निवेदन...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
14 Dec 2007 - 2:39 pm

राम राम मंडळी,

आजपर्यंत पंचायतसमितीच्या कामामध्ये तसेच येथील लेखन संपादित करण्यामध्ये मी कधीही हस्तक्षेप केलेला नाही/करत नाही हे सर्वप्रथम नमूद करतो. आणि तसं मी अनेकदा जाहीरपणे सांगितलंही आहे! आपल्याला विश्वास ठेवायचा असेल तर अवश्य ठेवा किंवा ठेवू नका, ही आपली मर्जी!

आपण जर येथील काही लेखन पुन्हा एकदा चाळलेत तर माझी थट्टामस्करी, माझ्यावर जाहीर आरोप, असले अनेक प्रकार इथे केलेले आपल्याला पाहायला मिळतील. हे सर्व लेखन आजही येथे शाबूत आहे! त्याचप्रमाणे सुरवातीला पोष्टमन यांचा 'संत तात्याबांची अमृतवचने' किंवा गेले काही दिवस किमयागार नावाच्या इसमाचे सतत मला टार्गेट करण्याकडे असलेले लेखन अश्याही गोष्टी माझ्याच बाबतीत लिहिल्या गेलेल्या आहेत, ज्या आजही येथे शाबूत आहेत!

असे असताना,

'कुणा एका बाळासाहेबांचा एखादा विनोद (ज्यात तात्याला टार्गेटही केलं गेलं नाहीये!) तात्याला मुद्दाम आपले मालकी हक्क वापरून येथून उडवून लावण्याची काय बरं गरज असावी?' असा साधा आणि सोपा विचारही येथे कालपासून मिसळपाववर आणि माझ्यावर मुक्त वाभाडे (हे देखील लोकशाहीचेच एक लक्षण, इतर संस्थळांवर कदाचित हे संभव नसावे/नाही!) काढणार्‍या, मिसळपाववर आणि तात्यावर वैयक्तिक प्रेम तसेच द्वेषही (!) असणार्‍या मंडळींनी करू नये, याचे मला राहून राहून आश्चर्य वाटते!

आता प्रश्न असा उरतो की हे केलं कुणी? तर त्याबाबतीत मी कालपासून जवळजवळ ८-१० वेळेला नीलकांतशी बोललो आहे, त्याला तपास करायला सांगितला आहे. तांत्रिक गोष्टीतलं मला काहीच कळत नाही, नीलकांतच ते सर्व पाहतो. परंतु तो सध्या अभ्यासात व्यग्र असल्यामुळे त्याला वेळ नाही. त्यामुळे 'तुझ्या सवडीने निवांतपणे तू काय ते बघ!' अशी मुभा मी त्याला दिली आहे.

मिपाच्या सुरवातीला ज्यांच्यावर मी पूर्ण विश्वास ठेवून ज्या मंडळींना येथील काळजीवाहू समिती सदस्य म्हणून नेमले होते आणि पुढे ती मंडळी बिनविरोध निवडून आली त्यापैकी एकानेही माझ्यावर जाहीर आरोप किंवा संशय घेण्यापूर्वी (तसा ते अवश्य घेऊ शकतात, त्याबद्दल ना नाही!) मला विश्वासात घेऊन किंवा एखादे पोष्टकार्ड पाठवून 'काय तात्या, काय भानगड झाली आहे? किंवा काय प्रॉब्लेम असावा?' असे विचारले नाही याचे मला राहून राहून वाईट वाटत आहे. मी मात्र जिथे जिथे पंचायत समितीचा उल्लेख आला किंवा मला करावा लागला तिथे तिथे वेळोवेळी पंचायतीबद्दल पूर्ण विश्वासच व्यक्त केला आहे हेही नमूद करावेसे वाटते!

कालपासून मी सर्व प्रतिसाद वाचत आहे, परंतु मुद्दाम इतका वेळ गप्प राहिलो त्याबद्दल क्षमस्व, परंतु या निमित्ताने मला हे बघायचे होते की कोण कसं आहे नी कोण कसं आहे, कुणाचे काय विचार आहेत आणि कुणाचे काय विचार आहेत! या निमित्ताने येथील बर्‍याचश्या मंडळींचे अंतरंग मला बघायला मिळाले! मालक या नात्याने मिसळपावचे खरे हितचिंतक कोण, मिपाची खरी काळजी/कड कुणाला आहे, कोण फक्त चोची मारायच्या संधी शोधतो आहे हेही समजले! तरीही मालक या नात्याने खुलासा करायला इतका वेळ लावल्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व सभासदांची क्षमा मागतो!

आता येथील लेखन उडण्याबाबत -

तर केवळ बाळासाहेबांचा विनोदच नव्हे, तर यापूर्वीही अगदी साधेसुधे असणारे प्रतिसादही (उदा माझे स्वत:चेच एक दोन प्रतिसाद, माझ्या आठवणी प्रमाणे प्रमोदकाकांचाही एखाददुसरा प्रतिसाद) येथून काही वेळेला उडाल्याच्या घटना घडल्या आहेत त्याबबतीतही मी वेळोवेळी नीलकांतला तपास करायला सांगितले आहे, परंतु त्याच्या कार्यबाहुल्यामुळे त्याला गेले अनेक दिवस हे कुठलेही काम करायला जमलेले नाही.

असो! खुलाश्याअंतर्गत माझ्यापाशी जे काही सांगण्यासारखं होतं ते मी सर्व इथे सांगितलं आहे! यापेक्षा अधिक कोणताही खुलासा माझ्यापाशी नाही तसेच यापुढे यापेक्षा अधिक कोणताही खुलासा मी करू शकेन असं मला वाटत नाही!

एक गोष्ट मात्र खरी, आता यापुढे कुणाच्या गळ्यात गळे घालायचे, कुणाला दिलखुलासपणे आपलं म्हणायचं, कोण जवळचा/कोण परका या सर्व गोष्टी मला समजल्या हे मात्र बरे झाले! अर्थात, हे माझे वैयक्तिक निवेदन. मिसळपावचा मालक म्हणून नव्हे!

कळावे,
लोभ आहेच, तो जमल्यास वाढावा, न वाढल्यासही उत्तमच! :)

आपला,
तात्या अभ्यंकर,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.

धोरणवावरप्रकटनप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

14 Dec 2007 - 2:58 pm | विसोबा खेचर

कळावे,
लोभ आहेच, तो जमल्यास वाढावा, न वाढल्यासही उत्तमच! :)

किंबहुना, काही मंडळींशी आता तो न वाढल्यासच अधिक उत्तम होईल असंही आता वाटायला लागलं आहे!

राहता राहिला प्रश्न मिसळपावच्या भविष्याचा आणि मिसळपावचं पुढे काय होणार याचा, तर त्याबद्दल मला काडीचीही फिकीर नाही हेही सांगू इच्छितो!

मला जे निवांतपणे लिहायचं आहे ते मी इथे लिहीन, कुणी वाचल्यास चांगलंच आहे! नाहीतरी सुरवातीला इथे एकटाच आलो होतो त्यामुळे पुन्हा एकटं रहाणंही फारसं जड जाऊ नये असं वाटतं!

तात्या.

राजे's picture

14 Dec 2007 - 2:59 pm | राजे (not verified)

लेखन नष्ट होण्याची अडचण / तांत्रिक गडबड ही ड्रुपल ४.७ मध्ये होती पंण ५.१ वर ती गडबड दुर केली गेली आहे असे मी वाचले आहे, तरी ही अशी काही अडचण असेल तर संकेतस्थळ दोन एक दिवसाठी बंद ठेऊन डाटाबेस तथा ईतर कोडींग तपासून घ्या, ही विनंती.
तसेच नवीन काही उपडेट्स आले आहेत ४.१ साठी ते चढवा.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

बेसनलाडू's picture

14 Dec 2007 - 3:09 pm | बेसनलाडू

तात्या,
जाहीर निवेदनाबद्दल अनेक आभार
(आभारी)बेसनलाडू
माझ्यासह अनेकांनी तुमच्यावरचा घेतलेला संशय केवळ निवेदनामुळे पूर्ण दूर होण्यास मदत होईल, असे वाटत नसल्याने तसेच तुमचा निवेदनातला एकूण नाराजीचा सूर बघता तुम्हांला तसेच लोकनियुक्त पंचायत समितीला काही सूचना कराव्याशा वाटल्या. त्या येथे जाहीरच आणि कोणताही आडपडदा न ठेवता, स्पष्टपणे करतो आहे.

