'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात ज्या आप्पांचा (माझ्या सासर्यांचा) उल्लेख आहे त्यांनी गेल्या महिन्यात ASCOP साठी एक लेख लिहिला होता. 'आधुनिक दृष्टिकोनातून रामायण'. तो मी इथे पोस्ट करीत आहे. पण त्या आधी थोडी प्रस्तावना.
आप्पा आता सत्त्याण्णव वर्षांचे झाले आहेत पण तोच उत्साह आणि स्पष्ट विचारशक्ती तशीच कायम आहे.
माझ्यासारख्या साधारण वाचकांनी वाचलेल्या व ऐकलेल्या रामायणात बर्याच उपकथा आहेत. मात्र मूळ संस्कृत रामायणात काय लिहिलेलं आहे हे आपल्या पैकी फारच थोड्या जणांना माहीत असेल. माझ्या सासूबाई (आई) संस्कृत पंडिता. सासरे (आप्पा) यांचं संस्कृत अतिशय उत्तम. दोघांनी मिळून मूळ संस्कृतमधलं वाल्मीकि रामायण वाचलं. हे मूळ रामायण आहे की नाही याबाबत संस्कृत विद्वानांमध्ये वाद नाही त्या अर्थी तेच मूळ असं मी समजते. (आपल्यासारख्या ज्यांना संस्कृत अजिबात वाचता येत नाही त्यांच्यासाठी देखील ते उपलब्ध आहे. त्याचं मूळ संस्कृत काव्य व वाक्य बाय वाक्य मराठीत अनुवाद 'विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, पुणे' यांनी प्रकाशित केला आहे.)
वाचकांच्या प्रतिक्रिया मी आप्पांपर्यंत पोहोचवीनच आणि त्यांचं स्पष्टीकरण तुमच्यापर्यंत.
आधुनिक दृष्टिकोनातून रामायण
आधुनिक दृष्टिकोनातून रामायणाचा विचार करायचा म्हणजे शास्त्रीय दृष्टीनं. धार्मिक अगर श्रद्धाळू दृष्टीनं विचार करतांना कोणत्याही व्यक्तीच्या विशिष्ट कृतीवर अगर एखाद्या घटनेवर “असं का?” असा प्रश्न विचारता येत नाही किंवा त्याची योग्यायोग्यता ठरवता येत नाही. फक्त शास्त्रीय दृष्टिकोनांत हे स्वातंत्र्य आपल्याला मिळू शकतं.
रामायणाबद्दल पहिला प्रश्न हा आहे की हा इतिहास आहे की वाल्मीकि ऋषींच्या अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेली कथा आहे? अर्थात हा इतिहास असो अथवा कल्पित कथा असो, त्यामध्ये त्या काळच्या राजे लोकांचं, तसंच सामान्य लोकांचं जीवन वास्तववादी पद्धतीनं रंगवलेलं आहे. त्या काळच्या समाजपद्धती, धार्मिक प्रथा, रूढी अशा सर्व गोष्टींवर उत्तम प्रकाश टाकलेला आहे. असं सर्व असूनही वाल्मिकींनी ती अत्यंत रंजक केलेली आहे.
साहित्यिक कृति म्हणूनही तिच्याकडे पाहिलं तरी सर्व जगातल्या विद्वानांनी तिला वाखाणलं आहे. त्या कथेत मनुष्यस्वभावाचे विविध कंगोरे पहायला मिळतात. प्रेम, द्वेष, राग, लोभ, तिरस्कार अशा विविध अगदी टोकाच्या भावना बघायला मिळतात.
शास्त्रीय दृष्टीनं बघायचं तर अयोध्येपासून लंकेपर्यंतच्या भूगोलाचं आणि त्यांत राहणार्या वेगवेगळ्या समाजांचं सविस्तर चित्र लेखकानं कसं रंगवलं याचं आश्चर्य वाटतं. कारण त्याकाळी सर्वत्र वन पसरलेलं, रस्ते नाहीत, दळणवळणाची कोणतीही साधने नाहीत, एकट्यादुकट्यानं प्रवास करणं अत्यंत धोक्याचं, अशा सर्व अडचणींवर मात करून राम, सुग्रीव व त्याचे वानरसैन्य यांच्या मदतीनं समुद्रावर सेतू बांधून लंकेत जाऊन रावणाचा वध करून सीतेला सोडवतो हे सर्व चित्र विलक्षण आहे यात शंका नाही.
रामायणाची कथा सर्वांनाच उत्तम माहीत आहे. त्यामुळे त्याबद्दल बोलण्याची गरज नाही. पण त्यातल्या विविध घटना आणि विविध व्यक्तिमत्वं ही मात्र अभ्यासण्यासारखी आहेत.
पहिली कथा त्रटिकेची : विश्वामित्र ऋषी रामलक्ष्मणाला घेऊन वनातून जात असतांना पहिली गाठ त्राटिकेशी पडते. त्राटिका ही राक्षसीण अत्यंत सामर्थ्यवान आणि भयंकर जुलमी. तिनं वनावर पूर्ण ताबा मिळविलेला. तिला तोंड द्यायची कोणाचीही छाती नव्हती. पण राम धनुर्विद्येत अत्यंत पारंगत आणि बलवान म्हणून तिला ठार मारू शकत होता. तरीसुद्धा वीर पुरुषांनी स्त्रीला ठार मारायचं नाही हा दंडक. अशा वेळेला विश्वामित्र ऋषी रामाला सांगतात की ही स्त्री असली तरी समाजाची अत्यंत घातक शत्रू आहे. तिचा नाश करण्यात पाप नाही. याचा अर्थ असा की “कोणतेही तत्व पालन करतांना ते समाजाच्या कल्याणाच्या आड येत असेल तर त्याचा वेगळा विचार करावयाचा” असं ऋषी सांगतात. तत्वाचे अवडंबर माजविणार्या लोकांना हे उत्तम उत्तर आहे असं म्हणावंसं वाटतं.
