्य परिस्थितीत फकिर भेटल्यानंतर काहीही फरक पडला नाही.पण एक समस्या सुटली आहे. नसलेला उंट फिरवला आणि चमत्कार घडला आणि सत्यही तसेच राहिले.

तसंच ते सगुणातून निर्गुण अलगद काढता येईल या भ्रामक कल्पनेला ही गैरलागू आहे.

माझ्यामते सगुणातुन निर्गुणाला बाहेर काढणे असे नसुन सगुणाच्या सहाय्याने निर्गुणाची अनुभुती घेणे असे असायला हवे.
म्हणजे एखादा तरण-शिक्षक आपल्या शिष्याला आधी डबा बांधुन पोहायला शिकवेल. पण एका निर्णायक क्षणी तो डबा आता जोखड होतोय तुच काढुन टाक असे म्हणेल वा स्वतःच त्याचा डबा काढुन शिष्याला पाण्यात ढकलेल.

संजय क्षीरसागर's picture

27 Jun 2020 - 11:12 pm | संजय क्षीरसागर

गापैंशी यावर झालेली सविस्तर चर्चा बघा.

तीनशे प्रतिसाद झाल्यावर.. कोणाच्या विचारात जर फरक पडला नाही तर, दोन्ही साईड ने बोलणाऱ्यांनी विषय बंद करण्यास काही हरकत आहे काय?

सहज वाटले..

फक्त धागा कर्त्यालं पटल तरच निर्माता अस्तित्वात आहे नाही पटल तर नाही.
धार्मिक विचारांनी सुयोग्य समाज निर्माण होतो अन्यथा नाही हे धागा कार्त्याला पटले तरच सत्यात उतरले.
कशाला त्यांना पटवण्याचा आटापिटा करताय कारण त्यांच्या सारखा विचार करणारी लोक अल्प संख्यक आहेत.
आपले विचार त्यांना पटले पाहिजेत ही आपली मजबुरी नाही.
अन् त्यांचे विचार आपल्याला पटले पाहिजेत ही त्यांची गरज आहे.
हा धागा बंद करणे च उत्तम.

संजय क्षीरसागर's picture

28 Jun 2020 - 9:15 pm | संजय क्षीरसागर

निर्माण होतो अन्यथा नाही ?

वाचा :

>दुसर्‍याचा गैरफायदा घेऊ नका आणि भीडेखातर किंवा मोहास्तव, स्वतःचा दुसर्‍याला फायदा घेऊ देऊ नका
या फक्त एका आचरणानं समाज कायम नितीमान राहील आणि
कोणत्याही पाप-पुण्याच्या भयाची (म्हणजे देवाची) गरज उरणार नाही

ह्या जगाचा कोणी तरी निर्माता आहे ह्या वर माझा विश्वास आहे.
आणि कसे जगावे,जगण्याची उद्दीष्ट काय असावीत, समाजात वावरताना वर्तन कसे असावे.
सुख ,दुःखाच्या कल्पना ह्या विषयी धर्म जे सांगतो ते अती उत्तम दर्जाचे च आहे .आणि मला ते पटत
धर्म अस्तित्वात आले नसते तर आताच सुनियोजित समाज,कुटुंब अस्तित्वात आलीच नसती.
हे पण ठाम मत आहे
तुमची मत बरोबर असतील तुमच्या पुरती त्या वर माझा काही आक्षेप नाही.
आणि तुमचीच मत योग्य आहेत ती सर्वांनी स्वीकारावी असे तुम्हाला वाटत असेल तर माझा नाईलाज आहे.
मी तुमच्या मताशी सहमत नाही.

संजय क्षीरसागर's picture

28 Jun 2020 - 10:22 pm | संजय क्षीरसागर

म्हणून तुम्हाला नीती-मूल्यांचा धसका आहे,
अन्यथा ती स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळण्या इतकी प्रगल्भता कुणाच्यात नाही.

म्हणजे नीती-मूल्य स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळणारे
जगात जे काही प्रगल्भ नास्तिक आहेत ते फक्त २ % आहेत.
असा सरळ अर्थ होतो.

गामा पैलवान's picture

28 Jun 2020 - 2:02 am | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला.

१.

थोडक्यात, नामाच्या आधारावर तुम्ही एक काल्पनिक देव धरुन ठेवला आहे.

करेक्ट. इलेक्ट्रॉन देखील कुणीही पाहिला नाहीये. त्याचीही केवळ कल्पनाच करता येते. त्याचं थेट रूप न दिसता ती कल्पना गणिती समीकरणांच्या मार्गे मांडावी लागते.

२.

नाम बंद की देव गुल !

समीकरणाचा कागद फाडला की इलेक्ट्रॉन गुल होत नाही.

३.

तुमच्या कल्पनेतला देवच तुम्हाला दिसू शकतो !

समीकरणातला इलेक्ट्रॉन इतका झगझगीतपणे दिसतो की तो गृहीत धरून त्याचे गुणधर्म शोधणाऱ्या अनेक लोकांना नोबेल पारितोषिक मिळालं.

४.

गोंदवलेकरांना राम शिकवला नसता तर त्यांना तो दिसला (?) नसता !

गोंदवलेकरांचं माहीत नाही. क्षमस्व!

५.

मोदी युगपुरुष आहेत या भक्तांच्या श्रद्धेत आणि तुमच्या वरच्या विधानात फारसा फरक नाही.

'इलेक्ट्रॉन अमुकेक स्थानी अस्तित्वात आहे' असं थेट विधान करता येत नाही. तरीपण त्याचं वस्तुमान मोजलं जातं. आणि ते मोजतांना तो स्थिर आहे असं मानलं जातं. हा तिढा कसा सोडवणार? हा पेच सुटंत नाही तोवर इलेक्ट्रॉनचं अस्तित्व ही एक भक्तांची श्रद्धाच असणारे.

६.

तुमच्यासाठी विसोबा शोधणारे ज्ञानदेव ऑलरेडी आहेत ?
कुठे असतात आणि केंव्हा भेटले ते तुम्हाला ?

ते माझा देव बघून घेईल. त्याला माझ्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. त्याला योग्य वाटेल तेव्हा मला यथोचित माणसं भेटतील.

७.

वरच्या प्रतिसादांवरुन तुम्हाला इष्ट देवता दिसायला लागली तर
तिच्यापासून सुटकेचा, तुमच्याकडे कोणताही मार्ग दिसत नाही.

