मोगँबो - २

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
22 Mar 2020 - 2:46 pm

हा सारंग ना नेहमी असेच करतो. ढोलकीवाल्याला आणायला दुसर्‍या कोणाला पाठवलं असते तर निदान तो तरी मिळाला असत अगिटारवर.
हा कार्यक्रम होऊन जाऊदेत मग बघु या त्याला.
"अरे हे आपण दरवेळी ठरवतो आणि होतं काय! कार्यक्रम झाला की सारंगसाहेब अभिनंदन स्वीकारत बसतात. आणि आपण लोकांना दिसतही नाही. " मीनाच्या बोलण्यात तक्रारीपेक्षाही कौतूकाचाच सूर होता. तीच काय पण सारंग बद्दल कोणीही तसेच बोलायचा. होताच तसा तो.

मागील दुवा : http://misalpav.com/node/46242
मीना च्या बोलण्यात तथ्य आहे या अर्थाने सर्वांनीच माना डोलावल्या.
" मोगँबो आला रे…… " आता हा आवाज वर्गाच्या बाहेरून न येता दाराबाहेरुन आला. पक्याने एका उडीत दार गाठले. बाहेर उभ्या अव्याला त्याने जवळजवळ ढकलतच वर्गात आणले.
" काय रे काय चालवलंय हे. उगाच मोगँबो आला म्हणून घाबरवतोस. आम्हाला " पक्याने अविनाशची गचांडीच धरली आहे त्यामुळे त्याला बोलता येत नाहिय्ये.
" अरे सोड सोड त्याला. गुदमरेल तो अशाने" संध्याने मध्यस्थी केली म्हणून अविनाश पक्याच्या तावडीतून सुटला तरी. नाहीतर त्याची काही खैर नव्हती.
" अविनाश तू सिनीयर पण कधीकधी उगाच बारक्या पोरासारखा वागतोस"
" अरे मला सारंग दिसला टिळक ब्रीजवर . मला वाटले की प्रॅक्टीस सम्पली आणि इकडे कॉलेजवर आलो तर या वर्गातून आवाज येत होते. कोण आहे ते कळायचा काहीच मार्ग नव्हता. थोडी गम्मत होईल आणि नक्की कोण प्रॅक्टीस करतय तेही कळेल म्हणून."
" ती पण ना काय महान अस्थी आहेस रे." पक्या नॉर्मलला येतोय.
" अस्थी नाय रे हस्ती…. हस्ती. अस्थी म्हणजे मडक्यात ठेवतात आणि नंतर नदीत विसर्जन करतात ते. " ज्यूनियरला रहावले नाही.
" तेच ते … तेच म्हणत होतो मी" ज्युनियर ने आपली चूक पकडावी म्हणजे काय पक्याला नक्की काय बोलावे ते समजत नव्हते.
पण तुला सारंग कुठे दिसला? टिळक ब्रीजवर? आणि तिकडे काय करत होता? बघा आपण त्याची वाट पहातोय आणि हे महाराज फिरत बसलेत गावभर. येवू देत त्याला , बघतोच त्याच्याकडे" पक्याने सगळा राग सारंगच्या अजून न येण्यावर वळवला.
" त्याच्यासोबत कोण एक मुलगी पण होती. "
" कोण होती कोण होती "मुलगी पण होती ! या माहितीमुळे सगळ्यांचे उत्सूक आवाज मोठे झाले.
"कोण माहीत नाही पण आपल्या कॉलेजची नव्हती"
"कॉलेजची नव्हती ? मग कोण ? कशी दिसत होती ! जीन्स होती की ड्रेस मधे होती. " मीनाचा प्रश्न लगेचच आला
" कॉलेजची दिसत नव्हती. जरा विचित्रच दिसत होती."
म्हणजे?
" एकदम भडक्क लिपस्टीक होती. त्या तसल्या बायका लावतात तशी" अविनाशचे नाकाला बोट लावत स्पष्टीकरण.
"काय? अनबिलीव्हेबल. " अविनाशच्या त्या स्पष्टीकरणावर सगळे चमकलेच.
" तोंड आहे म्हणून काय वाट्टेल ते बोलतोस होय रे $#$##…. कानाखाली हाणीन &५$३$५ " गण्या आपल्या सोबत मुली आहेत याची पर्वा न करता अविनाशवर शेलक्या शब्दांचा वर्षाव करायला लागला".