श्रावणाची कथा: श्रावण हा ब्राम्हण नव्हता. व तो अंध आई वडिलांना कावडीत घालून काशीला जायला निघाला नव्हता. हा ऋषी होता व तो एका तळ्याच्या काठी आपल्या अंध आईवडिलांना घेऊन रहात असे. तो तपश्चर्या करीत असे. याचे वडील वैश्य व आई शूद्र होती. असे आंतरजातीय विवाह समाजाला मान्य होते असे दिसते. कारण अशा आंतराजातीय विवाहातून जन्मलेल्या मुलाला म्हणजे श्रावणाला तपश्चर्या करण्याचा अधिकार मिळालेला होता. आज मात्र अशा विवाहितांना कित्येक वेळेला समाजाच्या बहिष्काराला (उघड अगर गुप्त) अगर क्वचितप्रसंगी मृत्यूला सुद्धा तोंड द्यावं लागतं. तेव्हा सुधारलेले कोण? तेव्हांचे की आजचे - असा प्रश्न पडतो.
सर्वसाधारणपणे समाजात गाजलेली कथा अहिल्येची. (तिला सती अहिल्या असंही कधीकधी संबोधलं जातं.) या अहिल्येला “अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्यान् स्मरेन् नित्यम्” म्हणजे आदरणीय व पवित्र स्त्रियांच्या यादीत तिला बसवण्यात आलेलं आहे. तिची खरी कथा काय आहे?
अहिल्या ही एक असाधारण सुंदर तरूण स्त्री. तिचे पती गौतम ऋषी हे एकदा नदीतीरी स्नानाला गेलेले असतांना इंद्र गौतम ऋषींचं रूप घेऊन अहिल्येकडे येतो व मला तुझ्याशी संग करण्याची इच्छा आहे असं सांगतो. हा गौतम ऋषी नसून इंद्र आहे हे अहिल्येच्या लक्षात येतं पण तरीही देवराजाशी रत होण्याचा मोह तिला पडतो आणि ती त्याला संमती देते. समागम झाल्यानंतर “मी कृतार्थ झाले” असं समाधान व्यक्त करते म्हणजे हे आपण काही पापकर्म करतो आहोत असं तिला वाटत नाही. इतकंच नाही तर हे गौतम ऋषींना समजू नये म्हणून इंद्राला “तू आता इथून जा” असे सांगते. पण तिच्या व त्याच्या दुर्दैवाने इंद्र पळून जाण्याच्या आतच गौतम ऋषी परत येतात. काय घडलं हे त्यांच्या लक्षांत येतं, व ते त्या दोघांनाही शाप देतात. अहिल्येला ते “याच आश्रमांत तू वायू भक्षण करून अदृष्य व निराहार अशी राहशील, राम वनात येईल त्यावेळी तुझा उद्धार होईल” असा शाप देतात आणि हिमालयात तपश्चर्येकरता निघून जातात. मात्र सर्वसाधारण समजूत आहे त्याप्रमाणे “तू शिळा होशील” असा शाप तिला देत नाहीत.
वास्तविक अहिल्येने व्यभिचाराचं पाप केलं होतं आणि ते आपल्या पतीपासून दडवण्याचाही प्रयत्न केला होता. असं असूनही गौतम ऋषींनी तिला मर्यादित काळापर्यंतचीच शिक्षा दिली आणि नंतर तिचे समाजात पुनर्वसन व्हावे अशी व्यवस्था केली. तिला आयुष्यातून उठवलं नाही. आजचा समाज अशा स्त्रीकडे अशा उदार दृष्टीने पाहील का?
दुसरी गोष्ट. अहिल्यामध्ये असा कुठला गुण होता की ज्याकरता तिला “पंचकन्यान् स्मरेन् नित्यम्” या यादीत बसवावी?
रामायणातील एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे सुग्रीव. सुग्रीव हा वानरांचा राजा. त्याची त्याच्या वानरसेनेवर अत्यंत जरब होती असं दिसतं. सीतेच्या शोधाकरिता वानरांचे वेगवेगळे गट करून त्यानं चारही दिशांना पाठवले होते. त्यात हनुमान, जांबुवंत वगैरेंचा गट दक्षिण दिशेला पाठवला होता. त्या गटानं सारी दक्षिण दिशा पालथी घातली तरी त्यांना सीतेचा शोध लागला नव्हता. शेवटी निराश होऊन दक्षिण किनार्यावर ते बसले असतांना त्यांच्यात बोलणं निघालं की सीतेचा शोध न लावता आपण परत गेलो तर सुग्रीव आपणां सर्वांना ठार मारील. तेव्हा परत जाण्याऐवजी आपण इकडेच जीव देऊ. हनुमान, जांबुवंत यांच्यासारख्यांची ही स्थिती. यावरून सुग्रीवाची सर्व सैन्यावर किती जरब होती हे दिसून येते.
अर्थात त्या गटाच्या सुदैवाने तिथे जटायूचा भाऊ संपाती त्यांना भेटला. त्यानं त्यांचं आपसातलं बोलणं ऐकलं आणि त्यानंच रावणानं सीतेला पळवून लंकेत नेऊन ठेवल्याची माहिती त्यांना दिली. ती महिती मिळाल्यामुळे हनुमान लंकेत गेला व सीतेला प्रत्यक्ष भेटून तिची माहिती घेऊन आला. पण या गटाला जर संपाती भेटला नसता तर ते परत सुग्रीवाकडे जायला भीत होते हे उघड आहे.
असा हा सुग्रीव. त्याची बायको तारा वालीनं पळविली होती त्यामुळे त्याची व रामाची समस्या एकच होती. रामाची व सुग्रीवाची भेट होण्याला कारण एक कबंध ठरला. राम लक्ष्मण अरण्यातून प्रवास करीत असतांना कबंध त्या दोघांवर धावून गेला म्हणून रामानं बाण मारून त्याला ठार केलं. त्याला जाळून टाकतांना त्यातून एक सुंदर पुरुष बाहेर पडला व त्यानं रामाला “सुग्रीवाची व तुझी समस्या एकच आहे म्हणून तू सुग्रीवाला भेट” असा सल्ला दिला. मग रामाची सुग्रीवाशी भेट झाली तेव्हां रामानं वालीला मारण्याचं वचन सुग्रीवाला दिलं आणि सुग्रीवानं सीतेला शोधून काढण्याचं. वाली हा प्रचंड शक्तिमान असल्याचं सुग्रीवानं रामाला सांगितलं तेव्हा रामानं एका प्रचंड राक्षसाचं शरीर वनात पडलेलं होतं ते आपल्या पायाच्या अंगठ्यानं उचलून कित्येक योजनं दूर फेकून देऊन सुग्रीवाची आपल्या सामर्थ्याविषयी खात्री करून दिली होती.
