ती म्हणाली " चिमणी " , मी म्हणालो भुर्रर्रर्र

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
17 Jun 2019 - 3:58 pm

ती म्हणाली " चिमणी "

मी म्हणालो भुर्रर्रर्र

ती म्हणाली " कावळा "

पुन्हा उत्तरलो भुर्रर्रर्र

आलतूफालतू उत्तरं देऊन

आमचं प्रेम झालं सूर्रर्रर्रर्र

लक्षात ठेवून होतो चांगलंच

गुढघ्यात असते अक्कल

डोकं बाजूला ठेऊन काम होतंय

थोडीच पाहिजे शक्कल

कशाला करावा अभ्यास ?

कशाला हवी ती नोकरी ?

कुणी सांगितलंय घासायला

पटवावी श्रीमंत बापाची छोकरी

सासरा बिचारा राबेल

कन्या भोळीच असेल

होऊन जायचं घरजावई

आपोआप झोळी भरेल

{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

अविश्वसनीयविनोदजीवनमान

प्रतिक्रिया

जोन's picture

17 Jun 2019 - 7:28 pm | जोन

तो म्हणाला हाड हाड !!!!

दुर्गविहारी's picture

17 Jun 2019 - 7:54 pm | दुर्गविहारी

हायला !!! या चिउ,काउची गोष्ट आहे होय. :-)

होय बरोब्बर ओळखलंत दुविसाहेब . मुली फारच हळव्या असतात . त्यांना खरे प्रेम काळतच नाही बहुतेकवेळा . काही उनाड पोरे , या गोष्टीचा व्यवस्थितपणे फायदा उचलतात आणि आयुष्यात सेटल होतात , तेही काही न करता . बिच्चारा बाप , हतबल होतो , त्यांच्या लाडावलेल्या मुलींसमोर आणि देतो त्यांना त्यांच्या गळ्यात बांधून ..
लहानपणीचा खेळ आठवतोय का तुम्हाला .. एकाने " चिमणी " बोलायचं आणि इतरांनी आपापली बोटे वर करून " भुर्रर्रर्र " बोलायचं . पक्ष्यांची नाव बोलता बोलता , मध्येच काहीतरी अचल वस्तूचं नाव घ्यायचं , उदा . डोंगर ,चमेली . आणि जो बोट वर करतो तो आऊट . हे असे खेळ मोठे झाल्यावर आचरट वाटतात पण लहानपणी एकदम निरागस . तसेच काहीसे मुलींचे आहे . मुली मोठ्या झाल्या तरीही निरागस असतात . त्यांना खरे खोटे प्रेमातले काहीच कळत नाही आणि मग पुढे जाऊन फसवणूक होते ...

जॉनविक्क's picture

18 Jun 2019 - 5:02 pm | जॉनविक्क

जॉनविक्क साहेब , विश्लेषण आवडले गेल्याबद्दल धन्यवाद ...