लॉकडाऊन सुरु आहे - भाग ५ - डर के आगे जीत -२

श्रीकांतहरणे's picture
श्रीकांतहरणे in जनातलं, मनातलं
6 Jun 2020 - 4:20 pm

धर्मराज अपार्टमेंट- हेमसिंगबुट्टा (नावबदलून)- दहा, दहा वर्षांपासून , तिथेच सडत असलेले, इंजिनीरिंग कॉलेजचे जवाई , त्याचा तो अड्डा, कुठलाही फ्रेशर असो, त्याले एकदातरी तिथे हजेरी लावण गरजेचे होत. फक्त लोकलविदयार्थी याले, अपवाद. अमरावतीच्या फ्रेशर्सची वर्दी अजून तिथ लागली नव्हती. आमाच्याच क्लासमधला एक उत्तरभारतीय पोट्ट, रूमवर निरोप घेऊन आल.

"बुट्टा सरकेयाह बुलाया है."

आम्ही तिघही एकमेकांकडे पाहून रायलो.काय कराच काई समजत नव्हत. बाल्यादादाले एवढ्या लवकर भेटणई शक्य नव्हत. तो जमाना मोबाईफोनचाई नोता,की जरा का मुंगी चावली, की लगेच मोठ्यांले फोन कराच, अन हेल्पमांगाची. आता आमालेच सिंहाच्या गुहेत जायच होत.

कसतरी, आम्ही दोन सायकलीनिशी तैयार झालो अन धर्मराज अपार्टमेंटच्या ग्राउंडफ्लोअर जवळ येऊन पोचलो. तो उत्तरभारतीय पोट्टा, आमाले धीर देत.

"अबे डरोमत बे,कुछ नही करते, अच्छे सर हैं बे." तेवढ्यात प्रवीणमाटे आमच्या क्लासमंदिल अमरावतीचा अजून एक पोट्टा तिथ येऊन पोचला. एका झापडीत पॅन्ट ओलीकरीन अशी त्याची तब्बेत. तरी बटे त्याच डेरिन लयच.

"काबे, काय करून रायले इकडे?" हासताच बोलला तो. इकडे आमच्या थोबाडावर बारा वाजले, अनयाले मजाक कशी काय सुचून रायली काय माहित?

"अबे, बुट्टासरण बोलवलं नाबे."

"मंग? घाबरत कायले खाते का बुट्टा? पायरे बा,लोड घ्याले पुरत काय?"

याची तब्बेत काय? हा बोलते काय? काय कॉम्प्लेन, बिंप्लॅन पिऊन आला लेकाचा. म्या राहुल्याले इशाऱ्यानच विचारल.

काही समजायच्या आधीच "चला" म्हणत आम्ही चौघे चवथामाळा चढत गेलो. अन हेमसिंगबुट्टा नावाच्या सिहाच्या दरबारात हजर झालो.

"सर ले के आया" उत्तरभारतीय पोट्ट्यान, त्याच्या बॉसला सांगितले.

कोणीतरी, दोन आमचे काका वाटावे, या वयाचे जाट,बहुतेक मूळचे हरियाणी. हेमसिंग बुट्टा त पंजाबी, मग ह्या दोघाले ना त पगडी, ना दाढी वाढलेली, कुठल्याई अँगलन,ते पंजाबी वाटत नव्हते. हेमसिंगबुट्टा तिथ नव्हताच,काईतरी कामासाठी तो बाहेर गेला असण.

त्या दोघांपैकी एक "क्यारे, सुना है तुम लोग रॅगिंग नही देते."

"नही सर,येसा नही" आमच्यापैकी एकझन बोलला.

"फिर? जब सब स्टुडन्स्ट हजेरी लगाके गये, तो तुम लोग क्यो नही आये?"

काहीच उत्तर नाही. "अबे डरते हो क्या?"

परत काहीच उत्तर नाही.

"छोटू उस्ताद, तूभी ईनके लाईन मे खडा होजा" त्या जाट अंकलन, आमच्या क्लासमधील त्या उत्तरभारतीय पोट्ट्याले सांगितलं. तो बहुतेक त्याचाच रूम मेट होता. हे आता आमाले समजलं होत.

"चलो शर्ट निकालो" झाल हे ऐकताच आमी अक्षरशः रडाले आलो.

"सर"

"बोलाना ,चलो शर्ट निकालो"

छोटूउस्ताद, त्यांचा पार्टनर,शर्ट काढून दोन मिनटात तयार. त्याले पाहून आमाले थोडा धीर आला. शर्ट निघाले. प्रविण्याचा अजून काईतरी टाईमपास चालू होता.

"क्यारे तेरे को अलग से बताना पडता क्या?"

"सर मै शर्ट नही उतारुंगा."

"क्या बे?"
"नही सर"

"छोटू उस्ताद, इसका शर्ट निकाल."

छोटूउस्तादन आदेशाच पालन केले

"चलो अब पॅन्ट"

आता डोळ्यातून अश्रू,कधी गळून पळले ते समजलंच नाई. "नही सर"

द्रौऊपदीच्या रक्षणासाठी श्रीकृष्णधांवून आले ,आमच्यासाठी कोण येणार?

