प्रसंगः एक नविन मराठी माणसाला मिपाबद्दल सांगताना
पुलंनी ज्यांच्यापुढे करं जोडावेत अशी महाराष्ट्रातील तीन गावं सांगितली. त्यानंतर असेच कर जोडण्यासारखे एक गाव म्हणजे मिपा. येथे (---^---) असे काहितरी कर जोडावे लागतात. तशी इतरही अनेक संस्थळ आहेत पण पुलंच्या भाषेतच सांगायचे तर ज्यांच्यपुढे करं जोडावे असे फक्त मिपाच त्याची सर इतरांना नाही. इथल्या माणसांची नावेदेखील गावचा, साहित्याचा बाज असणारि अर्थात काही अपवाद म्हणून ढोले पाटिल पॅरडाइस् सारखी इंग्रजाळलेली ब्रिटिश टिंग्या सारखी नावं पण आहेत. (पण खर सांग असली नावं पण मजेशीर वाटतात ना?)
तर तुम्हाला या गावचं सदस्य व्हायचयं का? कसं व्हायचं विचारताय, मेल्या भो**च्या बाजुला नवीन खाते बनवा दिसतं नाही काय? काय म्हणता मराठी लिहता येत नाही! मगं इथ कशाला झक मारयला आलास. हे काय तुला मुंबै वाटलं काय बै. तसे इथे प्रवेश मिळण्यासाठि खास काही त्रास नाहि हातोहात प्रवेश मिळतो. त्यामुळे अवैध मार्गाने बांग्लादेशातुन येणार्यांची संख्या लक्षणिय नाही. (अनेक पासपोर्ट असणारे काही जण आहेत इथे पण थोडे काहीजण परकायाप्रवेशातदेखील माहिर आहेत). इथे फार कडक असे शुध्दलेखनाचे कायदेही नाहित, पोलिस आणि प्रशासकही नाहीत. नाही म्हणायला एक ईंदिराजी आहेत पण त्यांचा वावर पाकिस्तानप्रमाणे वारंवार नसतो. काय इचारतोस मगं खर्डफळा आणि मिपा व्यवस्थीत चालतं कसं? अरे राजा थोडेफार अधिकार असलेली काही मंडळी आहेत येथे. (परत प्रशासकाचं नाव काढलस् किंवा असले फालतु प्रश्न विचारलेस तर भा* फाट्यावर मारीन... X( )
असो ... तर आत्तापर्यंत तुझ्या शब्दभांडारात काही असामान्य शब्दांची भर पडलिच असेल पण लक्षात घे हे शब्द असामान्य नसुन मिपावर दैनंदिन वापराले जातात (प्रेमाने). तेव्हा त्यांचा वापर शिकुन घे. काय म्हणलास तु मिपाकर झालास! साल्या अजुन तुझं हाग्रितलं शिक्श्यान नाय झालं अन् पदविधर झालास म्हनतोस. बरं बरं मी तुला प्राथमीक शिक्श्यान देतो. अन् पुढचं! अरं माझ पण व्हायचय अजुन. बरेच प्रा. अन् मास्तर हायतं इथं. साल्या बरेच प्रश्न विचारतोस थांब तुला प्रभुदेवाच्या समुपदेशनाच्या क्लासलाचं धाडतो( ~X( . काय म्हनतो हा काय प्रकार आहे? अरं
"तुझं शिक्ष्यान किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा डोस्कं किती? तू बोलतोयस किती?"
झेपलं नाय ना...! (क्रिप्टिक हाय हे :SS ) म्हनुन म्हनलं हे शिकुन घे. कधितरी वादविवादाच्या वेळेला उपयोगी पडंल. कसं वापरायचं ? अर हाय काय त्यात वाक्यातला दुसरा शब्द बदलायचा फक्त. कळलं कि नाय. समजेल हलुहलु. ह्यात पदवी घ्यायचि म्हणतोस अर मगं प्रभुदेवांनाच विचार की. पर कुठ्ल्याहि प्रकारच्या अर्वाचिन अथवा पदव्युत्तर शिक्ष्यान मात्र सर्कीट मास्तरांकडुनच घे. अरं ते कुंबलेसारखीच सारखीसारखी क्रिप्टिक गोलंदाजी करतात. चल आता वेळ झाली निघतो मी पुढची ओलख. क्रमशः (हा पण इथे एक कंपू आहे ). अरं थांब इथं कुठ इनो मिळतं का? च्यायला इतक्यात क्रिप्टिकपण टाकायला लागलासं :O
(क्रमशः) आवडलं तर
प्रतिक्रिया
1 Nov 2008 - 2:48 pm | जैनाचं कार्ट (not verified)
मस्त !
जबरा रे !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ
1 Nov 2008 - 2:50 pm | टारझन
अल्ले चेतन दादा ... केवढंस्स आहे रे तुझं ,................... लेखन !!