माझ्या देवाला माझ्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. त्यामुळे हा भर मी त्याच्यावर टाकला आहे.

८.

तुम्हाला अजून सगुण दिसायला तयार नाही,
ते दिसल्यावर तुमचे ज्ञानेश्वर तुमच्यासाठी विसोबा आणणार
मग ते तुम्हाला निर्गुण दाखवणार, आणि
कसा ते तुम्हाला माहिती नाही !

एकदम बरोबर. यालाच देवावर भरवंसा असणे म्हणतात.

९.

तुम्ही माझे सगळे मुद्दे यथोचित सिद्ध केले !

धन्यवाद! माझं थोडंतरी सहाय्य झालं. :-)

१०.

स्पंदनासाठी नामाची आवश्यकता नाही.

तुमच्यासाठी नसेल. बहुसंख्य साधकांसाठी स्पंदन हेच नाम आहे.

११.

हृदय चालू आहे म्हणून धडधड ऐकू येतेयं,
तुम्ही घोड्याच्या पुढे गाडी जोडतायं !

हे कळलं नाही.

१२.

शांततेत स्पंदन आहे आणि स्पंदन आहे म्हणून नाद आहे.

बरोबर.

१३.

तस्मात, मूळ शांतता आहे; नाद नाही

बरोबर. प्रत्येक नाद स्पंदनजन्य नसतो. उदा. : अनाहत नाद.

१४.

एकूणात तुमच्याशी आतापर्यंत चर्चा छान झाली
पण आता प्रतिसाद तर्कशून्य आणि भवविवश होत चालल्यानं मला चर्चेत स्वारस्य उरलेलं नाही.

तुमच्या मताचा आदर आहे. मी सुद्धा थांबायचं म्हणतो.

असो.

एकंदर चर्चेवरनं मला वाटतं की तुम्ही ज्याला देव (किंवा परम तत्त्व) म्हणता ते आकाशासारखं स्थितीशील आहे. याउलट मी (व बहुसंख्य लोकं) ज्याला देव म्हणतो तो चेष्टाकर म्हणजे हालचाल करणारा आहे. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना:.

आ.न.,
-गा.पै.

आणि तुमचा तर्कही काही वेळा काम करतो, म्हणून तुमच्यासाठी एक प्रयत्न करतो.

१. > इलेक्ट्रॉन देखील कुणीही पाहिला नाहीये. त्याचीही केवळ कल्पनाच करता येते. त्याचं थेट रूप न दिसता ती कल्पना गणिती समीकरणांच्या मार्गे मांडावी लागते.

सत्य सिद्ध आहे !

ती इलेक्ट्रॉनसारखी (किंवा देवासारखी) कल्पना नाही.

सिद्ध याचा अर्थ जे ऑलरेडी प्रूव्ड आहे,
ज्याच्या पुष्टीकरणार्थ कोणताही पुरावा सादर करण्याची गरज नाही.

आता हे शांतपणे वाचा :

जगात एकमेव विधान असं आहे ज्याचा प्रतिवाद होऊ शकत नाही, ते म्हणजे : मी आहे !
बाकी कोणतीही गोष्ट सिद्ध करायला लागेल,पण
`मी नाही' म्हणायला सुद्धा, तुमचं असणं अनिवार्य आहे.

आणि हा `मी' सार्वजनिक आहे.
तो आपल्या सर्वांचा एकच आहे.
त्यामुळे तो स्थानबद्ध नाही.
________________________________

मी नव्हतो किंवा मी नसेन या सुद्धा कल्पना आहेत कारण त्या देहाधारित आहेत.
थोडक्यात, मी नव्हतो किंवा मी नसेन हा कुणाचाही अनुभव नाही.
तस्मात, मी आहे हे विधान कालबद्ध नाही.
__________________________

याचं एकच कारण आहे ते म्हणजे आपणच सत्य आहोत !

आणि ही इतकी उघड गोष्ट आहे की त्यासाठी देव, इलेक्ट्रॉन, किंवा काहीही मधे आणण्याची गरज नाही.

________________________________________

मग लफडा काये ?
तर प्रत्येक जण `मी आहे' हा व्यक्तिगत आणि खाजगी मामला समजतो !
प्रत्येकाला असं ठामपणे वाटतं की तो विशिष्ठ देह आणि नांव असलेली व्यक्ती आहे.

हा भ्रम युगानुयुगं, मानसिकतेत इतका खोल गेला आहे की बोलता सोय नाही.
त्यात संत महंतांनी `निर्गुण प्राप्तीसाठी सगुणोपासनेचं' असं काही स्तोम माजवलंय की
एकालाही आपण सत्य आहोत ही उघड गोष्ट मान्य करायची लाज वाटते !
आणि त्यापुढे जाऊन तसं म्हणणं म्हणजे अहंकाराची भाषा समजली जाते.
_________________________________

वास्तविकात, अहंकार हा चुकीच्या धारणांचा एकत्रित परिणाम आहे.

स्वतःला व्यक्ती समजणे आणि मग स्वतः सत्य असतांना, ते प्राप्त करण्याचा घाट घालणे
हा खरा अहंकार आहे कारण `अहं-आकार' या मूलभूत धारणेतून तो निर्माण झाला आहे.

__________________________________

तस्मात, देव ही मानवी कल्पना न सत्यप्राप्तीसाठी गरजेची,
न तीच्यामुळे कुणाला काही संरक्षण, न कृपा, न कोप.

देवच नाही म्हटल्यावर त्याचं तुम्हीच ठेवलेलं नांव,
त्याच्या इतकंच निरुपयोगी आहे ही उघड गोष्ट आहे.

थोडक्यात, ही भानगड आता संपवा आणि
कोणतीही साधना, जप-जाप्य, परिक्रमा, कर्मकांड, पूजा-अर्चा, नवस करणं आणि फेडणं, तिर्थाटनं यात वेळ, पैसा आणि श्रम व्यर्थ घालवू नका.
उन्मुक्त आणि स्वच्छंद जगा.

दुसर्‍याचा गैरफायदा घेऊ नका आणि भीडेखातर किंवा मोहास्तव, स्वतःचा दुसर्‍याला फायदा घेऊ देऊ नका
या फक्त एका आचरणानं समाज कायम नितीमान राहील आणि
कोणत्याही पाप-पुण्याच्या भयाची (म्हणजे देवाची) गरज उरणार नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2020 - 12:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवाचं नाव माणसाने ठेवलं यावर एकमत झाल्याबद्दल सर्वांचे आभार.

