तू ठरव,आहे कसा मी,मी कसा नाही
हात घे हातात आधी,आरसा नाही!
टाळता आलाच तर,टाळू जरा तोटा
फायदा नात्यात आता फारसा नाही!
एवढा केला खुबीने खूनही माझा
वारही केला असा जो वारसा नाही!
सांगतो आहे जगाला कोण हा वेडा!
मी असा नाही असा नाही असा नाही!
कैफियत माझी जरा ऐकून तर घे ना
एवढीही या मनाला लालसा नाही!
तू ठरव...आहे कसा मी,मी कसा नाही...
—सत्यजित
प्रतिक्रिया
1 Jun 2020 - 5:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खास...!
-दिलीप बिरुटे
1 Jun 2020 - 5:17 pm | खिलजि
एक नंबर बहारदार , लाकडाउन स्पेशल कविता
==========================
काहीतरी द्यायचे ठरवले
देण्यासाठी हात खिशात गेले
मी रिता आधीच होतो
हे मजला नंतर समजले
1 Jun 2020 - 6:00 pm | मदनबाण
वा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jaane Do Na... :- Cheeni Kum
1 Jun 2020 - 7:46 pm | प्रमोद देर्देकर
मस्त आवडली
1 Jun 2020 - 11:12 pm | गणेशा
तू ठरव,आहे कसा मी,मी कसा नाही
हात घे हातात आधी,आरसा नाही!
अप्रतिम....
2 Jun 2020 - 1:39 am | वीणा३
मस्त!!!
2 Jun 2020 - 10:22 am | रातराणी
अप्रतिम!!
2 Jun 2020 - 11:10 am | मन्या ऽ
वाह वा!
2 Jun 2020 - 10:57 pm | श्रीगणेशा
"हात घे हातात आधी,आरसा नाही!"
भारीच एकदम!
5 Jun 2020 - 7:59 am | सत्यजित...
बिरुटे सर,खिलजी,मदणबाण,प्रमोदजी,गणेशा,वीणा,रातराणी,मन्या,श्रीगणेशा,सर्वांचे मनापासून आभार!
11 Jun 2020 - 10:15 pm | प्राची अश्विनी
वाह!
18 Jun 2020 - 12:28 pm | सत्यजित...
धन्यवाद!
22 Jan 2021 - 12:12 am | स्वलिखित
तुमचा फॅन सत्यजित भाऊ