तेव्हढ्यात, कोणालेई काही समाजाच्या आधीच, प्रविण्यान अशी स्फुर्ती दाखवली, मास्कच्याहिरो जिम कॅरी सारखा, जोसुटला पळत,की कधी चारमाळे उतरला , अन सायकल काळली, अन बंदा फरार. हेमसिंगबुट्टाच्या फ्लॅटवरून पळून जाण, म्हणजे त्या काळात काई साधी गोष्ट नोती.

"शर्ट पहणो रे" आम्ही पटापट शर्ट घातले."

तेवढ्यात हेमसिगबुट्टा तिथ आला, "क्या चल रहा रे?" हा तर कमीत कमी पस्तीशी पार केलेला असणं. त्याले सगळा काय मामला आहे, त समजल. त्यान त्याचाच मित्राले

"क्याबे तुम लोगो को काम नही क्या? अभी भी बचो जैसे हरकत करते हो."

आमच्याकडे पाहत "डरनामत रे. कोई कुछनही करेगा. छोटू सबको पाणी पिला बेटा और हा केले भी खिला."

"थँक्यूसर, थँक्यूसर" म्हणत आमी या पंजाबी कृष्णाचे आभार मानू लागलो "देवतारी त्याला कोण मारी" .म्हणतात ना मारणे वालेसे, बचाने वाला बडा होता है.

तो पुढ सांगाले लागला

"अरे यार, मैरी तो अब शादीभी हुवी है ,मेरा एक बेटा है. अकोला, मै ही मेरी कपडो की दुकानभी हैं. ये सब खाली मेरे नामसे, लोगो को डराते हैं. मै तो ये सबसे दूर हू. बस मेरे दो पेपर निकाल जाये डिग्री लेके निकल जाऊंगा. या फॅमेली को लेके आऊंगा."

बिचारा आमाले धीर देतहोता, कि आमच्या खांदयावर आपले, दुःख हलक करून रायला होता काही समजत नॊत. पण काही का असोना, आज आमच्यासाठी, तोच या तीन द्रौऊपदीले वाचविणारा पगडीवाला, दाढीवाला, मिश्यावाला कृष्ण होता.

"जाओ वो प्रवीणको भी समजादेना कुछ डरने कि जरुरत नही हे और तुमतिनो को आगे से किसीने डरया, तो मेरा नाम बोलना चलो जाओ अब."

आमी तिघई आनंदी चेहरे करत, बुट्टासरांचे आभार मानत आपल्या रूमवर सुखरूप आलो. घडलेली गोष्ट कोनलाई सांगायच नाई रे बा , असं तिघानई ठरवलं होत..

हलक्या, फुलक्या, गमतीदार , भीतीवाल्या अशा सगळ्या रॅगिंग आमी दिल्या होत्या.

आता तो दिवसपण आला, ज्याले रॅगिंगचा शेवटचा दिवस म्हणजे सगळे फ्रेशर्स अन सिनिअर्स याची पार्टी. नो मोअर रॅगिंग. आता सगळे मित्र होणार. सिनिअर्सने सगळ्याशी ओळखी केल्या .पण माई रॅगिंग अजून बाकी होती. इंट्राडक्शन झाल, "हॉबी काय रे?"

"सर सिंगिंग"

"अरे वा,चल म्हणून दाखव एखादा मस्त गाणे"

आज रॅगिंग मध्ये आधीसारखी भीती नोती, ऐक वेगळाच आनंदयून रायला होता.

म्या "तू मिले, दिलखिले और जिने को क्या चाहिये" हे क्रिमिनल या पिच्चरच गाणं म्हटलं. सगळ्याले लय आवडलं. अन काई नाई त आज सिनिअर्स पण टाळ्या वाजवल्या.

रॅगिंग, ही फक्त भीती निर्माण करण्याची प्रथानसून,तुमाले घराबाहेर राहून, बाहेरील दुनियेत कस बोल्ड व्हायच, याची एक शिकवण हाय. काही सिनिअर्स त्याचा दुरुपयोग करतात, पण ते ठीक नाही, असे काही सिनिअर्सने भाषणात आपल मत मांडलं. सिनिअर्स अन फ्रेशर्स, सॉरी, सॉरी आता सगळ्या मित्राची मस्त मजाकरत पार्टी झाली. जेवणाचा भरपूर आनंद घेतला. अन इथच, रॅगिंग नावाच आमच्या आयुष्यातील वादळ कायमच शांत झालं.

|| सूचना ||

मिंत्रानो ,बघा तुमची पिढी किती लकी हाय. रॅगिंग,सारखी जर शगेला पोचली तर किती जेवघेवी प्रथा आता सरकारने बंद केली हाय. तरी कधी, कोणी मर्यादयाचे उल्लंघन करीत, तुम्हाला त्रास देला तर हिमतीन त्याचा लढा द्या, नाही त लगेच वडीलधारी ,नाही त पोलिसाची मदत घ्या. जस अत्याचार करण गुन्हा, तसा तो चुपचाप सहन करणे हाही गुन्हाच हाय रे. लक्ष्यात ठेवा,डिप्रेशन बिप्रेषन काई नसत,संकट समयी जरी तुमी देवाची आठवण केली, तरी तो, कुठल्या ना कुठल्या रूपात तुमच्या मदतीले उभाच असतो.

।।भिऊ नको मित्रा मी तुझ्या पाठीशी आहे.।।
धन्यवाद

राहणीराहती जागाव्यक्तिचित्रणलेख