मागच्या महिन्यात रात्री झोपेत असताना एक काॅल आला
मी: हॅलो
क्ष: अरे फोटूवाले १७ तारखेला आपल्याला जालनाला जायचंय.
मी: ओके
चार्जिंग नसल्यानं फोन बंद पडला लगेच. :(
काय झालं काय माहित पण काॅल हिस्ट्रीतून नंबरही गायब झाला.
ताबडतोबीची नोंद म्हणून मी कॅलेंडर वर नावाऐवजी जालना लिहीलं.कालपर्यंत मला रिकन्फर्मचा काॅल आलाच नाही.
आज पहाटे साडेचार वाजता काॅल आला.आवरलं का विचारायला!
मी म्हटलं २० मिनीटं आहेत अजून, कुठे येऊ?
अजूनही माहित नव्हतं की कोण बोलत आहे.नंबर अननोन.
पटापट आवरुन ठरल्या जागी पोहचलो.गाडी आली, गाडीत बसलो आता अर्ध्या तासानंतर मी त्याला विचारलं काय काम आहे?
तो माझ्याकडे असा काही आश्चर्यचकित होऊन बघत होता की बस्!!!
मी म्हटलं काय झालं?
तो : इतका कसा कुल बे तू?
अरे सीएम साहेब येत आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं लाईव्ह आहे आपल्याकडे..
मी त्याला अजून एक झटका दिला..
शांतपणे त्याच्याकडे पाहिलं अन् म्हणालो "मग काय त्यात करुन घेऊ की..."
:)
प्रतिक्रिया
17 Sep 2018 - 3:51 pm | अमरेंद्र बाहुबली
मस्तच.
17 Sep 2018 - 5:17 pm | महासंग्राम
४.३० ला पण नाव नाही विचारलंत अवघडे भो
18 Sep 2018 - 6:30 am | फुटूवाला
नाव विचारलो असतो तर त्याला वाटलं असतं की याने गांभीऱ्याने घेतलच नाही.
18 Sep 2018 - 6:15 am | उगा काहितरीच
ब्याचलर ???
(बायकु असं नाय जाउ देणार ;-) :-D )
18 Sep 2018 - 6:32 am | फुटूवाला
बाहेरील कामाबद्दल सखोल विचारणारी नाही हे माझं नशीब..
18 Sep 2018 - 6:15 am | उगा काहितरीच
ब्याचलर ???
(बायकु असं नाय जाउ देणार ;-) :-D )
18 Sep 2018 - 10:32 am | सतिश गावडे
बऱ्याच वर्षांनी विप्र स्टाईलचा क्रिप्टिक लेख आला.
18 Sep 2018 - 7:35 pm | फुटूवाला
तुमचा प्रतिसाद डोक्यावरून गेलाय..... बऱ्याच वर्षांपूर्वीच्या विप्र स्टाईलच्या क्रिप्टिक लेख लिंकवाल तर समजून जाईल असे वाटत आहे.. विनंती
18 Sep 2018 - 2:16 pm | चांदणे संदीप
खत्तर्नाक लिहिलंय!
Sandy
18 Sep 2018 - 7:40 pm | फुटूवाला
असं म्हणाले तर सगळ्यांना सवय असते की कुठ,? काय कार्यक्रम आहे? किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत? पण मी एकही प्रश्न ना विचारता कार्यक्रम स्थळाजवळ जाऊन विचारतोय हे त्याला आश्चर्यकारक वाटलं... त्याने बोलूनही दाखवलं की परत तुला बोलवायला आवडेल..
नाहीतर होते असे कि वेळ सांगतात काही अन त्या वेळेत कार्यक्रम संपला नाही तर कुरकुर चालू होते..
18 Sep 2018 - 7:47 pm | टर्मीनेटर
खरं सांगू तर पहिल्यांदा वाचल्यावर काहीच टोटल लागली नाही. खालचे प्रतिसाद वाचून पुन्हा एकदा वाचला, लिखाणातल्या वेगळेपणामुळे आवडला.
18 Sep 2018 - 11:37 pm | फुटूवाला
मिपावर वाचनमात्र आहे.. सहजच लिहला.. यानंतर काळजी घेईन...
19 Sep 2018 - 8:07 am | तुषार काळभोर
मिपावर वाचनमात्र न राहण्याची काळजी घ्या आणि लिहीत राहा.
तुमचे अनुभव अनोखे असणार, याबद्दल खात्री आहे.
19 Sep 2018 - 9:28 am | ज्योति अळवणी
वा! मस्त लिहिला आहे. पण ज्यांना planning पूर्वक काम करायला आवडतं त्यांना नाही पचणार हे....
19 Sep 2018 - 11:18 am | फुटूवाला
पण ९०% कार्यक्रमांचे नियोजन हुकते वेळेवर. कधीच वेळेत पार पडत नाही.
22 Sep 2018 - 10:39 am | सुबोध खरे
अशा ठिकाणी डोके शांत ठेवणे हाच एक उपाय आहे. कारण बऱ्याच गोष्टी तुमच्या हातात राहत नाहीत आणि भारतात लोकांना सांगितलेली वेळ न पाळणे यात आपण काही गैर करतो आहे असे वाटतच नाही. अशा ढिल्या लोकांकडून गुपचूप दोन पैसे जास्त घेणे हाच एक मानसिक शांतीसाठी उत्तम उपाय आहे.
एक आगाऊ सूचना करतो आहे. उद्धट वाटले तर खुशाल केराची टोपली दाखवा.
जर एखाद्याचे लग्न किंवा असा मोठा समारंभ असेल तर तुमच्याकडे असलेला एखादा चांगला फोटो मोठा करून त्यांना त्याच्या एक वर्षाच्या वाढदिवशी भेट म्हणून द्या. माणसं आयुष्यभर लक्षात ठेवतात. ५० माणसं हा फोटो दिला आणि त्यातील एकाने जरी परत काम दिले तरी आपले पैसे वसूल होतात.
23 Sep 2018 - 12:19 am | फुटूवाला
धन्यवाद प्रतिसादाबद्दल..
डोक शांत ठेवतो म्हणूनच तर तो मला कूल बोलून गेला,
केराची टोपली तयारच असते पण एक व्यवसाय निवडलेला असल्याने दाखवताना पुन्हा एकदा विचार करावा लागतो..
फोटो फ्रेम बद्दल जे बोललात ते खरच मला आवडलं.
वैयक्तीक ते मी करतोच सोबतच चहाचा कप, मुलाचा टिफीन चा डब्बा, आणि एक टेबल कॅलेंडर(ज्यांना जे बरं दिसेल) अशा गिफ्ट मी देतोच ☺️
23 Sep 2018 - 12:32 am | फुटूवाला
20 Sep 2018 - 9:43 pm | उपयोजक
झ... का...स