'द सेल्फ' किंवा स्व-स्वरूप ही संकल्पना भगवान रमण महर्षींच्या बोलण्यात वारंवार येत असे. पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या लेखनातही 'स्वामी म्हणे लाभे अवीट आनंद, लागलासे छंद स्वरूपाचा' या सारखे उल्लेख ठिकठिकाणी आहेत.
रमण महर्षींनी उल्लेख केलेल्या स्वरूपाच्या बाबतीत पुढील गोष्टी लक्षात घेण्याजोग्या आहेतः
'स्वरूपाचा' अर्थ आपले व्यक्तिमत्व असा नसून ती संकल्पना एका निर्वैयक्तिक आणि सर्वसमावेशक अशा विशुद्ध चैतन्याच्या अखंड अनुभूतीकडे इशारा करते. अहंकार, अस्मिता इत्यादिंच्या परिघात इंद्रियांच्या संयोगाने आलेल्या अनुभवांमुळे जन्माला आलेला, तसेच संस्कारांनी आणि वासनांनी बद्ध असलेला व्यक्तिमत्वदर्शक 'मी' आणि स्व-स्वरूप यात गल्लत होता कामा नये. खरे स्व-स्वरूप निरंतर अस्तित्वात असल्याने ते अनुभवता येणे सहज शक्य आहे. मात्र तसे घडताना दिसत नाही. या बाबतीत महर्षी असे प्रतिपादन करत असत की मुळात अमर्याद असलेल्या चैतन्याभोवती काल्पनिक मर्यादा निर्माण करून बंधनात जखडलेली स्थिती अनुभवण्याची मनाची जन्मोजन्मी जोपासली गेलेली प्रवृत्ती नष्ट झाल्याखेरीज खर्या 'स्व' विषयीची सजग जाणीव होणे संभवत नाही. एकसंध आणि निरंतर अशा स्वरूपाच्या सजग जाणीवेसच आत्मसाक्षात्कार म्हणता येईल.
सच्चिदानंद, देव, ज्ञान, ह्रदय, तुरिय/ तुर्यातीत, 'आत्मन' तसेच 'सहज स्थिती' अशा अनेकविध संकल्पनांचा उल्लेख रमण महर्षी स्व-स्वरूपाचे किंवा आत्मसाक्षात्कारी स्थितीचे समानार्थी किंवा पर्यायवाचक शब्द या स्वरूपात करत असत. रमण महर्षींचा देव सगुण साकार स्वरूपात नसून या जगाचे रहाटगाडगे चालवणारी एक निराकार शक्ती असे त्याचे स्वरूप आहे. हा देव विश्वाची उत्पत्ती करणारा नसून दृश्य जगाशी त्या शक्तीचा स्वरूप संबंध आहे. ईश्वराच्या अमर्याद चैतन्याच्या एका यःकिंचीत अंशाचे मूळ शक्तीपासून कधीच विभक्त न होणारे प्रकट स्वरूपच आपल्याला ब्रह्मांडाच्या स्वरूपात अनुभवता येते असा या स्वरूप संबंधाचा अर्थ होतो. ब्रह्मांडाच्या अस्तित्वाचा किंवा नास्तित्वाचा मूळ ईश्वरी शक्तीवर काहीच परिणाम होत नाही, तसेच व्यक्त स्वरूपातल्या ब्रह्मांडातल्या कार्यकलापांच्या कर्तृत्वाचा आरोपही ईश्वरावर करता येत नाही.
प्रश्नः (या जगातली) वास्तविकता (सत्य) नेमकी काय आहे?
रमण महर्षी: सत्य (किंवा वास्तविकता) हे निरंतर सत्यच असले पाहिजे. नाम आणि रूपाने बनलेल्या जगताबद्दल तसे म्हणता येत नाही. ज्या आधारशक्तीच्या बळावर नामरूपात्मक जगत अस्तित्वात येते ती खरी चिरंतन वास्तविकता आहे. ती स्वभावानेच बंधनरहित आणि अनंत आहे. स्वतः सत्यस्वरूप असूनही ही वास्तविकताच आभासी मृगजळासारख्या वस्तुमात्रांचा आधारवड बनून राहते. शाश्वत सत्यस्वरूप जे काही आहे आणि जसे काही आहे ते नेहेमी तसेच राहते. त्याचे वर्णन करू पाहता वाचा खुंटते. अस्तित्व किंवा नास्तित्व या सारख्या संकल्पनांच्या पलीकडची ती चिरंतन आणि स्वयंसिद्ध स्थिती आहे. जेव्हा भौतिक वस्तुंविषयीच्या भ्रामक ज्ञानाचा अज्ञानासमवेत पूर्णपणे निरास होतो, तेव्हा विशुद्ध चैतन्यस्वरूप असलेली वास्तविकता आपोआप प्रकट होते. हेच खरे स्व-स्वरूप आहे किंवा आत्मज्ञान आहे. या ब्रह्मस्वरूपात स्वसंवेद्य अशी शुद्ध जाणीव प्रकर्षाने असते, तसेच अज्ञानाचा लेशमात्रही तिथे शिल्लक नसतो.
बाह्य जगताची जाणीव असलेली स्थिती (उदा. जागृती) तसेच जाणीव नसलेली स्थिती (उदा. निद्रा) या दोन्हींना व्यापून उरणारी, तसेच पाप, ताप आणि दैन्यापासून मुक्त असलेली स्वयंप्रकाशी अशी विदेही स्थिती हे तुमचे खरे निजस्वरूप आहे. ही स्थिती अंतर्बाह्य मौनानेच अभिव्यक्त होते. सगळे ज्ञानीजन असा निर्वाळा देतात की कुठल्याही स्थळ, काळ आणि परिस्थितीत अबाधित राहणारी अशी ही अंतिम ज्ञानावस्था आहे. विशुद्ध ज्ञान हेच वैराग्य आहे, तेच खरेखुरे सोवळे आहे आणि तेच ईश्वरी साक्षात्कारही आहे. ज्यात क्षणभराचेही आत्मविस्मरण संभवत नाही असे ज्ञान हेच अमरत्व आहे, त्यातच सर्वज्ञता आहे. कैवल्य ज्ञान हेच खरे तर साधकासाठी सारसर्वस्व आहे.
प्रश्नः आत्मस्वरूप जर स्वयंप्रकाशी, नित्य, स्वयंसिद्ध आणि स्वसंवेद्य असेल तर आत्ता या क्षणी मला त्याची जाणीव का होत नाही?
रमण महर्षी: द्वैत वास्तविक पाहता अस्तित्वातच नाही, मात्र तुम्ही आत्ता ज्याला ज्ञान समजता आहात ते अहंभावातून निपजलेले आहे. असे ज्ञान हे साहजिकच स्थळ काळ आणि परिस्थिती सापेक्ष असते. सापेक्ष ज्ञानासाठी दृष्य वस्तु आणि द्रष्टा दोन्ही अनिवार्य आहेत, मात्र स्वसंवेद्यता ही परिपूर्ण स्थिती असल्याने तिला दृष्य वस्तु आणि द्रष्टा अशा द्वैताची गरज नसते.
स्मरण ही अशीच एक सापेक्ष गोष्ट आहे, जिथे स्मरणात ठेवायची वस्तु आणि स्मरण करणारा दोहोंची अनिवार्यता आहे. जिथे द्वैतच अस्तित्वात नाही, तिथे कोण कोणाचे स्मरण करेल? तुमचे खरे स्वरूप हे शाश्वत आणि चिरंतन आहे. प्रत्येकालाच आपल्या मूळ स्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे. मात्र मला हे व्यवस्थित समजावून सांगा, की 'पहावे आपणासी आपण' अशी प्रचिती मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकी कुठल्या स्वरूपात मदत अपेक्षीत आहे?
साधकांना एखादी नाविन्यपूर्ण घटना घडावी अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार अपेक्षित असतो. असा भ्रामक समज करून घेण्यात मुळातच आंतरिक विसंगती आहे, कारण आत्मस्वरूप चिरंतन आणि अखंड असल्याने त्यात कुठलेच परिवर्तन संभवत नाही. साधकांना दिव्य प्रकाश, नाद वगैरे अनुभवांची लालसा असते. आत्मस्वरूप तसे कसे असू शकेल? ते प्रकाश आणि अंधार या सारख्या द्वैताच्या पल्याड असते. (प्रचिती घेता आली तरी) आत्मस्वरूपाची व्याख्या करता येणे शक्य होत नाही. ते जसे असते तसेच सत्य सनातन असते.
'मी आहे', अहंस्फुरणाची ही उपाधीरहित विशुद्ध जाणीवच आत्मस्वरूपाची त्यातल्या त्यात चांगली व्याख्या आहे असे म्हणावे लागेल. श्रुतिवचनांमधे आत्म्याचे वर्णन अंगुष्ठमात्रा एवढा, केशाग्रासारखा, विजेच्या ठिणगीसारखा, अमर्याद, सूक्ष्माहूनही सूक्ष्म असे नानाविध प्रकारे केलेले दिसते. वास्तविक पाहता हा सगळा पूर्णपणे निराधार असा कल्पनाविलास आहे. (व्यावहारिक दृष्ट्या) आपण ज्याला ज्ञान आणि अज्ञान असे म्हणतो, त्या पेक्षा वेगळे असे हे आत्मस्वरूपाचे ज्ञान आहे. (व्यावहारिक दृष्ट्या) आपण ज्याला तथ्यपूर्ण आणि तथ्यहीन म्हणतो, त्या दोन्हीपेक्षा वेगळे असे हे शाश्वत सत्य आहे. त्याची व्याख्या करायची तरी कशी? हे सत्य जाणता येत नाही, ते जाणण्यासाठी स्वतःच सत्यस्वरूप होउन जावे लागते!
प्रतिक्रिया
9 Jun 2020 - 8:36 pm | अर्धवटराव
असं आहे तर :)
9 Jun 2020 - 9:21 pm | संजय क्षीरसागर
> नष्ट झाल्याखेरीज खर्या 'स्व' विषयीची सजग जाणीव होणे संभवत नाही.
सुरुवातच चुकली आहे.
