भगवान दक्षिणामूर्ती आणि भगवद्पाद पूज्य श्री आदि शंकराचार्य प्रणित अद्वैत वेदांताची परंपरा अखंड ठेवणार्या, तसेच आधुनिक काळाशी सुसंगत पद्धतीने 'आत्मविचार' या साधनापद्धतीचे पुनरुज्जीवन करणार्या भगवान श्री रमण महर्षीं या लोकोत्तर ज्ञानी सत्पुरुषाविषयी मराठी भाषेत फारसे साहित्य उपलब्ध नाही. हे लक्षात घेता आंतरजालावरच्या मराठी साहित्यसागरात भगवान श्री.रमण महर्षींविषयी थोडीफार भर घालावी असा मानस आहे.
महर्षींची शिकवण आणि त्यांचा उपदेश या विषयीचा 'प्रमाण ग्रंथ' अशी मान्यता डेव्हिड गॉडमन यांनी महत्प्रयासाने संकलित केलेल्या 'बी अॅज यू आर' या ग्रंथालाच जगभर विखुरलेल्या रमणभक्तांकडून मिळालेली दिसते. महर्षींनी कधीच औपचारिक स्वरूपाची व्याख्याने किंवा प्रवचने दिली नाहीत. महर्षींना वेळोवेळी भेटलेल्या साधकांशी घडलेल्या त्यांच्या व्यक्तिगत स्वरूपाच्या संवादांचे अध्यात्मिक मोल देशोविदेशीच्या साधकांना उमगत गेले, आणि प्रश्नोत्तर स्वरूपात या संवादांचे संकलन आणि अनुवाद करण्याचा परिपाठ सुरू झाला. श्री. गॉडमन यांनी वेगवेगळ्या कालखंडातल्या या संवादांचे संकलन तर केलेलेच आहे, त्या जोडीला चर्चिल्या गेलेल्या विषयांच्या अनुषंगाने वर्गवारी करून सुरेख मांडणीही केलेली आहे. प्रत्येक विषयाला अनुसरून अत्यंत समर्पक अशी प्रस्तावनादेखील श्री. गॉडमन यांनी लिहीलेली आहे. हा सगळा भाग मुळातूनच वाचण्यासारखा आहे. गॉडमन यांनी ग्रंथाचे एकंदर सहा विभाग केलेले आहेतः
१. स्वरूपबोध २. आत्मविचार आणि शरणागती ३. सद्गुरू ४. ध्यान आणि योग ५. प्रचिती आणि ६. अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोह.
गॉडमन यांच्या अनुक्रमणिकेशी सुसंगती ठेवत ग्रंथातील निवडक भागाचा अनुवाद करून तसेच पावसच्या परमहंस स्वामी स्वरूपानंद या नाथपंथी संतांच्या लेखनातले काही संदर्भ घेत या पुस्तकाचे सिंहावलोकन करण्याचा प्रयत्न करणार आहे. महर्षींविषयी मराठी भाषेत फारशी पुस्तके उपलब्ध नाहीत, हे लक्षात घेता आंतरजालावर मराठीत उपलब्ध असलेल्या विशाल ज्ञानसागरात महर्षींविषयक माहिती उपलब्ध करून देण्यात खारीचा वाटा उचलणे इतकाच या लेखनामागचा उद्देश आहे. संदर्भासाठीचे साहित्य (रेफरन्स मटेरियल) स्वरूपाचे हे लेखन आहे हे स्पष्टपणे नमूद करत लेखनाचा श्रीगणेशा करतो.
मूळ स्त्रोतः BE AS YOU ARE
प्रतिक्रिया
9 Jun 2020 - 8:40 pm | अर्धवटराव
शुभेच्छा _/\_
9 Jun 2020 - 8:51 pm | सतिश गावडे
लेखनमालेस मनःपूर्वक शुभेच्छा. तुमच्या लेखनाने महर्षींची शिकवण मराठीत उपलब्ध होईल ही मोठी गोष्ट आहे.
25 Jun 2020 - 4:33 pm | मूकवाचक
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग १ - स्वरूपबोध: प्रकरण १ - 'स्व' चे मूळ स्वरूप - http://misalpav.com/node/46980
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग १ - स्वरूपबोध: प्रकरण २ - स्वरूपाचे भान, स्वरूपाविषयीचे अज्ञान आणि साधकांच्या श्रेणी - http://misalpav.com/node/46984
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग १ - स्वरूपबोध: प्रकरण ३ - ज्ञानी - http://misalpav.com/node/46985
25 Jun 2020 - 4:36 pm | मूकवाचक
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती - प्रकरण ४ - आत्मविचार (सैद्धांतिक) - http://misalpav.com/node/46989
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती: प्रकरण ५ - आत्मविचार (साधना संहिता) - http://misalpav.com/node/46991
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती: प्रकरण ६ - आत्मविचार (काही गैरसमज आणि त्यांचे निराकरण) - http://misalpav.com/node/46992
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती: प्रकरण 7 - भक्ती आणि समर्पण - http://misalpav.com/node/46994
25 Jun 2020 - 4:38 pm | मूकवाचक
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ३ - सद्गुरू: प्रकरण ८ - गुरूतत्व - http://misalpav.com/node/47000
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ३ - सद्गुरू: प्रकरण ९ - मौन आणि सत्संग महात्म्य - http://misalpav.com/node/47007
25 Jun 2020 - 4:41 pm | मूकवाचक
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: प्रकरण १० - ध्यान आणि एकाग्रता - http://misalpav.com/node/47017
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: प्रकरण ११ - मंत्र, जप आणि नामस्मरण - http://misalpav.com/node/47023
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: प्रकरण १२ - दैनंदिन व्यावहारिक जीवन - http://misalpav.com/node/47032
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: - प्रकरण १3 - योगिक प्रक्रिया - http://misalpav.com/node/47040
26 Jun 2020 - 1:30 pm | मूकवाचक
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण १४ - समाधी - http://misalpav.com/node/47066
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण 15 - दृष्टांत आणि सिद्धी - http://misalpav.com/node/47080
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण १६ - साधकांचे भावविश्व आणि त्यांच्या समस्या - http://misalpav.com/node/47094
3 Jul 2020 - 4:54 pm | मूकवाचक
गवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण १७ - विश्वनिर्मिती संबंधित सिद्धांतप्रणाली आणि जगाचे सत्यत्व - http://misalpav.com/node/47103
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण १८ - पुनर्जन्म - http://misalpav.com/node/47105
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण १९ - ईश्वराचे स्वरूप - http://misalpav.com/node/47113
भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण २० - (मानवी जीवनातले) दु:ख आणि नैतिकता - http://misalpav.com/node/47131
[अंतिम भाग] भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण २१ - कर्माचा सिद्धांत, प्रारब्ध आणि कर्म स्वातंत्र्य - http://misalpav.com/node/47137
3 Jul 2020 - 6:53 pm | राघव
लेखमाला खूप छान झालीये मूकवाचक! खूप खूप धन्यवाद. :-)