  1. तुम्ही नीलकांताला सांगितल्याप्रमाणे या प्रकरणाचा छडा लागला, की त्या तपासाचे निष्कर्ष त्वरीत येथे सर्व सभासदांसमोर जाहीर व्हावेत.
  2. पंचायत समितीचेच एक सभासद असलेल्या विकासरावांचा परवलीचा शब्द चोरण्याचा जो प्रयत्न झाला, त्या प्रकरणाचा आणि प्रतिसाद उडवण्याच्या प्रकरणाचा परस्परसंबंध लक्षात घेऊन त्या दृष्टीने एकूण प्रकरणाचा छडा लावावा
  3. तुम्हाला मागे मी लिहिलेला व्य नि मिसळपावाच्या हितासंबंधी आहे, असे सांगून जगजाहीर केल्यानंतर माझ्यासह येथील बर्‍याच सदस्यांची त्याबाबत स्पष्ट नाराजी सगळ्यांनाच दिसली आहे. त्यामुळे तुम्हाला कोणी (अगदी पंचायत समितीचे सदस्यही) व्य नि वगैरे लिहून विश्वासात बिश्वासात घेऊन संवाद साधण्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरते. त्यामुळे कुणाकडून तशी अपेक्षा न ठेवाल तरच बरे! निदान मी तरी पुन्हा अशा व्य नि च्या फंदात स्वतःहून पडण्यास तयार नाही. ज्यांनी त्या प्रकरणानंरही व्य नि तून संपर्क साधला असेल, त्या सदस्यांच्या सहनशीलतेचे मला कौतुकच वाटते.
  4. नियुक्त पंचायत समितीने 'ना काम' आंदोलन थांबवले की मिसळपावावरील मार्गदर्शक लेखनाबाबत काही बाबी सुस्पष्ट कराव्यात. जसे प्रतिसाद उडवले जाण्यासाठीचे निकष; अश्लील,ओंगळवाणे,हिडीस काय आहे, काय नाही; इत्यादी. त्याबाबत संकेतस्थळाचे मालक म्हणून तुमचा हस्तक्षेप नसला, तरी योग्य पाठपुरावा असावा. त्याबाबत सदस्यांना माहिती दिली जावी.
  5. तुमचे किंवा प्रमोदकाकांचे उडालेले साधेसुधे प्रतिसाद उडणे आणि येथील बाळासाहेबांचा आणि त्यावरील काही प्रतिसाद उडणे, यातील अपघात काय आणि खोडी काय हे न कळण्याइतके मिसळपावचे सभासद मूढमती नसावेत, असे वाटते. त्यामुळे तुमच्या किंवा प्रमोदकाकांच्या प्रतिसादांच्या उडण्याची आणि बाळासाहेबांचे व संबंधित इतर प्रतिसाद उडण्याची तुलना करूच नकात.
  6. सध्याच्या वस्तुनिष्ठ समस्येला निवेदनातून वैयक्तिक हितसंबंधांची, वैयक्तिक भावनांची झालर लावू नकात (कोण कसे आहे, कोणाला कोणाची किती पडली आहे, कुणाला आपले नि परके समजायचे वगैरे) त्यामुळे एक तर विषय भरकटू शकतो आणि दुसरे, असे करून सदस्यांची संकेतस्थळाबद्दलची, येथील कामकाजाबद्दलची अपेक्षा, तक्रार जे काही असेल ते - सहानुभूतीत बदलू शकेल, जे कोणासाठीच हितावह नसेल; मिसळपावसाठी तर नाहीच नाही

असो. तुमचे निवेदन वाचून जे मनात आले ते प्रामाणिकपणे मांडले. मिसळपावच्या यापुढील वाटचालीसाठी मालक म्हणून तुम्हाला, पंचायत समितीला आणि सर्व सदस्यांना अनेकोत्तम शुभेच्छा.
(प्रामाणिक शुभेच्छुक)बेसनलाडू

प्रमोद देव's picture

14 Dec 2007 - 3:56 pm | प्रमोद देव

तात्याचा स्वभाव बघता हा खुलासा पटण्यासारखा आहे. आजही ते लेखन इथे शाबूत आहे ज्यात तात्यावर सरळ सरळ टीका आहे. तात्याची टिंगलटवाळी केलेले प्रतिसाद अजूनही दिसताहेत. त्यामुळे बाळासाहेबांचे ’बालबुद्धी’ विनोद तात्यांनी उडवले असतील असे मला तरी वाटत नाही.
मध्यंतरी माझेही अतिशय साधेच एकदोन प्रतिसाद उडवले गेले होते.त्याचेही कारण कळले नव्हते.
मिपाच्या सुरवातीला ज्यांच्यावर मी पूर्ण विश्वास ठेवून ज्या मंडळींना येथील काळजीवाहू समिती सदस्य म्हणून नेमले होते आणि पुढे ती मंडळी बिनविरोध निवडून आली त्यापैकी एकानेही माझ्यावर जाहीर आरोप किंवा संशय घेण्यापूर्वी (तसा ते अवश्य घेऊ शकतात, त्याबद्दल ना नाही!) मला विश्वासात घेऊन किंवा एखादे पोष्टकार्ड पाठवून 'काय तात्या, काय भानगड झाली आहे? किंवा काय प्रॉब्लेम असावा?' असे विचारले नाही याचे मला राहून राहून वाईट वाटत आहे.

ह्या तात्याच्या मताशी मी सहमत आहे. ह्या पंचायत समितीमधल्या मंडळींनी अशा तर्‍हेची तक्रार आल्यावर जाहीर निवेदन देऊन आपापली बाजू मांडली. त्यामुळे असा एक समज झाला की हे सगळे तात्यानेच केले असावे. मलाही तसेच वाटत होते आणि मी ते तात्याजवळ बोलूनही दाखवले. त्याऐवजी पंच मंडळींनी आधी आपापसात आणि तात्याशी बोलून जर का एखादे संयुक्त निवेदन दिले असते तर कदाचित हे इतके रामायण घडले नसते. चूक कुणाकडूनही होऊ शकते अथवा ती एखादी तांत्रिक चूकही असू शकेल. पण संपादक मंडळी आणि मालक ह्यांनी जर एकमेकांशी सुसंवाद न ठेवता जर कोणता व्यवहार केला तर मग अशी पाळी येते. इथे ह्या सर्व मंडळींचे चुकले. अर्थात ही काही फार जीवघेणी चूक नव्हती पण त्यामुळे आधीच्याच गढुळ वातावरणात भरच पडली.
म्हणून म्हणतो की ह्या बाबतीत नेवेदन देणार्‍या संपादक मंडळातील सगळ्यांनी थोडी काळजी घेतली असती तर कदाचित आज निर्माण झालेली कटुता निर्माण झाली नसती.

बाकी ह्या प्रकरणातील कुणाच्याही मनात मिपा बद्दल अथवा वैयक्तिक तात्याबद्दल आकस नाही हेही मी पूर्णपणे जाणतो. फक्त थोडी घाई झाली. ती जर टाळता आली असती तर... असो.
झाले गेले गंगेला मिळाले. आता पुन्हा नव्या जोमाने सगळ्यांनी कामाला लागावे म्हणजे आपोआप हे मळभ दूर होईल.

सहज's picture

14 Dec 2007 - 7:33 pm | सहज

तात्याचा हा खुलासा काहींना पटेल व काहींना नाही. तांत्रीक बिघाड म्हणले तर आता काय बोलायचे. काहीच बोलायला रहात नाही. बरेच जण जाऊ द्या म्हणुन सोडून देतील. आम्ही आम सदस्य तर काहीच करू शकत नाहीत.