स्व गवसण्यात एकमेव अडथळा म्हणजे चुकीच्या धारणा आहे;
कारण व्यक्तीमत्व म्हणजे अशा चुकीच्या धारणांचा एकत्रित परिणाम !
मनाच्या जन्मोजन्मी जोपासलेल्या प्रवृत्ती म्हटल्यावर
पूर्वसंचिताचा मुद्दा येतो आणि तो सर्वस्वी निराधार आहे.
एकदा अशी चुकीची सुरुवात झाली की स्वरुपाचा उलगडा असंभव होतो.
मनाची काय वाट्टेल ती अवस्था स्वरुप बदलू शकत नाही
ही खर्या अध्यात्माची सुरुवात आहे !
तिथेच चूक झाली तर
मनाच्य दुरुस्तीतच आयुष्य संपून जातं.
9 Jun 2020 - 10:04 pm | प्रसाद गोडबोले
करेक्ट . ह्याला आपल्याकडे शुक नलिका न्य्याय म्हणले आहे .
माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥
काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥
शुकें नळिकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥
तुका म्हणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव कांहीं तेथें ॥३॥
उत्तम ! स्वरुप हे मनो बुध्दी अहंकारादि पंचकोषांच्या परे आहे . समाधीला अतिषय सुंदर शब्द वापरला आहे - उन्मनीअवस्था - अर्थात मनच्या परे असलेली अवस्था ! आपल्या सगळ्याच कल्पना मग त्यात हे मन , पाप पुण्य , जन्म पुनर्जन्म , सगळ्या भावना सुखं दु:ख वगैरे सगळ्यांच्या पलीकडे निर्गुणरुप आहे ज्याला आपण अस्तित्व म्हणाता ! सुख दु:ख राग लोभादी मनाच्या अवस्थांच्या आपण परे गेलो की जी अवस्था आहे त्याचं माऊलींनी इतकं सुंदर वर्णन करुन ठेवले आहे -
तैसें आपुलेनि सुखपणें । नाहीं जया सुखावणें ।
आणि नाहीं हेंही जेणें । नेणिजे सुखें ॥ ५-३७ ॥
__________________इत्यलम . :)
9 Jun 2020 - 11:09 pm | संजय क्षीरसागर
- अर्थात मनच्या परे असलेली अवस्था !
उन्मनी अवस्थेबद्दल घोर गैरसमज पसरवले गेलेत.
पैकी हा एक : अर्थात मनच्या परे असलेली अवस्था !
मग साधक मनाच्या पलिकडे जाण्याच्या मागे लागतो !
त्यामुळे समोर कायम उभा असलेला
आणि चराचर अंतर्बाह्य व्यापून असलेला निराकार दिसणं दुर्लभ होतं.
__________________________
निराकार दिसण्यापूर्वीच्या स्थितीला अत्यंत साधा शब्द झेनप्रणालीत आहे : नो माइंड !
त्याचा सरळ अर्थ `नो मेंटल अॅक्टीविटी ' असा होतो.
थोडक्यात, मेंटल अॅक्टीविटी थांबली की
मनाचं शून्यावर सतत होणारं दृक-श्राव्य प्रक्षेपण थांबतं.....
आणि समोरचा निराकार स्पष्ट दिसतो !
त्याबरोबर आणि तत्क्षणी हा बोध होतो की
तेच आपलं मूळ स्वरुप आहे !
आपण व्यक्ती भासत असलो तरी
शून्य आहोत.
आपण देहात बंदी भासत असलो
तरी वास्तविकात कुठेच नाही
आणि तरीही सर्वत्र आहोत.
ही समाधी !
9 Jun 2020 - 11:57 pm | प्रसाद गोडबोले
बाकी सर्व ठीक
पण हे मात्र चुकले :
>>> उन्मनी ह्या शब्दाची व्युत्पत्तीच उत्+मनी अर्थात मनाच्या "वर" अर्थात परे अशी आहे !
बाकी तुम्ही आधीच मान्य केले आहे की तुम्ही देव वगैरे काही मानत नाही , तस्मात तुम्ही साधना भक्तीमार्ग आणि विशेषकरुन नामस्मरण वगैरे निरर्थक कालापव्यययी प्रकारांचा जवळुन अनुभव घेतल्याची शक्यता शुन्य आहे असे मला वाटते ( हा माझा गैरसमज असल्यास कृपया दूर करावा ही नम्र विनंती ) . एकुणच ह्या एका बाबतीत आपली मते यनावाला सारखी ऐकीव सांगोवांगीच्या गोष्टीवरुन काढलेली असावीत असा माझा अंदाज आहे !
कोणताही साधक कधीच मनाच्यापार जाण्याच्या मागे लागलेला नसतो. ना तुडे मुख्य परमात्मा | म्हणोनी करावी लागे प्रतिमा || हे साधकांना माहीत असते म्हणुनच परमोच्च उन्मनी अवस्था , भले ती काय हे साधकाला माहीत नसेल तरीही, ती प्राप्त आहे अशा प्रतिमांचे साधक ध्यान करत असतो, आणि हळु हळु तसे व्हायचा प्रयत्न करत असतो ! खरा साधक आपल्या ईश्वराप्रत " अखंड तैलधारावत अनुसंधान " प्राप्त करण्याच्या मागे लागलेला असतो . आणि हे एकाग्र अनुसंधान साधायचा मार्ग
सोप्पा सर्व साधुसंतांनी शिकवलेला मार्ग म्हणजे नामस्मरण !
हरिनाम जपे तो नर दुर्लभ । वाचेसी सुलभ राम कृष्ण ॥ १ ॥
राम कृष्ण नामीं उन्मनी साधली । तयासी लाधली सकळ सिद्धि ॥ २ ॥
सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निमाले साधुसंगे ॥ ३ ॥
ज्ञानदेवीं नाम रामकृष्ण ठसा । तेणें दशदिशा आत्माराम ॥ ४ ॥
आपण जसे म्हणालात की "आपण देहात बंदी भासत असलो तरी वास्तविकात कुठेच नाही आणि तरीही सर्वत्र आहोत." हीच अवस्था साधनेच्या "शेवटी" साधकाला सर्व च दशदिशात , सर्वच्या सर्व जगात रामकृष्ण ह्यांचेच रुप दिसत असल्याने प्राप्त झालेली असते , आणि स्वतःमध्ये देखील तो सर्वव्यापी अवस्था - "तेणे दशदिशा आत्माराम"- हेच अनुभवत असतो . सर्वं खल्विदं ब्रह्मः सर्वं विष्णुमयं जगत !
मी आधीच म्हणाल्या प्रमाणे सर्वच माणसे समान बौध्हिक पातळीला नसतात तस्मात आपण जे लॉजिकल अर्ग्युमेन्ट्स करत आहात ते समजणारा कोणीतरी लाखात एक असेल . बाकी सर्वसामान्य बुध्दीचा लोकांना नामसंकीर्तन साधन पै सोपे !!
अर्थात हे सारे तुम्हाला पटणार नाही , किंव्वा तुम्हाला हे सारच निरथक सव्यापसव्य वाटेल , असु दे , काही हरकत नाही पण सरते शेवटी तुम्ही जी अवस्था म्हणत आहात तीच साधकांही प्राप्त होत आहे हे पाहुन आपल्याला नक्कीच आनंद होईल असा अंदाज आहे . हाही माझा गैरसमज असल्यास कृपया दुर करावा ही नम्र विनंती .
साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥ १ ॥
कापुराची वाती उजळली ज्योती । ठायींच समाप्ती झाली जैसी ॥ २ ॥
मोक्षरेखें आला भाग्ये विनटला । साधूचा अंकिला हरिभक्त ॥ ३ ॥
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्त्वीं ॥ ४ ॥
10 Jun 2020 - 12:15 am | संजय क्षीरसागर
> मागे लागलेला नसतो ?
मग हे काय आहे ?
> खरा साधक आपल्या ईश्वराप्रत " अखंड तैलधारावत अनुसंधान " प्राप्त करण्याच्या मागे लागलेला असतो . आणि हे एकाग्र अनुसंधान साधायचा मार्ग सोप्पा सर्व साधुसंतांनी शिकवलेला मार्ग म्हणजे नामस्मरण !
कितीही श्लोक कसेही लावले आणि एकाग्रतेला कितीही विशेषणं लावली तरी मुळ मुद्दा बदलत नाही :
मनानी मन थांबवण्याचा उद्योग कधीही नो माइंड स्टेट आणू शकत नाही
कारण मेंटल अॅक्टीविटी हीच तर नो माइंडच्या विपरित स्थिती आहे.
10 Jun 2020 - 12:18 am | प्रसाद गोडबोले
बरं . असो.
तुम्ही कधी आयाहौस्का पिलीय का हो ?
10 Jun 2020 - 12:28 am | संजय क्षीरसागर
अरे इतक्यात थांबलात ?
मला वाटलं नामस्मरणानी उन्मनीअवस्था - अर्थात मनच्या परे असलेली अवस्था !
कशी प्राप्त होते याचा मनोशास्त्रीय आणि निर्विवाद उलगडा तुम्ही कराल.
_______________________________
बाय द वे, Cointreau Liqueur हे माझं सर्वात आवडतं मद्य आहे.
10 Jun 2020 - 9:19 am | प्रसाद गोडबोले
तुमचं आयाहौस्का विषयी काय मत आहे सांगा ना ?
10 Jun 2020 - 1:28 pm | संजय क्षीरसागर
ट्राय केली नाही, सो पास !
पण त्याचा या धाग्याशी काय संबधे ?
10 Jun 2020 - 2:13 pm | संजय क्षीरसागर
अध्यात्मातल्या कुणाही धुरंदरानं किंवा मानसशास्त्राच्या अभ्यासकानं
या साध्या गोष्टीचा विचार का केला नसावा ?
एका बाजूला साधक नामस्मरणाची घंटा वाजवतोयं
मग तो परिश्रमसिद्ध, पार `अजपा' का असेना, घंटा त्याच्याच डोक्यात वाजतेयं
त्यात नामस्मरण अजपा झालं याचा अर्थ; घंटानाद साधकाच्या आवाक्याबाहेर गेला !
