रात्री झोपायला म्हणुन खोलीत आलो. पलंगपोस बदलावा म्हणुन घातलेला पलंगपोस काढणार तेव्हढ्यात लक्ष बिछान्यावर विराजमान झालेल्या पाहुण्याकडे. पाहुणा घर आपलच समजुन मस्त मजेत बिछान्यावर फिरत होता. हिरवेगार तुकतुकीत अंग, पंखांना तपकिरी काठ, साधारण एक सेंटिमिटर आकार, पंख मिटुन घेतलेले असा पाहुणा सोयिस्कर जागेची पाहणी करत असावा
हा प्रकार जरा वेगळाच दिसला. म्हटल पाहुणे आले आहेत तर त्यांची छबी टिपावी. लगबगीन कपाटातला कॅमेरा काढला, भिंगसंच बदलला. कॅमेरा सरसावुन पाहुणे कुठल्या बाजुने बरे दिसतील असा अंदाज घेत असतानाच पुन्हा पाहुण्यांचे भ्रमण सुरू झाले. अपल्या मंदगतीने पाहुणा सावकाश बिछान्याच्या परिघाने फिरत होता. मधेच थबकायचा. किरण साधायला जावे, तर पुन्हा गाडी सुरू. पाहुणा पुढे, मी मागे असे चालले होते. आता साहेब कडेला आले, आणि 'माझे चित्र टिपायचे आहे का? तर हरकत नाही, थांबतो मी जरा' अशा थाटात मागे वळले आणि माझ्या दिशेने तोंड करून उभे राहिले.
चित्र टिपुन होताच पाहुणा पुन्हा तुरुतुरू फिरायला लागला. मधेच पाहुण्याने पंख फडकावले आणि अचानक लक्षात आले की पाहुणा केवळ हिरवाच नव्हे तर चांगला रंगीतही आहे! पंख वर उचलताच पाठिवरील व पंखांच्या आतील भागाचा तपकिरी भाग व कडेचे बारिक ठिपकेनजरेत भरले.
रात्रीचे बारा वाजत आले होते. पाहुण्यांचे कौतुक आता बास झाले. या पाहुण्यांना घरात ठेवुन घेणे बरे दिसत नव्हते. उगाच अंगाखाली चिरडले, कुठे बाधा झाली तर नसता व्याप व्हायचा. एका कागदावर हलक्या हाताने पाहुण्याला उचलले आणि बाहेर सोडले.
प्रतिक्रिया
24 Oct 2008 - 10:09 pm | प्राजु
मस्तच आहे हो पाहुणा. अगदी विविध रंगी आहे..!! आणि त्यावर आपलं मनोगत (पाहुण्याबद्दलचं) तर एकदमच छान..
असेच पाहुणे आपल्याघरी येत राहोत आणि आपल्याला आपल्या फोटोग्राफी चं कौशल्य पुन्हा पुन्हा आजमावायला मिळावं.. ;)(ह्.घ्या)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Oct 2008 - 10:11 pm | मदनबाण
पाहुणा लयं कलरफुल हाय.
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
24 Oct 2008 - 10:16 pm | धोंडोपंत
क्या बात है!!!!!!!
तुमच्या सृजनशीलतेला आमचा दंडवत.
बळवंतराव, तुम्ही आमच्याच पठडीतले.
आपला,
(आनंदित) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, मराठी भाषा व संस्कृती, आर्य सनातन वैदिक धर्म व ज्योतिषशास्त्र यांना विरोध करणार्यांना आम्ही फाट्यावर मारतो.)
24 Oct 2008 - 11:12 pm | खुसपट
फारच सुन्दर 'पाहुणा' आणि तुमची छायाचित्रण कला !! बर्याच वर्षान्पूर्वी कर्जतजवळ मित्राच्या घरापुढील बागेत सुन्दर हिरवा किडा साध्या कॅमेर्यात टिपला होता त्याची आठवण झाली. सापडल्यास जालावर टाकतो. पुनः एकदा अभिनन्दन.
खुसपट (राव)
जे जे सुन्दर , उदात्त, उन्नत , महन्मधुर ते ते ,कौतुकावे !
25 Oct 2008 - 12:03 am | विसोबा खेचर
साक्षी, कुठला रे किडा हा? छान आहे! :)
तात्या.
25 Oct 2008 - 5:35 am | धमाल नावाचा बैल
साक्षीदेवा तुम्हीपण जरा येड्*** दिसता!
अहो अंथरुण घालताना दिसला किडा तर ठेचायचे त्याला चपलेखाली, कपाटातुन कॅमेरा काढून त्याचे फोटो कसले काढत बसता. :D
आपला
बैलोबा
25 Oct 2008 - 5:42 am | चतुरंग
साक्षी, रात्री बारा वाजताही इतका उत्साह? खरंच कॅमेरा चालवण्याचा किडाच म्हणायला हवा! :)
मस्तच आलेत फोटू.
चतुरंग
25 Oct 2008 - 7:46 am | अनिरुध्द
अगदी नावालाच जागलात. :) ते सुध्दा रात्री बारा वाजेपर्यंत.