क्लायमेट चेंज रियल आहे

पुणेरी कार्ट's picture
पुणेरी कार्ट in जे न देखे रवी...
26 Sep 2019 - 11:54 am

गेल्या काही दिवसांपासून व्हॅट्सऍप, फेसबुक आणि ट्विटरवर 'क्लायमेट चेंज इस रियल' च्या चर्चांना उधाण आले आहे. त्या निमित्ताने -  

CO2 सोडणाऱ्या पेट्रोल, डिझेलच्या गाड्या आम्ही सोडणार नाही,
घरातले आणि ऑफिस मधले AC आम्ही बंद करणार नाही,
पण क्लायमेट चेंज रियल आहे.

गर्दीचं कारण पुढे करून पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये उभे राहणार नाही,
घरातून आणि ऑफिसमधून बस स्टॉप पर्यंत थोडंसं चालत जाणार नाही,
पण क्लायमेट चेंज रियल आहे.

गाडी ही बाहेरच्या बाजूने खराब होणारच हे माहीत असूनही
दिवसाआड गाड्या स्वच्छ पाण्याने बाहेरून धुवून पाणी वाया घालवणे आम्ही सोडणार नाही,
पण क्लायमेट चेंज रियल आहे.

मल्टी नॅशनल कंपन्यांचे ऑनलाईन प्रोडक्ट प्लास्टिक मधून मागवणे आम्ही सोडणार नाही,
प्लास्टिक पिशव्या वापरू नका असं सांगितल्यावर "जे देत आहेत त्यांना सांगा की", "हे प्लास्टिक चालतं" असा वाद घालणं आम्ही सोडणार नाही,
पण क्लायमेट चेंज रियल आहे.

आमचा धर्म - त्यांचा धर्म करत प्रदूषण करणे आम्ही थांबवणार नाही,
फक्त आम्ही बरोबर आणि बाकी सगळे चूक असं छातीठोकपणे सांगायची सुवर्णसंधी आम्ही सोडणार नाही,
पण क्लायमेट चेंज रियल आहे.

बाकीचे सुद्धा करतात आधी त्यांना सांगा,
हे सगळं आम्हीच करायचं तर मग सरकार कशाला आहे? असं बोलून इतरांना दोष देणं सोडणार नाही,
पण क्लायमेट चेंज रियल आहे.

हे लिहिणारा महाभाग कोण, त्याला बोलायला काय जातंय, त्याने आजपर्यंत काय केलंय
असं ओरडून आम्ही जरा प्रयत्न करण्याचा विचारसुध्दा करणार नाही,
पण क्लायमेट चेंज रियल आहे.

फ्री स्टाइलमाझी कवितामुक्त कविताकवितामुक्तकसमाज

प्रतिक्रिया

आजी's picture

26 Sep 2019 - 5:21 pm | आजी

अगदी बरोबर बोललात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Sep 2019 - 8:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेखातले मुद्दे रियल आहेत.
तरीपण त्यातले काहीपण करायचे आम्ही सोडून देणार नाही.
कारण स्वतःला चटका बसेपर्यंत न बदलण्याची आमची सवयपण रियलच आहे. :(

जालिम लोशन's picture

26 Sep 2019 - 11:10 pm | जालिम लोशन

instead of carry bag