त्यात पुन्हा (पूर्वापार सांगितल्याप्रमाणे) नामात भाव ओतला, तर ती भावनिक भानगड होते
म्हणजे जरा कुणी काही युक्तीवाद केला की हृदयाला धक्का ! लॉजिक बंद.
सगळीकडे दुर्लक्ष करुन....
पुन्हा नामस्मरणाची घंटा सुरु !
आणि जे साधायचंय ती शांतता आहे
कारण तेच तर आपलं स्वरुप आहे.
घंटा वाजवणं थांबल्याशिवाय शांतता असंभव आहे
10 Jun 2020 - 7:33 pm | प्रसाद गोडबोले
वाह ! ज्या गोष्टी तुम्ही ट्रायच केलेल्या नाहीत त्यावर तुम्ही पास देत आहात हे पाहुन छान वाटले !
:)
10 Jun 2020 - 8:15 pm | संजय क्षीरसागर
> नाहीत त्यावर तुम्ही पास देत आहात हे पाहुन छान वाटले !
आयाहौस्का आणि नामस्मरणाची साधना यांचा संबंध जोडण्याचं तुमचं लॉजिक असं आहे :
प्रगो तुम्हाला कधी दिवस गेलेत का ?
नाही !
मग तुम्हाला सांख्ययोग कळणार नाही !
__________________________
ज्यानं मनाचा सर्वांगिण अभ्यास केलायं त्याला प्रत्येक साधनेच्या फलिताची पूर्ण कल्पना असते.
तस्मात, तुम्हाला नामस्मरणानी उन्मनी अवस्था आली का ? हा सवाल आहे !
10 Jun 2020 - 8:46 pm | प्रसाद गोडबोले
अजुन एक उत्तम उदाहरण दिल्याबद्दल धन्यवाद !!
नाही , मला कधी दिवस गेले नाहीत , त्यामुळे आई होण्याच्या वेदना कष्ट आणि आनंद मला कळणार नाही आणि मला हे मान्यच आहे ! पण म्हणुन " मी कधीच आई होणे हे फालतु आहे , निरर्थक आहे " अशा अर्थाची विधाने करणार नाही . मी इतकेच म्हणेन की "मला त्या गोष्टीचा अनुभव नाही ." बाकी ते सांख्ययोग म्हणजे काय ? ते मटक्यात आकडा लावला अन योगायोगाने लागला तर जे होते त्याला सांख्य योग म्हणतात काय ?
ज्याचं त्याचं अनुभव विश्व ज्याच्यात्याच्या अनुभवांपुरतं मर्यादित असतं , आणि म्हणुनच " मला सर्वच गोष्टीतील सर्वच कळतं " असा अभिनिवेष मी तरी बाळगत नाही !
ज्या गोष्टी माझ्या अनुभव परीघाच्या बाहेर त्यावर मी गप्प बसतो (किंव्वा सध्या आहे तसा रिकामा वेऴ असेल तर टवाळक्या करत बसतो !!)
अर्थात हे माझे माझ्या वैयक्तिक अनुभवांवरुन बनलेले मत आहे , तुमचेही तसेच असले पाहीजे असा काही आग्रह नाही ! तुम्हाला साधनेच्या फलिताची अनुभुती आली असेल तर काय मला दु:ख होणार नाही , उलट आनंदच आहे की ! आणि आली नसेल तरीही मला काय शष्प फरक पडातोय !
तद्वत मला नामस्मरणाने उन्मनी अवस्था समजा आली असेल तर तुम्हाला दु:ख होईल काय ? किंव्वा आली नसेल तर मुद्दा सिध्द झाला म्हणुन तुम्हाला आनंद होईल काय ? =))))
होत असेल तर होवो बापडे . मला काय फरक पडनार आहे त्याने !
मी आधीच तुम्हाला म्हणालो कि मला कोणालाच काहीच पटवुन द्यायचे नाहीये, माझं आपलं लेखन स्वान्तःसुखाय आहे . तुम्हाला वाटतंय हे आमचं निरथक स्वात्मरंजन आहे तर तसं समजा हवं तर , आम्हाला काहीही हरकत नाही =))))
किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं ।
ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ ८-८ ॥
:)
10 Jun 2020 - 9:10 pm | कोहंसोहं१०
अहो तुम्ही कोणाला समजावून सांगायच्या भानगडीत पडताय? द्या सोडून. संजय क्षीरसागर ह्या आयडीला कितीही सांगून काहीही फरक पडणार नाहीये. पालथ्या घड्यावर पाणी आहे. अनेकांनी अनेकवेळा अनेक पद्धतीने समजावून सांगूनदेखील यांच्यात काहीही फरक पडला नाहीये त्यामुळे फुकट वेळ वाया घालवू नका. . ह्या माणसाचा अहंकार एवढा आहे की साक्षात ज्ञानेश्वर, शंकराचार्य, रामकृष्ण परमहंस ह्यांनाही चुकीचे ठरवून मीच काय तो बरोबर हे सांगत फिरत असतात. ४ पुस्तके वाचून अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली अनेक मंडळी पहिली आहेत हे त्यापैकीच एक. काही वर्षांपूर्वी शाब्दिक चकमकीत यांचा पाडाव होऊन काही दिवस विजनवासात गेले होते. आता अहंकार पुन्हा फणा काढून उभा राहिला त्यामुळे आले परत इतरांना चावायला. अध्यात्माच्या भाषेत सांगायचे झाल्यास यांची लोकेषणा अजून संपलेली नाही. तुम्ही तुमची नामस्मरणयुक्त साधना सुरु ठेवा आणि ह्या आयडीच्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करा. अनुल्लेखाने मारणे हाच यावर उपाय आहे.
10 Jun 2020 - 10:26 pm | प्रसाद गोडबोले
>>> मी आधीच अनेकवेळा म्हणालो कि मला कोणालाच काहीच पटवुन द्यायचे नाहीये, कोणाला काहीही समजाऊन द्यायचं नाहीये, माझं आपलं लेखन स्वान्तःसुखाय आहे . :)
सध्या "काम करा घरुन" चालु असल्याने आणि प्रोजेच्टही संपत आल्याने थोडा रिकामा वेळ असल्याने मिपाला प्रतिसादाच्या तुंबड्या लावत टाईम्पास करत आहे, =))))
माफ करा पण मी नामस्मरण किंव्वा कोणत्याच प्रकारची साधना , सध्यातरी , करत नाही ! ( पण म्हणुन मला त्या किंव्व अन्य कोणत्याच साधनेची थट्टा उडवण्याचा अधिकार आहे असे मानत नाही)
चित्तस्य शुध्दये कर्म न तु वस्तूपलब्धये । वस्तुसिध्दिर्विचारेण न किन्चित् कर्मकोटिभिः ।। (वि.चू.११). ह्या आचार्य वचनावर माझा ठाम विश्वास आहे, समाधी प्राप्त करण्यासाठी कोणत्याच साधनाची आवश्यकता नाही, आवश्यकता आहे ती केवळ शांतपणे विचार करण्याची !
संक्षी थोडेसे एकक्कल्ली आणि आत्ममग्न असतीलही कदाचित पण अगदीच यनावाला किंव्वा स्वयंघोषित धर्मसुधारकांच्या इतके वाईट नकीच नाहीत असा माझा ठाम विश्वास आहे =))
बाकी आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद !
10 Jun 2020 - 10:56 pm | संजय क्षीरसागर
> कोणत्याच साधनाची आवश्यकता नाही, आवश्यकता आहे ती केवळ शांतपणे विचार करण्याची !
काय सांगता ?
मग तुमचा काल दिलेला हा प्रतिसाद :
खरा साधक आपल्या ईश्वराप्रत " अखंड तैलधारावत अनुसंधान " प्राप्त करण्याच्या मागे लागलेला असतो . आणि हे एकाग्र अनुसंधान साधायचा मार्ग सोप्पा सर्व साधुसंतांनी शिकवलेला मार्ग म्हणजे नामस्मरण !
आज बाद ठरतो !
11 Jun 2020 - 10:31 am | संजय क्षीरसागर
> सांगायच्या भानगडीत पडताय ?
तोतापुरींच्या चालण्यानं नदीच्या पाण्याची पातळी कशी बदलत होती ? आणि
काली पोटदुखी बरी करत असेल तर व्यक्तीगत जीवनातून तुम्ही डॉक्टर हद्दपार केलायं का ?
हे अजून पेंडींगच आहे !
____________________
> काही वर्षांपूर्वी शाब्दिक चकमकीत यांचा पाडाव होऊन काही दिवस विजनवासात गेले होते
हा वाचन कमी असल्याचा परिणाम आहे, कारण याचं सविस्तर उत्तर ऑलरेडी दिलंय. वाचा :
याच धाग्यामुळे ३ वर्षापूर्वी माझा आयडी ब्लॉक केला होता. आता जिएसटीची परिस्थिती सर्वांसमोर आहे आणि ती माझी सर्वच्या सर्व विधाने खरी ठरवते.
______________________________
भावनेच्या भरात तुमचा प्रतिसाद व्यक्तीगत झाला आहे, त्याची योग्य दखल प्रशासन घेईलच.
अर्थात, प्रतिसाद निस्सरित झाला तर ते तुमच्याच हिताचं आहे.
अन्यथा, नक्की प्रॉब्लम काये ? या पोस्टवर म्हटल्याप्रमाणे लोकांच्या निराधार धारणांना धक्का बसल्यामुळे ते उफाळतात हे पुन्हा सिद्ध होईल.
पण त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे बर्षानुवर्षे केलेल्या नामस्मरणादी साधना, साधकाचा मानसिक तोल राखण्यासाठी निरुपयोगी आहेत हे उघड होईल.
12 Jun 2020 - 10:19 pm | कोहंसोहं१०
सांगायच्या भानगडीत पडताय ? तोतापुरींच्या चालण्यानं नदीच्या पाण्याची पातळी कशी बदलत होती ? आणि
काली पोटदुखी बरी करत असेल तर व्यक्तीगत जीवनातून तुम्ही डॉक्टर हद्दपार केलायं का ?हे अजून पेंडींगच आहे !