त्या दोघांमध्ये ठरल्याप्रमाणे, सुग्रीवानं वालीला आव्हान देऊन द्वंद्वयुद्धाला बोलावलं. त्यांचं युद्ध चालू असतांना रामानं झाडाआड उभं राहून वालीला बाण मारला व तो खाली पडला. तो मरणासन्न असतांना त्यानं रामाला विचारलं “तू स्वतःला न्यायी राजा समजतोस. मी सुग्रीवाशी युद्धात गुंतलेला असताना तू झाडाआडून मला बाण मारलास हा न्याय झाला का? आणि मी तुझा काय अपराध केला होता म्हणून तू मला मारावंस?”
त्यावर उत्तर म्हणून “तू सुग्रीवाची बायको पळविलीस म्हणून मी तुला शिक्षा केली. सुग्रीवानं मला मदत मागितली म्हणून मी तुला मारलं. शिवाय मी माणूस आहे व तू वानर म्हणजे पशू आहेस. माणसाला पशूंची शिकार करण्याचा हक्क आहे. त्यामुळे मी तुला मारण्यात अन्याय केला असं होत नाही.” हे त्याचं उत्तर न्यायाच्या निकषावर टिकणारं नाही आणि हा रामाच्या चारित्र्यावर एक डाग आहे असेच म्हणायला पाहिजे.
रामानं वालीला मारल्यामुळे सुग्रीवाला आपली बायको परत मिळाली. त्याचं काम झालं. त्यानं आता रामाला मदत करावयाची. पण आता पावसाळा सुरू होत आहे त्यामुळे रावणाविरुद्धची मोहीम आता आपल्याला सुरू करता येणार नाही असं सांगून सुग्रीव रामाच्या संमतीनं आपल्या राजधानी - किष्किंधेला परत गेला. तिकडे तो आपल्या बायकांच्यात इतका रमला की पावसाळा संपला तरी रामाकडे जाण्याचं तो पूर्ण विसरून गेला. शेवटी रामानं लक्ष्मणाला त्याला बोलावण्याकरता त्याचेकडे पाठवलं. त्यावेळचा प्रसंग लक्ष्मण, सुग्रीव व सुग्रीवची पत्नी तारा या तिघांच्या स्वभावावर उत्तम प्रकाश टाकणारा आहे. लक्ष्मण स्वभावानं अत्यंत संतापी. पूर्वी दशरथानं रामाला चौदा वर्षे वनवासात पाठवायचं ठरवलेलं त्याच्या कानावर गेलं तेव्हा तो दशरथाला ठार करायला निघाला होता. रामानं त्याला वाटेत अडवून शांत केलं होतं. आता सुग्रीवच्या वर्तनाचा त्याला राग आला होता. तो सुग्रीवाला बोलवायला गेला त्यावेळी सुग्रीव आपल्या बायकांच्यात पूर्ण रमून गेला होता. लक्ष्मण आला आहे ते कळताच तो खूप घाबरला. आपण रामाला दिलेलं वचन मोडल्याची त्याला आठवण झाली. लक्ष्मण संतापी आहे, आता तो आपलं काय करील कोणास ठाऊक! अशी भीती वाटून तो स्वतः बाहेर न येता त्यानं आपल्या पत्नीला - ताराला “ बाहेर पाठवलं. तारानं बाहेर येऊन लक्ष्मणाला शांत करण्याचा प्रयत्न केला. तिनं त्याला मुत्सद्दी सल्ला दिला. “अरे लक्ष्मणा, माणसंसुद्धा दिलेलं वचन विसरतात. सुग्रीव हा तर वानर आहे. तो विसरला तर त्यात आश्चर्य काय? पण तो आता जागा झाला आहे. तो तुमचं काम करील. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव. सुग्रीवाजवळ असंख्य वानरांची फौज आहे. त्याच्या मदतीशिवाय तुम्हाला सीतेला शोधून काढता येणार नाही. त्यामुळे तू त्याच्याशी सबूरीनं बोल. त्याला एकदम टाकून किंवा रागावून बोलू नकोस.” लक्ष्मणाला शांत केल्यानंतर सुग्रीव व लक्ष्मण रामाकडे गेले.
त्यानंतर सुग्रीव आपल्या वानरांना चारी दिशांना पाठवतो त्यावेळी तो विविध बेटांचं वर्णन करतो व तिथे काय काळजी घ्यावयाची याच्या सुचना आपल्या वानरांना देतो. त्यानं वानरांना पाठवलं त्यात जावा, सुमात्रा, जंबुद्वीप या आजच्या नावांचा उल्लेख येतो. त्यावेळी राम त्याला विचारतो, "या आर्यावर्ताच्या बाहेरच्या बेटांची इतकी सविस्तर माहिती तुला कशी?" त्या वेळी सुग्रीव रामाला सांगतो की ज्यावेळी वालीचं आणि त्याचं भांडण झालं आणि वाली त्याच्या मागे लागला त्यावेळी तो या बेटांवरून त्या बेटावर पळत होता त्यावेळी त्याला या बेटांची व प्रदेशाची माहिती झाली. आपल्याला आज आश्चर्य वाटतं की ही जर कल्पित कथा असेल तर वाल्मीकि ऋषींना या सर्व भागाची इतकी सविस्तर माहिती कशी?
त्यानंतर हनुमान सीतेला शोधून काढतो. त्यानंतरच राम वानरांचं सैन्य घेऊन रावणाच्या लंकेवर हल्ला करायचे ठरवतो आणि त्याप्रमाणे सर्व वानरसेना भारताच्या दक्षिण दिशेला प्रवासाला निघते त्या वेळी रामानं या प्रवासात सर्व सैन्याची कशी काळजी घ्यायची, रात्रीच्या वेळी कांही वानरांना पहार्याच्या कामावर ठेवावयाचे, रावणाचे हेर आजूबाजूला फिरतील त्यांच्यापासून सावध राहाणं इत्यादी अत्यंत वास्तववादी सूचना व अर्वाचीन इतिहासात सैन्य इकडून तिकडे जात असताना काय काय करावं लगलं असेल याची वास्तववादी जाणीव करून देणारा आहे.
