ओले केस

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
26 Sep 2019 - 5:18 am

केस ओले न्हालेते
आले प्रेमाचे भरते

(पावसात केस ओले
प्रेमाचे भरते आले) ( आपआपल्या मगदुराप्रमाणे केस ओले करावेत!)

शिडकावा ओल्या थेंबांचा
चिंब भिजवून देण्याचा

गोरी काया ओलेती
तुझे लावण्य दाखवती

गाली लाज आलेली
शृंगाराविना सजलेली

अशी सामोरी ललना
मन हरखले ना !

साडी लपेटून उभी
येते कवेत कधी?

- पाषाणभेद
२६/०९/२०१९

माझी कविताशांतरसकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

26 Sep 2019 - 9:56 am | खटपट्या

चांगलय

दुर्गविहारी's picture

26 Sep 2019 - 12:00 pm | दुर्गविहारी

चिंब भिजलेले, रूप सजलेले, बरसुनी आले, रंग प्रीतीचे

आठवले

गवि's picture

26 Sep 2019 - 12:30 pm | गवि

वाट पाहात बसा. ;-)

गामा पैलवान's picture

26 Sep 2019 - 1:28 pm | गामा पैलवान

पाभे,

सुंदर कविता आहे. मन हरखून गेलं.

पाऊस = सांबार
गौरकाय = इडली
गाली लाज = सांबारातल्या टॉमेटोचा लाल तुकडा
ओले केस = सांबारातल्या शेकटाच्या शेंगेवरच्या रेषा
शृंगाराविना सजलेली = फारसे मसाले न घालताही चविष्ट असलेली
लपेटलेली (हिरवी) साडी = इडलीवर पसरलेली तिखटजाळ (हिरवी) चटणी

तोंपासु! धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Sep 2019 - 1:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाभे लिहिते राहा.

०दिलीप बिरुटे

ते आता व्यस्त आहेत. कवेत येण्याची वाट पाहात.

पुढची कविता आता कोरडे झाल्यावर येईल.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Oct 2019 - 3:27 pm | अत्रुप्त आत्मा

@पुढची कविता आता कोरडे झाल्यावर http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif येईल.

पाभे कविता आवडलेली आहे पण खालील कंसाचा खुलासा अभिप्रेत हाय

( आपआपल्या मगदुराप्रमाणे केस ओले करावेत ! )

पाषाणभेद's picture

28 Sep 2019 - 12:12 am | पाषाणभेद

कविता आवडल्याबद्दल धन्यवाद. सा-यांनाच.

>>> केस ओले न्हालेते
>>> आले प्रेमाचे भरते

>>> (पावसात केस ओले
>>> प्रेमाचे भरते आले) ( आपआपल्या मगदुराप्रमाणे केस ओले >>> करावेत!)

कंसातले दुसरे कडवे हे पहिल्या कडव्याला पर्याय आहे.
ज्याला जे आवडेल ते कडवे निवडावे.

काय आहे की पार्श्वभुमी निराळी आहे. आधीच माझ्या कविता हलक्या असतात. त्यात पहिले कडवे न्हाऊन ओले झाल्यामुळे केसांचे आहे. त्यामुळे कुणाला नाही आवडणार.

म्हणून मी दुस-या कडव्याचा पर्याय ठेवला.

त्यामुळे पावसामुळेही कुणी केस ओले करू शकतो.

आवड ज्याची त्याची.

तुमची आवड काय मग?

खिलजि's picture

1 Oct 2019 - 6:48 pm | खिलजि

आवड व्यनि करतो .. इथे नको

गणेशा's picture

9 Oct 2019 - 1:54 pm | गणेशा

मस्त