" और नै तो क्या….. तू चल बाहेर बघतोच तुला. " यूसूफ ने अविनाशची कॉलर पकडली. वर्गाच्या दरवाजातून सारंग आला म्हणून पुन्हा एकदा अविनाशची सुटका झाली.
" ए काय चाललंय? कसली मारामारी करताय. " सारंगच्या प्रश्नामुळे घाबरलेला अविनाश जरातरी सावरला.
" सारंग हा तुझ्याबद्दल काय वाट्टील ते बरळतोय. भाड्याला कानफाडणारच होतो" गण्या अजूनही घुश्शातच.
" ते कानफाडणे वगैरे नंतर पाहुया. अगोदर बोल हा अव्या काय म्हणाला ते आणि तू इतका चिडलास कशाला"
" हा म्हणतोय त्याला टिळकब्रिजवर दिसलास म्हणून "
" मग त्यात चिडण्यासारखे काय आहे. होतो मी टिळक ब्रिजवर. आपल्या कॉलेजला यायचं तर टिळकब्रिज वरूनच यावे लागते ना."
"नाही तो अजून म्हणाला की तुझ्याबरोबर एक बाई होती म्हणून"
" हो होती. मग? तुला काय जेलसी झाली का? "
" नाही पण तो अजून म्हणाला की ….. की ती तसली बाई होती म्हणून...…" गण्याला तसली बाई होती हा शब्दही बोलायला अवघड जातय.
" तसली म्हणजे ?"
" ती तसली… फोरास रोडवर असतात बाया तसली…." गण्याने नाकावर तर्जनी आपटली." चपलीने सडकीन भाड्या तुला अव्या . खोटे सांगतोय रे सारंग हा तुझ्याबद्दल" गण्याचा राग काही शांत होत नाहिय्ये.
" हो ना कोणाबद्दल असले काही खोटेनाटे बोलतात का? " या भांडणात पडावे की नाही याचा विचार संध्या पडलाय पण सारंगबद्दल सारंगच काय पण ग्रुप मधल्या कोणाहीबद्दल असले घाणेरडे काही खोटेनाटे ऐकायची तीची तयारी नव्हती.
" खरे बोलला तो." सारंगच्या या उत्तरावर सगळेच चमकले. चमकले नुसते चमकलेच नाही तर त्याना जोरदार धक्का बसला. संजनाला काय बोलावे तेच कळत नव्हते. संध्याचीही तीच गत होती. पक्या चे तोंड सताड उघडे झाले.
" तो खरे बोलला…….?" आपल्या तोंडून हे शब्द कसे बाहेर पडले याचेच पक्याला आश्चर्य वाटले.
" हो. इतकेच नाही मी त्या मुलीला इथेही आणलंय. " सारंगच्या या वाक्यावर टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता पसरली.
" तुमची ओळख करून देतो. आशा आत ये…." सारंगने आवाज दिला.
वर्गाच्या दारातून एक त्यांच्याच वयाची असेल …. एक मुलगी आत आली. सावळीशी ,पण खारदाणा वाटावा इतकी भरपूर पावडर लावलेला चेहेरा. टाईट जीन्स वर तसलाच अर्धा टॉप. लालभडक लिपस्टीक. लांब मोकळेच असलेले केस. डोळ्यात भरपूर काजळ.
" मित्रानो ही आशा. माझी धाकटी बहीण…. आशा हे माझे मित्र" सारंगने सगळ्यांशी तीची ओळख करून दिली.
तीला पहाताच सगळ्यांचेच आ वासले गेले. जे घडतंय ते त्यांच्या कल्पनेबाहेरचेच.. मीनाचा चेहेरा तर एकदम पांढरा फटक्क पडला.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

30 Mar 2020 - 10:13 am | विजुभाऊ

हा भाग दिसत का नाहिय्ये?

प्रचेतस's picture

30 Mar 2020 - 3:06 pm | प्रचेतस

एकदमच वेगळं वळण लागलं ह्या भागाला. लवकर लिहा पुढचे भाग.

विजुभाऊ's picture

30 Mar 2020 - 3:43 pm | विजुभाऊ

पुढचे दोन भाग पोस्ट केले आहेत
मोगँबो ३ http://misalpav.com/node/46300
मोगँबो ४ http://misalpav.com/node/46304