सेना समुद्रापर्यंत आली. आता समुद्र कसा पार करावयाचा हा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी आपल्यामध्ये नल नावाचा वानर आहे व तो सेतू बांधण्यातला तज्ञ आहे असे वानरांनी रामाला सुचवले. त्याप्रमाणे सर्व वानरांनी झाडं, शिळा, दगड इत्यादी साधनं गोळा करून नलाला आणून दिली व त्यानं त्यांच्या सहाय्यानं सेतू बांधला. आता हे सर्व प्रत्यक्षात कसं घडलं असेल? भारत व लंका हे दोन जमिनीचे प्रदेश एकमेकाच्या खूपच जवळ, त्यांचे मध्ये जरी समुद्र दिसत असला तरी या दोन जमिनींना पाण्याखालून जोडणारा जमिनीचा उथळ भाग असणार ह्याची शक्यता खूपच आहे. त्याचा नलाला सेतू बांधताना उपयोग झाला त्यामुळे पाण्यात दगड तरंगले वगैरे आख्यायिकात काही अर्थ नाही. विशेष म्हणजे खुद्द वाल्मीकि रामायणांत दगड पाण्यावर तरल्याचा उल्लेख कुठेही नाही.
हल्ली हल्ली काही लोकांनी या समुद्रात मधे उभं राहून फोटो काढून ते प्रसिद्ध केले आहेत. मात्र व्हॉट्सअॅपवर काहीही होऊ शकतं. त्याबद्दल न बोलणं बरं.
राम रावणाचं युद्ध संपतं. रामाच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मण अशोकवनातून सीतेला घेऊन येतो. त्यानंतर राम सीतेला म्हणतो, "मी रावणाला शिक्षा केली. त्याच्या कैदेतून तुला सोडवलं. पण तू परपुरुषाकडे राहिलेली असल्यामुळे तुझ्या पावित्र्याबद्दल खात्री देता येत नाही. तेव्हा तू हवं तिकडे जाऊ शकतेस." हे शब्द कानावर पडताच सीतेला काय वाटलं असेल? तिच्या कोणत्या अपराधाकरता तिला ही शिक्षा मिळावी? राम रावणाला मारील, आपल्याला त्याच्या कैदेतून सोडवील आणि आपण रामाबरोबर आनंदानं अयोध्येला जाऊ अशा कल्पनेत असलेल्या सीतेवर हे शब्द अगदी वज्रासारखे कोसळले असतील. तिनं अग्निप्रवेश करायचं ठरवलं पण अग्निनं स्वतःच रामाला ग्वाही दिली की "सीता पवित्र आहे. तू तिचा स्वीकार कर."
पुराणकाली स्त्रियांना फार मानानं वागवलं जात असे असा काही लोकांचा दावा आहे. ते अजिबात खरं नाही. सीतेसारखीला ही वागणूक, मग सामान्य स्त्रियांचं काय? अग्नीच्या आश्वासनामुळे सीतेचा स्वीकार झाला व ती बहुमानानं अयोध्येला गेली खरी. पण पुन्हा अयोध्येच्या नागरिकांत कुजबूज सुरू झाली. रामानं एका धोब्याचं बोलणं ऐकलं. धोबी म्हणाला, "माझ्या बायकोच्या चरित्र्याबद्दल मला शंका आली म्हणून मी तिला घराबाहेर काढली. सीता तर इतके महिने रावणाच्या कैदेत राहिलेली. रामानं तिचा परत कसा स्वीकार केला?" हे ऐकून राम पुन्हा अस्वस्थ झाला. शेवटी त्यानं लक्ष्मणाला सांगितलं, "हिला वनांत सोडून ये. मला जास्त काही विचारू नकोस." लक्ष्मणानं त्याप्रमाणे सीतेला वनात नेऊन सोडलं. सीतेला जाताना कल्पनाही दिली नव्हती. त्यामुळे तिला लक्ष्मणानं वनात सोडल्यावर तिचा धीरच सुटला. तिनं लक्ष्मणाला विचारलं, "या भयंकर अरण्यात मी एकटी कुठे जाऊ?" लक्ष्मणाकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. त्यानं तिला सोडतांना इतकीच काळजी घेतली होती की तिला त्यानं वाल्मीकि ऋषींच्या आश्रमाच्या अगदी जवळ सोडलं, हेतू हा की आश्रमात जे कोणी असतील ते तिला आत घेऊन जातील आणि ती सुरक्षित राहील.
आणि तसंच झालं. वाल्मीकींचा एक शिष्य बाहेर आला असतांना त्यानं तिला पाहिलं आणि तो तिला आश्रमांत घेऊन गेला. त्यावेळी सीतेला दिवस गेलेले होते याचाही रामानं विचार केला नाही. थोड्याच दिवसांत लव आणि कुश तिच्या पोटी जन्माला आले.
आश्रमात सीतेचे पुत्र लहानाचे मोठे झाले. वाल्मीकींनी त्यांना सर्व तर्हेचं शिक्षण दिलं. त्याच काळात त्यांचं रामायण काव्य लिहून पुरं झालं होतं. ते त्यांनी त्या मुलांच्याकडून पाठ करून घेतलं व उच्च स्वरांत (आपल्याकडे पोवाडे गातात तसे) म्हणायला शिकवलं. मग त्यांना ते गाण्याकरिता अयोध्येला पाठवलं. हेतु हा होता की राम स्वतः ते केव्हातरी ऐकेल. त्याप्रमाणे रामानं एक दिवस ते ऐकलं. ‘ती मुलं कोण?’ असं विचारलं. पण वाल्मीकि ऋषींनीं पढवल्याप्रमाने आपण रामाचीच मुलं आहोत हे त्यांनी रामाला सांगितलं नाही. रामानं त्यांना ते काव्य राजदरबारात म्हणायला सांगितलं. सगळ्या दरबारानी ते ऐकलं. तेच जगप्रसिद्ध 'रामायण'.
आप्पा गोडबोले
प्रतिक्रिया
25 Mar 2018 - 11:11 pm | माहितगार
या उपरोक्त हिंदी वाक्याच्या इतर निसटत्या बाजू आपण नंतरच्या प्रतिसादातून पाहू, ......इस प्रकार मौर्य साम्राज्य को नष्ट करने वाले पुष्यमित्र शुंग को राम का किरदार बनाया गया ....... या हिंदी वाक्याचा सर्वसाधारण मतितार्थ राम आधी पासून होता, पुष्यमित्र शुंगाने रामाचा किरदार म्हणजे रोल / भूमिका (पुन्हा) वठवली असा काहीसा हा आक्षेप आहे, आक्षेपाच्या बाकी भागाकडे आपण नंतर येऊ या हिंदी वाक्याचा सर्वसाधारण मतितार्थ राम आधी पासून होता असा होत असावा. (हिंदी वाक्याचा मराठी अर्थ लावण्यात मी चुकत असल्यास हिंदीभाषा जाणकारांनी मला दुरुस्त करावे.)