-दिलीप बिरुटे

शा वि कु's picture

28 Jun 2020 - 12:31 pm | शा वि कु

:))

अभ्या..'s picture

28 Jun 2020 - 12:37 pm | अभ्या..

अर्थात,
दरवर्षी आम्ही देवाचा जन्म भक्तिभावे अगदी पाळण्याला झोके देऊन साजरा करतो त्यामुळे नाव ठेवणे क्रमप्राप्त आहे.
.
नाव ठेवणाऱ्या माणसाचा वंशज
अभ्या

कानडाऊ योगेशु's picture

28 Jun 2020 - 1:31 pm | कानडाऊ योगेशु

चूक होते आहे अभ्या...! (ह्या धाग्यावरचे पॉप्युलर विधान..)
इथे माहीत असलेल्या देवाला त्याचे माहीत असलेले नाव देतोयस तू.
हा म्हणजे "तुम्हारा नाम क्या है बसंती" सारखा प्रकार आहे.
पण ते असो ह्या निमित्ताने हा २९९ वा प्रतिसाद..

अभ्या..'s picture

28 Jun 2020 - 1:45 pm | अभ्या..

बरे. माझी चुक झाली.
खरे तर देवाला देव का म्हणायचे सुरुवात आहे माझी पण हरकत नाही.
धडकनमध्ये सुनील शेट्टी "देव" नाव घेऊ शकतो तर कसलीच हरकत नाहीये खरोखर.
.
३०० झाले ब्वॉ.
झरक्सिस खुष हुवा.
आहू........

शाम भागवत's picture

28 Jun 2020 - 1:06 pm | शाम भागवत

३०० तरी होऊ द्यायचे. ;)

अभ्या..'s picture

28 Jun 2020 - 1:17 pm | अभ्या..

तुम्ही घ्या मनावर. पास न देता खेळा टिच्चून मग ३०० काय ५०० पण कमी पडतील.
बाकी सगळ्याबाबत आम्हाला आदरच आहे.
सद्य परिस्थितीत दोन चार प्लस वण ठोका सहमतीचे. होतील ३००.
.

शाम भागवत's picture

28 Jun 2020 - 2:33 pm | शाम भागवत

नको.
मी तेवढ्यासाठी जुना धागा वरती आणतोय.
चितळेसाहेबांच्या धाग्याला फक्त ८८ प्रतिसाद?

सतिश गावडे's picture

28 Jun 2020 - 5:06 pm | सतिश गावडे

आता हे शांतपणे वाचा :
आता शांतपणे वाचा :
आता हे तर खरंच शांतपणे वाचा :
आता परत वरचा ४ शांतपणे वाचा !
आता नीट वाचा :
पुन्हा वाचा :
वर २. वाचा

संजय क्षीरसागर's picture

28 Jun 2020 - 5:38 pm | संजय क्षीरसागर

तस्मात, देव ही मानवी कल्पना न सत्यप्राप्तीसाठी गरजेची,
न तीच्यामुळे कुणाला काही संरक्षण, न कृपा, न कोप.

देवच नाही म्हटल्यावर त्याचं तुम्हीच ठेवलेलं नांव,
त्याच्या इतकंच निरुपयोगी आहे ही उघड गोष्ट आहे.

थोडक्यात, ही भानगड आता संपवा आणि
कोणतीही साधना, जप-जाप्य, परिक्रमा, कर्मकांड, पूजा-अर्चा, नवस करणं आणि फेडणं, तिर्थाटनं यात वेळ, पैसा आणि श्रम व्यर्थ घालवू नका.
उन्मुक्त आणि स्वच्छंद जगा.

दुसर्‍याचा गैरफायदा घेऊ नका आणि भीडेखातर किंवा मोहास्तव, स्वतःचा दुसर्‍याला फायदा घेऊ देऊ नका
या फक्त एका आचरणानं समाज कायम नितीमान राहील आणि
कोणत्याही पाप-पुण्याच्या भयाची (म्हणजे देवाची) गरज उरणार नाही.

सतिश गावडे's picture

28 Jun 2020 - 7:25 pm | सतिश गावडे

या धाग्यावर लोकांना "देव नाही" हे सांगण्याची तुम्हाला इतकी नशा चढली आहे की माझ्यासारख्या नास्तिकालाही तुम्ही "देव नाही" हे सांगत आहात.

भानावर या संजयजी :)

>आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥ ?

केंव्हा झाला हा बदल ? आणि कशामुळे ?

सतिश गावडे's picture

28 Jun 2020 - 8:26 pm | सतिश गावडे

ज्या तत्परतेने तुम्ही खोदकाम केलेत त्याला दाद द्यायला हवी.

संजय क्षीरसागर's picture

28 Jun 2020 - 8:48 pm | संजय क्षीरसागर

काही हरकत नाही.

पण विचारसरणीत बदल कशामुळे झाला ?

सतिश गावडे's picture

28 Jun 2020 - 10:01 pm | सतिश गावडे

>> ४ वर्षाला युगे म्हणतायं !
अहो गंमतीत म्हटलं होतं ते. तुम्ही लगेच माझा तो प्रतिसाद मी केव्हा दिला होता पाहून आलात ना. :)

>> पण विचारसरणीत बदल कशामुळे झाला ?
मिपावरील समाज प्रबोधन करणारे नास्तिक लोकांचे लेख वाचून मलाही नास्तिक व्हावंसं वाटू लागलं. मग मी लगेच अमेझॉनवरुन How to be an atheist in 21 days हे पुस्तक मागवलं. त्या पुस्तकाच्या फिलॉसॉफीनुसार रोज एक चाप्टर वाचू लागलो. २१ व्या दिवसाच्या रात्री रिचर्ड डॉकिन्स माझ्या स्वप्नात आला आणि नास्तिकपंथाचा गंडा माझ्या हातावर बांधला. माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशिर्वाद दिला, "आजन्म नास्तिक भव". बाविसाव्या दिवशी सकाळी मी अंतर्बाह्य नास्तिक झालो होतो.

जोक्स अपार्ट, सश्रद्ध अथवा अश्रद्ध असणं ही मी वैयक्तीक बाब मानतो. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं मी उचित समजत नाही. क्षमस्व.