उद्या शब्दापरिस क्रमशः टाकून 'क्यो की...." च्या ९८,७४,५२,२१,७३,५९,३७,३२४ भागांच रेकॉर्ड कोणी तोडलं नाही तर नवलंच ...
कंपुबाज
--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
बघता काय सामिल व्हा
1 Nov 2008 - 4:32 pm | चेतन
काय करणार माझ्या अवाक्याप्रमाणे लिहलं तुझा आवाका खुपचं मोठा दिसतोयं
(क्रिप्टिक) चेतन
आवांतरः कंपुगिरीचा उल्लेख केल्याने राग आलेला दिसतोयं (दंत विमा आधिच काढुन ठेवलेला बरा)
1 Nov 2008 - 2:51 pm | टारझन
च्यायला आजकाल प्रतिसाद डबल यायचं प्रमाण वाढलंय .. काही तांत्रिक अडचण असावी ... तात्या / निलकांत काळजी घेणे हेहेहे
1 Nov 2008 - 5:45 pm | मीनल
अजून वाचायच आहे .
यात मिपाचा अभ्यास केलेला दिसतो आहे.
अजून इतकच चांगल लिहायच असेल तर अजून अभ्यास हवा.
मीनल.
1 Nov 2008 - 5:58 pm | विनायक प्रभू
मारतो आणि ह. घ्या. करतो काय? थांब तुला बघतो बरोबर. असा क्रिप्टीक टाकीन की पार डोक्याचा बुदबुदा झाला पाहिजे.
1 Nov 2008 - 6:54 pm | चेतन
गुरुजी म्हणुनच हलकेच घ्या म्हणलो होतो.
अवांतर : हल्ली कॉपीपेस्टचं काम राहिलयं म्हणुन डोक्याला बुदबुद नाही आहे.
अतिअवांतरः आम्ही डोकं फार कमी चालवतो (क्रिप्टिक आहे हे)
1 Nov 2008 - 7:11 pm | ब्रिटिश टिंग्या
पहिला भाग आवडला! आमचा नामोल्लेख झाल्याने जास्तच आवडला ;)
असो, पुलेशु!
आपला,
(ढोले पाटिल पॅरडाइस्) ब्रिटिश टिंग्या
1 Nov 2008 - 8:39 pm | प्राजु
टारझन म्हणतो त्याप्रमाणे भाग मोठे लिहा.. वाचायला बरं वाटेल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Nov 2008 - 8:44 pm | यशोधरा
:)
2 Nov 2008 - 7:30 am | अरुण मनोहर
मिपावर आवडलेली काही नावे- कसे लोकांना इतके चांगले सुचते कोण जाणे! आपल्याला ख-या नावाशिवाय काही सुचतच नाही!
गलगले निघाले (गलबलून येते. निघतांना त्यांना जे हवे ते द्यारे!)
बेसनलाडू (लहानपणी दोन खिशांत दोन लाडू, दोन हातात दोन घेऊन तोंडामधे एक असायचा!)
३_१३ जागी अदिती (खूप वेळ झोपू शकणा-यांचा हेवा वाटतो)
खवीस कुटूंब (खाई त्याला खवखवे)
सर्कीट (द लॉन्ग ऍन्ड शॉर्ट ऑफ इट)
उपाशीमाऊ - खाडादबोका (कार्यकारण भाव?)
2 Nov 2008 - 8:53 am | विसोबा खेचर
सुरवात बरी आहे, अजून थोडे मोठे भाग लिहा...
वैयक्तिक शेरेबाजी गंमतीपुरतीच मर्यादित ठेवा, मस्करीची कुस्करी होता कामा नये... :)
तात्या.
3 Nov 2008 - 12:34 pm | धमाल मुलगा
सुरुवात तर लै भारी झालीये...
चेतनभौ,
आता पुढं आतीशबाजी पहायची प्रचंड उत्सुकता लागुन राहिलीये :)
येऊ दे लवकर!
आणी हो, तात्यांचा सल्ला मात्र ध्यानी राहु दे, उगाच नसता गदारोळ नको, काय?
4 Nov 2008 - 10:36 am | चेतन
धन्यवाद प्रतिसाद दिलेल्याचें आणी न दिलेल्यांचे (हे ही कुठून तरी ढाप्ल्यासारखे वाटते)
आणी हो, तात्यांचा सल्ला मात्र ध्यानी राहु दे, उगाच नसता गदारोळ नको, काय?
ध्वनीप्रदुषणाच्या कायद्यप्रमाणे ११० डेसिबलपेक्षा कमी आवाजाचे फटाके उडवायचा प्रयत्न पुढच्या भागात केलाय. (जेणेकरुन कोणाचीही झोप उडणार नाही झोप आली तर त्यात माझा दोष नाही)
(नवशिका) चेतन