मिसळपाव सुरू झाले बाबूजी, पुलं, कुसुमाग्रज आणि भारतिय अभिजात संगीताच्या क्षेत्रातले महापुरूष आदरणिय पं. भीमसेन जोशी यांच्या आशिर्वादाने. आत्ताच टीव्हीवर आलेल्या बातमीनुसार, पं. भीमसेन जोशी यांना भारत रत्न हा भारत सरकार तर्फे देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार जाहिर झाला आहे.
मिसळपावचे मालक श्री. तात्या अभ्यंकर यांच्याशी आत्ताच झालेल्या बोलण्याप्रमाणे, मिपावर परत एकदा दिवाळी साजरी करण्यात येईल.
व्यक्तिशः माझ्या तर्फे पंडितजींना शतशः नमन. आज खरंच 'भारतरत्न' पदवीला किंमत आली आहे असे वाटते.
प्रतिक्रिया
4 Nov 2008 - 11:05 pm | लिखाळ
वा खरंच आनंददायक बातमी आहे...
पं. भीमसेनांचे अभिनंदन आणि त्यांना अभिवादन.
पुण्याच्या कीर्तीमध्ये अजून भर पडली म्हणून अजून आनंद झाला :)
--लिखाळ.
4 Nov 2008 - 11:08 pm | शाल्मली
वा खरंच आनंददायक बातमी आहे...
पं. भीमसेनांचे अभिनंदन आणि त्यांना अभिवादन.
माझ्याकडून सुध्दा :)
--शाल्मली.
4 Nov 2008 - 11:16 pm | सर्वसाक्षी
बातमी ऐकताच सर्वप्रथम तात्याला हाळी दिली. तात्या उचलत नव्हता - बहुधा फटाक्याची माळ लावायला गेला असावा. पंडितजी हे आमच्या तात्याचे एक श्रद्धास्थान!
4 Nov 2008 - 11:20 pm | बेसनलाडू
पंडितजींचे अभिनंदन आणि त्यांना भारतरत्न मिळाल्याने अपार आनंद झालेल्या माझ्यासारख्यांचेही!
(आनंदित)बेसनलाडू
4 Nov 2008 - 11:32 pm | आजानुकर्ण
अतिशय छान बातमी.
आपला
(अमेरिकारत्न) आजानुकर्ण
5 Nov 2008 - 9:07 am | ऋषिकेश
पंडितजींचे अभिनंदन आणि त्यांना भारतरत्न मिळाल्याने अपार आनंद झालेल्या माझ्यासारख्यांचेही!
-(अत्यानंदीत) ऋषिकेश
5 Nov 2008 - 12:34 pm | राघव
म्हणतो!
(अत्यानंदीत) मुमुक्षु
4 Nov 2008 - 11:21 pm | रेवती
श्री. भिमसेन जोशींचे अभिनंदन!
तात्यांना भयंकर आनंद होणार तर!
रेवती
4 Nov 2008 - 11:29 pm | भाग्यश्री
वा.. पंडीतजींचे अभिनंदन..
खरच आज भारतरत्नाला किंमत आली!
4 Nov 2008 - 11:31 pm | साती
पंडितजींना भारतरत्न मिळाल्याचा आनंद तर आहेच आहे पण तात्यांना किती आनंद आणि अभिमान वाटेल हा विचार करून आणखीनच आनंद झाला.
साती
4 Nov 2008 - 11:31 pm | विकास
आज खरंच 'भारतरत्न' पदवीला किंमत आली आहे असे वाटते.
असेच बातमीचा मथळा वाचताना वाटले...
4 Nov 2008 - 11:31 pm | चकली
खुप आनंद झाला.
चकली
http://chakali.blogspot.com
4 Nov 2008 - 11:35 pm | चतुरंग
त्या सावळ्यालाही आनंदाचे भरते आले असेल तिथे तुमची आमची अवस्था तर वेड्यासारखी होणारच!
पंडितजींचे त्रिवार अभिनंदन! अभिजात संगिताचाच हा सत्कार आहे असे मी मानतो!!
(इतकी परमानंदाची बातमी पोचवल्याबद्दल बिपिनदा आणि आण्णांचे मानसशिष्य तात्या ह्यांचेही अभिनंदन)
चतुरंग
4 Nov 2008 - 11:40 pm | मुक्तसुनीत
उत्तम बातमी ! अतिशय आनंदाची !