>>>>>>मला वाटले तुमच्या सत्य(?)बुद्धीला उमगले असेल आतापर्यंत. असो. नक्की प्रॉब्लेम काय ह्या धाग्यावरचा विषय येथे काढायचे प्रयोजन नव्हते. तुम्हाला प्रतिसाद देणे म्हणजे वेळ वाया घालवणे होय परंतु उत्तराच्या मागे लागलाच आहात तर वाचा. पण त्याआधी एक सांगू इच्छितो - कोणतीही गोष्ट उडवून लावण्याआधी निदान थोडे का होईना सत्यता जाणण्याचा प्रयत्न करत चला. यामुळे आपलेच हसे होणे थांबेल.रामकृष्ण परमहंसाच्या जीवनकथेबद्दल आपल्याला किती माहिती आहे याचा मला अंदाज नाही परंतु एखादी घटना/कथा माहित नसेल तर सुज्ञपणे माहिती करून घ्याव्या प्रयत्न करावा. आपण मात्र देवभोळ्या लोकांनी लावलेल्या स्टोर्या असे म्हणून उडवून लावले यातचआपल्यामध्ये सूज्ञपणाची कमतरता आहे हे ठळकपणे दिसून आले.
बऱ्याच वर्षांपूर्वी रामकृष्णांवर आलेला एक चित्रपट गाजला होता. सुदैवाने युट्युब वर तो मिळाला. ही त्याची लिंक.
https://www.youtube.com/watch?v=KD1TsRBZnn8
पूर्ण चित्रपट पाहिल्यास उत्तमच. परंतु रामकृष्ण आणि तोतापुरींची कथा साधारण ३० व्या मिनिटांपासून ४६व्या मिनिटापर्यंत आहे. तोतापुरींचा जलसमाधी घेण्याचा निश्चय, कालीमातेची लीला आणि तोतापुरींनी मान्य केलेलं कालीमातेचे अस्तित्व हे साधारण ३८व्या मिनिटांपासून दाखवले आहे. ही कथा रामकृष्णांचे शिष्य शारदानंद यांच्या बायोग्राफी मध्ये नमूद केली आहे. रामकृष्ण परमहंस यांच्याविषयी माहिती असणाऱ्यास ही कथा काही नवीन नाही.
आपले अज्ञान प्रकट करण्याआधी आपण निदान प्रथम इंटरनेटवर शोधले असते तरी माहिती मिळाली असती. पण स्वतःचे हसे करून घेणे आपण काही थांबवत नाही त्याला मी तरी काय करणार.
आता तोतापुरींच्या चालण्यानं नदीच्या पाण्याची पातळी कशी बदलत होती ? ही त्याच शक्तीच्या आधारे बदलत होती ज्या शक्तीच्या आधारे चांगदेव वाघावर बसून आकाशमार्गाने ज्ञानेश्वरांना भेटायला आले होते, ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती आणि रेड्याच्या तोंडातून वेद म्हणवले होते किंवा पाठीवर मांडे भाजले होते, स्वामी समर्थांनी, शंकराचार्यांनी मृत व्यक्तीला जिवंत केले होते. या गोष्टींना सामान्य माणसे चमत्कार मानतील. भाविक लोक लीला म्हणतील आणि बुद्धिजीवी लोक भौतिक वैज्ञानिक पातळीवर जाणून घेण्याचा प्रयत्न करून बुद्धीला न पटल्याने भाकडकथा मानतील. परंतु या मागे जे सूक्ष्म विज्ञान आहे जेथे अजून आजचे विज्ञान पोहोचायचे आहे. २०० वर्षांपूर्वी कोणी म्हणाले असते की अजून १०० वर्षांनी माणूस आकाशात उडू शकेल, चंद्रावर जाऊ शकेल तर बुद्धिजीवी लोकांनी अशीच उडवून लावले असते. तरीही चमत्काराचे विज्ञान जाणून घ्यावयाचे असेल तर परमहंस योगानंदाच्या ऑटोबायोग्राफी ऑफ या योगी मधील Law of Miracles हा चॅप्टर वाचा. थोडी ज्ञानात भर नक्की पडेल.
याच धाग्यामुळे ३ वर्षापूर्वी माझा आयडी ब्लॉक केला होताभावनेच्या भरात तुमचा प्रतिसाद व्यक्तीगत झाला आहे, त्याची योग्य दखल प्रशासन घेईलच>>>>> माझा प्रतिसाद कुठेही भावनिक किंवा व्यक्तिगत नाही मी जी वस्तुस्थिती आहे ती सांगितली. आपला आयडी ब्लॉक केला होता हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. आपला आयडी ब्लॉक झाला होता यातच सर्व काही आले. दखल म्हणाल तर तुमचा आयडी ब्लॉक करून प्रशासनाने दखल याआधी घेतलीच होती.
याआधी तुम्ही अनेक वेळा अगदी सध्या सध्या प्रश्नांनी कोंडीत पकडले गेला आहात (अगदी या धाग्यावरसुद्धा) आणि हे आपल्यालाही ठाऊक आहे आणि बाकी जनतेला पण. आणि बाकीच्यांना हे ठाऊक आहे हे आपल्याला ठाऊक असूनही आपला सूक्ष्म अहंकार हे मान्य करायला तयार होत नाही आणि त्यामुळे आपण दुराग्रह सोडत नाही. आपला अहंकार सुखवयाला अगदी ज्ञानेश्वर, शंकराचार्य किंवा रामकृष्ण परमहंस हे कसे चुकीचे होते आणि मी कसा बरोबर आहे हेही सांगायला आपण कमी केले नाही. खरंच एकदा सद्सद्विवेकबुद्धीने विचार करून लिहीत जा. बाकी सत्यबोधामध्ये सर्वात मोठा अडसर अहंकाराचा असतो हे वेगळे सांगणे नव्हे.
बाकी यावरदेखील तुम्ही गोल गोल जिलब्या टाकून प्रतिसाद द्याल हे माहित आहे तरीही तुमचे अज्ञान दूर करण्यासाठी आणि इतरांना कथेची माहिती व्हावी याकरिता प्रतिसाद दिला.
13 Jun 2020 - 12:02 pm | संजय क्षीरसागर
.> ही त्याच शक्तीच्या आधारे बदलत होती ज्या शक्तीच्या आधारे चांगदेव वाघावर बसून आकाशमार्गाने ज्ञानेश्वरांना भेटायला आले होते, ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती आणि रेड्याच्या तोंडातून वेद म्हणवले होते किंवा पाठीवर मांडे भाजले होते, स्वामी समर्थांनी, शंकराचार्यांनी मृत व्यक्तीला जिवंत केले होते
मृत व्यक्ती जीवंत होऊ शकते यासारखं हास्यास्पद विधान खरं मानणं फक्त देवभोळे लोकच करु शकतात आणि त्याला काहीही आधार नसल्यानं Law of Miracles म्हणू शकतात.
इतका भारी फॉर्म्युला शंकराचार्यांनी स्वतःसाठी का वापरला नाही ?
किमान लिहून तरी का ठेवला नाही ?
मानवतेला मृत्यूच्या भयातून सर्वस्वी मुक्त न करता फक्त स्वत:च पुस्तक लिहायला एक माणूस उठवला ?
किती फेका फेकी ?
> १०० वर्षांनी माणूस आकाशात उडू शकेल, चंद्रावर जाऊ शकेल तर बुद्धिजीवी लोकांनी अशीच उडवून लावले असते ?
काय बोल्ता ?
सूक्ष्मविज्ञान न येता आज कुणीही विमानातून उडू शकतो हे शास्त्रीय संशोधनामुळे शक्य झालं आहे.
देवभोळ्या लोकांच्या 'सूक्ष्मविज्ञान ' थिअरीवर विश्वास ठेवून
शास्त्रज्ञ वाट बघत बसले असते की `पुष्पक विमान आकाशातून खाली येईल ',
तर अजून माणूस फक्त वाटच बघत राहीला असता !
> आपला आयडी ब्लॉक झाला होता यातच सर्व काही आले ?
काय सांगता ?
आयडी ब्लॉक झाला नसता तर सदस्यांना जिएसटीमुळे देशाचं किती अपरिमीत नुकसान होतंय ते कळलं असतं
आणि सत्तांतर होण्याची शक्यता होती.
आता किंमतीतर कमी झाल्या नाहीतच पण सर्वांना आयुष्यभर जिएसटीचा ताप भोगावा लागणार आहे !
> याआधी तुम्ही अनेक वेळा अगदी सध्या सध्या प्रश्नांनी कोंडीत पकडले गेला आहात (अगदी या धाग्यावरसुद्धा) ?
खरं की काय ?
एकदाही असं झालेलं नाही.
उलट तुम्हीच असले चमत्कारवादी प्रतिसाद देऊन स्वतःची विज्ञानशून्यता दर्शवता आहात.
13 Jun 2020 - 1:08 pm | संगणकनंद
मिपाचं अॅक्टीव्ह सदस्य किती आहेत हे कळायला मार्ग नाही. आपण ते पाचशे असतील असं गृहीत धरुया. या सर्वांनी तुमचे लेखन वाचले आणि ते तुमच्या विचारांनी प्रभावीत झाले (ही शक्यता दुरस्थ आहे पण तरीही आपण गृहीत धरुया असे.) या लोकांनी तितक्याच लोकांना प्रभावीत केले असे समजून. आकडा झाला एक हजार.
२०१९ च्या निवडणूकीत ६१ कोटी लोकांनी मतदान केले. त्यातील बहुमतासाठीचा कमीत कमी आकडा ५१% धरुया. हा आकडा येतो ३१ कोटी.
म्हणजे तुमचे विचार वाचणारे लोक हजार पाचशे, आणि सत्ता निवडून आणण्यासाठी लागले ३१ कोटी. आणि तरीही तुम्ही म्हणत आहात तुमचे विचार वाचून सत्तांतर होण्याची शक्यता होती.
तुमची लाडकी स्मृती स्ट्रींग थेयरी ही फेकाफेकीच आहे ना? ती कोणत्या शास्त्रज्ञाने कोणत्या प्रयोगशाळेत किती साली सिद्ध केली?
