माय गे माय...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
27 Feb 2018 - 8:23 pm

सक्काळपासूनच्या कौतुकाने हरखलेली माय मराठी दमून भागून जरा ओसरीवर टेकली.
डोक्यावरचं संदेशांचं, भाषणांचं, योजनांचं ओझं उतरवलं.
गळ्यातले हारतुरे काढून बाजुला ठेवले.
पिशवीतला श्रीखंडाच्या गोळ्यांचा डब्बा पुन्हा घडवंचीवर ठेवत पुटपुटली,
"एवढा मोठा सोहोळा झाला ,सगळी पोरं जमली पण नातवंडं काही भेटली नाहीत. "

करुणसंस्कृतीकवितामुक्तकसमाज

प्रतिक्रिया

पैसा's picture

27 Feb 2018 - 11:36 pm | पैसा

ओल्ड fashioned आहे. श्रीखंड गोळ्या? Omg! गिव देम समथिंग सेक्सी यू नो! =))

प्राची अश्विनी's picture

28 Feb 2018 - 7:18 am | प्राची अश्विनी

यु सेड इट गं!

पद्मावति's picture

27 Feb 2018 - 11:44 pm | पद्मावति

:) मस्तच

प्राची अश्विनी's picture

28 Feb 2018 - 7:18 am | प्राची अश्विनी

:)

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Feb 2018 - 12:00 am | डॉ सुहास म्हात्रे

एका दृष्टीकोनातून मनोगत आवडलं !

पण मराठी काही एवढी वृद्ध झाली नाही... ती बदलत्या कालाबरोबर अधिकाधि तरूण... चिरतरूण... होत राहणार आहे. तिचे बाह्यरूप बदलेल. तिचे कपडे, दागिने, अविर्भाव बदलत्या काळाप्रमाणे बदलत राहतील, इतकेच... तसे बदलणे हाच तर जीवनाचा मूलधर्म आणि जिवंतपणाचे लक्षण असते, नाही का ?

सद्या मी मॉलमध्ये, एखाद्या हायफाय ऑफिसमध्ये किंवा इतर चकचकीत ठिकाणी जातो तेव्हा तेथे आलेल्या आणि काम करणार्‍या तरुणाईच्या तोंडात चालणारा मराठीचा सहजपणे चाललेला वापर ऐकतो. असेल तो जरासा इंग्राजळलेला किंवा हिंदाळलेला... पण हे सगळ्या भाषांमध्ये नेहमीच होते, होईल आणि दर पिढीगणिक वाढत राहील (शेपन्नास वर्षांपूर्वीची मराठी वाचताना आपली फेफे उडतेच, नाही का?). केसांमध्ये चांदी डोकावू लागलेल्या पुरुषांनी धोतर सोडून केवळ पँटच नाही तर काहीजणांनी जीनसुद्धा केव्हा स्विकारली आणि त्याच वयाच्या स्त्रियांनीही नऊवारी साडी --> पाचवारी साडी --> पंजाबी ड्रेस असा प्रवास करत काहींनी अगदी जीनसुद्धा केव्हा स्विकारली हे, तसा मुद्दाम विचार केल्याशिवाय आपल्या लक्षातही येत नाही !

अजून दहा वर्षांनी, "माय मराठी जीन आणि टॉप पेहरून, नातवंडांना केक-पास्ता-चॉकलेट्सच्या बरोबरच बेसनाच्या लाडवांचा व उकडीच्या मोदकांचा डेसर्ट स्प्रेड असलेल्या बुफेवर तुटून पडताना कौतूकाने पहात आहे", असे कोणी मिपावर लिहिले तर आश्चर्य वाटणार नाही ! :)

सस्नेह's picture

28 Feb 2018 - 11:39 am | सस्नेह

सहमत !

प्राची अश्विनी's picture

28 Feb 2018 - 7:15 am | प्राची अश्विनी

खरंय.मराठी नेहमीच चीर तरुण राहील. आणि तुम्ही सांगितलेलं चित्र आशादायी आहेच. पण पण पण..
मी मराठी म्हातारी झाली असं नाहीच म्हटलंय.;) जसं प्रत्येक स्त्री आधी मुलगी आई आणि आजी या तीन पिढ्यांतून जाते तशीच माय मराठी पण रूपं बदलत असते. पण आजची आजी आणि आजची नातवंड यांच्यातला सुसंवाद अखंड ठेवायला आपली मधली पिढी कुठेतरी कमी पडतेय असं वाटतं. ं

पलाश's picture

28 Feb 2018 - 10:32 am | पलाश

+१.

भीडस्त's picture

1 Mar 2018 - 10:53 am | भीडस्त

घरात आजी आणि नातीचा संवाद ऐकत असताना शेवटल्या वाक्याचा प्रत्यय घरात पदोपदी घेतो आहे

पलाश's picture

28 Feb 2018 - 10:31 am | पलाश

वा!! मस्त लिहिलंय हे.

हरवलेला's picture

28 Feb 2018 - 11:16 am | हरवलेला

मार्मिक

एस's picture

28 Feb 2018 - 1:47 pm | एस

सहमत.

प्राची अश्विनी's picture

28 Feb 2018 - 7:33 pm | प्राची अश्विनी

डॉ म्हात्रे, स्नेहांकिता, पलाश, हरवलेला, एसभाऊ, मनापासून धन्यवाद.

मारवा's picture

28 Feb 2018 - 7:47 pm | मारवा

माय गे माय...
दारात उभा गे साजण
ची आठवण झाली.

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Mar 2018 - 10:15 am | ज्ञानोबाचे पैजार

कविता आवडली
अमृतातेही पैजा जिंकणारी माझी माय मराठी आता साता समुद्रापार पोचली आहे.
नातवंडे आपल्याकडे येतील अशी वाट न पहाता नातवंडांच्या भाषेतच त्यांच्याशी संवाद साधायला लागली आहे.
पैजारबुवा,

पैसा's picture

1 Mar 2018 - 10:33 am | पैसा

फॉर्वर्ड आलेय, नाव आणि लिंक काढून. त्या मंडळीना मिपाची लिंक पाठवून योग्य रीतीने फॉर्वर्डा म्हणून सांगितले.

प्राची अश्विनी's picture

2 Mar 2018 - 9:48 am | प्राची अश्विनी

पैजारबुवा, भीडस्त, मारवा, पैताई धन्यवाद!
पैताई, तुला स्पेशल धन्यवाद!