चतुरंग यांचे पोस्ट अतिशय अर्थपूर्ण !
5 Nov 2008 - 12:11 am | स्वाती दिनेश
पंडितजींचे त्रिवार अभिनंदन! अभिजात संगिताचाच हा सत्कार आहे असे मी मानतो!!
चतुरंग यांच्यासारखेच म्हणते.
स्वाती
5 Nov 2008 - 12:15 am | छोटा डॉन
धत्ताड धत्तड धत्तड !!! धत्ताड धत्तड धत्तड !!!
धत्ताड धत्तड धत्तड !!! धत्ताड धत्तड धत्तड !!!
वाजवा रे ढोल ताशे वाजवा, गुलाल उधळा ...
आज भारतरत्न पुरस्काराचाच सन्मान झाला आहे ...
अगदी अगदी, अगदी असेच म्हणतो ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
4 Nov 2008 - 11:35 pm | प्रमोद देव
पंडीत भीमसेनांना हा किताब मिळाल्यामुळे त्या किताबाचाच सन्मान झालाय!
4 Nov 2008 - 11:41 pm | कुंदन
अतिशय आनंदाची बातमी !
पं. भीमसेनांचे अभिनंदन आणि त्यांना अभिवादन.
5 Nov 2008 - 10:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पंडीत भीमसेनांना हा किताब मिळाल्यामुळे त्या किताबाचाच सन्मान झालाय!
अशाच भावना !
4 Nov 2008 - 11:36 pm | यशोधरा
आज खरंच 'भारतरत्न' पदवीला किंमत आली आहे असे वाटते.
अगदी, अगदी!! खुशीची बातमी एकदम!!
4 Nov 2008 - 11:50 pm | धोंडोपंत
सोनियाचा दिवस आजि अमृते पाहिला
अण्णांचे हार्दिक अभिनंदन. भावना व्यक्त करायला शब्द नाहीत. क्षमा असावी.
आपला,
(भारावलेला) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
4 Nov 2008 - 11:55 pm | धोंडोपंत
अण्णांविषयी काहीबाही बोलणार्यांना, तुकाराम महाराजांच्या शब्दात आणि अण्णांच्या सुरात सांगावेसे वाटते:-
तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे
अवघियांचे काळे केले तोंड
आपला,
(भीमसेनी) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
4 Nov 2008 - 11:56 pm | विसोबा खेचर
आमच्या अण्णांना भारतरत्न मिळावं यापरिस दुसरी आनंदाची गोष्ट ती कोणती? :)
त्यांचा मला भरपूर सहवास लाभला, खाजगी तसंच जाहीर मैफलीतलं त्यांचं अगदी भरपूर गाणं ऐकायला मिळालं, गाण्याविषयी चार मोलाच्या गोष्टी त्यांच्या पायाशी बसून शिकता आल्या हे माझं भाग्य!
चला, आता लौकरच पुण्याला जायला हवं, आणि जातांना त्यांना आवडणारी साजूक तुपातली जिलेबी न्यायला हवी! :)
आपला,
(अण्णांचा भक्त) तात्या.
5 Nov 2008 - 12:01 am | चतुरंग
आणि आम्हा समस्त 'मिपाकरांच्या' सद्भावना आण्णांपर्यंत पोचवा!
त्यांना आयुरारोग्य लाभो हीच कानडा विठ्ठलूचरणी प्रार्थना!
चतुरंग
5 Nov 2008 - 12:05 am | बिपिन कार्यकर्ते
तात्या, मगाशी तुला म्हणलं तसं,
तू पेश्शल पुण्याला जा, समस्त मिपापरिवारातर्फे त्यांना साष्टांग दंडवत घाल.
बिपिन कार्यकर्ते
5 Nov 2008 - 12:05 am | वाटाड्या...
अण्णांच्या तब्येतीबाबत चिंतातुर इकडे ऐकायला येतयं....
अशात अण्णांसाठी फक्त एकच..
उठ (संगीत)पंढरीच्या राया...वाढ वेळ झाला...
थवा (संगीत)वैष्णवांचा दारी आला...
अण्णांना त्रिवार वंदन...अण्णांच्याच आवाजातला 'जो भजे....' ची प्रचिती आली. भारतरत्नाची किंमत वाढली....अण्णांना अभिनंदन...