ही मी वैयक्तीक बाब मानतो ?

काय सांगता ?

पण इथे तर तुम्ही मोठ्या झोकात, पब्लिक फोरमवर म्हटलंय :

" माझ्यासारख्या नास्तिकालाही तुम्ही "देव नाही" हे सांगत आहात. "

सतिश गावडे's picture

28 Jun 2020 - 10:39 pm | सतिश गावडे

ही मी वैयक्तीक बाब मानतो हे मी नास्तिक का आहे याची चर्चा मला करायची नाही अशा अर्थी होतं ते.

>> पण इथे तर तुम्ही मोठ्या झोकात, पब्लिक फोरमवर म्हटलंय
हो, मला माहिती नव्हतं मी तसं लिहीण्याने तुमच्या भावना दुखावतील. सॉरी हा.

संजय क्षीरसागर's picture

28 Jun 2020 - 10:47 pm | संजय क्षीरसागर

ज्या ठामपणे तुम्ही लिहीलंय ते वाचून नवल वाटलं.
सगळा लेख तर देव ही कल्पना आहे यावर आहे.
तुमचं अजून नक्की ठरत नाही असं म्हणा !

सतिश गावडे's picture

28 Jun 2020 - 10:52 pm | सतिश गावडे

>> तुमचं अजून नक्की ठरत नाही असं म्हणा !
तुम्हाला वाटतंय ना, मग तसंच असणार ते.

त्यानं एकतर नामस्मरणात बाधा येईल आणि
`शांत झोप ' जाऊन `जाग येईल' ते वेगळंच !

शाम भागवत's picture

28 Jun 2020 - 11:08 pm | शाम भागवत

:)
आमेन

शाम भागवत's picture

29 Jun 2020 - 9:29 am | शाम भागवत

एकच गोष्ट साध्य करायला विविध मार्ग असतात हे पटलं तर.
:)

पळवाट शोधायचा तुम्हाला `नवीन मार्ग' सापडला,
असा अर्थ आहे !

शाम भागवत's picture

29 Jun 2020 - 11:27 am | शाम भागवत

:)
आमेन.
:)

राजाभाउ's picture

29 Jun 2020 - 1:37 pm | राजाभाउ

हे एक नंबर आहे.

नामस्मरणाने हजरजबाबीपणा वाढतो. :)

शाम भागवत's picture

29 Jun 2020 - 1:59 pm | शाम भागवत

:)

अनन्त अवधुत's picture

29 Jun 2020 - 12:39 pm | अनन्त अवधुत

देवाची कृपा, अजुन काय !! ;)

शा वि कु's picture

28 Jun 2020 - 9:38 pm | शा वि कु

खुदा

बुरा लगा तो होगा ऐ खुदा तुझे,
दुवा में जब,
जम्हाई ले रहा था मैं―
दुआ के इस अमल से थक गया हूँ मैं !
मैं जब से देख सुन रहा हूँ,
तब से याद हैं मुझे,
खुदा जला बुझा रहा है रात दिन,
खुदा के हात मैं हे सब बुरा भला―
दुआ करो !

अजीब सा अमल है ये
ये एक फर्जी गुफ्तगू,
और एकतर्फ़ा― एक ऐसे शख्स से,
ख्याल जिसकी शक्ल है
ख्याल ही सबूत है ।

संजय क्षीरसागर's picture

28 Jun 2020 - 10:14 pm | संजय क्षीरसागर

अजीब सा अमल है ये
ये एक फर्जी गुफ्तगू,
और एकतर्फ़ा― एक ऐसे शख्स से,
ख्याल जिसकी शक्ल है
ख्याल ही सबूत है ।

__________________________

अजीब आलम है दोस्तों तुम्हारा,
अगर कोई खुदासे बातें करें तो जमानेने
उसे सर-आखोंपे बिठा लिया, और
अगर कोई खुदसे बातें करे तो उसे
पागलखाना करार दिया |

संजय क्षीरसागर's picture

29 Jun 2020 - 12:09 am | संजय क्षीरसागर

किती सुरेख कविता आहे ही, तीचा मराठीत अर्थ असा !

देवा, तुझी प्रार्थना चालू असतांना मला जांभई आली;
तुला नक्कीच वाईट वाटलं असणार.

तुझ्या या पवित्र प्रार्थनेनं,
मी आता थकलोयं.

जेंव्हापासनं मी ऐकतोय आणि पहातोयं,
तेंव्हापासून मला आठवतंय की
देव दिवस-रात्र उजळवतो आणि मालवतो,
देवाच्या हातात सगळ्यांचं भलं-बुरं आहे -
प्रार्थना करा !

अजब पावित्रता आहे ही,
हा एक फसवा संवाद,
जो एकतर्फी आहे - आणि तोही अशा व्यक्तीशी,
की कल्पनाच जिचा चेहरा आहे, आणि
कल्पनाच जीचा पुरावा !

शा वि कु's picture

29 Jun 2020 - 10:17 am | शा वि कु

अमल चा हिंदी अर्थ अपवित्रता आहे, पण तो इथे त्या अर्थाने वापरला नसावा. इथे उर्दू अमल अभिव्यक्त आहे. नशा, अमली पदार्थांमधला अमल.

संजय क्षीरसागर's picture

29 Jun 2020 - 10:38 am | संजय क्षीरसागर

अमलचा हिंदी अर्थ निर्मल, स्वच्छ असा आहे आणि ते उपहासात्मक आहे.

उर्दू शब्द म्हणून तुम्ही म्हणता तसा `नशेचा अंमल' हा पण एक अँगल आहे.

कानडाऊ योगेशु's picture

29 Jun 2020 - 12:08 pm | कानडाऊ योगेशु

अजीब आलम है दोस्तों तुम्हारा,
अगर कोई खुदासे बातें करें तो जमानेने
उसे सर-आखोंपे बिठा लिया, और
अगर कोई खुदसे बातें करे तो उसे
पागलखाना करार दिया |

ओळी आवडल्या.

दुआ के इस अमलसे..

इथे अमल चा अर्थ जबरदस्ती असा असावा. (अमलबजावणी वा अमलात आणणे मधला अमल)

अजीब सा अमल..