आता प.ग. त्यांच्या मराठी वाक्यात काय म्हणतात ते पाहू "............ म्हणजे रामायण, यात राम हे पात्र पुष्यमित्रवरून प्रेरित आहे." यात पुष्यमित्र आधी आहे आणि त्याच्यावरुन रामाचे पात्र नंतर प्रेरीत झाले आहे. राम हे पात्र पुष्यमित्राच्या आधीतरी झाले असेल अथवा नंतर तरी (किंवा सोबत तरी पण इथे प.ग. ंचे मराठी वाक्य आणि हिंदी संदर्भ आधी किंवा नंतरचा पर्याय देताहेत सोबतचा पर्याय देताना दिसत नाहीत) तेव्हा आधी आणि नंतर या दोन्ही शक्यता एकदम शक्य नसाव्यात. एकतर सदहूर हिंदी वाक्याचा अर्थ प.ग. साहेबांनी सरळ सरळ उलटा लावला (त्यांना कबुल करावयाचे नसले तरी हि शक्यता टाळता येते का या बाबत मी साशंक आहे) किंवा उसणवारी केलेल्या कांद्याच्या फसव्या चित्राची अजून एखादी बास्केट त्यांना गवसली असावी.
उसणवारी केलेल्या कांद्याच्या फसव्या चित्राची अजून एखादी बास्केट त्यांना गवसली असेल तरी त्यांनी स्वतःच दिलेला हिंदी संदर्भ राम पुष्यमित्राच्या आधीचा असल्याचे संकेत देतो . म्हणजे स्वतःचे वाक्य खोडण्यासाठी स्वतःच संदर्भ प.ग, साहेबांनी दिला असल्यास आपण त्याम्नी केलेल्या self goal साठी आभारच मानले पाहिजेत . त्यांनी स्वतःच्याच संदर्भाने स्वतःस खोडले असे म्हणता येते का ?
त्यांना इतर काही म्हणावयाचे असल्यास आपण त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहूया.
25 Mar 2018 - 11:19 pm | पैसा
=))
26 Mar 2018 - 3:34 pm | पगला गजोधर
.
"खेळीमेळीने चर्चा " अशाप्रकारचे शब्द वरील प्रतिसादात वाचून, आता एकदम सेल्फगोल वैगरे शब्द वाचून अंमळ धक्का बसला.
गोल वैगरे शब्द युद्ध जरी दर्शवित नसले तरी, स्पर्धात्मकता दर्शवित आहेत काय ?
खेळ = स्पर्धा , असे जर असेल तर माहितीगार साहेब मी आपणाला आताच विजयी घोषित करतो, कारण हि स्पर्धा तशी एकतर्फी होणार (इन योर फेवर अफकोर्स),
कारण आपला माहितीचा ज्ञानसागर एका बाजूला , आमचे बापुडे गबाळे शब्दचाळे दुसऱ्या,
शिवाय माझ्या विरुद्ध किरकिर करणारे अनेक महामाया +अवदसा+ मुंजे (तुम्ही त्यांना आमंत्रण न देन्याची शक्यता गृहीत धरून) आहेतच ते गोल पोस्ट सारखा सरकावण्यात मदत करतीलच) असो त्यामुळे अजिबात तुल्यबळ नसलेला , असा हा सामना , आपणच जिंकला आहात.
मला वाटत होतं, या मिपा समुद्रकिनाऱ्यावर वाळूत आपण काही अक्षरे रेघोट्या उमटवू, व माहितीचा-सागर त्याच्याकडून भरतीवेळीच्या लाटेने, ती अक्षरे मिटवेल, आपण परत पुन्हा नवीन काही शब्द लिहू परत समुद्र ते मिटवेल , असा स्वच्छंदी खेळ मी समजलो होतो... असो.
==============================
सांकृत्यायन ने यह बताने का प्रयास किया है कि भगवान राम कोई और नहीं बल्कि मौर्य साम्राज्य के सेनापति पुष्यमित्र थे जिन्होंने मौर्य वंश के आखिरी सम्राट बृहदत्त मौर्य को मारकर खुद को राजा घोषित कर दिया था. माना जाता है कि पुष्यमित्र ने ही साकेत को सबसे पहले राजधानी का दर्जा दिया था.
(सेकंडपार्टी रेफेरेंस: Page 116, Complete Indian History for IAS Exam:Highly Recommended for IAS, PCS and ...
By Praveen Kumar अयोध्या इन्स्क्रिप्शन - धनादेव द्वारा पुष्यमित्राने दोन अश्वमेध केले इत्यादि ... The Ayodhya Inscription of Dhandeva mentions that he performed two Ashwamedha Yagyas (Horse Sacrifices).)
दूसरे व्यक्ति हैं महापंडित राहुल सांकृत्यायन जिन्होंने अपनी किताब ‘वोल्गा से गंगा’ के ‘प्रभा’ नामक अध्याय में स्पष्ट संकेत दिया है कि भगवान राम असल में कौन थे. सांकृत्यायन लिखते हैं कि (पुष्यमित्र से पहले) साकेत (अयोध्या) कभी किसी राजा की प्रधान राजधानी नहीं बना. उन्होंने लिखा है, ‘पुष्यमित्र या उसके शासन काल में रामायण लिखते हुए वाल्मीकि ने (साकेत की जगह) अयोध्या नाम का प्रचार किया. कोई ताज्जुब नहीं कि वाल्मीकि शुंग वंश (पुष्यमित्र का वंश) के आश्रित कवि रहे हों जैसे कालिदास चंद्रगुप्त विक्रमादित्य के.’ सांकृत्यायन बताते हैं कि महाकवि कालिदास ने अपने काव्य में चंद्रगुप्त विक्रमादित्य को रघुवंश का रघु और उनके पुत्र कुमारसंभव को कुमार कहकर उनकी ख़ूब प्रशंसा की है. इसी आधार पर राहुल सांकृत्यायन लिखते हैं, ‘शुंग वंश की राजधानी की महिमा बढ़ाने के लिए ही उन्होंने (वाल्मीकि न) जातकों के दशरथ की राजधानी वाराणसी से बदलकर साकेत या अयोध्या कर दी और राम के रूप में शुंग सम्राट पुष्यमित्र की प्रशंसा की.’ जातक शब्द बौद्ध कथाओं के लिए उपयोग किया जाता है जिनमें बुद्ध के पूर्वजन्मों की बातें होती हैं. कहा जाता है कि रामायण बुद्ध के बाद ‘दशरथ जातक’ से प्रेरणा लेकर लिखी गई. राहुल सांकृत्यायन की किताब के मुताबिक़ पुष्यमित्र के शासनकाल में शुरुआती दिनों में अयोध्या का ख़ासा महत्व था और उस समय भी इसका नाम अयोध्या नहीं बल्कि साकेत था. जानकारों के मुताबिक जब यवन (यूनान) के राजा मिनांडर ने साकेत पर घेरा डाला तो पुष्यमित्र के गुरु पतंजलि ने भी इसी नाम (साकेत) से उसका ज़िक्र किया था.