13 Jun 2020 - 1:48 pm | संजय क्षीरसागर
> हजार पाचशे, आणि सत्ता निवडून आणण्यासाठी लागले ३१ कोटी !
पण लोकांनी त्याचूसारखाच विचार केला !
काहीही झालं तरी मोदींना पंतप्रधान करायचं म्हणून स्वतःच्या प्रभागातला वाट्टेल तो उमेदवार निवडून दिला.
जिएसटी येऊन २ वर्ष झाली होती तरी लोकांना अनर्थाची कल्पना आली नाही.
जिएसटीमुळे माझे विचार ३१ कोटी लोकांना कसे कळणार ? पण संपूर्ण देशात जिएसटीमुळे झालेल्या देशाच्या आर्थिक वाताहतीची बातमी पसरली असती तर त्याचूला सुद्धा समजलं असतं आणि इतक्या पाशवी बहुमतानं सरकार निवडून आलं नसतं.
10 Jun 2020 - 10:36 pm | संजय क्षीरसागर
> असा अभिनिवेष मी तरी बाळगत नाही !
मुद्दा कितीही भरकटवला तरी मुळ प्रष्ण तोच राहतो !
नामस्मरणानं जी उन्मनी अवस्था प्राप्त होते म्हटलंय तो तुमचा अनुभव आहे का ?
कारण मग पुढचा प्रष्ण फार सोपा आहे :
नामस्मरण त्या अवस्थेतप्रत कसं नेतं ?
11 Jun 2020 - 11:04 am | प्रसाद गोडबोले
बरं
ते आयाहुस्काचे साईड इफेक्ट जे होतात ते ओव्हरडोस मुळे होत असावेत असा माझा अंदाज आहे , तुमचे काय मत आहे ह्यावर ?
=))))
11 Jun 2020 - 11:29 am | संजय क्षीरसागर
मुद्दा कितीही भरकटवला तरी मुळ प्रष्ण तोच राहतो !
नामस्मरणानं जी उन्मनी अवस्था प्राप्त होते म्हटलंय तो तुमचा अनुभव आहे का ?
कारण मग पुढचा प्रष्ण फार सोपा आहे :
नामस्मरण त्या अवस्थेतप्रत कसं नेतं ?
11 Jun 2020 - 3:16 pm | प्रसाद गोडबोले
मुद्दा हा आहे की तुम्ही आयोहौस्का कधीच ट्राय केली नाहीये तर त्यावर प्रतिसाद देण्याचे टाळत आहात हे पाहुन मला फार छान वाटत आहे :P
11 Jun 2020 - 5:14 pm | संजय क्षीरसागर
आयोहौस्का कधीच ट्राय केली नाहीये तर त्यावर प्रतिसाद देण्याचे टाळत आहात ?
काय सांगता ?
ज्याला आपण काल काय प्रतिसाद दिला ते आज आठवत नाही, तो
"ईश्वराप्रत अखंड तैलधारावत अनुसंधान " नामस्मरणातून कसं प्राप्त करतो ?
हा खरा मुद्दा आहे !
11 Jun 2020 - 6:34 pm | प्रसाद गोडबोले
तुम्ही आयोहौस्का ट्रायच न करता ती निरर्थक आहे , फालतु आहे असे काही बोलला असतात तर तुमच्या रेप्युटेशनला फार साजेसे झाले असते हो !
ख्या ख्या ख्या
11 Jun 2020 - 7:17 pm | अर्धवटराव
:)
11 Jun 2020 - 11:08 pm | संजय क्षीरसागर
ज्याला आपण काल काय प्रतिसाद दिला ते आज आठवत नाही
त्याच्या रेप्युटेशनची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करा !
12 Jun 2020 - 2:27 am | प्रसाद गोडबोले
आयाहौस्का एकदम फायनल नेल इन द कॉफीन झाला नै :))))
ज्या गोष्टींचा तुम्हाला अनुभव नाही त्या गोष्टींची तुम्ही केवळ कल्पना करू शकता, सत्य अनुभव घेऊ शकत नाही. घेतलाय असं तुम्हाला वाटतं असेल तर वाटो बापडे, आमचं काय जातंय :))))
तुम्हाला आयोहौस्का चा जसा अनुभव नाही तसाच नामस्मरण आणि अन्य साधक करत असलेल्या साधना मार्गांचाही नाही. तुम्ही केवळ कल्पना करा त्याचीही. माझ्या रेप्युटशन ची करत आहात तशी :))))
मला शष्प फरक पडत नाही आता कशाचा .
निर्विकार स्थितीला, निर्गुणाला रेप्युटशन ची काळजी नसते =))))
12 Jun 2020 - 9:46 am | संजय क्षीरसागर
जितकं लिहाल तितकं चुकाल !
सत्यालाच सगळे अनुभव येतात आणि सत्याला कल्पनाही करता येते.
जितकी कल्पनाशक्ती जबरदस्त तितकी काय करायचं आणि काय नाही हे कळण्याची क्षमता प्रगल्भ.
तस्मात, सिद्धाकडून नामस्मरण, परिक्रमा इत्यादी मूर्खपणा होण्याची शक्यता शून्य !
________________________________
ज्याचं लेखन अनुभवातून येतं तो असे सल्ले देणार नाही, पाहा :
5 Jun 2020 - 7:29 pm | मार्कस ऑरेलियस
त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी?
>>>
गांजा !
_____________________________________
अशा सल्ल्याचे फक्त दोन अर्थ संभवतात
१. काहीही अनुभव नसतांना वाट्टेल तसे प्रतिसाद देणं, किंवा
२. स्वानुभावातून दुसर्याला गांजा मारायला सांगणं ( ही तुमचीच आयाहौस्का थिअरी)
_________________________________
ज्याला आपण काल काय प्रतिसाद दिला ते आज आठवत नाही, तो
स्वानुभवातू सल्ला देतोयं की काय ?
अशी शंका येऊ शकते. (अर्थात, आयाहौस्का थिअरी)
_____________________________________
आणि तसा सल्ला स्वानुभवातून आला नसेल तर
"ईश्वराप्रत अखंड तैलधारावत अनुसंधान " किंवा इतर सर्व अध्यात्मिक लेखनाला फक्त
कॉपी/पेस्ट ही कला अवगत आहे यापलिकडे काहीही उरत अर्थ नाही.
_______________________
हा खरा मुद्दा आहे !
12 Jun 2020 - 11:03 am | प्रसाद गोडबोले
आयोहौस्का जिंदाबाद !!
ख्या ख्या ख्या
=))))
12 Jun 2020 - 3:44 pm | संजय क्षीरसागर
अशा सल्ल्याचे फक्त दोन अर्थ संभवतात:
१. काहीही अनुभव नसतांना वाट्टेल तसे प्रतिसाद देणं, किंवा
२. स्वानुभावातून दुसर्याला गांजा मारायला सांगणं ( ही तुमची आयाहौस्का थिअरी !)
_________________________________
ज्याला आपण काल काय प्रतिसाद दिला ते आज आठवत नाही, तो
स्वानुभवातू सल्ला देतोयं की काय ?
अशी शंका येऊ शकते. (अर्थात, आयाहौस्का थिअरी)
_____________________________________
आणि तसा सल्ला स्वानुभवातून आला नसेल तर
"ईश्वराप्रत अखंड तैलधारावत अनुसंधान " किंवा इतर सर्व अध्यात्मिक लेखनाला फक्त
कॉपी/पेस्ट ही कला अवगत आहे यापलिकडे काहीही उरत अर्थ नाही.
12 Jun 2020 - 4:55 pm | प्रसाद गोडबोले
तुम्ही कापुसकोण्ड्याची गोष्ट ऐकली आहे का हो ?
=))))
12 Jun 2020 - 6:14 pm | संजय क्षीरसागर
नामस्मरण म्हणजे स्वतःलाच कापुसकोण्ड्याची गोष्ट सांगणं !
आणि तुमच्या प्रतिसादातून ते स्पष्ट होतंय.
12 Jun 2020 - 6:37 pm | प्रसाद गोडबोले
नामस्मरण नामस्मरण काय करताय , कापुसकोंड्याची गोष्ट ऐकलीये का ते सांगा ?
=))))
12 Jun 2020 - 10:25 pm | कोहंसोहं१०
गोष्ट माहित नसेल तर देवभोळ्या लोकांनी लावलेल्या स्टोर्या म्हणून उडवून लावतात आणि सर्वमान्य गोष्ट माहीत नाही हे अज्ञान प्रकट करून स्वतःचेच हसे करून घेतात. माहित असेलच तर तेल तापवायला ठेवतात शब्दांच्या जिलब्या तळायला :-)
झोपलेल्याला उठवणे सोप्पे असते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही.
13 Jun 2020 - 10:00 am | संजय क्षीरसागर
काली जर पोटदुखी दूर करत असेल तर इतके डॉक्टर्स, हॉस्पिटल्स आणि मेडीकल संशोधन झालंय ते कशापायी ?
का ते सगळं झूट आहे ?
11 Jun 2020 - 11:11 am | मूकवाचक
अर्धवटराव, संजयजी, मार्कसजी आणि कोहंसोहं१० - प्रतिसाद दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
12 Jun 2020 - 11:29 pm | कोहंसोहं१०
@संजय क्षीरसागर,



रामकृष्णाबद्दल मी सांगितलेली कथा देवभोळ्या लोकांच्या स्टोर्या म्हणून उडवून लावून आपण आपले अज्ञान प्रकट केले याबद्दल आपले अभिनंदन. वर लिहिलेल्या एका प्रतिसादामध्ये मी नमूद केले होते कि रामकृष्णांच्या बायोग्राफी मध्ये ही कथा सापडेल आणि इंटरनेटवर शोधल्यास आपल्याला काही माहिती नक्की मिळेल. तुम्ही ती तसदी घेणार नाही याची मला खात्री आहे त्यामुळे मीच थोडा शोध घेतला आणि नेटवर राजीव मेहोत्रा यांच्या 'Thakur - Sri Ramakrishna: A Biography' या पुस्तकात याचा संदर्भ मिळाला.