माहौल हा अर्थ असावा..
म्हणजे एकुण कवितेचा अर्थ खयाली पुलावा मधल्या पुलावाला कित्ती चविष्ट आहे असे म्हणण्याची जबरदस्ती करुन थकुन गेलोय असे म्हणायचे असावे कवीला असे वाटते.(चुभुदेघे.)

ते वरच्या प्रतिसादात दिलेत.

अर्थात, तुम्ही काढलेला निष्कर्श :

> एकुण कवितेचा अर्थ खयाली पुलावा मधल्या पुलावाला कित्ती चविष्ट आहे असे म्हणण्याची जबरदस्ती करुन थकुन गेलोय असे म्हणायचे असावे कवीला असे वाटते

एकदम करेक्टे !

शा वि कु's picture

29 Jun 2020 - 12:44 pm | शा वि कु

खरंय कायो. हा पण अर्थ जमतोय.

कोणी तरी सांगितलं देव आहे आणि जगभरातील लोक देव आहे असे मानायला लागले पूजा अर्चा करायला लागले असे घडले नाही.
किती तरी वर्ष गेली असतील ह्या मध्ये.
त्या पासून निरंतर बदल होत गेले आणि अजुन पण होत आहेत .
पण देव (भले कल्पना असली तरी अजुन घट्ट टिकून आहे)
एकादी कल्पना (सिध्द करता येत नाही म्हणून कल्पना असे म्हणुया)हजारो वर्ष टिकून राहण्याचे हे एकमेव उदाहरण असावे.
पण देव ,माणसाच्या प्रगतीत आडवा पण आला नाही लोकांनी श्रद्धा पण ठेवली आणि नव नवीन शोध पण लावले.
विज्ञान आणि श्रद्धा ह्यांची भेसळ न केल्या मुळे च ते शक्य झाले.
आता सरळ सरळ एक काही तरी निवडा असा अतिरेकी विचार काही लोक करत आहेत.
विज्ञान तरी निवडा नाही तर देव तरी निवडा
हा अतिरेक आहे त्या ची विक्षिप्त प्रतिक्रिया म्हणून लोक त्याचा विरोध करतात.
शोध चालू आहे निर्मात्याचा.
तो प्रश्न निकाली निघणार नाही इतक्यात कारण अजुन पण खूप काही सिध्द होणे बाकी आहे.
जसा काळ पुढे सरकत जाईल आताचे शोध सुद्धा खोटे ठरतील सत्य काही वेगळेच आहे अश्या नवीन गोष्टी माहिती पडतील.
आणि एक दिवस देव सत्य की कल्पना हे पुराव्या सहित सिद्ध होईल .
तो पर्यंत wait and watch .

संजय क्षीरसागर's picture

28 Jun 2020 - 11:10 pm | संजय क्षीरसागर

म्हणून तुम्हाला नीती-मूल्यांचा धसका आहे,
अन्यथा ती स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळण्या इतकी प्रगल्भता कुणाच्यात नाही.

आणि तुमच्या मते तुमच्यासारखे ९८ % लोक आहेत !
म्हणजे नीती-मूल्य स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळणारे
जगात जे काही प्रगल्भ नास्तिक आहेत ते फक्त २ % आहेत.
असा सरळ अर्थ होतो.

________________________________

हे आधी सोडवा आणि मग पुढे जंप मारा.

धार्मिक लोक प्रगल्भ नसतात आणि नास्तिक प्रगल्भ असतात ( भले संख्येने नगण्य असले तरी).
हे पण तुम्हीच ठरवत आहात.
हाच तो हट्ट वादी पना तुमच्या स्वभावात आहे.

> धर्म अस्तित्वात आले नसते तर आताच सुनियोजित समाज,कुटुंब अस्तित्वात आलीच नसती.
हे पण ठाम मत आहे > 28 Jun 2020 - 9:33 pm | Rajesh188

हे तुम्ही लिहिलंय !

Rajesh188's picture

29 Jun 2020 - 12:26 am | Rajesh188

हट्ट वादी पना सोडा लोकांना ठरवू ध्या त्यांना काय योग्य वाटते ते.
साधं सिंपल आहे.

संजय क्षीरसागर's picture

29 Jun 2020 - 10:25 am | संजय क्षीरसागर

म्हणून तुम्हाला नीती-मूल्यांचा धसका आहे,
अन्यथा ती स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळण्या इतकी प्रगल्भता कुणाच्यात नाही.

आणि तुमच्या मते ९८ % लोक तुमच्यासारखे आहेत !

म्हणजे नीती-मूल्य स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळणारे
जगात जे काही प्रगल्भ नास्तिक आहेत ते फक्त २ % आहेत.
असा सरळ अर्थ होतो.

________________________________

हे आधी सोडवा आणि मग पुढे जंप मारा.

आपण समजतो तेच सर्वांनी मान्य करावे हे नास्तिक लोकांना वाटत असते.
आणि हेच लोकांना खटकते.
नास्तिक त्या मध्ये भारतीय नास्तिक हे कट्टर धर्म वेड्या व्यक्ती पेक्षा जास्त आग्रही असतात.
हे कोडेच आहे..
तुम्ही प्रगल्भ आहात ना मग तुम्ही विचाराचा अतिरेक का करताय .
आग्रह का धरत आहात.
लोकांना ठरवू ध्या ना.
नरेंद्र दाभोलकर सारखा विचारी व्यक्ती सुद्धा शालेय शिक्षणात देव नाही हे शिकवावे असा विचार व्यक्त करतो तेव्हा ही भारतात चाललेली नास्तिक चळवळ ही कट कारस्थान आणि प्रायोजित आहे असे लोकांना वाटते.
शालेय शिक्षणात देव आहे हे शिकवत नाहीत.
धर्मग्रंथ शालेय शिक्षणात समाविष्ट नाहीत.
मग देव नाही हे मात्र शाळेत शिकवा असे विचार कसे व्यक्त होवू शकतात .
प्रायोजक असल्या शिवाय भारतात असे विचार व्यक्त होवूच शकत नाहीत.
जगातील कोणत्याच देशात देव नाही हे शालीय शिक्षणात मुलांना शिकवा ही मागणी होत नाही पण भारतात तसे विचार व्यक्त होतात.
प्रतेक व्यक्ती विचार करू शकतो .
व्यक्ती व्यक्ती च्या मानवी मेंदूच्या क्षमतेत विशेष फरक नसतो.
हे तरी सायन्स स्वीकारा.