३ गोष्टी महत्वाच्या

१) कर्णाने आधी इतर इतर पंचायत सदस्यांशी बोलून तात्याशी चर्चा करून मगच काही जाहीर वक्तव्य करायला पाहीजे होते. पंचायत-मालक यांच्यात सुसंवाद नाही हे सिद्ध झाले व ते योग्य नव्हे. संबधीत सर्वांनी जबाबदारीने हे प्रकरण हाताळायला पाहीजे होते. पंचायत सदस्य ही जबाबदारी ओळखून कर्णाने असा जनता दरबार सुरू करणे योग्य नव्ह्ते. जरी वैयक्तीक पळवाटा शोधता आल्या तरी मिसळपावचे नाव खराब न होऊ देण्याची जबाबदारी झटकु शकत नाही.

२) जे लेखन उडवले गेले त्याबद्दल एखादी-दुसरी व्यक्ति सोडली तर बहुसंख्यांचा (उडवायला)पाठींबा होता त्यामुळे (तांत्रीक बिघाड सोडला तर) ज्या कोणी हा प्रतिसाद उडवला होता त्याने योग्य तेच केले फक्त तसे लगेच खुलेपणाने सांगायला पाहीजे होते.

मला वाटते आक्षेप दुटप्पी धोरणाला होता "चीकाचा उल्लेख" देखील तितकाच निषेधार्ह होता. बहुसंख्य लोक हेच म्हणतील. जर ते चालते तर हे पण चालायला हरकत नव्हती किंवा दोन्ही चालायला नाही पाहीजे. माझ्या मते दोन्ही निषेधार्ह. पण इथे लोकांना स्वातंत्र्य, तत्व, लोकशाही जिंदाबाद, प्रशासक शब्द ही शिवी आहे, असे बोलायला हवे असते व मिळालेले स्वातंत्र्य असले आक्षेपार्ह वाटेल ते म्हणण्यात घालवायचे असते. कदाचित तसले (चीक) लिखाण आले नसते तर अजुन घाणेरडे विनोद आले नसते.

३) असो झाले गेले गंगेला मिळाले. आता पुन्हा नव्या जोमाने सगळ्यांनी कामाला लागावे म्हणजे आपोआप हे मळभ दूर होईल. हे म्हणल्यावाचून रहावत नाही की फक्त तात्याला डिवचण्यासाठी जे लेखन होते त्यावर जरा विशेष लक्ष पंचायतीने द्यावे. तसेच तात्याला विनंती आहे की सतत काही लोकांचा उद्धार करणे बंद कर जर त्याला इतर लोक त्याच्या नावाने "शंख" करायला नको असतील तर त्याने देखील संयम बाळगला पाहीजे. काय सुंदर सुंदर लेखन करु शकतो तात्या. तात्यावर फक्त टिका करणार्‍यांनी इथे चांगले लेखन करुन दाखवावे. हा विषय सोडुन देण्यात यावा तसेच लगेच बेसनलाडू वरची कविता ताबडतोब काढली जावी ही मी पंचायतीला विनंती करतो. एखादा टोमणा, एखादे वाक्य पकडून खिल्ली उडवणे ठीक पण अशी आख्खी कविता एका सदस्यावर करणे योग्य नाही.

काहीही असले तरी मिसळपाव सारखे पारदर्शक चर्चा होणारे दुसरे संकेतस्थळ नसावे!!

पेरले तैसे उगवते बोलण्यासारखे उत्तर येते.

विसोबा खेचर's picture

14 Dec 2007 - 7:55 pm | विसोबा खेचर

तसेच लगेच बेसनलाडू वरची कविता ताबडतोब काढली जावी ही मी पंचायतीला विनंती करतो.

असहमत आहे, ती कविता इथेच राहू द्यावी असे मला वाटते!

तात्या.

प्रियाली's picture

14 Dec 2007 - 5:05 pm | प्रियाली

१. मी त्या प्रतिसादांच्या संपादनात नाही म्हणजे तात्या आहे असे माझ्या कोणत्याही प्रतिसादांतून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रतीत होत नाही.

२. प्रमोद देवांचे प्रतिसाद उडवले जाणे हे तांत्रिक बिघाड असले तरी विनोदांतील प्रतिसाद उडवून त्यावर पंचायत समितीच्या नावाने टिप येणे हे काही तांत्रिक बिघाडाचे लक्षण वाटत नाही.

३. मला स्वतःला संपादनाची कामगिरी सांभाळणे शक्य नाही यांत कोणाचा विश्वासघात करणे इ. नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यातील जबाबदार्‍यांत गेल्या १-दीड महिन्यांत अचानक अतिशय वाढ झाली आहे आणि त्या नेटापेक्षा प्रथम येतात त्यामुळे मला हे सांभाळणे शक्य नाही. कधीतरी प्रतिसाद लिहिणे किंवा दोन चार मतांच्या पिंका टाकणे शक्य असते पण सर्व प्रतिसाद वाचून, लेख वाचून संपादन करणे मला शक्य नाही.

४. हे काम जमेल का नाही याबाबत डोक्यात विचार सुरु होतेच, पण चटकन 'आता जमणार नाही' असे कळवले नाही ती माझी चूक झाली.

माझ्या मुळे कोणाची गैरसोय होत असल्यास/ झाली असल्यास कृपया माफ करा.

किमयागार's picture

14 Dec 2007 - 7:55 pm | किमयागार (not verified)

प्रमोद देवांचे प्रतिसाद उडवले जाणे हे तांत्रिक बिघाड असले तरी विनोदांतील प्रतिसाद उडवून त्यावर पंचायत समितीच्या नावाने टिप येणे हे काही तांत्रिक बिघाडाचे लक्षण वाटत नाही.

हा हा हा!! आमच्या प्रमोद आजोबांईतकी इथली सगळीच मंडळी दुधखुळी नाहीत म्हणायचं तर!
अध्यक्षांचा १६ भुमिका असणारा एकपात्री प्रयोग मात्र आता चांगलाच रंगात आला आहे.
वा अध्यक्ष परफॉरम्न्स पाहून "मझा आ गया!!"

-कि'गार
********************************************
अल्कोहोलचा परिणाम, दुसरे काय?

गारंबीचा बापू's picture

14 Dec 2007 - 4:58 pm | गारंबीचा बापू

बरं झालं तात्या तू निवेदन दिलंस.

पण त्या बाळासाहेब चौगुल्याच्या ओंगळवाण्या लेखनावरील माझा आक्षेप कायम आहे आणि तो जेव्हा जेव्हा असले काही लिहील, तेव्हा तेव्हा मी त्याला विरोध करून त्याचे लेखन काढून टाकण्याची मागणी जाहीरपणे करेन.

लोकशाहीच्या पडद्यामागे लपून पंचायत समितीच्या एका सदस्याने बाळासाहेबाच्या गलिच्छ लेखनाचे समर्थन करावे ही गोष्ट मलाच काय कोणत्याही सुसंस्कृत माणसाला पटणारी नाही.

त्यामुळे तुझ्या त्या पंचायत समिती सदस्याला योग्य ती समज तू दे.

बापू

आजानुकर्ण's picture

14 Dec 2007 - 5:02 pm | आजानुकर्ण

>>लोकशाहीच्या पडद्यामागे लपून पंचायत समितीच्या एका सदस्याने बाळासाहेबाच्या गलिच्छ लेखनाचे समर्थन करावे ही गोष्ट मलाच काय कोणत्याही सुसंस्कृत माणसाला पटणारी नाही.

बाळासाहेबांचे लेखन गलिच्छ आहे की नाही ही व्यक्तिनिरपेक्ष गोष्ट आहे.
सदर लेखनाचे थेट समर्थन मी केलेले नाही, लेखन ज्या पद्धतीने गेले त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

असो.

गारंबीचा बापू's picture

14 Dec 2007 - 6:16 pm | गारंबीचा बापू

बाळासाहेबांचे लेखन गलिच्छ आहे की नाही ही व्यक्तिनिरपेक्ष गोष्ट आहे.