आपल्या सगळ्यांच आभार व अभिनंदन..
मुकुल
5 Nov 2008 - 12:07 am | प्राजु
खूप चांगली बातमी. खर्या रत्नाला आज भारत रत्न मिळालं आहे. भारत रत्न हे नाव खरंच सार्थ झालं आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Nov 2008 - 9:56 am | मिंटी
प्राजुशी एकदम सहमत......
खरच आज पंडितजींना भारतरत्न पुरस्कार देऊन भारतरत्न हे नाव सार्थ केलं सरकारनी..... :)
5 Nov 2008 - 12:13 am | कपिल काळे
हा तर भारत रत्न ह्या किताबाचा सन्मान.
ह्या वेळी सवाईपर्यन्त पुण्याला परतायचा विचार होता. तो आता दृढ झाला आहे. ह्या वर्षी सवाइत चंगळ असणार.
http://kalekapil.blogspot.com/
5 Nov 2008 - 12:15 am | विसोबा खेचर
ही बातमी ऐकायला आज आमच्या वत्सलावहिनी हयात असायला हव्या होत्या..!
तात्या.
5 Nov 2008 - 12:30 am | अमित.कुलकर्णी
अतिशय आनंदाची बातमी!
भीमसेनजींचे अभिनंदन आणि त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो ही प्रर्थना.
अमित
5 Nov 2008 - 2:04 am | घाटावरचे भट
संगीताच्या सूर्याला आमचे त्रिवार अभिवादन!!!! हा स्वरभास्कर आपल्या असीम तेजाने अखिल जगत प्रकाशमान करत राहो हीच जगन्नियंत्याकडे प्रार्थना!!!
-भटोबा
5 Nov 2008 - 2:34 am | सुक्या
अतिशय आनंदाची बातमी!
सकाळी नेहेमीप्रमाणे कार्यालयात आल्या आल्या मिपा उघड्ले अन् लगेच ही गोड बातमी पाहीली. लगेचच काही मराठी पेपर च्या संकेतस्थळावर जाउन बघु लागलो तर काही दिसले नाही. आता दोन तासांनी सकाळ वर बातमी पाहीली. मिपा म्हणजे आमचे न्युज चॅनेल झाले आहे. धन्यवाद.
पंडितजींचे अभिनंदन !!
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
5 Nov 2008 - 4:26 am | भास्कर केन्डे
मिळणार की नाही, मिळणार की नाही अशा वावड्या उठत. न मिळाल्याचे पाहून वाईट वाटे. पण आजच्या दिवशी ते सगळे विसरलो... धुंद झालो.
खरेच आज तो किताब पावन झाला. खरोखरीच्या भारत रत्नाला प्राप्त झाल्याबद्दल.
आपण आज पेढे वाटणार (आणि खाणार पण)!
आपला,
(भारावलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.
5 Nov 2008 - 7:37 am | डॉ.प्रसाद दाढे
अतिशय आन॑दाची बातमी! सकाळी रेडिओवर ऐकल्यावर मन जणू थुई थुई नाचायलाच लागले.. घरातल्याच व्यक्तीचा अत्युच्च सन्मान झाल्यासारखे वाटले.. मी मनात म्हटल॑च, मिपावर पुन्हा एकदा दिवाळी साजरी होणार!
सरकारने आमच्या मनासारखा निर्णय उशिरा का होईना घेतल्याबद्दल त्या॑चेही आभार.
मराठी पाऊल पडते पुढे..
5 Nov 2008 - 7:46 am | अनिल हटेला
खर्या रत्नाला आज भारत रत्न मिळालं आहे!!
चलो !! मिपा वर पून्हा एकदा दिवाळी साजरी करुयात !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
5 Nov 2008 - 9:04 am | अमोल केळकर
स्वरभास्करांना मानाचा मुजरा !
योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची अशीच चांगली बुध्दी विधाता भारत सरकारला देवो ही त्याच्या चरणी प्रार्थना
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
5 Nov 2008 - 9:20 am | रामदास
सरकारी किताब फार उशीरा येतात. यावेळी हा उशीर झाला नाही म्हणून आनंद झाला.
पंडीतजींना आरोग्य आणि दिर्घायुष्याच्या शुभेच्छां. अभिनंदन आणि अभिवादन.
5 Nov 2008 - 9:25 am | पक्या
आनंदाची बातमी!