संजय क्षीरसागर's picture

30 Jun 2020 - 12:04 pm | संजय क्षीरसागर

म्हणून तुम्हाला नीती-मूल्यांचा धसका आहे,
अन्यथा ती स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळण्या इतकी प्रगल्भता कुणाच्यात नाही.

आणि तुमच्या मते ९८ % लोक तुमच्यासारखे आहेत !

म्हणजे नीती-मूल्य स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळणारे
जगात जे काही प्रगल्भ नास्तिक आहेत ते फक्त २ % आहेत.
असा सरळ अर्थ होतो.

________________________________

हे आधी सोडवा आणि मग पुढे जंप मारा.

संजय क्षीरसागर,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो.

१.

थोडक्यात, ही भानगड आता संपवा आणि ....

संपवणारा मी कोण? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.

२.

कोणतीही साधना, जप-जाप्य, परिक्रमा, कर्मकांड, पूजा-अर्चा, नवस करणं आणि फेडणं, तिर्थाटनं यात वेळ, पैसा आणि श्रम व्यर्थ घालवू नका.

माझा दिवसाला फक्त १५ मिनिटं नित्यपाठ असतो. बाकी काहीही करीत नाही. मात्र लोकांना याची गरज असू शकते.

३.

उन्मुक्त आणि स्वच्छंद जगा.

एकदम बरोबर.

४.

दुसर्‍याचा गैरफायदा घेऊ नका आणि भीडेखातर किंवा मोहास्तव, स्वतःचा दुसर्‍याला फायदा घेऊ देऊ नका
या फक्त एका आचरणानं समाज कायम नितीमान राहील

पहिली गोष्ट म्हणजे समाजाला नीतिमान करण्याची किंवा ठेवण्याची माझी जबाबदारी नाही. दुसरं असं की नीती काय व अनीती काय हे प्रसंग पाहून ठरवावं लागतं. एक उदाहरण देतो. पांडवांवर लाक्षागृहात जाळून जायची वेळ आली होती. पण त्यांच्या जागी एक स्त्री व तिचे पाच पुत्र जळून मेले. आता, या मृत्यूंना जबाबदार कोण? पांडव की दुर्योधन?

सांगायचा मुद्दा असा की ईश्वरी अस्तित्वाशिवाय ( म्हणजे देव मानल्याशिवाय) न्याय, नीती इत्यादिंना आधार प्राप्त होणार नाही.

५.

कोणत्याही पाप-पुण्याच्या भयाची (म्हणजे देवाची) गरज उरणार नाही.

खरा देव पापपुण्यादि द्वैताच्या पल्याड आहे. मात्र देवाचा धाक असेल तर माणूस क्रूरपणे वागणार नाही.

आ.न.,
-गा.पै.

शा वि कु's picture

29 Jun 2020 - 7:29 am | शा वि कु

ईश्वरी अस्तित्वाशिवाय ( म्हणजे देव मानल्याशिवाय) न्याय, नीती इत्यादिंना आधार प्राप्त होणार नाही.

हे योग्य नाही असे वाटते. स्वतःच्या व स्वतःसारख्या इतरांच्या वेल बिइंग साठी माणूस स्वतःवर आणि इतरांवर बंधनं घालून घेण्यास तयार नाही होऊ शकत, देव नसेल तर ? दैवी शक्तीने सांगितलेल्या नैतिकतेच्या नियमांमध्ये माणूस कायमच बदल करत असतो. काही नियम अगदी नव्याने वाढवत असतो. असे असताना देवाच्या अभावात नैतिकता उरणार नाही हे का म्हणावे ?

संजय क्षीरसागर's picture

30 Jun 2020 - 12:13 pm | संजय क्षीरसागर

माणूस क्रूरपणे वागणार नाही ?

काय बोल्ता ?

वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवणार्‍यांनी ते काम देव आणि धर्मासाठी केलंय,
स्वतःचे प्राण पणाला लावण्याइतक्या इतक्या उदात्त आस्तिकतेचं
हे जगासमोर आलेलं सर्वात रिसेंट आणि अत्यंत ठळक उदाहरण आहे.

धर्माचा किंवा देवाचा आणि निती-मूल्यांचा शून्य संबंध आहे याचा इतका उघड पुरावा,
इतिहासात नोंदवण्यासारखा आहे.

इथे धर्म दोषी नाही ज्यांनी केले आहे ती धर्मांध लोक होती,धर्माचा चुकीचं अर्थ लावणारे कट्टर धर्मांध,.
कट्टर म्हणजे मीच म्हणतो ते जगानी ऐकावे नाही तर त्यांना जगण्याचा हक्क नाही अशा विचाराची.
नस्तीक्ता पण वाईट आहे असे इथे कोणीच बोलत नाही
तुम्ही जो विचार करता देव,धर्मा विषयी तो सोडा असे इथे कोणी म्हणत नाही.
पण कट्टर नास्तिक बनू नका(कट्टर धर्मांध लोकांसारखे कट्टर नास्तिक) अतिरेकी विचारसरणी सोडा .
तुमच्या मताचा अतिरेक करू नका नाही तर नंतर तुमचे काहीच ऐकून घेतले जाणार नाही
आणि मी ह्या निष्कर्ष पर्यंत पोचलो आहे संजय जी हे कट्टर नास्तिक( कट्टर धर्मांध अतिरेकी विचाराचे ह्या अर्थाने) आहेत.
त्यांचे विचार कोणी ऐकले नाहीत की ते त्या वर थोपण्याचा प्रयत्न करत असतात.
हा अतिरेक च झाला .

धर्माचा किंवा देवाचा आणि निती-मूल्यांचा शून्य संबंध आहे याचा इतका उघड पुरावा,
इतिहासात नोंदवण्यासारखा आहे.

माझा प्रतिसाद योग्य च आहे तुम्हाला तो समजून घ्यायला त्रास दायक ठरतोय.
धर्मांध लोक आणि धार्मिक लोक ह्यातील फरक तरी तुम्हाला समजतो की नाही अशीच शंका आहे.