हे देण्याचे प्रयोजन एवढेच की नामस्मरण किंवा मूर्तिपूजा याबाबत फारसा अनुभव नसताना उलटसुलट विधानं करून चुकीची माहिती आणि संभ्रम पसरवणाऱ्या आपल्या बुद्धीला योग्य प्रेरणा मिळो.
13 Jun 2020 - 9:56 am | संजय क्षीरसागर
आपल्या बुद्धीला योग्य प्रेरणा मिळो ?
छापिल ते सत्य हा एक पूर्वापार गैरसमज आहे आणि
भलत्यासलत्या स्टोर्या जनमानसात त्यापायीच मूळ धरुन आहेत.
इतका प्रयास करण्यापेक्षा एका साध्या प्रष्णाचं उत्तर दिलं तर इतरांबरोबर तुमचाही गैरसमज दूर होईल :
काली जर पोटदुखी दूर करत असेल तर इतके डॉक्टर्स, हॉस्पिटल्स आणि मेडीकल संशोधन झालंय ते कशापायी ?
का ते सगळं झूट आहे ?
13 Jun 2020 - 8:17 pm | कोहंसोहं१०
छापिल ते सत्य हा एक पूर्वापार गैरसमज आहे आणि भलत्यासलत्या स्टोर्या जनमानसात त्यापायीच मूळ धरुन आहेत ----> मी पुरावा सादर केला आहे आणि अख्या वाचकांसमोर तुम्ही तोंडावर आपटला आहात. त्यामुळे जेवढी असली विधाने कराल तेवढे अजून आपटाल आणि स्वत:चेच हसू करून घ्याल. तुमचे मात्र अनुभव आणि पुराव्याविना काहीही बरळायचं आणि इतरांनी तो सादर करून तोंडावर पाडले तरी गिरे तो भी टांग उपर. वर लिहिल्याप्रमाणे झोपलेल्याला उठवता येत पण झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही.
काली जर पोटदुखी दूर करत असेल तर इतके डॉक्टर्स, हॉस्पिटल्स आणि मेडीकल संशोधन झालंय ते कशापायी ? >>>>असल्या फालतू, बालिश, आणि विषय भरकटवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यात काही अर्थ नाही तरी एका वाक्यात देतो. डॉक्टर्स, हॉस्पिटल्स आणि मेडीकल संशोधन झालंय ते तुमच्याआमच्या सारख्या सामान्य (तुम्हाला सामान्य म्हणणे म्हणजे तुमचा अपमानच आहे पण तरी तो दोष पत्करला आहे) माणसाला बरे करण्यासाठी.
आयडी ब्लॉक झाला नसता तर सदस्यांना जिएसटीमुळे देशाचं किती अपरिमीत नुकसान होतंय ते कळलं असतं आणि सत्तांतर होण्याची शक्यता होती.>>>>> हसूनहसून अक्षरशः लोळलो जमिनीवर. लिहितानाही हसू आवरत नाहीये अजून. येउद्यात अजून अशी विधाने. मस्त करमणूक होतीये.
13 Jun 2020 - 11:50 pm | संजय क्षीरसागर
> झालंय ते तुमच्याआमच्या सारख्या सामान्य (तुम्हाला सामान्य म्हणणे म्हणजे तुमचा अपमानच आहे पण तरी तो दोष पत्करला आहे) माणसाला बरे करण्यासाठी.
तेच तर सांगतोयं !
अशा असामान्य थापांचा जगातल्या कुणालाच काही उपयोग नाही !
लोक पोट दुखायला लागल्यावर कालीची वाट न बघता सरळ दवाखाना गाठतात.
थोडक्यात, जी गोष्ट तुम्ही स्वतःही करता (स्वतःला नॉर्मल समजत असाल तर), ती नाकारता येत नाही.
तस्मात, अशा भाकड कथांचा जगाला शून्य उपयोग आहे.
> मी पुरावा सादर केला आहे आणि अख्या वाचकांसमोर तुम्ही तोंडावर आपटला आहात.
भाकड कथा छपली आणि ती इथे पेस्ट केली याला फक्त देवभोळे पुरावा मानतील.
तुम्ही स्वतःच जर डॉक्टरकडे जाता तर आता तोंडावर कोण पडलंय ते पाहा.
> आयडी ब्लॉक झाला नसता तर सदस्यांना जिएसटीमुळे देशाचं किती अपरिमीत नुकसान होतंय ते कळलं असतं आणि सत्तांतर होण्याची शक्यता होती.
अर्थात !
चला किमान आयडी ब्लॉक झाला या निरर्थक गोष्टीचा
तुम्हाला इतके दिवस होणारा आनंद तरी मावळला !
आता जन्मभर वाढीव किंमतीवर आपण जिएसटीचा भुर्दंड भरतोयं हे पण यथावकाश लक्षात येईल !
14 Jun 2020 - 2:27 am | कोहंसोहं१०
तस्मात, अशा भाकड कथांचा जगाला शून्य उपयोग आहे -----> आता तुम्ही कितीही कंठशोष करून ती भाकड कथा म्हणली तरी त्याचा काही उपयोग नाही. हा प्रसंग स्वत: रामकृष्णांचे शिष्य स्वामी सारदानंदांनी यांनी त्यांच्या पुस्तकात उद्बोधित केला आहे. पुरावा सादर करून तुम्हाला तोंडावर पाडल्याने तुमचा अहंकार दुखावला गेला असेल त्यामुळे तुम्ही मान्य करत नसाल पण माझा त्याला नाईलाज आहे. त्यामुळे जेवढा याला प्रतिरोध कराल तेवढे अजून आपटाल.
उपयोगाचे म्हणाल तर या कथेचा संदर्भ देण्याचे सार कट्टर निर्गुणवादी असणाऱ्या तोतापुरी महाराजांनी मान्य केलेले कालीमातेचे अस्तित्व, आणि सगुण आणि निर्गुण यांच्यातला अभेद हे दर्शवणे होते. योग्य तो बोध घेण्याऐवजी तुम्ही त्याला भाकडकथा म्हणालात आणि फालतू, निरर्थक विषयाला सोडून प्रश्न विचारत बसलात. अगदी ज्ञानेश्वर, शंकराचार्य, रामकृष्ण परमहंस यांना चुकीचे म्हणून मीच कसा बरोबर ही टिमकी पण वाजवली. यातूनच तुमचा पराकोटीचा अहंकार, मूढता, आणि दुराग्रहीपणा दिसून येतो. आपलाच मुद्दा बरोबर हे सांगण्याची तुमची केविलवाणी धडपड तुम्हाला वाचकांसमोर अजून मूर्ख ठरवत आहे.
बाय द वे, "आयडी ब्लॉक झाला नसता तर सदस्यांना जिएसटीमुळे देशाचं किती अपरिमीत नुकसान होतंय ते कळलं असतं आणि सत्तांतर होण्याची शक्यता होती" ------
हे मात्र एपिक होतं. यासाठी
14 Jun 2020 - 9:54 pm | संजय क्षीरसागर
> हा प्रसंग स्वत: रामकृष्णांचे शिष्य स्वामी सारदानंदांनी यांनी त्यांच्या पुस्तकात उद्बोधित केला आहे.
छापिल ते सत्य या घोर गैरसमजामुळे तुम्ही उगीच हरखून गेलात.
वाट्टेल ते झालं तरी डॉक्टरकडे जात नाही;
फक्त कालीच्या आशीर्वादानं मी कोणत्याही व्याधीतून मुक्त होतो.
त्यातून काही बरं वाईट झालंच तर जवळच्या लोकांना,
गेलेल्याला जीवंत करण्याचा मंत्र शिकवून ठेवला आहे.
आणि ते ही चुकून फेल झालं तर साक्षात चांगदेव महाराज वाघावर बसून
आकाशातून प्रकटतील आणि मला थेट स्वर्गात नेतील.
असा कॉन्फिडन्स दाखवला असता तर तुमच्या स्टोर्यांना काही अर्थ होता.
स्वतः डॉक्टरकडे जाणारा कालीच्या भाकड कथा सांगतो,
माणसं जीवंत करायच्या गोष्टी करतो आणि
वाघावर बसून महाराज आकाशातून येण्याची स्टोरी सांगतो
हे ऐकून चवथीतला मुलगा सुद्धा तुमच्या विडिओतल्या माणसासारखा हासून-हासून लोळायला लागेल
नक्की करुन पाहा !
_______________________________________________
हा जिएसटीचा धागा नाही तरीही तुमच्या माहितीसाठी
लक्षावधी कंसल्टंटस, करोडो व्यावसायिक आणि किमान बुद्धी असलेले नागरिक जिएसटीचा फियास्को समजले आहेत.
आवाज दाबले गेले नसते तर जुलै १७ ते एप्रिल १९ हा दीर्घ कालावधी सरकारच्या निर्बुद्ध आर्थिक धोरणांविषयी जनजागृती करायला पुरेसा होता
पण जनता इतकी भक्तीभावात दंग आहे की जिएसटीमुळे झालेली आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी सरकारनी आरबीआयच्या पावणे दोन लाख कोटींच्या गंगाजळीवर डल्ला मारला, पण लोकांना याचा पत्ताच नाही !
______________________
अर्थात, तुमच्या आगाध सिद्धींनी तुम्ही आकाशमार्गे जाऊन
श्री जेटलींशी संपर्क करुन त्यांचे मनोगत जाणून घेऊ शकलात,
तर देशाचे भले होऊ शकेल, किंवा
असे असंबद्ध प्रतिसाद देण्याऐवजी,
तुमच्या सिद्धींनी जिएसटीचे गुह्य जाणून,
तो देशासाठी किती उपकारक आहे यावर स्वतंत्र धागा काढावा.
15 Jun 2020 - 4:21 am | कोहंसोहं१०
छापिल ते सत्य या घोर गैरसमजामुळे तुम्ही उगीच हरखून गेलात >>>>>गैरसमज तुम्हाला झालाय. पुरावा देऊन तुमच्या विधानातली फुसकी हवाच काढून टाकल्यामुळे तुम्ही सैरभैर झालात. तुम्ही मान्य करा किंवा नका करू मला त्याने काहीच फरक पडत नाही. पण तुमच्या निराधार आणि बाष्कळ वाक्यांना उघडे पाडणारे पुरावे मी दिले हे बाकी वाचकांच्या लक्षात आले असणारच. तुम्ही जेवढा त्याचा प्रतिकार कराल तेवढे तुम्ही अजून उघडे पडाल हे वेगळे सांगायची गरज नाहीच.