26 Mar 2018 - 4:10 pm | पैसा
मिपा सदस्यांना उद्देशून वरील आयडीने जे अपशब्द वापरले आहेत तीच यापुढे मिपाची भाषा असणार आहे का? तर आमच्यासारख्या लोकांना नारळ दया.
27 Mar 2018 - 5:47 pm | सुखीमाणूस
विचारसरणी असणार्या लोकांकडून आणखी काय अपेक्शा करणार.
तरी बर राम हा क्शत्रिय व रावण हा ब्राम्हण होता म्हणे.
https://en.m.wikipedia.org/wiki/Ravana
मग बहुजनांन एका ब्राम्हणाला मारले त्याची पूजा सगळे हिन्दु करत आहेत हे सुद्धा यांच्या पोटात कळ आणते.
26 Mar 2018 - 11:50 pm | माहितगार
वेल या क्षणी, गोलपोस्ट शीफ्ट न करता मुद्द्यावर येतो ........... म्हणजे रामायण, यात राम हे पात्र पुष्यमित्रवरून प्रेरित होण्याचा प्रश्न येत नाही. सत्ता काबीज करण्यासाठी शस्त्र उचललेल्या वरुन, सत्तेचा मोह वडीलांच्या इच्छेखतर दूर ठेवणारे पात्र प्रेरीत आहे म्हणणे विरोधाभास करणारे होते. खास करुन इतिहास विषयक प्रमाण संदर्भ उपलब्ध नसताना.
श्री गुरुजींनी त्यांच्या तुम्हाला दिलेल्या एक वाक्याच्या "पुष्यमित्र शृंग यांच्या महान कार्याबद्दल त्यांना विनम्र अभिवादन!" या प्रतिसादातून एका वाक्यात बरीच ध्येय प्रथम दर्शनी सहज साध्य केली असे वाटले तरीही सत्ता काबीज करण्यासाठी शस्त्र उचललेल्या वरुन, सत्तेचा मोह वडीलांच्या इच्छेखतर दूर ठेवणारे पात्र प्रेरीत आहे म्हणणे अगदी सार्कॅझम म्हणून असेल अथवा पुष्यमित्र त्यांचा म्हणून असेल एका वाक्याचा शॉर्टकट मारण्या पेक्षा मुद्दा प्रमाण संदर्भ मागून क्लिअर केला असता तर त्यांच्या आणि इतरांच्या श्रद्धेची अधिक काळजी घेण्याची संधी त्यांना वापरता आली असती का ?
राहुल सांकृत्यायनांचे काही मुद्दे पुढच्या वेगळ्या प्रतिसादातून खोडेन पण मुख्य म्हणजे; त्याम्चे संदर्भ दिलेले लेखन ऐतिहासिक कथा ललैत साहित्य या प्रकारात मोडते त्या मुळे त्यांचे कथन ऐतिहासिक प्रमाण साधन म्हणून स्विकारणे कठीण जाते. कोणतेच ललित साहित्य कथा कादंबर्या ऐतिहासिक साधन अथवा संदर्भ ग्रंथ म्हणून न स्विकारण्या बाबत ईतर सर्वच ग्रंथांचे सम्दर्भ पडताळातना मी जसा सजग असतो तसाच इथेही सजग आहे. ललित साहित्याचा भाग असेल किंवा हिंदी साहित्याचे वाचन कमि म्हणून असेल राहुल सांकृत्यायनांचे सदर वाचन माझ्या वाचनात आलेले नव्हते. पण इथे संदर्भ आलेला पाहून संदर्भ दिलेली कथेतील संबंधीत भाग अक्षरशः दहा वेळा वाचला आहे आणि त्याचा उहापोह पुढच्या प्रतिसादातून करेन .
या निमीत्ताने चर्चेत सहभाग घेता आला या बद्दल आभार .
बाकी पै ताई म्हणतात तसे कारण कोणतेही असो चर्चेत सहभागी होणार्या इतरांसाठी व्यक्तिगत लक्ष्य करणारे शब्द या चर्चेत प्रस्तुत असण्या जोगे वाटले नाही.
27 Mar 2018 - 2:08 pm | पगला गजोधर
,
(तुम्ही "माझ्या"सारख्या समोर गीता वाचता, असा काही आयडी समज करण्याची रिस्क गृहीत धरून ), तुम्हास परत एक मूलभूत प्रश्न विचारतो की,
तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या, रामायण आणि महाभारत , "ललित साहित्य कथा कादंबर्या" मानता की ऐतिहासिक पुरावा म्हणून पहाता ?
27 Mar 2018 - 2:17 pm | माहितगार
प्रमाण ऐतिहासिक साधनांचे पुरावे उपलब्ध नसलेले लोकसाहित्य
27 Mar 2018 - 2:48 pm | पगला गजोधर
तर मग
एका लोकसाहित्यातील बाबींचा उहापोह करण्यासाठी ,
त्या लोकसाहित्याशी साहित्यिक-बंध असलेल्या
दुसऱ्या एका लोकसाहित्याचा रेफरन्स दिला, तर
सभ्य चर्चेच्या मर्यादेचे उल्लंघन झालेच नाही व सेल्फ गोल तर दुरकी बात.
असो
27 Mar 2018 - 4:07 pm | माहितगार
सेल्फ गोल संदर्भ स्वतःचे एक म्हणणे स्वतःच दुसरा विरुद्ध संदर्भ देऊन खोडणे हा होय . माझा या धाग्यावर तुम्हाला दिलेले आधीचे काही प्रतिसाद आपल्या नजरेतून सुटले आहेत का ?