नैतिक नियमात माणूस बदल करत आहे ना म्हणजे लवचिक पना दाखवत आहे ना मग आक्षेप कशावर.
आस्तिक लोक लवचिक पना दाखवत आहे वेळेनुसार बदलत आहेत मग त्यांनी बदलायचा वेग अजुन वाढवून सरळ सर्व नियमाचा आधार देव च नाकारून मोकळं व्हावं असा हट्ट का?
त्या साठी वेळ जावू ध्या देव नाही हे सत्य असेल तर लोक योग वेळ आल्यावर तो नाकरतील.
आत्ताच नाकारा हा विचाराचा अतिरेक झाला.

कपिलमुनी's picture

29 Jun 2020 - 12:44 pm | कपिलमुनी

एवढा सोपा प्रश्न तत्वज्ञ उगीच चर्चा करत बसतात.

गायी साठी प्रत्येक भाषेत वेगळा शब्द आहे , गाय तीच आहे , नाव ठेवणार्‍यांनी त्यांच्या सोयिनुसार त्यचे वर्णन केले आहे , देवाचे तसेच आहे. ज्यने त्याने स्वतच्या सोयिने नाव ठेवले

Word for Cow Language & Country
Europe:
‘kÿr’ Icelandic (Iceland)
‘ko’ Danish (Denmark) and Swedish (Sweden)
‘koe’ Dutch (The Netherlands) and Flemish (Belgium)
‘ku’ Norwegian (Norway) and Yiddish (Germanic language of eastern European Jews)
‘kuh’ German (Germany)
‘kràva’ Czech (Czech republic)
‘krava’ Macedonian (Macedonia), Croatian (Croatia), Bulgarian (Bulgaria), Ukrainian (Ukraine), Slovak (Slovakia), Slovene (Slovenia), Serbian (Serbia) and Bosnia).
‘krowa’ Polish (Poland)
‘karova’ Belarusian (Belarus)
‘korova’ Russian (Russia)
‘karvé’ Lithuanian (Lithuania)
‘vache’ French (France)
‘vacca’ Italian (Italy)
‘vacâ’ Romanian (Romania)
‘vaca’ Portuguese (Portugal and Brazil) and Catalan (Spain, southern France)
‘vaca’ Spanish (Spain and many Spanish-speaking South American countries.) (The literal translation of ‘vaquero’ is ‘cow man’. ‘Buckaroo’ is common in some southern parts of the U.S., and it is thought to originate from ‘vaquero’ because the letter ‘v’ is pronounced as ‘b’ in Spanish.)
‘goys’ Latvian (Latvia)
‘lopë’ Albanian
‘behia’ Basque (South of France/northern Spain)
‘lehmä’ Finnish (Finland)
‘ayelada’ Greek (Greece)
Africa:
‘koei’ Afrikaans (South Africa) ('vee' - cattle [plural])
‘nkopo’ Bobe (Equatorial Guinea)
‘ngombo’ Bobangi (Congo)
‘ngombe’ Kikuyu (Kenya)
‘ng'ombe’ Swahili (Kenya & East Africa)
‘xaafu’ Bukusu (Kenya)
‘inkomazi’ Zulu (South Africa)
‘ente’ Kiga (Uganda, Tanzania & Congo)
‘sac’ Somali (Somalia)
‘saniya’ Hausa (Nigeria)
South America:
‘waka’ Quechua (mainly in Peru & Bolivia but also southern Columbia and Ecuador, northern-western Argentina and northern Chile)
‘qachu’ Aymara (mainly in Bolivia, but also Peru, Chile and Argentina)
‘vaca’ Spanish (many Spanish-speaking countries such as Mexico, Argentina, Chile, Colombia, Cuba, Ecuador, Paraguay, Uruguay and Peru)
‘vaca’ Portuguese (Portugal and Brazil)
Middle East:
‘baqara’ Arabic (Saudi Arabia)
‘parah’ Hebrew (Israel)
‘gow’ Dari (Afghanistan)
‘mange’ Kurdish (Iraq, Turkey and Syria)
Asia:
‘gay’ Hindi (India)
‘gaa’ Rajasthani (Rajasthan, India)
‘gaay’ Urdu (Pakistan)
'wua' Thai (Thailand)
‘nwa’ Burmese (Burma)
‘so’ Korean (Korea) ('amso' is the word for a female bovine)
‘ushi’ Japanese (Japan)
‘mu niu’ Mandarin (China)
‘ngau-na’ Cantonese (China)
Pacific:
‘kau’ Maori (New Zealand)
‘povi’ Samoan (Samoa)
‘bulumakau’ Fijian (Fiji)
‘pipi’ Hawaiian (Hawaii)
Britain:
‘cou’ Scottish (Lowland Scotland & some northern Ireland)
‘bò’ Irish (Ireland)
‘buwch’ Welsh (Wales)

उद्या हा प्राणी १०० वेग्वेगळ्या देशात सापडला तर त्याचे नाव वेगळे असेल पण प्राणी तोच असेल

name

आता जसा ह्या प्राण्याचे नाव ठेवायला तो दिसावा लागला, त्याची संकल्पना सुचावी लागलि तशि देवाची कोणाला सुचली असा प्रश्न असेल तर ठीक , पण उगा नाव कोणि ठेवले , फोटू कोणी काढला असे फालतू प्रश्न सुचावेत याचे वाईत वाटले

संजय क्षीरसागर's picture

29 Jun 2020 - 1:04 pm | संजय क्षीरसागर

मला वाटलं काही नवा शोध लावला का ?

> आता जसा ह्या प्राण्याचे नाव ठेवायला तो दिसावा लागला, त्याची संकल्पना सुचावी लागलि तशि देवाची कोणाला सुचली असा प्रश्न असेल तर ठीक , पण उगा नाव कोणि ठेवले , फोटू कोणी काढला असे फालतू प्रश्न सुचावेत याचे वाईत वाटले

शब्द हा निर्देश आहे.

देव हे सर्वनाम कुठेही नसलेल्या व्यक्तीकडे निर्देश आहे.
देवाची कल्पनाही माणसाचीच (हे उघड आहे) आणि
त्याचं नांवही माणसानं ठेवलंय, असा लेखाचा अर्थ आहे

कपिलमुनी's picture

29 Jun 2020 - 3:01 pm | कपिलमुनी

>>देव हे सर्वनाम कुठेही नसलेल्या व्यक्तीकडे निर्देश आहे.