अहो महाशय,

सामाजिक संकेतस्थळावर सामाजिक संकेत हे वैयक्तिक मतापेक्षा महत्वाचे आहेत. उद्या कोणी नागडे फोटो इथे चिकटवले तर तुम्ही व्यक्तिसापेक्ष म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणार की गलिच्छ म्हणून ते काढून टाकणार? समितीवर आहात तर जरा जबाबदारीने बोला की.

सदर लेखनाचे थेट समर्थन मी केलेले नाही, लेखन ज्या पद्धतीने गेले त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

तुम्ही व्यक्तिसापेक्षता आणि लोकशाहीच्या टिमक्या वाजवत होतात.

तेव्हा खरं तर तुमचं हे काम होतं की ते लेखन ताबडतोब उडवणं आणि तशा स्वरूपाचे लेखन पुन्हा त्याकडून होणार नाही यासाठी तातडीने त्याच्यावर कारवाई करणं.

त्याला व्यनि पाठवून तंबी देणं, पुन्हा असलं लेखन त्याच्याकडून आलं तर त्याचा आयडी ब्लॉक होईल हे सांगणं, हे तुमचं काम होतं.

पण आपलं काम सोडून तुम्ही भलतीकडेच लक्ष घालत बसलात. तुमच्या 'प्रतिष्ठित' मित्रांना तुम्ही असल्या धर्तीचे विनोद कसे ऐकवले त्याची उदाहरणे तुम्ही देत होतात.

बापू

तुम्ही जो व्यक्तिनिरपेक्षता असा शब्द वापरला आहे तो चुकीचा आहे. तो व्यक्तिसापेक्षता असा हवा.

धर्मनिरपेक्षता शब्दावरून तुम्ही हा शब्द बनविला आहे असे वाटते.

आजानुकर्ण's picture

14 Dec 2007 - 6:17 pm | आजानुकर्ण

व्यक्तिनिरपेक्षता व व्यक्तिस्वातंत्र्याची तुमची व्याख्या जर तसले फोटो चिकटवणे व ओंगळवाणे लेखन इतकीच असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. माझी व्याख्या तशी नाही.

असो. हा माझा या चर्चेवरचा शेवटचा प्रतिसाद.

गारंबीचा बापू's picture

14 Dec 2007 - 6:23 pm | गारंबीचा बापू

अहो तुमची व्याख्या काहीही असो. इथे प्रश्न आहे की समितीचा एक सदस्य म्हणून तुमची जबाबदारी काय होती?

तुम्हाला व्यक्तिगत पातळीवर असले ओंगळवाणे लेखन आवडत असले तरी संकेतस्थळावर तुमच्या आवडीनिवडी न राबवता, सामाजिक मूल्यांचा मान राखणे हे तुमचे कर्तव्य होते. ते तुम्ही केले नाहीत हेच आम्ही सांगतोय.

तुमच्या व्याख्या काय आहेत याच्याशी आम्हाला काय करायचायं? त्या असू द्यात तुमच्यापाशीच.

समितीचा सदस्य म्हणून तुमची काय जबाबदारी आहे याच्याशी आम्हाला मतलब.

बापू

विसोबा खेचर's picture

14 Dec 2007 - 5:04 pm | विसोबा खेचर

बापूसाहेब,

त्यामुळे तुझ्या त्या पंचायत समिती सदस्याला योग्य ती समज तू दे.

आपल्या सूचनांबद्दल धन्यवाद, परंतु एक तर मी कुणालाही समज वगैरे देऊ शकत नाही/इच्छित नाही आणि दुसरे म्हणजे यापुढे पंचायत समितीवरील कुणाशिही काहीही भाष्य करण्याची माझी इच्छा नाही!

तात्या.

किमयागार's picture

14 Dec 2007 - 8:06 pm | किमयागार (not verified)

आपलीच प्यादी आपल्यावरच उलटली. आता आमचे ओरिजीनल पात्र त्यांना उत्तर देणार नाही! त्यांना आमचे कलापथक बघून घेईल.

-कि'गार
******************************************
अल्कोहोलचा परिणाम, दुसरे काय?

विकास's picture

14 Dec 2007 - 5:38 pm | विकास

तात्या, तुमचा प्रतिसाद आत्ता सकाळी उठल्या उठल्या वाचला! आपण असे स्पष्ट उत्तर लिहील्यावर ते पटण्यासारखे आहे आणि आपल्यावर विश्वासही आहे.

आता प्रश्न आम्ही (मिसळपाव पंचायत समिती सदस्य) तुमच्याशी का संपर्क साधला नाही तो. माझ्या पुरते बोलायचे तर मला काल (माझ्या) सकाळी हा प्रकार समजला पण मी संध्याकाळी तो बघू शकलो. कालच मला हे पण समजले की माझे अकांऊट कोणीतरी फोडण्याचा प्रयत्न केला ते. ज्या कोणी केला त्याने माझ्याबाबतीत असे का केले हा प्रश्न पडला आणि आत्ता पर्यंत आलेल्या प्रतिसादावरून तसा अनुभव इतर कोणाला आला असे वाटत नाही. मला काळजी त्याची जास्त होती, की माझ्या नावाने कोणी काही दिवे लावलेत का ते...

त्या संदर्भात आणि मी "इतरांचे प्रतिसाद उडवले नाहीत" असे सांगणारी प्रतिक्रीया मी लिहीली आणि त्याचा दुवा आपल्या खरडवहीत दिलापण.. माझे नंतरचे प्रतिसाद पाहीले तरी त्यात आपल्यावर आणि "फॉर दॅट मॅटर" इतरांवर पण मी काही उलटसुलट लिहीले नाही. नंतर सर्कीटरावांनी त्यांच्या थिअरी प्रमाणे आपण केले असावे असे नवीन लेखन केले. त्यावर आपण बराच वेळ (आमच्या रात्रीच्या) आलेले असूनही जेंव्हा पटकन किमान "तो मी नव्हेच" इतके उत्तर दिले नाहीत. तेंव्हा झोपायला जायच्या आधी मी लिहीले की "सायलेन्स कॅन बी मिसइंटरप्रीटेड ऍज ऍक्सेप्टन्स" असे लिहीले आणि आपल्याला उत्तर लिहायची विनंती केली. त्यावर आपला वरील खुलासा आपण जवळ जवळ पाच-सहा तासांनी केलात.

संवादाचा अभाव हा विसंवाद होण्यास कारणीभूत असतो. या सर्व घटनेत हाच प्रकार परत दिसला. जसे आमच्या पैकी कोणी आपल्यास व्य. नि. लिहीला नसेल तर ते आपल्यातील विसंवादास कारण असले, तसेच आपले ताबडतोब उत्तर नसणे (आलेले दिसून) हे घडणे पण सार्वजनीक विसंवादास कारण आहे, विशेष करून इंटरनेटच्या काळात जेंव्हा "इन्स्टंट रिस्पॉन्सेस"ची अपेक्षा असते तेंव्हा.

त्यात आपण ज्या पद्धतीने हे स्थळ चालू केले त्याप्रमाणे हे व्हर्चुअल असले तरी ती पब्लीक सर्व्हीस आहे. (त्यात आम्ही पण सदस्य म्हणून आहोतच) आणि येथे म्हणतात त्या प्रमाणे तुमच्या साठी आणि पंचायतसमितीसाठी पण Public Service is a thankless job... Damned if you do and damned if you don't!

प्रमोद देव's picture

14 Dec 2007 - 5:49 pm | प्रमोद देव

संवादाचा अभाव हा विसंवाद होण्यास कारणीभूत असतो. या सर्व घटनेत हाच प्रकार परत दिसला.
विकासरावांच्या ह्या विधानाशी पूर्णपणे सहमत आहे.

चित्रा's picture

14 Dec 2007 - 6:37 pm | चित्रा

तात्या,

तुमचे निवेदन स्पष्ट आहे, ते खरेही असावे असे समजून चालते.
पण हे सर्व चालले आहे या सर्वाचे मूळ कारण माझ्या मते मागची ओझी कोणीच टाकून देत नाही हे आहे. निदान तुम्ही आतातरी ती टाकून द्या हा न मागता दिलेला सल्ला. आणि बाकीही सर्वांना अशीच विनंती/सल्ला.

