मराठी दिवस २०२०

विचार मन्थन

Primary tabs

sunil bhat's picture
sunil bhat in जनातलं, मनातलं
26 Apr 2019 - 10:41 pm

भारताची सध्याची आव्हाने : रोजगार निर्मिती आणि उत्पादकता

सर्वसमावेशक रोजगार निर्मिती, राष्ट्रवाद :सगळ्यांची एक ओळख, आणि उत्पादकता सुधारणे हि भारत सरकार साठी तीन मोठी आव्हाने आहेत
सर्व उपलब्ध संसाधनांपैकी कमीत कमी खर्च मध्ये उत्पादकता सुधारली जाऊ शकते हे जपान ने गेल्या शतकात सर्व जगाला दाखऊन दिले। जपानने गेल्या शतकात वेगवान उद्योगिकरणं सुरु केले तेंव्हा मर्यादित संसाधने वापरून गुणवत्ता व्यवस्थापनाची पद्धती लागू करून भांडवल योग्य प्रकारे वापरून खूप यश सांपदले ।
त्याची कारखान्याची रचना एकाद्या घरा प्रमाणे केली ज्याप्रकारे आपण आपले घर राखतो त्या प्रमाणे तेथील लोक कारखान्या मध्ये काम करतात। त्यामुळे त्यांचे उत्पादन वाढून देशाची व लोकांची प्रगती झाली।
भारताने पण आपले स्वतःचे असे व्यवस्थापन विकसित करून लोकाभिमुख उत्पादन वाढवले पाहिजे। प्रत्येक श्रमाची मोजणी करून त्याप्रमाणे रोजगार आखले तर हे सहज शक्य आहे।

भारताच्या उर्जावांन लोकशाहीला समर्थ नेतृत्वाची व क्रयशक्ती ला गवसणी घालेल अश्या तंत्राची नितांत आवश्यकता आहे।
काही विचारवंत म्हणतात की सशक्त राष्ट्राची निर्मिती हि अनेकदा राष्ट्रीय ओळख मजबूत करून केली गेली आहे। क्रांती नंतर जपान, कोरिया, रशिया, फ्रान्स व सिंगापूर ने अशी प्रगती केली आहे। म्हणूनच भारतात तशी प्रेरणा घेऊन एक मजबूत राष्ट निर्माण करण्याची गरज आहे। आणि जर असे झाले तर आपण सर्व जगात एक बलाढ्य राष्ट म्हणून ओळखले जाऊ शकतो।

धोरणमांडणीप्रकटनविचार