अर्थात, तुमच्या आगाध सिद्धींनी तुम्ही आकाशमार्गे जाऊन श्री जेटलींशी संपर्क करुन त्यांचे मनोगत जाणून घेऊ शकलात >>>>>>>>> सिद्धी मला प्राप्त आहे हा दावा मी कधीच केला नाही. मी डॉक्टर कडे जाण्याचा आणि कालीमातेच्या अस्तित्वाचा काहीच संबंध नाही. तुमच्याकडे उत्तर नसल्यामुळे तुम्ही तो जोडण्याचा प्रयत्न करीत आहात आणि तुमचे अजूनच हसू होत आहे.
भक्तिमार्गी संत सोडा परंतु योगमार्गी पतंजली, ज्ञानमार्गी संत ज्ञानेश्वर, शंकराचार्य, रमण महर्षी यांनी सुद्धा ईश्वराचे अस्तित्व मान्य करून भक्तिमार्गाचा सल्ला दिला आहे. त्यांना सोडून तुमच्या अहंकार आणि दंभयुक्त विधानांना कोण विचारतंय? आपलेच म्हणणे खरे ठरवण्यासाठी संतमंडळींना खोटे ठरवून मीच कसा शहाणा हे सांगून तुम्ही तुमच्या अहंकाराची आणि अज्ञानीपणाची चुणूक दाखवलीच आहे. आणि अजूनही तेच करत आहात त्यामुळे तुम्ही बसा असेच ओरडत आणि आपटा नेहमीप्रमाणे तोंडावर.
पण काहीही असो, तुमचे हे वाक्य "आयडी ब्लॉक झाला नसता तर सदस्यांना जिएसटीमुळे देशाचं किती अपरिमीत नुकसान होतंय ते कळलं असतं आणि सत्तांतर होण्याची शक्यता होती" आणि त्यावर स्पष्टीकरण देण्याची तुम्ही चालवलेली केविलवाणी धडपड यासाठी अजून एक:

जाता जाता, इतके हसायचे कारण अजूनही कळाले नसेल तर ते तुमच्या विधानातील 'आयडी ब्लॉक झाला नसता तर सत्तांतर होण्याची शक्यता होती' ह्या पार्टसाठी आहे. जीएसटी चुकीचा की बरोबर हा इथे मुद्दाच नाहीये. त्यामुळे उगाच जीएसटी बद्दल स्पष्टीकरणे देत अजून बोर करुन स्वतःचे हसू करून घेऊ नका.
15 Jun 2020 - 10:28 am | संजय क्षीरसागर
> तुमच्या विधानातली फुसकी हवाच काढून टाकल्यामुळे
पुरावा कशाला म्हणतात याबद्दल तुमच्या कल्पना नामी आहेत !
तुमचं सामान्यज्ञान अपडेट करु :
जी गोष्ट सर्वांसाठी, सर्व-काल आणि वारंवार सत्य आहे त्याला पुरावा म्हणतात.
उगाच रद्दीतल्या कोणत्याही पुस्तकाचं छापिल पान सतरादा नाचवून त्याला पुरावा म्हणणं
म्हणजे स्वतःचं हसू करुन घेणं आहे.
त्यात मेलाला माणूस जीवंत करता येतो असं अत्यंत भंपक विधान तुम्ही मान्य केलं आहे
इतकंच नव्हे तर ते भर पब्लिक फोरमवर उधृत करुन स्वतःची फार मोठी अडचण करुन घेतली आहे.
मला इथे देवभोळे लोक सपोर्ट करणं असंभव आहे हे उघड आहे पण
तुम्हाला सुद्धा इथे एकही जण अनुमोदन देत नाही कारण
इतका फनी प्रकार अगदी सात-आठ वर्षाचं मुल सुद्धा मान्य करणार नाही.
____________________________________
> सदस्यांना जिएसटीमुळे देशाचं किती अपरिमीत नुकसान होतंय ते कळलं असतं आणि सत्तांतर होण्याची शक्यता होती
अर्थात !
जिएसटीविरुद्ध उठवलेल्या अनेक आवाजांपैकी एक आवाज माझा होता आणि
जनतेपर्यंत असे सर्व आवाज पोहोचले असते तर सत्तांतराची हमखास शक्यता होती
असा त्या विधानाचा अर्थ होतो
पण मेलाला माणूस जीवंत करता येतो यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती
कितपत विचार करु शकेल हे उघड आहे
त्यामुळे तुम्हाला मुद्दा कळत नाही यात तुमची चूक नाही.
15 Jun 2020 - 11:25 am | संगणकनंद
तुम्ही हे वाक्य लिहीणं हा या शतकातील सर्वात मोठा विनोद असेल.
कारण तुम्हीही अशीच कसलाही आगापिछा नसलेली विधानं केली आहेतः
हे सर्व सर्वांसाठी, सर्व-काल आणि वारंवार सत्य आहे का? =))
बाकी जो माणूस "माझा आयडी ब्लॉक झाला नसता तर सत्तांतर झाले" सारखे सहस्त्रकातील सर्वात विनोदी वाक्य म्हणू शकतो. तो शतकातील सर्वात विनोदी वाक्य लिहूच शकतो.
15 Jun 2020 - 12:29 pm | संजय क्षीरसागर
> जी गोष्ट सर्वांसाठी, सर्व-काल आणि वारंवार सत्य आहे त्याला पुरावा म्हणतात
अर्थात !
आता शेपूट न घालता, तुम्ही फक्त तुमचं पुनर्जन्माविषयीचं आकलन स्वतंत्र धागा काढून लिहा
अनफॉरमॅटेड मेमरी स्ट्रींग्जचा दावा मी तिथे सिद्ध करीन.
__________________________________
दरवेळी प्रतिसाद न वाचता त्याचू रिप्लाय देण्यात काही अर्थ नाही,
पुन्हा वाचा :
जिएसटीविरुद्ध उठवलेल्या अनेक आवाजांपैकी एक आवाज माझा होता आणि
जनतेपर्यंत असे सर्व आवाज पोहोचले असते तर सत्तांतराची हमखास शक्यता होती
असा त्या विधानाचा अर्थ होतो
__________________________________
15 Jun 2020 - 12:49 pm | संगणकनंद
माझं नाव तुम्हाला खुपच आवडलेलं दिसतंय. असो.
झाली ना पुन्हा एकदा बोलती बंद. दावा तुम्ही केलाय म्हटलंय त्याचे पुरावे द्यायची जबाबदारी तुमची नाही का? "तुम्ही फक्त तुमचं पुनर्जन्माविषयीचं आकलन स्वतंत्र धागा काढून लिहा" ही पळवाट कशाला काढताय? मी कसला दावा केलाच नाही तर मी माझे आकलन कशाला लिहू? जो दावा करतो त्याने पुरावा द्यायचा असतो असा शहाण्यांचा नियम आहे? तुमच्यात नसतो का असा नियम?
आणि दावा सिद्ध करायला तुम्ही शास्त्रज्ञ आहात की प्रयोगशाळेत काही प्रयोग केलेत की एखादं उपकरणं बनवलंत ज्यातून या त्या तुमच्या स्मृती स्ट्रीन्ग्ज अंतराळात निसटताना दिसतात, नवजात अर्भकाच्या मेंदूत शिरताना दिसतात? तुम्ही सिद्ध करणं नको, कुठल्या शास्त्रज्ञाने शोधून काढलं, कोणत्या प्रयोगशाळेत शोधलं, स्मृती स्ट्रीन्ग्ज अंतराळात निसटताना दिसतात, नवजात अर्भकाच्या मेंदूत शिरताना दिसतात हे कोणत्या उपकरणातून पाहीलं, त्या उपकरणाचं नाव, ते कुठे विकत मिळतं, तुम्ही ते कोणत्या प्रयोगशाळेत पाहीलं या सार्या प्रश्नांची उत्तरे हवीत.
तुमची नेहमीसारखी बाष्कळ फेकाफेकी नको. वरील प्रश्नांची उत्तरे द्या, ती दिलीत की तुमचा दावा आपोआप सिद्ध होईल. घेताय का आव्हान या प्रश्नांची उत्तरे देण्याचं? फक्त याच प्रश्नांची उत्तरे बरं का? इतर काहिही लिहीलंत तर तुमच्याकडे उत्तर नाही हे (पुन्हा एकदा) सिद्ध होईल.
15 Jun 2020 - 2:36 pm | संजय क्षीरसागर
जरा विचार करुन लिहा !
पुनर्जन्म हा इथल्या सभासदांचा दावा आहे, माझा नाही
४/५ दिवसांनी फक्त पिंका टाकण्यासाठी इथे येत असलेल्यांना ते लक्षात येणार नाही.
तस्मात, पुनर्जन्माची थिअरी > ` सर्वांसाठी, सर्व-काल आणि वारंवार ' या वस्तुनिष्ठ परिमाणंवर
तुम्हाला सिद्ध करावी लागणार आहे, मला नाही.
मेमरी स्ट्रींग्ज हा दावा पुनर्जन्म या बोगस थिअरीचं वस्तुनिष्ठ निराकारण आहे.
_________________________________________________
पिंका टाकण्यापलिकडे तुम्हाला स्मृती > रिट्रावल > प्रोसेसिंग याबाबतीत काही समज असेल तर
पूर्वजन्मीच्या स्मृती, या जन्मी कशा पुनर्ज्जिवित होतात ? हे तुम्हाला स्वतंत्र धागा काढून मांडावं लागेल
तस्मात, तुमचं पुनर्जन्माविषयीचं आकलन स्वतंत्र धागा काढून लिहा
आणि त्याबाबतीत काहीच ज्ञान नसेल तर पुन्हा पुन्हा नांव सार्थ करु नका.