दुसरे - नीलकांतांना वेळ होत नसला तर एक उपाय आहे - तुम्हालाही या संकेतस्थळावर थोडेफार बदल करता येतील इतपत संगणकीय ज्ञान मिळवायला हरकत नाही. कठीण वाटेल पण कठीण नाही(माझ्या स्वतःच्या अनुभवातून ). ते काही रॉकेट सायन्स नाही. याप्रमाणे निदान तुम्ही जेव्हा नीलकांतला शक्य नाही तेव्हा त्याला सांगून तुम्ही काही बदल करू शकता. ते बदल काय आहेत हे सर्वांना कळावे म्हणून ते नोंदवण्याची एक पब्लिक स्पेस असली तर हे अजिबात कठीण नाही आणि त्यात पारदर्शकता राहू शकते. तेही होत नसल्यास नीलकांतांशिवाय अजून कोणाला वेळ असल्यास त्यांच्याकडून तात्पुरती मदत घेऊ शकता. हा वेळेचा सदुपयोग होईल.

त्याहूनही महत्त्वाचे -
पहिल्याने इथे काय लिखाण चालेल, याच्या स्पष्ट कल्पना / स्पष्ट धोरण असल्या/असले पाहिजे - हे मी मागे उपक्रमाच्या संपादकांनाही लिहीले होते - त्यांचे त्यावर मला तरी उत्तर आले नव्हते. सदस्यांची नाराजी ओढवून घेऊ नये यासाठी संपादक मंडळाने ही धोरणे लिहीणे जरूरीचे आहे. हे माझ्या ओळखीतील संपादकांना मी सांगितलेले आहे. पण ते एकदा सर्वांना उद्देशून लिहीते (उशीर झाला असला तरी). हे लिहायला उशीर केला याची शिक्षा म्हणून हवे तर त्या तयार करायला सध्याच्या मंडळावरील कोणी तयार असल्यास त्यांना मी मदत करू शकते - डिसें. च्या शेवटच्या आठवड्यात २-३ दिवस मला वेळ आहे. मात्र त्यानंतर त्या कशा प्रकारे वापरल्या जातात हे पहायला कोणीतरी लागेलच - ती जबाबदारी मी स्विकारू शकत नाही.

दुसरे, मिपाची ओळख "नक्की" काय म्हणून ठेवायची याचाही विचार तुम्ही मालक म्हणून करावा हा (अजून एक जाता जाता दिलेला) सल्ला. लोकशाहीने चालणारी चावडी असल्यासारखे ऐसपैस संकेतस्थळ अशी ओळख असली तरी हरकत नाही, पण मग ती ओळख कायम असू देत.
असो.

विसोबा खेचर's picture

14 Dec 2007 - 7:27 pm | विसोबा खेचर

चित्राताई,

आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार..

पहिल्याने इथे काय लिखाण चालेल, याच्या स्पष्ट कल्पना / स्पष्ट धोरण असल्या/असले पाहिजे
सदस्यांची नाराजी ओढवून घेऊ नये यासाठी संपादक मंडळाने ही धोरणे लिहीणे जरूरीचे आहे.

मिपाच्या पंचायत समितीची निवड झाल्यावर लगेचंच मिपाची घटना लिहा, ध्येयधोरणं लिहा, तुम्ही लिहाल ती ध्येयधोरण मला मान्य आहेत, तो ड्राफ्ट मला दाखवायचीही गरज नाही असंच मी पंचायतीच्या सर्व मंडळींना सांगितलं होतं. मला आठवतंय, विकासरावांनी थोडाफार पुढाकार घेतलाही होता पण पुढे काहीच झालं नाही!

हे लिहायला उशीर केला याची शिक्षा म्हणून हवे तर त्या तयार करायला सध्याच्या मंडळावरील कोणी तयार असल्यास त्यांना मी मदत करू शकते

मदतीचा हात पुढे केल्याबद्दल मनापासून धन्यवाद...

दुसरे, मिपाची ओळख "नक्की" काय म्हणून ठेवायची याचाही विचार तुम्ही मालक म्हणून करावा हा (अजून एक जाता जाता दिलेला) सल्ला. लोकशाहीने चालणारी चावडी असल्यासारखे ऐसपैस संकेतस्थळ अशी ओळख असली तरी हरकत नाही, पण मग ती ओळख कायम असू देत.

खरं सांगायचं तर यापुढे मी या कशातच लक्ष घालणार नाही. एखाद्या गोष्टीचा उगिचंच विनाकारण डोक्याला ताप होऊ लागला तर मी तो जास्त करून न घेता त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि मोकळा होतो! माझी हौस म्हणून मी हे संस्थळ सुरू केलं. त्यामुळे आता फक्त इथे भरभरून लिहायचं काम मी करीन! इतरांनीही इथे अवश्य यावं, मिपा आवडलं तर इथे वाचावं, लिहावं! मी त्यांच्या लेखनाचाही आस्वाद घेईन, आवडलं तर भरभरून दादही देईन!

राहता राहिला प्रश्न लोकांनी माझे दोष काढण्याचा, मला नांवे ठेवण्याचा, तर त्याचीही मला सवय आहे! कारण काही लोक फक्त तोच उद्योग करत वावरत असतात ही वस्तुस्थिती आहे!

बाकी, मिसळपावचं जे काही व्हायचं असेल ते होईल. चामारी फार फार तर काय होईल? लोकं मिसळपाववर वैतागून इथे येईनाशी होतील आणि मिपा बंदच पडेल ना? पडू देत तिच्यायला!

आगे अल्ला मालिक! :)

आपला,
(बेफिकीर!) तात्या.

चित्रा's picture

14 Dec 2007 - 9:10 pm | चित्रा

बाकी, मिसळपावचं जे काही व्हायचं असेल ते होईल. चामारी फार फार तर काय होईल? लोकं मिसळपाववर वैतागून इथे येईनाशी होतील आणि मिपा बंदच पडेल ना? पडू देत तिच्यायला!

असे असल्यास प्रश्नच नाही. हे होऊ नये म्हणून वरील सूचना होत्या.

ऋषिकेश's picture

14 Dec 2007 - 8:11 pm | ऋषिकेश

आत्ता हे निवेदन वाचलं. खरं सांगायचं तर हे सगळं बघुन वाईट वाटलं. हे फार वैयक्तीक पातळीवर चालू आहे असं वाटलं (जरी सगळे वैयक्तिक काही नाहि म्हणून सांगत असले तरी). म्हणजे एखाद्याचं म्हणणं पटलं तरी केवळ पुर्वी एखाद्याने आपल्याला डिवचलं आहे त्याला असा सोडायचा नाही हा आवेश दिसला याचं वाईट वाटतं.

आता झालं गेलं विसरून पंचायत समितीने आणि तात्यांनी मनावर घेऊन पारदर्शक घटना लिहावी कारण इथे स्वातंत्र्य याचा अर्थ कही जणांकडून स्वैराचार असा घेतला जातो आहे असं गेल्या महिनाभर असलेल्या प्रेक्षकाच्या भुमिकेतून वाटलं. काहि मदत लागल्यास सांगा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन.

मी... तुम्ही.. खरंतर आपण सगळेच बाकी काहि मदत नाहि करू शकलो तर इथे नियमीत लेखन करून हे स्थळ नक्कीच फुलवू शकतो.

लोकशाही म्हटली की असे क्षण यायचेच. तेव्हा कात टाकून हे स्थळ बहरास आणूया कारण प्रशासकांच्या टाचेखाली नसलेलं आपलं असं हेच एक स्थळ आहे.

कात टाकू पाहणार्‍या मिसळपावच्या वाटचालीला शुभेच्छा!