त्यातील एका प्रतिसादाचा भाग खालील प्रमाणे आपल्या माहितीसाठी पुन्हा एकदा
इथे पुरोगाम्यांसमोरचा प्रश्न सभ्यतेचा नव्हे आपली विश्वासार्हता गमावली जाण्याचा आहे. आणि जे पुरोगामी हे लक्षात घेत नाहीत ते 'तथाकथित' या विशेषणास पात्र होत जातात. असो.
आपल्या इतर काही सदस्यांना उद्देशून वापरलेल्या शब्दांबद्दलचा सभ्यतेचा मुद्दा मात्र रास्त आहे. आपल्या नजरेतून सुटले असल्यास आपण स्वत:च पहावे. असो
27 Mar 2018 - 6:05 pm | पगला गजोधर
.
रामायण व महाभारत, हे आपल्या व माझ्या , दोघांच्याही मते जर साहित्य आहे ,
ते सृजनात्मक कल्पनांचे पंतंग आहेत, यावर जर एकमत आहे,
तर अश्या कल्पनाआधारित संकल्पनेबाबत संशयवाद कसा पेरता येऊ शकतो ?
मुळात जी गोष्टच काल्पनिक आहे ती ठाम कशी असू शकते ?
उलटपक्षी, एखाद्या पारंपरिक साहित्याबाबतीत असलेला एखाद्या अपरंपरावादी (तुमच्या शब्दी : विद्रोही साहित्य) विचारा
संदर्भात "संशयवाद " अश्या प्रकारच्या शब्द निवडीने, पारंपरिक साहित्य म्हणजे अस्सल " फॅक्ट / स्थापित इतिहास " असल्याचा
भास निर्माण होतोय का, याबाबत आपण सर्वानी पडताळणी केली पाहिजे.
राजा तू नागडा आहे ? असे रोखठोकपणे सांगणारा मुलगा व दुसऱ्या बाजूला त्या राजाचे खुशमस्करे भाट... यात हा साधा मुलगाच मला भावतो.
कदाचित एका काल्पनिक कथेतील ह्या मुलाचे पात्र सुद्धा "तथाकथित" असेल...
असो
.
.
एखाद्या क्ष गोष्टीला जर य व्यक्ती विषाची उपमा देत असेल तर
विषाचे साईडइफ्फेक्ट समजण्याची समज असेल त्याव्यक्तीकडे,
असे आपल्याला मी विचारण्यात काहीच हशील नसल्याने, असो.
27 Mar 2018 - 1:17 pm | श्रीगुरुजी
'ब्राह्मण X बहुजन' पिंका अजून सुरूच आहेत?
27 Mar 2018 - 6:30 pm | पैसा
हार्ड डिस्क फुल झाली की नवा डाटा लिहिता येत नाही. RAM /मेमरी पण फुल झालीय.
27 Mar 2018 - 7:36 pm | श्रीगुरुजी
हार्ड डिस्क फुल झालीये का करप्ट झालीये का त्यावर एखाद्या व्हायरसचे आक्रमण झालेय?
असो. रामायणापाठोपाठ आता महाभारत व श्रीकृष्ण यांचा बादरायण संबंध कोणत्यातरी बौद्ध कथेशी कसा जोडला जाईल याची आतुरतेने वाट पहात आहे.
27 Mar 2018 - 7:48 pm | पैसा
जातीय व्हायरसमुळे फुल झालीय. करप्ट ही झाली असावी असा संशय आहे.
25 Mar 2018 - 4:58 pm | Topi
पुष्य मित्र शुंग महाराज की जय
25 Mar 2018 - 5:38 pm | पैसा
जय श्रीराम! :)
कथा ही कथा म्हणून वाचावी. आणि समजा इतिहास असेल तरी आजच्या काळाचे मापदंड तेव्हाच्या लोकांच्या वागण्याला लावणे अयोग्य वाटते. बरे आता चर्चा करून काही बदलणार नसते. तेव्हा मनोरंजन म्हणून वाचताना फार चिकित्सा करू नये हे माझे मत.
रामायण महाभारतातील खूप भाग प्रक्षिप्त आहेत त्यामुळे मूळ कथा शोधणे जिकिरीचे आहे.
26 Mar 2018 - 1:30 pm | स्वीट टॉकरीणबाई
आप्पांच्या लेखाची जवळ जवळ दोन हजार वाचने झाली आणि ९२ प्रतिक्रिया आल्या हे समजल्यावर आप्पांना आनंद झालाच, पण त्यांची लेखनाचा वेग पाहता त्यांना प्रत्येकास प्रतिक्रिया देणे शक्य होणार नाही असं मला वाटतं. मात्र खूपच प्रतिक्रिया अतिशय विचारपूर्वक आणि सविस्तर आहेत त्या सर्व मिपाकरांना आप्पांनी नमस्कार कळवायला सांगितला आहे.
26 Mar 2018 - 6:02 pm | गामा पैलवान
गवि,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला.
१.
तसा भाव आलाच ना! लोकं संशय घेऊ शकतात. म्हणून तर तिने अग्निदिव्य केलं. पण जर ती हनुमानासोबत परतली असती तर तिच्यावरच्या फितुरीच्या संशयाची निवृत्ती कधीच होऊ शकली नसती.
२.
श्रीरामांनी हनुमानास सीतेचा शोध घ्यायची आज्ञा केली होती. ती रावणाच्या तावडीत असली तरी नक्की कुठे असेल याविषयी कोणालाच कसलीही माहिती नव्हती. त्यामुळे रामाने स्थायी सूचना (= standing instruction) वितरीत केली नसल्याची शक्यता आहे.
आ.न.,
-गा.पै.
27 Mar 2018 - 1:34 am | गामा पैलवान
पगला गजोधर,
हे विधान तुम्ही मनापासून लिहिलेलं असेल तर तुमची गल्ली चुकली म्हणायची. इतिहासाची चर्चा करण्यासाठी भक्कम पुरावे लागतात. भरतीमुळे पुसणारी वालुकाक्षरे काय कामाची!
आ.न.,
-गा.पै.
27 Mar 2018 - 7:00 pm | पगला गजोधर
.
गामाजी ,
रामायण व महाभारत हा माझ्यालेखी इतिहास नाही, तर लोकसाहित्य आहे.