हे तुमच्या कल्पनाशक्ती किंवा ज्ञानाचे लिमिटेशन आहे. बर्‍याच ठिकाणि अव्यक्त परमेश्वर आहे असे असताना व्यक्तीकडे निर्देश कसा असेल ?
देवाची कल्पनाही माणसाचीच ? हे इतर प्राण्यांचा अभ्यास झाल्याशिवाय कसे ठरव्णार ? त्यांचे काही शेप्रेट देव असतील . त्यांनी नावे दिली असतील.
बाकि मी कोण हा प्रश्न आस्तिक लोकांपेक्षा विज्ञानवादी लोकांना छळतो , कारण त्याचे ठोस उत्तर आज तरि नाहिये.

जी संकल्पना नाकारत आहात तिचा पुरेसा अभ्यास आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे .

कुठे दिसला तुम्हाला ?

> मी कोण हा प्रश्न आस्तिक लोकांपेक्षा विज्ञानवादी लोकांना छळतो , कारण त्याचे ठोस उत्तर आज तरि नाहिये.

हे कुठून काढलं ?

प्रतिसाद देण्यापूर्वी आधीची चर्चा वाचा म्हणजे असे घोळ होणार नाहीत

कपिलमुनी's picture

29 Jun 2020 - 6:00 pm | कपिलमुनी

दुसर्‍याची चर्चा कशाला वाचू ? माझे म्त मांडले कि झाले .

तुम्हाला देव कल्पनाच कळलेलि नहिये , म्हणून तुम्हि असे म्हणत आहात ,

गुरुत्वाक्र्षण आहे तिथेच होते , माणसाला नंतर कळाले , नाव दिले नियम शोधले तसेच अजुन बर्‍यच गोष्टी कळायच्य आहेत

शा वि कु's picture

29 Jun 2020 - 3:31 pm | शा वि कु

म्हणजे काय ? म्हणजे ऊर्जा,जागृती,साचा (किंवा आणखी काही गूढरम्य गोष्ट) असेल तर- प्रतिसाद वाचाल तर याचा पण प्रतिवाद होऊन गेलेला दिसेल.
>>>> प्राण्यांचे शेप्रेट देव- तुम्ही मुद्दा मिस करताय. प्राण्यांनी दिलेले असो व माणसाने दिलेले असो. कल्पना माणसाची किंवा प्राण्याचीच ना ? हा धागा देव ही कल्पना आहे हेच सांगायसाठी आहे! नाही म्हणजे देव ही कल्पना प्राण्यांमध्ये पण असू शकते यातून काय वेगळा असा निष्कर्ष निघतो ? प्राणी काय अजून तर्काधारीत मत मांडणार आहेत काय ?
देवाची कल्पना (खरी असो व खोटी) ती सुद्धा माणसाची नाही असा दावा ? मानवाच्या तर्कक्षमतेवर इतका तो अविश्वास ? आणि बाय द वे, प्राण्यांमध्ये देवाची कल्पना आहे की नाही, याचा, माणसाला समजलेली देवाची कल्पना ही मानवनिर्मितच आहे की नाही, ह्याच्याशी काहीएक सम्बन्ध नाही. प्राण्यांना पंचांसंस्था कळते की नाही, याचा माणसाने पचनसंस्थेचे आकलन केले आहे की नाही याच्याशी काय संबंध आहे काय ? प्राण्यांना पंचनसंस्थेबद्दल जरी माहित असले, तरी शरीरातल्या विविध अवयवांची मिळून असणारी एक यंत्रणा, ती म्हणजे पचनसंस्था, ही मानवाची कल्पना आहे की नाही ? माणसाने हे आकलन स्वतः केले आहे की नाही ? मग त्याचा कुठल्या प्राण्याला कितपत पचनसंस्था कळते याच्याशी काय संबंध ?

देव ही कल्पना आहे हा विचार नास्तिक लोकांसाठी .
आमच्या साठी ह्या जगाचा निर्माता आहे हे स्पष्ट मत आहे.
निर्मात्या शिवाय सुनियोजित सृष्टी निर्माण होवूच शकत नाही.
आता उत्क्रांती वाद आणि डार्विन ह्यांना तुमच्या फायद्या साठी बळी चा बकरा बनवू नका.
परत सांगतो डार्विन नी उत्पत्ती विषयी काही ही मत व्यक्त केलेले नाही.
क्लिष्ट रचना असलेले जीव कसे निर्माण झाले हे डार्विन आणि उत्क्रांती वाद ह्यांनी काहीच मत व्यक्त केलेले नाही.
जेव्हा गरज लागेल तेव्हा उत्क्रांती वादाच्या मागे लपू नका.
असा पण उत्क्रांती कशी होते हे प्रयोग शाळेत सिद्ध झालेले नाही.
एक पेशी जीव पासून बहु पेशीय जीव कसे निर्माण होतात हे पण प्रयोगशाळेत सिद्ध झालेले नाही .
हे सर्व तर्क आणि तर्काची साखळी आहे.
वनस्पती विषयी तर कोणच कशी बोलत नाही.
जो पर्यंत प्रयोगांनी सर्व प्रश्न निकाली निघत नाहीत तो पर्यंत देव नाही असे ओरडून सांगायची गरज नाही.
देव नसेल तर फक्त तुमच्या पुरता मर्यादित .
आम्ही देव चराचरात आहे असेच मानणार.

पृथ्वी असलेली समस्त सजीव सृष्टी जगाकडे कशी बघते ,काय विचार करते ह्या वर विज्ञान आणि नास्तिक मंडळी नी जोर लावला पाहिजे.
माणसाला जे जाणवत जे दिसत,जे ऐकू,जो वास येतो,जी चव समजते तो सर्व मेंदू चा खेळ आहे ते काही सत्य नाही.
जी गोष्ट तुम्हाला गोड लागते ती दुसऱ्या प्राण्या ला तिखड लागत असेल .
गोड चव हा माणसासाठी भास च आहे ते कशी सत्य नाही..
फक्त पंच महाभुत हे सत्य आहेत .
प्राणी सुद्धा विचार करत असतील,तर्क करत असतील त्यांची सुद्धा देव विषयी विषयी कल्पना असतील.
माणूस म्हणजे विश्व नाही तो एक घटक आहे सजीव सृष्टी चा.
विज्ञान आणि विज्ञान वादी ह्यांनी हे प्रश्न सोडवावा त्या साठी सर्व ताकत लावावी.
की देव नाही हे अपुऱ्या अभ्यासावर ठरण्यात धन्यता मानावी.
निवड तुमची मतं आमचे.