-(मिसळप्रेमी)ऋषिकेश

विसोबा खेचर's picture

14 Dec 2007 - 9:41 pm | विसोबा खेचर

तेव्हा कात टाकून हे स्थळ बहरास आणूया

धन्यवाद ऋशिकेशभाऊ! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Dec 2007 - 8:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरे तर या विषयावर आम्ही बोलणार नव्हतो. पण, तात्यांनी केलेला खूलासा पटणारा होता. म्हणुन या विषयावर लिहावे वाटले. त्याचे कारण असे की, सन्माननीय सदस्य श्री चौगुले यांच्या लेखनावर आमचाही प्रतिसाद उडविल्या गेला होता.( पंचायत समितीचे सदस्य अशा लेखनाकडे लक्ष देतील काय ? असे आम्ही विचारले होते. ) अर्थात आमचा हा प्रतिसाद उडविण्यासारखा नसावा असे आम्हाला तरी वाटते. ती काही तरी तांत्रिक गडबड असेल असे आम्हाला तरी वाटते.

बाकी, श्री चौगुले यांचे लेखन आम्हाला तरी आवडले नव्हते. सार्वजनिक संकेतस्थळावर असे लेखन येऊ नये असे आमचे मत आहे. खरे तर पंचायत समितीचे अशा लेखनाकडे आणि मागील काही लेखनांकडे दुर्लक्ष झाले असे आम्हास वाटते. अर्थात त्यांना वयक्तिक कार्यबाहुल्यामुळे तितका वेळ सदस्यांचे लेखन आणि प्रतिक्रिया वाचण्यास वेळ मिळत नाही, यावरही आमचा विश्वास आहे. लोकशाही आहे, याचा अर्थ कोणतेही आणि कितीही घाणेरडे लेखन करावे असा त्याचा अर्थ होत नसावा असे वाटते. पण, का कोणास ठाऊक मिसळपाव हे संस्थळ नीट चालू नये...........असेच काही मंडळी प्रयत्न करतांना दिसतात, कदाचित आमचा गैरसमजही असेल. पण, अधिकाधिक वेळ आम्ही मिसळपाववर वावरतो म्हणुन तसे वाटते. अर्थात आमचे हे निरिक्षण चुकीचे देखील असू शकते. मात्र येणा-या काळात पंचायत समितीचे सदस्य वाढवले पाहिजे असे वाटते. (कॉ. मेंबर असतात तसे ) जेणे करुन संकेस्थळावर कोणत्यातरी सदस्याचे सतत लक्ष राहील . दर्जेदार लेखन व्हावे, जराशी खेचाखेची व्हावी, जरासे मनोरंजन व्हावे आणि बरेच काही....मात्र हे होतांना पंचायत समिती सदस्यांचा जरासा धाकही असावा ....अर्थात संस्थळाच्या मालकांनी ठरवायचे आहे, काय बदल करावे ते. आणि या बाबतीत संस्थळावर काहीतरी बदल केलेच पाहिजेत, करावेच लागतील. आम्हीही वाटल्यास काही मदत करु. ते बदल काय असावेत हे संस्थळावर वावरणा-या आणि दुनियादारीची ओळख असलेल्या दादा माणसाला आम्ही तरी सांगण्याची गरज नाही हेही आम्हाला ज्ञात आहे.

आपला.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे.
(मिसळपावचा चाहता.)

विसोबा खेचर's picture

14 Dec 2007 - 9:13 pm | विसोबा खेचर

अर्थात संस्थळाच्या मालकांनी ठरवायचे आहे, काय बदल करावे ते. आणि या बाबतीत संस्थळावर काहीतरी बदल केलेच पाहिजेत, करावेच लागतील. आम्हीही वाटल्यास काही मदत करु.

बिरुटेसाहेब,

आपल्या आस्थेबद्दल धन्यवाद, मदतीच्या हाताबद्दलही धन्यवाद. परंतु आम्हाला सध्या तरी काहीही करावेसे वाटत नाही, कुणाला काहीही सांगावेसे वाटत नाही! परमेश्वराची आणि आपल्यासारख्या हितचिंतकाची इच्छा असेल तर मिपा अगदी अवश्य सुरू राहील, दणक्यात सुरू राहील! नाहीतर आपली मैत्री आहेच, मला तुमचा आणि तुमचा मला, ब्लॉगही माहिती आहे, तिथे भेटत जाऊ. आपणही कधी अवश्य मुंबईत या, मीही कधी औरंगाबादला आलो तर आपल्याला जरूर भेटेन! मजा करू तिच्यामारी! :)

अहो नाहीतरी एवीतेवी ही सगळी आभासी दुनिया! संगणक बंद की सगळं बंद! :) आमच्या सुदैवाने आमची इतरही दुनिया, दोस्त मंडळींची दुनिया, गाण्यातल्या लोकांची दुनिया खूप मोठी आहे, खूप समृद्ध आहे. आम्ही तिथे मन रमवू, धमाल करू! :)

तात्या.

राजे's picture

14 Dec 2007 - 8:57 pm | राजे (not verified)

येथे झालेल्या गोधळातून काही शिकलो व माझे शब्द वर नियम व अटी लागू केल्या आहेत त्या येथे पाहा व काही सुचना असतील तर तेथे लिहा ही विनंती.

माझे तर मत असे आहे की हेच नियम व अटी येथे देखील लागू करावेत फक्त संकेतस्थळाचे नाव बदला ;}

http://mazeshabd.ekbhasha.com/node/74

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

देवदत्त's picture

14 Dec 2007 - 9:51 pm | देवदत्त

परमेश्वराची आणि आपल्यासारख्या हितचिंतकाची इच्छा असेल तर मिपा अगदी अवश्य सुरू राहील, दणक्यात सुरू राहील!
अहो तात्या, मिपा सुरू राहिलच.
त्यास काही नाही होणार असा विश्वास आहे आणि आमच्या शुभेच्छाही.

भरपूर काही वाचायचे (आणि लिहायचेही) असताना अचानक मिपा बंद होण्याची भाषा वाचून वाईट वाचले. अहो, माझ्या ब्लॉग वर काही ना काही लिहिण्याचा विचार (?) मिसळपाव मुळेच तर बळावला. आधी फक्त विचार होते, पण कृती ह्या २ महिन्यात झाली.

अहो नाहीतरी एवीतेवी ही सगळी आभासी दुनिया! संगणक बंद की सगळं बंद! :)
मॅट्रिक्स सिनेमाची आठवण झाली हो. :)

मनोज's picture

14 Dec 2007 - 10:05 pm | मनोज

मुद्दइ लाख बुरा चाहे तो क्या होता है ? वही होता है जो मंजूर ए खुदा होता है !
मिसलपाव ला भावी वाटचालीला खुप सार्‍या शुभेच्छा!!!

एक मराठी माणुस - मन्या :)

सुनील's picture

14 Dec 2007 - 10:13 pm | सुनील

या सर्व वाद-विवादातून, आरोप-प्रत्यारोपातून, समज-गैर-समजातून मिपा पुन्हा बाहेर येओ हीच शुभेच्छा आणि तसा तो येईल असा विश्वासही!!

(सदैव आशावादी) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सर्किट's picture

15 Dec 2007 - 2:12 am | सर्किट (not verified)

तात्यासारख्या मनमोकळ्या स्वभावाच्या माणसाकडून हेच अपेक्षित होते.

नेहमी अशा प्रकारचे गैरसमज दूर करण्यासाठी तात्याकडून लगेचच खुलासे होतात.

ह्या खुलाशाला वेळ लागल्याने "दाल में कुछ काला है" असे सदस्यांना वाटणे हे साहजिकच आहे.

परंतु आता, झाले-गेले वसरून ह्या स्थळाला बहर आणण्याच्या कामात सर्व सदस्यांची मदत होईल, ही अपेक्षा.

ह्या स्थळाची घटना लिहिण्यासाठी पंचायत समितीच्या व्यतिरीक्त धनंजय आणि गुंडोपंतांची मदत घ्यावी, असे सुचवतो.

- सर्किट

विसोबा खेचर's picture

15 Dec 2007 - 2:31 am | विसोबा खेचर

परंतु आता, झाले-गेले वसरून ह्या स्थळाला बहर आणण्याच्या कामात सर्व सदस्यांची मदत होईल, ही अपेक्षा.

हे तुम्ही म्हणताय? नवल आहे..! या संस्थळाला बहार यावी असं तुम्हाला वाटतंय यावर विश्वास बसत नाहीये परंतु आनंद नक्कीच वाटतो आहे!