स्वरभास्करांना दंडवत आणि त्यांचे हार्दिक अभिनंदन !!!
5 Nov 2008 - 9:38 am | झकासराव
धंदड त्तत्तड, धंदड त्तत्तड,
धंदड त्तत्तड, धंदड त्तत्तड,...........
(आनंदाने नाचणारी स्मायली)
अत्यंत आनंदाची बातमी. :)
आज सकाळी चहा पित पित पेपर पाहिला आणि आणि मन नाचु लागल.
काहि महिन्यांपुर्वीच भारतरत्न ह्या पदवीसाठी असलेल राजकारण क्षणभर आठवल आणि आताच समाधान कैक पटीने वाढल.
खरच योग्य निर्णय थोडा उशीरा का असेना.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
5 Nov 2008 - 10:05 am | विजय आचरेकर
पं. भीमसेनांचे अभिनंद
5 Nov 2008 - 10:28 am | वेताळ
आज हा अभिजात संगिताचा सत्कार झाला आहे. पंडीतजीना व तात्याना परत एकदा हार्दिक शुभेच्छा.
वेताळ
5 Nov 2008 - 3:28 pm | विसोबा खेचर
पंडीतजीना व तात्याना परत एकदा हार्दिक शुभेच्छा.
अरे मला कशाला रे शुभेच्छा? :)
मला त्यांचा चांगला सहवास लाभला, चांगलं गाणं कशाला म्हणावं याबाबतचे त्यांचे विचार खूप जवळून ऐकायला मिळाले इतकंच..
एरवी अण्णांचे लाखो चाहते आहेत त्यापैकीच मीही एक. त्यांना हा पुरस्कार देऊन सरकारने आपल्या सर्वांचाच सन्मान केला आहे! :)
तात्या.
5 Nov 2008 - 10:42 am | विसुनाना
अत्यंत खडतर तपश्चर्येतून पुढे आलेला स्वयंसिद्ध गायक.
खर्या अर्थाने गुरु-शिष्य परंपरेचा पाईक.
त्यांचे गायन ऐकताना आणि पाहताना 'गायकाला स्वर दिसतात' म्हणजे काय? त्याची भौतिक आणि अधिभौतिक प्रचिती येते.
अशा या महान गायकाला भारताचा सर्वोच्च सन्मान मिळावा हेच अपेक्षित होते.
बातमी काल रात्रीच ऐकली. खूप आनंद झाला.
या भारतरत्नाला दीर्घायु आणि अरोग्य लाभो ही सदिच्छा.
5 Nov 2008 - 12:22 pm | नंदन
सहमत आहे. अतिशय आनंदाची बातमी!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
5 Nov 2008 - 11:08 am | मनस्वी
खूपच छान वाटलं बातमी ऐकून.
देर आए पर दुरुस्त आए|
5 Nov 2008 - 11:47 am | अभिजीत
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना आदराचे अभिवादन.
- अभिजीत
5 Nov 2008 - 12:52 pm | केशवराव
आमच्या भिमाण्णांना 'भारत रत्न' मिळाले; काल रात्री ११-३० पासुन एस्.एम.एस. यायला लागले. मी तर अण्णांच्या सि.डी. ऐकत बसलो आहे.[ सध्या बागेश्री चालू आहे.]
मन थूई थूई नाचत आहे.
अण्णांचा पागल - - - - - - केशवराव.
5 Nov 2008 - 1:26 pm | सुमीत भातखंडे
खूपच छान बातमी.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी याना मनापासून शुभेच्छा.
5 Nov 2008 - 2:51 pm | अनिरुध्द
'भारतरत्न' मिळाल्याबद्दल पंडितजींचे त्रिवार अभिनंदन!
5 Nov 2008 - 10:22 pm | कलंत्री
ही बातमी वाचतांना दुहेरी आनंद झाला. एकतर आयुष्यभर तपसाधना करणार्या व्यक्तिला हा सर्वोच्च बहुमान मिळाला आणि दुसरे या वार्तेमुळे बर्याच मिपाकरांना आनंद होणार हे माहित असल्यामुळे.
शुभवार्ता कालच समजली होती.
6 Nov 2008 - 10:07 am | शरुबाबा
वा खरंच आनंददायक बातमी आहे...
पं. भीमसेनांचे अभिनंदन आणि त्यांना अभिवादन.