"हे राम शिव शंकरा..Sssss"
होय मी धार्मिकच आहे.
रोज निद्राधीन होताना
मनाची कवाडं बंद करण्याआधी
ही शब्दफुलं अंतरात्म्याला वहावीच लागतात मला.
त्याशिवाय ह्या देव्हाऱ्यात रात्रीचा निरव येत देखील नाही. त्याचे कर्तव्य करायला.
देहाची कुडी जन्माला आलो तेंव्हा अमुक एका धर्माचा ठसा घेऊन आली नव्हती.तो धर्मच नव्हे तिचा!
हां., पण आधाराची गरज हा मात्र तिचा मूलभूत स्थायीभाव! ती तहान मात्र अत्यन्त नैसर्गिक,शाश्वत, अविनाशी!
त्या तहानेला माझ्या मातापित्यांनी त्यांच्याही नकळत अत्यन्त सहजतेनी त्यांना तश्याच रीतीनी मिळालेल्या धर्मातल्या देवरूपांचा प्याला पुढे केला,त्या देवांच्या द्रव घटक नामांसहीत!
आणि मग माझ्याही तहानेला नाव मिळालं.
रंग ,रस,गन्ध मिळाला. नित्त्याच्या तडफडीचं सुलभीकरण झालं एका अर्थाने!
पण असं वाटतं की झालं हे ठीकच झालं.
अंतर्मन हे जर देवत्वाच्या तहानेनी व्याकुळ होणार असेल,तर त्याच्या तहान भागवणाऱ्या पणपोया माणसांच्या जगात जन्माला येतच असतात.ही माणुसपणाची कमालंही आहे,आणि मर्यादाही!
प्याला रिता होतो तर तो पुन्हा भरला जाणं ही पण त्याची मर्यादाच!
ह्हा!!! कसं सुखावलं हो मन आता.शांत वाटतय.पुन्हा तोच अनुभव येतोय,जन्माच्या वेळी असलेल्या कोऱ्या करकरीत मनाचा!
काही काळ त्याच सहजतेनं निद्राधीन होतो आता...भेटू पुन्हा...असेच नव्या तहानेच्या शोधात.
==================================================
*अतृप्त*
प्रतिक्रिया
12 Mar 2018 - 12:12 pm | प्रचेतस
क्या बात है अत्रुप्तजी आत्मा..!!!
तुमची तहान लवकरच भागो आणि तुम्हाला त्रुप्ती मिळो हीच त्या सत्यनारायण भगवानाकडे प्रार्थना.
12 Mar 2018 - 11:22 pm | अत्रुप्त आत्मा
13 Mar 2018 - 5:46 am | प्रचेतस
मला नै का धन्यवाद अत्रुप्त आत्माजी?
13 Mar 2018 - 6:57 am | अत्रुप्त आत्मा
हे घे!
दु दु आगोबा~खुर्चीमारातृप्त
12 Mar 2018 - 2:27 pm | पद्मावति
छान लिहिलेय.
12 Mar 2018 - 3:33 pm | माहितगार
रोचक
12 Mar 2018 - 11:15 pm | अत्रुप्त आत्मा
@पद्मावती, माहितगार - धन्यवाद.