15 Jun 2020 - 4:07 pm | संगणकनंद
तुमची बोलती बंद झाल्याने तुम्ही पुन्हा पुन्हा माझ्या "आयडी" नावावर घसरत आहे. "आयडी" नावावर घसरणे हे मुद्द्याविषयी लिहायला काहीच नसल्याने होत आहे. हा "आयडी" केवळ टाईमपास म्हणून घेतला आहे हे ही तुमच्या मेंदूत घुसत नाही. तुम्ही मात्र फार मोठा मुद्दा हाती लागल्यासारखे त्या "आयडी" नावावर घसरत आहात. हे काही ज्ञानी माणसाचं लक्षण नव्हे =))
जो दावा मी केलाच नाही तो मला सिद्ध करायला सांगत आहात. आणि जो दावा तुम्ही केला आहे त्याचे पुरावे देण्याचे नाव नाही. इथे शेपूट घालत आहात. अजब न्याय आहे हा.
"तुमचं" वस्तुनिष्ठ निराकारण नकोय. वैज्ञानिक पुरावे द्या. मुळात एक अशास्त्रिय दावा स्वतः करत आहात, त्याचे पुरावे मागितलं की शेपूट घालत आहात. आणि वरुन लोकांना म्हणत आहात "जी गोष्ट सर्वांसाठी, सर्व-काल आणि वारंवार सत्य आहे त्याला पुरावा म्हणतात."
हे म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि इतरांचं ठेवायचं वाकून.
सांगा, मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या?
"तुमचं" वस्तुनिष्ठ निराकारण नकोय. या प्रश्नांची उत्तरे द्या.जर तुमचा दावा वैज्ञानिक सत्य आहे तर. पळवाटा कशाला शोधताय? दुसरे पुनर्जन्मावर लिहीतील न लिहीतिल, तुमचा दावा वैज्ञानिक सत्य आहे ना, मग द्या ना पुरावे.
तुमचं कसं आहे माहिती आहे का, शेंबूड माझ्या नाकाला आणि मी हसतोय जगाला. स्वतः एक अशास्त्रिय विधान करुन सिद्ध करत येत नसल्याने पळवाटा शोधताय, आणि दुसर्यांना वैज्ञानिक सत्य काय आहे याच्या बाता शिकवत आहात.
15 Jun 2020 - 4:23 pm | संजय क्षीरसागर
करुन वर बोलती बंद ?
मानवी मेंदू हा बायो-कंप्युटर आहे हे मी न्यूयॉर्क टाइम्सची लिंक देऊन ऑलरेडी सिद्ध केलंय
वाचलीत का ती चर्चा ?
तुमचं वाचन ही नाही आणि प्रतिसादही नांवासारखे,
त्यामुळे तुम्हाला काय चर्चा झाल्या आणि मुद्दा काय हे समजणं अवघड.
मेंदू हा बायो-कंप्युटर आहे हे सिद्ध झाल्यावर मेमरी स्ट्रींग्ज हा डेटा आहे हे सिद्ध होतं
________________________________________________
असो, तुम्हाला कंप्युटरची कार्यप्रणाली माहिती आहे का ?
असल्यास ती स्वतंत्र धागा काढून लिहा
कारण या धाग्यावर हे अवांतर आहे
(अर्थात, त्याचू म्हटल्यावर तेही समजणं कठीण !)
तुम्ही एकदा तुमचं कंप्युटरचं ज्ञान दर्शवलं की फक्त एका प्रतिसादात
मी मेमरी स्ट्रींग्जचा सिद्धांत प्रूव करीन !
आलं लक्षात ?
आता परत नांव सार्थ करु नका.
15 Jun 2020 - 4:31 pm | संगणकनंद
फक्त तुम्ही जो अशास्त्रीय दावा केला आहे, त्याच्या अनुषंगाने पुढील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेतः
मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या?
15 Jun 2020 - 4:57 pm | संजय क्षीरसागर
पुन्हा वाचा :
मानवी मेंदू हा बायो-कंप्युटर आहे हे मी न्यूयॉर्क टाइम्सची लिंक देऊन ऑलरेडी सिद्ध केलंय
वाचलीत का ती चर्चा ?
तुमचं वाचन ही नाही आणि प्रतिसादही नांवासारखे,
त्यामुळे तुम्हाला काय चर्चा झाल्या आणि मुद्दा काय हे समजणं अवघड.
मेंदू हा बायो-कंप्युटर आहे हे सिद्ध झाल्यावर मेमरी स्ट्रींग्ज हा डेटा आहे हे सिद्ध होतं
________________________________
अर्थात, व्यत्त्यास वगैरे तुमहाला कितपत समजेल ही शंका आहे, तरी
एकदा कंप्युटर एस्टॅब्लीश झाला की डेटा रिट्रिवल अँड प्रोसेसिंग हे व्यत्त्यासानं सिद्ध होतं.
पण तुम्ही त्या भानगडीत पडू नका.
ते बरच वरच्या लेवलला आहे.
____________________
तुम्ही फक्त एक काम करा....
तुम्हाला कंप्युटरची कार्यप्रणाली माहिती आहे का ?
असल्यास ती स्वतंत्र धागा काढून लिहा
कारण या धाग्यावर हे अवांतर आहे
(अर्थात, त्याचू म्हटल्यावर तेही समजणं कठीण !)
तुम्ही एकदा तुमचं कंप्युटरचं ज्ञान दर्शवलं की फक्त एका प्रतिसादात
मी मेमरी स्ट्रींग्जचा सिद्धांत प्रूव करीन !
आलं लक्षात ?
आता परत नांव सार्थ करु नका.
15 Jun 2020 - 5:25 pm | संगणकनंद
मी कोणतीही चर्चा वाचलेली नाही आणि मला कुठली लिन्क माहिती नाही. आणि तुमचा मुद्दा जर लिन्क देऊन सिद्ध होतो तर इतरांचे मुद्दे पुस्तकांची पाने देऊन का सिद्ध होऊ नयेत. तुमची लिन्क काय आभाळातून पडली आहे का? आणि सीएकडून कॉम्युटर कसा चालतो हे शिकण्याईतकी वाईट वेळ माझ्यावर आली नाही.
>> मानवी मेंदू हा बायो-कंप्युटर आहे हे मी न्यूयॉर्क टाइम्सची लिंक देऊन ऑलरेडी सिद्ध केलंय
मुळात याने तुमचा दावा शास्त्रीय आहे हे नाही सिद्ध होत नाही. तुमचा दावा अतिशय भंपक आहे. वैज्ञानिक सत्य असतं तर चार प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली असती तुम्ही. पण मुळातच भंपक दावा केल्याने आता चूक मान्य करायला अहंकार आडवा येतोय. त्यामुळे तोंड लपवायला पळवाटा शोधाव्या लागत आहेत तुम्हाला.
या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे असतील तर द्या, नाही तर तुम्ही केलेले अशास्त्रीय विधान मागे घ्या. आहे का हिंमत बोला.
15 Jun 2020 - 5:47 pm | संजय क्षीरसागर
> मी कोणतीही चर्चा वाचलेली नाही आणि मला कुठली लिन्क माहिती नाही.
तेच तर मी पहिल्यापासनं सांगतोयं.
न तुमचं इथल्या पोस्टसचं काही वाचन, न प्रतिसादांना काही अर्थ !
३/४ दिवसांनी येऊन काहीही संदर्भ माहिती नसतांना पिंका टाकायच्या !
> तुमची लिन्क काय आभाळातून पडली आहे का?
हे तर तुमचं वाचन !
न्यूयॉर्क टाइम्सनी कंप्युटरची कार्यप्रणाली आणि मानवी मेंदू यातलं साधर्म्य सोदाहरण, एकेक मुद्दा घेऊन स्पष्ट केलं आहे.
> इतरांचे मुद्दे पुस्तकांची पाने देऊन का सिद्ध होऊ नयेत !
ही तर तुमची वैचारिक झेप !
मेलेला माणूस जीवंत झाला हे छापिल पानं इथे डकवून सिद्ध झालं म्हणणं, आणि
न्यूयॉर्क टाइम्सनी कंप्युटरची कार्यप्रणाली आणि मानवी मेंदू यातलं साधर्म्य सोदाहरण, एकेक मुद्दा घेऊन स्पष्ट करणं
यातला फरक तुम्हाला लक्षात येत नाही !
____________________________
एकूणात तुम्हाला कंप्युटरचंही ज्ञान दिसत नाही आणि तुम्ही इथे झालेल्या चर्चाही वाचलेल्या नाहीत.
तस्मात, तुम्हाला एकही प्रतिसाद देण्यात अर्थ नाही.
तरीही तुम्हाला हौस असेल तर तुमचं काँप्युटरचं ज्ञान इथे स्वतंत्र धागा काढून लिहा आणि मी माझी थिअरी त्याच धाग्यावर, तुमच्याच विधानांनी (ती बरोबर असतील तर) सिद्ध करतो.
इथून पुढे तुम्ही या धाग्यावर काहीही त्याचूसारखं लिहू नका !
15 Jun 2020 - 6:02 pm | संगणकनंद
आणि तुम्ही जो दावा केला आहे, त्यासंदर्भात या प्रश्नांची उत्तरे द्या:
उत्तरे द्या किंवा या प्रश्नांची उत्तरे नसतील तर तुम्ही एक भंपक थाप मारली हे मान्य करा.
14 Jun 2020 - 11:00 pm | अर्धवटराव
इथे कावळ्याच्या शापाने गायी मरायला लागल्या आहेत, त्यांच्या श्राद्धानिमीत्त बिरबलाची खिचडी रांधुन तयार आहे, आणि पंगतीला सोबत म्हणुन शेखचिल्ली मनातल्या मांड्यांवर यथेच्च ताव मारतोय...
आणि तुम्ही गडबडा लोळत हसताय ?
=))
14 Jun 2020 - 10:02 pm | अनरँडम
मागे मी रमणरावांना भामटेच म्हटले असते. पण आता सगळं जगच कसं छ्चोर-विनोदी वाटू लागल्याने मला पॅनसायकिजम सत्य असल्याचे वाटते. म्हणजे काय सगळेच सचेतन आहे. आता मी मूकवाचक यांचे लेख वाचून थोडाफार रमणरावांची विचारशॄंखला समजून घेतो.