ह्या स्थळाची घटना लिहिण्यासाठी पंचायत समितीच्या व्यतिरीक्त धनंजय आणि गुंडोपंतांची मदत घ्यावी, असे सुचवतो.

गुंडोपंतांचा येथील वावर अगदीच कमी असल्यमुळे, तसेच माहितीपूर्ण संस्थळांवर कविता चालत नसल्याने केवळ आपल्या कविता लिहिण्यापुरतेच ते इथे येतात, सबब 'मालक' या नात्याने त्यांना यात सहभागी करू नये असे आम्हाला वाटते! त्याचप्रमाणे कोलबेर आणि आजानुकर्ण यांचाही यापुढे मिपाच्या कुठल्याही कामात सहभाग नसावा असेही 'मालक' म्हणून आम्हाला वाटते. अर्थात, ते लोकनियुक्त सभासद असल्यामुळे आमचा नाईलाज आहे हा भाग वेगळा!

धनंजयाच्या नावाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. त्याचप्रमाणे आमच्या 'मालकीच्या' अधिकारात आम्ही प्रा. डॉ, दिलीप बिरुटे, श्री प्रकाश घाटपांडे, व श्री प्रमोद देव या वरीष्ठ सभासदांनाही घटनेच्या कामात सहभागी होण्याची विनंती करू!

अवांतर - गेले दोन दिवस 'मालक!', 'मालक!', 'मालक कुठे आहेत?', 'मालकांचा खुलासा हवा आहे!' असा आमचा एवढा उदो उदो झाला की आता आम्हीही थोडंसं 'मालकासारखं' वागायचा प्रयत्न करणार आहोत! (आजपर्यंत कधी तसे वागलो नाही हेही तितकंच खरं!)

असो,

आपला,
तात्या अभ्यंकर,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.

सर्किट's picture

15 Dec 2007 - 2:35 am | सर्किट (not verified)

अवांतर - गेले दोन दिवस 'मालक!', 'मालक!', 'मालक कुठे आहेत?', 'मालकांचा खुलासा हवा आहे!' असा आमचा एवढा उदो उदो झाला की आता आम्हीही थोडंसं 'मालकासारखं' वागायचा प्रयत्न करणार आहोत! (आजपर्यंत कधी तसे वागलो नाही हेही तितकंच खरं!)

म्हणजे, मिसळपावाचे दुसरे मनोगत करायचे असा निर्णय घेतला आहेस का तात्या ?

तसे स्पष्ट सांग !

आम्ही येथे का येतो, याचा जरा विचार कर, म्हणजे मग आम्ही काय म्हणतो, त्यावर विश्वास बसेल.

- सर्किट

कोलबेर's picture

15 Dec 2007 - 2:51 am | कोलबेर

त्याचप्रमाणे कोलबेर आणि आजानुकर्ण यांचाही यापुढे मिपाच्या कुठल्याही कामात सहभाग नसावा असेही 'मालक' म्हणून आम्हाला वाटते.

मुळात आपण आमचा समावेश केलात हे जितके 'अनपेक्षीत' होते तितकेच हे लिखाण 'अपेक्षीत' होते.
आम्ही आमचा राजीनामा आधीच दिला आहे. तेव्हा तुमच्या 'मालक' ह्या भुमिकेतुन योग्य ती कारवाई करा.
गेल्या ४८ तासात पाहायला मिळालेले मनुष्यस्वभावाचे पैलू मात्र बरेच काही शिकवून गेले. बर्‍याच गृहितकांना तडा गेला.
तेव्हा आमचा निरोप घ्यावा.
-कोलबेर

नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी
जिणे गंगौघाचे पाणी

कशाचा न लागभाग
कशाचा न पाठलाग
आम्ही हो फुलांचे पराग

आम्हा नाही नाम-रूप
आम्ही आकाश स्वरूप
जसा निळा नळा धूप

पुजेतल्या पानाफुला
मृत्यू सर्वांग सोहळा
धन्य निर्माल्याची कळा

-बा. भ. बोरकर

आजानुकर्ण's picture

15 Dec 2007 - 11:06 am | आजानुकर्ण

माझेही मत असेच आहे. मिसळपावच नव्हे तर इतर कोणत्याही संकेतस्थळाला संपादकांची काय गरज आहे? एकमेकांवर विश्वास ठेवून, म्याच्युरिटीने आपण का वागू शकत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

मिसळपावाचा एक सदस्य म्हणून मात्र आम्ही इथे सर्वांना पिडत राहूच.

गारंबीचा बापू's picture

15 Dec 2007 - 11:56 am | गारंबीचा बापू

गुंडोपंतांचा येथील वावर अगदीच कमी असल्यमुळे, तसेच माहितीपूर्ण संस्थळांवर कविता चालत नसल्याने केवळ आपल्या कविता लिहिण्यापुरतेच ते इथे येतात, सबब 'मालक' या नात्याने त्यांना यात सहभागी करू नये असे आम्हाला वाटते!

सहमत.

त्याचप्रमाणे कोलबेर आणि आजानुकर्ण यांचाही यापुढे मिपाच्या कुठल्याही कामात सहभाग नसावा असेही 'मालक' म्हणून आम्हाला वाटते.

श्री कोलबेर यांच्याबाबतीत मी काही बोलत नाही. पण आजानुकर्णांची असमंजस वृत्ती कोणत्याही संकेतस्थळाला घातक ठरेल यात शंका नाही. त्यांनी स्वत:च सांगितले आहे की ते इथे लोकांना 'पिडण्यासाठी' येणार आहेत. अशा मनोवृत्तीच्या माणसाला धोरणात्मक बाबींपासून दूर ठेवावे. कारण त्यांचा उपयोग होण्यापेक्षा उपद्रवच जास्त होईल.

धनंजयाच्या नावाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. त्याचप्रमाणे आमच्या 'मालकीच्या' अधिकारात आम्ही प्रा. डॉ, दिलीप बिरुटे, श्री प्रकाश घाटपांडे, व श्री प्रमोद देव या वरीष्ठ सभासदांनाही घटनेच्या कामात सहभागी होण्याची विनंती करू!

चारही नावांशी सहमत. १००% पाठिंबा

बापू

गुंडोपंत's picture

16 Dec 2007 - 2:43 pm | गुंडोपंत

गुंडोपंतांचा येथील वावर अगदीच कमी असल्यमुळे, तसेच माहितीपूर्ण संस्थळांवर कविता चालत नसल्याने केवळ आपल्या कविता लिहिण्यापुरतेच ते इथे येतात, सबब 'मालक' या नात्याने त्यांना यात सहभागी करू नये असे आम्हाला वाटते!

हे मात्र योग्यच आहे तात्या. जर मी येथे येवून तितका वेळ देवू शकत नसेल हे स्पष्ट दिसते आहे अशा वेळी जबाबदारी देण्यात काय अर्थ आहे? शिवाय मलाही वाटत नाही की मी इतके काम करू शकेन. आळस हा महत्वाचा मुद्दा नि दारूचा अंमल नसतांना मिळणारा वेळ हा दुसरा महत्वाचा मुद्दा.

मी कविता लिहिण्यापुरताच येथे येतो असे म्हणणे मात्र योग्य नाही. मी येथे येत जात असतोच... तसेच असते तर कविता तिकडे मैत्रीपार्कात नसती का टाकता आली? आणि असेही मी काय माहितीपूर्ण तरी लिखाण करतोय हो ? ;)))

मला संपादन वगैरे जबाबदारी नको हे मी मागेही जाहीर सांगितले आहेच, आताही सांगतो.
मी आपला मवाली म्हणूनच बराय! संपादनाची पोलिसी कामे मला नाही जमणार...

आपला
मवाली, आळशी नि दारूड्या
गुंडोपंत

गारंबीचा बापू's picture

15 Dec 2007 - 11:31 am | गारंबीचा बापू

मिसळपावाचा एक सदस्य म्हणून मात्र आम्ही इथे सर्वांना पिडत राहूच.

बरं झालं तुम्हीच ही कबुली दिलीत. तुमच्या येथिल वर्तणुकीबद्दल आमच्या व्याख्या नाही विचारल्यात.