शेरलॉक होम्स (हा सुद्धा एक काल्पनिक पात्र आहे, ऐतिहासिक पुरुष नाही, आधीच सांगतो, नाहीतर भक्कम पुरावे मागाल)
च्या स्टाईलने सांगायचं म्हणजे....
आपला मेंदू हे एक प्रकारचे गोदाम , किंवा आधुनिक भाषेत मी म्हणेन की जणू एखादी हार्डडिस्क...
ज्यांना हार्डडिस्क (म्हणजे ज्यांना मेंदू आहे असे सर्व मानव), एफिशिअंटली वापराची असते , अशी लोक
त्याच्यात अनवॉन्टेड गोष्टी ठेवत नाही, त्यामुळे काल्पनिक-गोष्टीचे-भक्कम-पुरावे कुठं ठेवावे आम्ही ?
27 Mar 2018 - 8:23 pm | माहितगार
@प.ग. लोकसाहीत्यात पुष्यमित्राचे पात्र आणि रामाचे पात्र दोन पात्रे लिहिली गेली हे वस्तुनिष्ठ सत्य आहे. त्यास अनेक वर्षे झाली म्हणजे किमान लोकसाहित्याच्या इतिहासाचा भाग आहे. आता इतिहासात दोन लिहिलेल्या स्वतंत्र पात्रांचा एकमेकांशी संबंध आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रमाण ऐतिहासैक साधनांचे पुरावे हवेत; ते आपल्या कडे नाहीत . एका बोटावरची थुंकी दुसर्या बोटावर करण्याचा प्रयोग फार फारतर काही क्षणांसाठी संभ्रमात टाकू शकतो पण कायमची शक्य नसलेली धूळफेक करणे सुज्ञांनी टाळलेले श्रेयस्कर असावे . बाकी आपली मर्जी. असो.
27 Mar 2018 - 8:31 pm | पगला गजोधर
१. या उपखंडाचा इतिहास,
२. या उपखंडातील लोकसाहित्य, व
३. या उपखंडातील लोकसाहित्याचा इतिहास ,
असे अनेक बदलते गोलपोस्ट असल्यामुळे, आपण उल्लेखात त्याप्रमाणे
एका बोटावरची थुंकी दुसर्या बोटावर करण्याचा प्रयोग फार फारतर काही क्षणांसाठी संभ्रमात टाकू शकतो
पण कायमची शक्य नसलेली धूळफेक करणे सुज्ञांनी टाळलेले श्रेयस्करच .
3 Apr 2018 - 1:02 pm | गामा पैलवान
पगला गजोधर,
इ.स. १८६० च्या आसपास भारतात इंग्रजी सत्ता दृढ झाली तेव्हा अधिकृत इतिहासानुसार शिवाजी हा चोर व दरोडेखोर होता. त्याचे शौर्य, धैर्य, सुप्रशासन वगैरे सर्व गुण काल्पनिकच होते. पुढे न्यायमूर्ती रानड्यांनी The Rise of Maratha Power हा ग्रंथ लिहून तत्कालीन समजुती पुराव्यानिशी खोडून काढल्या.
अशीच संकल्पना मला रामाच्या बाबतीत राबवायला आवडेल. पण तुम्ही तर रामाच्या अस्तित्वावरच संशय उपस्थित करताय. एकंदरीत काल्पनिक व्यक्तींवर तुम्ही तुमचा वेळ फुकट घालवीत आहात.
आ.न.,
-गा.पै.
3 Apr 2018 - 6:51 pm | गामा पैलवान
मार्मिक गोडसे,
हो.
कारण की वानरसेना मूळची रामाची नसून वालीची होती. याच प्रबळ सेनेच्या आधारे वालीने पूर्वी रावणाची दाणादाण उडवली होती. वानरसेनेच्या नादी लागून स्वत:च्या डोळ्यांच्या गोट्या स्वत:च्याच कपाळात घालून घेण्यापेक्षा सागरतीरी गोट्या खेळंत बसलेलं काय वाईट?
आ.न.,
-गा.पै.
3 Apr 2018 - 6:59 pm | अभ्या..
मग वान्नरसेनेने लंकेत एन्ट्री केल्यावर सगळी रावणसेना पळून जायला पाह्यजे होती. ;)
3 Apr 2018 - 7:08 pm | पगला गजोधर
नै तोपर्यंत त्यांना लोकसभेत बहुमत मिळालेले होते व राज्यात लंकेन्द्राला पहिला क्रमांक मिळाला होता ...
त्यामुळे वानरांना भ्यायचे काही कारण उरले नव्हते...
3 Apr 2018 - 10:16 pm | गामा पैलवान
तेच झालं की! म्हणून काही पराक्रमी राक्षसांनी धीर दिला. पण ते सुद्धा एकेक मृत्युमुखी पडू लागले.
-गा.पै.
3 Apr 2018 - 7:44 pm | अभिजीत अवलिया
रावणाची दाणादाण ??? पण रावण खूप पराक्रमी होता ना? म्हणजे ते महाभारत मध्ये वगैरे कसे दाखवले जायचे; अर्जुन, कर्ण, भीम, भीष्म वगैरे महारथी असत आणि प्रचंड प्रमाणात इतर सटरफटर सैनिक एकमेकात लढत असत. कितीही पब्लिक एकदम अंगावर आलं तरी हे महारथी शांत राहून फक्त एक बाण सोडणार आणि सगळं पब्लिक खल्लास. असे महारथी रामायण काळात न्हवते का किंबहुना रावण इतका पराक्रमी न्हवता ?
3 Apr 2018 - 8:25 pm | पगला गजोधर
.
पण हीच सेना आता पूर्वीप्रमाणे प्रबळ न राहिल्याने, त्या लंकेंद्राचे चांगलेच फावले हो !
3 Apr 2018 - 10:18 pm | गामा पैलवान
रावणाचा पराक्रम वालीसमोर फिकाच पडला. कारण की वानरांना राक्षसांच्या मायावी युक्त्या ओळखायची कला अवगत होती.
-गा.पै.
4 Apr 2018 - 12:11 am | दीपक११७७
वाली च्या विरोधात जो उभा रहायचा त्याची अर्धी शक्ती अपो आप वाली ला मिळायची, सबब त्याच्याशी समोरा समोर कोणी लढत नसे.
एकदा त्याने रावणाला शेपटीत बांधुन महीनो महीने एका कुठल्याश्या पर्वतावर ठेवले होते.
श्री रामाला सुध्दा त्याला लपुनच मारावे लागले