देवाचं नांव कुणी ठेवलं ?
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
देवाचं नांव कुणी ठेवलं ?
या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्या संकल्पनेचा डोलारा कोसळतो.
तुमचं जीवन निर्भार होतं;
सुरुवातीला थोडी धाकधूक वाटते,
पण अवलंबित्व हाच भीतीचा आधार आहे,
एकदा निरावलंब झालो की सगळी भीती संपली !
कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही.
कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही.
कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत,
कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्याचं धन होणारी दानपेटी नाही.
कुठे दिवे लावायला नको, धूप जाळायला नको, कोणतेही यज्ञ-याग नाही.
कुठले नवस बोलायला नको की फेडायला नको,
कोणत्याही समस्येला वस्तुनिष्ठपणे आणि वैज्ञानिकदृष्टीनं, निर्भिडपणे सामोरं जायला आपण सज्ज.
घरातल्या सगळ्या भींती क्लिअर, सगळे कोपरे स्वच्छ;
सगळे ग्रंथ, पोथ्या, चरित्र रद्दीत, बुकशेल्फ निम्मी रिकामी.
स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ आणि
निर्बुद्धपणावर खर्च न झाल्यानं वाचलेला,
तुमच्या कष्टाचा पैसा !
आणखी काय हवं आयुष्य मोकळं व्हायला ?
_____________________________________
देवाचं नांव कुणी ठेवलं ?
इतका साधा, सोपा, वरकरणी बाळबोध वाटणारा पण लक्ष्याचा नेमका वेध घेणारा तीर !
प्रष्ण सुद्धा फक्त एकदाच विचारायचा, तोही स्वतःला;
आणि मग हसून सगळ्यातून मोकळं व्हायचं !
कुठल्या गुरुकडे जायला नको,
'मी कोण' असं स्वतःलाच विचारुन, स्वतःचा छळ नाही,
आणि चेहेर्यावर कायम प्रष्णचिन्ह घेऊन करायचा वेडगळ शोध नाही.
वर्षानुवर्ष करायची नामसाधना नाही,
जरा लक्ष विचलीत झालं की भंगणारा जप नाही,
की भ्रमिष्टावस्थेत नेणारा अजपा नाही.
एका प्रष्णात काम तमाम !
_____________________________
एक गोष्ट मात्र नक्की, स्वतःला बावळट समजायचं नाही !
इतकी वर्ष काय झक मारलीस का ?
या मनाच्या उपहासाला,
एकदाच हसून`हो !' म्हटलं की झालं.
मग मेलेल्याला जीवंत करणारे तुमचा पिच्छा सोडतील,
पोट दुखायला लागल्यावर तुम्ही कालीचा धावा करण्याऐवजी सरळ डॉक्टरकडे जाल,
वाघावर बसून आकाशमार्गे येणार्यांच्या आणि भींत चालवणार्यांच्या सिद्धींपेक्षा;
तुमचं आयुष्य सहज आणि सुलभ करणार्या वाहनांचे शोध लावणारे शास्त्रज्ञ,
तुम्हाला जवळचे वाटतील.
पाण्यात दिवे पेटवणार्यांऐवजी,
रात्रंदिवस खपून आपल्याला अखंड विजपुरवठा करणार्या कामगारांप्रती,
तुमचा मैत्रभाव जागेल.
चमत्कार, सिद्धी, असामान्यत्व असल्या भाकड कल्पनांमुळे,
आपण त्यांच्यापुढे छपरी,
हा नाहक खोल गेलेला न्यूनगंड संपेल.
एक सामान्य,
वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय,
संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी,
अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला,
साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही
निर्भ्रांत जगायला लागाल !
अगदी आजपासून !
प्रतिक्रिया
@ गामा पैलवान : तुमचे प्रतिसाद इतके प्रामाणिक आहेत
एकमत झालं तर...?
:))
अर्थात,
चूक होते आहे अभ्या...! (ह्या
अगदी अगदी
३०० तरी होऊ द्यायचे. ;)
हॅहॅहॅ
नको.
वाचा
@ सतिश गावडे : हे मात्र नक्की वाचा !
सल्ल्यासाठी धन्यवाद
@ सतिश गावडे : माझ्यासारख्या नास्तिकालाही ?
युगे लोटली त्याला...
@ सतिश गावडे : ४ वर्षाला युगे म्हणतायं !
>> ४ वर्षाला युगे म्हणतायं !
@ सतिश गावडे : सश्रद्ध अथवा अश्रद्ध असणं....
ही मी वैयक्तीक बाब मानतो हे
सतिश गावडे : माझ्या भावना ?
तुम्हाला वाटतंय ना...
@ अभ्या.. : तुम्ही घ्या मनावर. पास न देता खेळा टिच्चून
:) आमेन
@शाम भागवत : `माझा पास' ला किमान नविन पर्याय तरी शोधलात !
एकच गोष्ट साध्य करायला विविध
@ शाम भागवत : एकच गोष्ट साध्य करायला विविध मार्ग असतात ?
:) आमेन. :)
हे एक नंबर आहे.
:)
एकमत झाले..
गुलजारची एक सुंदर कविता
@ शा वि कु : क्या बात है !
@ शा वि कु : खुदा -गुलजारची एक सुंदर कविता
अमल
शा वि कु : अमल
अजीब आलम है दोस्तों तुम्हारा,
अमलचे हिंदी आणि उर्दू असे दोन अर्थ आहेत
हम्म.
असे मानायला काय हरकत आहे.
@ Rajesh188 : थोडक्यात, धर्मात सांगितलंय
हे पण तुम्हीच ठरवत आहात
@ Rajesh188 : तुम्हाला दोन तासात विस्मरण होतं की काय ?
हट्ट वादी पना सोडा
@ Rajesh188 : थोडक्यात, धर्मात सांगितलंय
आपण समजतो तेच सर्वांनी मानावे
@ Rajesh188 : थोडक्यात, धर्मात सांगितलंय
न्याय, नीती, पराधीन पुत्र, इत्यादि
ईश्वरी अस्तित्वाशिवाय (
@गामा पैलवान: मात्र देवाचा धाक असेल तर
वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवणार्यांनी ते काम देव आणि धर्मासाठी केलंय,
@ Rajesh188 : मुद्दा नीट वाचून प्रतिसाद देणं जमतंय का बघा
Pagination