बापू

उत्तर शोधत आहे's picture

15 Dec 2007 - 10:21 pm | उत्तर शोधत आहे (not verified)

ईतरांना माहीत नसावे की ड्रुपल काय चीझ आहे पण मला व येथील काही सदस्यांना द्रुपल वापरणे येते व ह्यातील कमी व कमजोरी आम्हाला माहीत आहेत.

उदा.
देवदत्त
राजे >> मी प्रतिसाद लिहीत होतो... मी नाही हो नष्ट केले ते लेखन
टिकाराम
किमयागार
मनोज
व्यंकट

वेळ शक्यतो ... आसपास [( शनी, 2007-12-15 १०:०७) .]

हे सद्स्य जेव्हा येथे उपलब्ध होते.......... जेव्हा मी किमयागार ह्यांच्या एका लेखनाला " बेसनलाडूच्या वरील कविता कोठे गेली" हे विचारना करणारे लेखन होते... व मी प्रतिसाद लिहला [जो सर्वात पर्थम} व त्यांचे पुर्व-परिक्षण करु पर्यंत तो लेख / लेखन नष्ट केला गेला ... का हे सोडाच... पण कसे हे सांगा पहिल्यादां.

उत्तर हवे... लेखन कोठे गेले व माझा प्रतिसाद कूठे गेला ते.

राज जैन

राजे's picture

15 Dec 2007 - 10:29 pm | राजे (not verified)

जर तुम्ही खोटे नाही आहात अथवा संकेतस्थळावरील तुमचे "लोकशाही" नियुक्त सदस्य ह्यामध्ये नाही आहे असे तुम्हाला वाटत असेल तर काही ही फेरफार न करता.. व्यवस्थापन आयडीचा पासवर्ड व सद्स्य नाव मला व्यनी. ने अथवा दुरध्वनी द्वारे द्यावी ही विंनती.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

उत्तर शोधत आहे's picture

15 Dec 2007 - 11:16 pm | उत्तर शोधत आहे (not verified)

काही तरी ठीक करता करता.... मीच बिघडलो आहे....
कोणाला तरी सपोर्ट करता करता... मीच बिन सपोर्ट राहीलो आहे...
काही व्यक्तीरेखांना व्यक्ति समजता समजता.... मीच हरवलो आहे...
काही प्रश्नांची उत्तरे देता देता..... मीच काही प्रश्न विचारत आहे...
कधी कधी प्रश्न शोधता शोधता....... मीच उत्तर शोधत आहे.. मीच उत्तर शोधत आहे......

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

गारंबीचा बापू's picture

15 Dec 2007 - 11:36 pm | गारंबीचा बापू

अरे आता पुरे

सकाळ संध्याकाळ इथे कधीही आलो तरी नुसती भांडणं.

लोकशाही , सरपंच, पंचायत समिती, ते एक येड** त्या पंचायत समितीतलं.... वीट आलाय आता.

आता पूर्णविराम द्या या सगळ्या गोष्टींना आणि काहीतरी चांगलं लिहा.

जे काही भांडायचं असेल ते एकमेकांना इमेल पाठवून भांडा. आयमाय काढा एकमेकांची. पण ते इथे नको.

आम्ही इथे आल्या आल्या आमच्या मूडची वाट लावू नका.

बापू

मनोज's picture

16 Dec 2007 - 2:51 am | मनोज

बापू एक नंबर बोललात !!! - सहमत आहे.

आपलाच,
मन्या

प्राजु's picture

16 Dec 2007 - 6:06 am | प्राजु

तात्या,
माझा तुमच्यावर विश्वास आहे.
ज्यांना जे लिहायचे ते लिहूदेत. पण लिहीताना एका गोष्टीचे भान जरूर ठेवावे की आपल्या मिसळपावच्या "घरात" आमच्या सारख्या मैत्रिणीही आहेत. कोणतेही लेखन करताना जर तुम्हाला स्वतःला लाज किंवा घृणा वाटत असेल तर असे लेखन करण्याआधीच दहावेळा विचार करावा. तुमच्या कुटुंबीयांनी असे लेखन वाचले तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल हाही विचार करावा. असे केल्याने कदाचित ओंगळ आणि गलिच्छ लेखन कमी होईल. या कामी कोणत्याही तात्याची गरज नाही. गरज आहे फक्त स्वपरिक्षणाची . आणि तरिही अशाप्रकारचे लेखन आलेच तर पंचायत समितीने कोणताही विचार न करता किंवा आप्-पर भाव न ठेवता ते लेखन उडवावे. आणि मग त्यासाठी कोणीही आक्षेप घेऊ नये.
सगळे वाद विसरून नव्याने घर बांधू आपण. रुसलेल्या लाडवाची समजूत काढून त्यालाही मदतीला घेऊ.

भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर..
जरा विसावू या वळणावर...
या वळणावर...

- प्राजु. (होमसिक)

सुशील's picture

16 Dec 2007 - 7:54 am | सुशील

आम्हाला तात्या जसा आहे तसा त्याच्या शिव्यांसकट आवडतो. कुटुंबियांनी लिहिले तर काय वाटेल वगैरे वाटणार्‍यांसाठी मनोगत वगैरे स्थळे आहेतच की. इथले स्वरूप कसे असणार हे तात्याने आधीच स्पष्ट केले आह आणि ते मिसळपाव.कॉम ह्या नावातुनच प्रतित होते. ही साइट वरणभात.कॉम नव्हे.

रुसलेल्या लाडवाची समजूत काढून त्यालाही मदतीला घेऊ.

ह्याची गरज आहे असे मला तरी वाटत नाही. लाडू तसाही येतच राहतो. एकाची समजूत काढली की सगळेच लाडावतील. फक्त न्युसन्स असणार्‍या किमयागाराचे अकाउंट डीलिट केले आह मग त्याची पण समजुत काढायची का?

मुक्तसुनीत's picture

16 Dec 2007 - 6:15 am | मुक्तसुनीत

पण लिहीताना एका गोष्टीचे भान जरूर ठेवावे की आपल्या मिसळपावच्या "घरात" आमच्या सारख्या मैत्रिणीही आहेत. कोणतेही लेखन करताना जर तुम्हाला स्वतःला लाज किंवा घृणा वाटत असेल तर असे लेखन करण्याआधीच दहावेळा विचार करावा. तुमच्या कुटुंबीयांनी असे लेखन वाचले तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल हाही विचार करावा.

मनातले बोललात. शिवीगाळ, निंदानालस्ती या सर्व गोष्टी "मर्दाना" समजल्या जातात हे खरे. पण त्यात कसले पौरुष नेमके आहे ते मला नक्की समजले नाही अद्याप. इन एनी केस, अपशब्दांच्या मंत्रपुष्पाचा कंटाळा पुरुषानाही येऊ शकतो हे येथे नमूद व्हावे. मैत्रिणींइतक्याच मित्रानाही हे प्रकार नको आहेत.

ही साईट आवडते कारण ती मनमोकळ्या संवादाचे वचन देते. "मनमोकळे" म्हणजे अद्वातद्वा किंवा असभ्य मात्र नव्हे हे कुणाला वेगळे सांगायला नकोच.

प्राजु's picture

16 Dec 2007 - 6:24 am | प्राजु

"मनमोकळे" म्हणजे अद्वातद्वा किंवा असभ्य मात्र नव्हे हे कुणाला वेगळे सांगायला नकोच.
हे अगदी माझ्या मनातले बोललात..

- प्राजु.

ऋषिकेश's picture

16 Dec 2007 - 6:35 am | ऋषिकेश

मैत्रिणींइतक्याच मित्रानाही हे प्रकार नको आहेत... +१
"मनमोकळे" म्हणजे अद्वातद्वा किंवा असभ्य मात्र नव्हे हे कुणाला वेगळे सांगायला नकोच. ++१
गरज आहे फक्त स्वपरिक्षणाची +++१
आणि चारोळी तर आहाहा!!!! मनातलं बोललात!

अगदि मनातले बोललिस बघ!

संजय अभ्यंकर